Login

ह्या सुट्टीत मुलं काय करतायत? चकटफू ऑनलाईन कॉम्प्युटर क्लासेस

Your children have access to numerous free online courses, if you दोन kniw about them, now you know!

या सुट्टीत मुलं काय करतायत? चकटफू कॉम्पुटर कोर्सेस!

उन्हाळ्याची अर्धी सुट्टी तर संपत आली. सुट्ट्यांमध्ये गावाला जाणे, मनसोक्त खेळणे, आंबे फस्त करणे हे तर चालू असेलच. पण मग नंतर नंतर आता काय करायचे किंवा मुलांना काही शिकवता आले तर सगळी सुट्टी फुकट नाही जाणार असेही विचार पालकांचे सुरु होतात. तुम्ही पण ह्याच गटात मोडत असाल तर हा लेख अवश्य वाचा. ह्या लेखात पैसे खर्च न करता घरच्या घरी बसून शिकता येणाऱ्या आणि मुलांना आवडतील अशा बहुमूल्य संगणक आणि स्टेम कोर्सेसच्या लिंक्स दिल्यात 

सध्या रोबोटिक्स आणि AI (कृत्रिम बुध्दीमत्ता) हे परवलीचेशब्द झालेत. गेल्या काही दशकांपासून STEM ( Science, Technology, Engineering, and Mathematics) अभ्यासक्रमाला जास्त पसंती किंवा उठाव आहे. पूर्वी कॉलेज मध्ये गेल्यावर किंवा ती शाखा घेतल्यावर अभ्यास सुरू व्हायचा. पण आता अगदी प्रार्थमिक शाळेत किंवा त्याही आधीपासून मुलांना coding शिकवायला पालक उत्सुक असतात. मग साहजिकच त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन शेकडो प्रशिक्षण वर्ग ( classes) लाखो रुपयांच्या फिया आकारून मुलांना किंबहुना त्यांच्या पालकांना आकर्षित करून घेतात. पण बऱ्याच वेळा येवढे पैसे भरूनही मुलं गणितात तरबेज होतीलच, उत्तम coding skills शिकतीलच याची खात्री हे लाखोंनी फी अकरणारे कधीही घेत नाहीत.

STEM शिक्षणात यशस्वी होण्यासाठी काही मूलभूत कौशल्ये असली की मुलांना पुढचे शिक्षण सोपे जाते. काही मुलांकडे ती कौशल्ये उपजत असतात, तर काहींना ती शिकवून आत्मसात करता येऊ शकतात.

१. Problem solving skills

२. Logical Ani critical thinking

३. संगणक किंवा मशीन कसे विचार करते त्याची समज

४. प्रत्यक्ष coding skills.

Problem solving किंवा लॉजिकल thinking साध्या साध्या खेळांमधूनसुध्दा मुलं शिकतात, तेही अगदी लहान वयात. अगदी तिसऱ्या चौथ्या वर्षांपासून मुलांना puzzles( वेग वेगळे तुकडे जोडून चित्र पूर्ण करणे) , building blocks ( निरनिराळे ठोकळे वापरून वस्तू किंवा आकार बनविणे, जसं Lego) खेळायला द्यावीत. हळू हळू त्यातील त्यांची गती वाढताना दिसून येईल. 

Online free resources :

काही उत्तम संस्थांनी मुलांसाठी खूप सारी माहिती, साहित्य, शैक्षणिक खेळ जगभरातील मुलांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. परंतु माहितीअभावी त्यांचा उपयोग करून न घेताच बऱ्याचदा हजारो लाखो रुपये खर्च करून खाजगी प्रशिक्षण घेतले जाते. म्हणून ह्या लेखात अशा काही संकेत स्थळाची माहिती देणार आहे की तुमची मुलं अगदी घरच्या घरी कोणतीही फी न भरता सुरक्षितपणे शिकू शकतात.

An Hour of code 

या संकेत स्थळावर अगदी लहान मुलांपासून मोठया मुलांपर्यत सगळ्यांना खेळता येतील अशी वेगवेगळ्या काठिन्यतेची खेळाच्या स्वरूपातील आव्हाने आहेत. हळू हळू त्यातील काठिण्य वाढत जाते. यात मुलांचे लॉजिकल आणि क्रिटिकल थिंकिंग सजील वाढतेच परंतु संगणक कसा विचार करतो, वागतो याचेही शिक्षण मिळते. https://hourofcode.com/us/learn

खान अकॅडमी 

अगदी नर्सरी पासूनच्या मुलांना इंग्रजी, गणित ह्या सारखे शालेय विषय त्याच बरोबर robotics, JavaScript, HTML, CSS ह्यांसारख्या coding/ scripting languages सुध्दा शिकता येतात. 

Code. orgह्या संकेत स्थळावर अगदी ४ वर्षांपासून ते हायस्कुल च्या मुलांसाठीचेकोर्सेस वेगवेगळे संगणकाचे दिले आहेत. मुलांच्या रुचीनुसार ते निवडू शकतात.  

https://www.khanacademy.org/

Scratch (स्क्रॅच)

ही थोडी अलीकडची ब्लॉक प्रोग्रामिंग लँग्वेज मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कारण अतिशय सोप्या, ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने मुलं पटापट लॉजिक वापरून स्वतः चे गेम्स, कार्टून्स बनवू शकतात. स्क्रीनवर वेळ घालवायचाय ना मग दुसऱ्यांनी बनवलेले खेळ खेळण्या पेक्षा स्वतः बनवा आणि ते खेळ मित्रांना खेळायला द्या.

 https://scratch.mit.edu/

Tinkercad

Tinkercad वरती simulator मध्ये Resistors, Capacitors, बॅटरी, Switches, असे बरेच components वापरून मुलं छोटी छोटी circuits बनवू शकतात. तसेच डिझाईन बंवयचेही पर्याय तिकडे उपलब्ध आहेत.

https://www.tinkercad.com/circuits

तुम्हाला अजून ह्या संदर्भातील काही माहिती हवी असेल, किंवा ही माहिती उपयुक्त वाटली तर जरूर कळवा . 

#ifyoudontknownowyouknow

0