Login

फुकटचा सल्ला

फुकटचा सल्ला
सदाभाउ आपलं घर मोठ्या उत्साहात बांधत होते. त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांचं संपूर्ण आयुष्यभरचं स्वप्न पूर्ण होत होतं. लहानपणापासून ते छोटया घर असलेल्या घरात राहत होते. रिटायर झाल्यावर त्यांनी त्याचं स्वप्न पूर्ण करायला घेतल होत. स्वतः च हक्काचं छप्पर बांधण्याचं.

आता त्यांचं स्वप्न पूर्ण होत होतं. त्यांचा सगळा दिवस घर बांधण्याच्या धावपळीतच जात होता. ते स्वतः उभ रहात होते. आपल इतक्या वर्षाच स्वप्न साकार होतानाचा प्रत्येक क्षण ते डोळ्यात साठवत होते. असं म्हणायला हरकत नाही.

त्यांनी आपल्या बजेटपेक्षा जास्त पैसा खर्च केला होता. जस जसे घर पूर्ण होत जात होते, तस तसे त्यांच्या मनात आणि कुटुंबात आनंद वाढत होता. आपलं घर असण्याचं स्वप्न कोणालाच आवडत नाही?

एक दिवस मुंबईहून त्यांच्या वडिलांचे मित्र आले. तेंव्हा सदाभाऊच्या त्यांच्या घराच बांधकाम चालू होतं. मुंबई चे श्रीकांत काका आणि काकु बांधकाम चालु असलेलं घर पाहण्यासाठी आले. सदभाऊ आणि श्रीकांत काका यांच्या मधे वाटणी झाली होती.

श्रीकांत काकांनी त्यांचा हिस्सा सदाभाऊना विकला होता. त्यावेळीं त्यांना थोड लोन काढावं लागलं होतं. त्या नंतर बऱ्याच वर्षांनी सदाभाऊ नी या जमीनीवर घर बांधायचं ठरवलं होतं. त्याचं काम चालू होते. आज श्रीकांत काका आणि काकू ते घर बघायला आले होते.

घर पाहून त्यांनी सर्वात आधी म्हटलं,

" अरे हे तर खूपच लहानसं बांधलं आहे. एरिया ही चांगला नाही. "

" आणि हे काय ? अस फर्निचर करत आहे ? जुन्या पद्धतीचे ? "

" आता हे पी.ओ.पी चलत नाही. फाल्स सीलिंगचं युग आहे आता. माझ्या घरचं  इंटिरियर बघ. दिड कोट रुपये खर्च करून इंटिरियर केलं आहे. अठराव्या मजल्यावर घर आहे. करोडो रुपये लागले आहेत आमची बिल्डिंग तयार करण्यासाठी. समुद्राचा व्ह्यू काय मस्त दिसतो तुला सांगतो सदा " अस म्हणत त्यांनी आपल्या प्रशंसा करीत राहिले.

" त्यापेक्षा तुम्ही आमच्या इंटिरियर करणाऱ्या फर्म कडून इंटेरियर करून घ्या.त्यांच्या आयडिया अगदीं युनिक असतात." आपल्या नवऱ्याला सपोर्ट करत सुरेखा काकू म्हणल्या.

सदाभाऊ त्यांच्या निरर्थक गोष्टी ऐकत बसले. जेव्हा त्यांची बोलणे संपली, तेव्हा सदाभाऊ ने श्रीकांत काकांना म्हटलं,

" काका , तुम्ही असं करा एका नव्वद एक लाख रुपये माझ्या खात्यावर जमा करा. म्हणजे मग तुम्ही जे सांगाल तसंच इंटिरियर मी करून घेईन. कारण माझ्याजवळ जितक पांघरूण आहे तितकाच पाय पसरवू शकतो. मी माझ्या ऐपाती नुसार काम करून घेतलं आहे. आता आपल्या सल्ल्यानुसार काम करण्यासाठी पैसेही लागतील ना. आपणच दे द्या. आताच्या काळात तुमच्या भाच्यासाठी एवढं तर करूच शकता ना."

सदाभाऊची ही अजब मागणी ऐकुन काका चक्रावून गेले. त्यांना तर ठसकाच लागला. सदा अस काही म्हणेल अस त्यांना वाटलचं नव्हतं.

"अरे, तू काय बोलतोयस ? " काका म्हणाले.

"यात काय चूक आहे? न विचारता सल्ला देणं तर खूप सोपं आहे. मदत करणं कठीण. तू म्हणत आहेस तर थोडीशी मदतही कर. माझं घर आपल्या पसंतीचं होईल आणि जेव्हा तुमचं मन होईल तेव्हा येऊन रहा."

"अरे, मला महत्त्वाचं काम आठवल." काका गडबडी ने म्हणाले. त्यांनी झटकन आपला मोबाइल खिशातून काढला. नी नंबर लावत ते तिथूनच पळाले. काकु पण मी आले म्हणत त्यांच्या मागे पळाल्या.

खरंच म्हणतात ना, घर बांधलं जाईल तेव्हा मोफत सल्ला देणारे खूप असतात. पण हातात धरून काम पूर्णत्वाला नेणारं कोणीच सापडत नाही.

तुमचं काय मत आहे असा फुकटचा सल्ला देणाऱ्यांच्या बद्दल ?

समाप्त

© ® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.