" पूर्वा तुझा ब्रेकफास्ट अजून तयार झाला नाही........ काय यार काय करत काय असते तू दिवसभर, साधं वेळेवर माणसाला काही देताही येत नाही तुला......... " निशांत आपल्या कामाची बॅग भरत रागारागानेच बोलत असतो........ पूर्वा मात्र किचनमध्ये पटापट ब्रेकफास्ट बनवण्याच्या घाईत असते ....... तिच्या कानावर त्याचे शब्द पडलेले असतात आणि म्हणूनच डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, परंतु तरीही त्याला काही उलट उत्तर न देता तुझी तिचे काम तसेच सुरू ठेवते...........
" निशांत अरे ब्रेकफास्ट तयार झालाच आहे, दोन मिनिट दे मी लगेच डायनिंग टेबलवर ठेवते...... असा न खाता जाऊ नकोस....... " निशांतला दरवाजाच्या दिशेने जाताना बघत पूर्वा घाईतच बाहेर येऊन विनंतीच्या स्वरात बोलू लागते........
" काही गरज नाही तूच खात बस निवांत...... घरात दोनच माणस आहेत पण त्याचीही काम तुला नीट वेळेवर पूर्ण करता येत नाही.......... तुझा नशीब चांगला आहे की, तुला माझ्यासारखा नवरा भेटला घरी बसूनच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात...... " निशांत रागानेच तिच्याकडे बघून बोलत आपली बँग घेऊन निघूनही जातो...........
" माझे नशीब चांगले आहे की वाईट हेच तर मला समजत नाही आहे निशांत...... एवढ्या सगळं करूनही मी नक्की कुठे कमी पडते तेही तू सांगत नाहीस.. ..... " पूर्वा बाहेर निघून गेलेल्या निशांत कडे पाहून स्वतःशीच बडबडत खुर्चीवर येऊन बसते........... अचानक तिचे मन उडत भूतकाळाच्या आठवणीत निघून जाते........
पूर्वा आणि निशांत एकमेकांना कॉलेज पासून ओळखत होते......... निशांत पुरवाला एक वर्ष सीनियर होता........ दोघांची चांगलीच मैत्री होती....... हळूहळू त्यांच्या मैत्रीच्या रूपांतर प्रेमात झाले........ पूर्वा पहिल्यापासूनच प्रेम, मनमिळावू आणि समंजस असल्यामुळे ती प्रत्येक गोष्टीत समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती...........
त्या दोघांच्या नात्यांमध्येही निशांत सगळे निर्णय घेऊन मोकळा व्हायचा पण पूर्वा मात्र त्या निर्णयांना त्याचे प्रेम समजून मनातूनच आनंदी व्हायची........ निशांत ने स्वतःचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्वाला लग्नाची मागणी घातली........
" निशांत अरे माझे हे शेवटचे वर्ष बाकी आहे..... ते पूर्ण झाल्यावर मग आपण लग्न करूया ना....... " पूर्वाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.........
" अरे यार पूर्वा, आपण लास्ट चार वर्षापासून एकमेकांना ओळखत आहे....... तीन वर्षांपूर्वीच मी तुला प्रपोज केला होता त्यावर तू होकारही दिला....... त्यानंतरही आपण आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी थांबलो , पण आता अजून धीर धरवत नाही, मला लवकरात लवकर तू माझ्या जवळ पाहिजे आहे........ " निशांत एक्साईटेड होऊन बोलू लागतो......
" निशांत जसं तुझं शिक्षण पूर्ण झालं तसं माझंही फक्त एक वर्ष बाकी आहे....... माझे शिक्षण पूर्ण झालं की, मग आपण लग्न करूया ना........ " पूर्वा त्याला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करत बोलते...........
" हे बघ पूर्वा, माझा शिक्षण पूर्ण झाला आहे आणि मला एक चांगली नोकरी ही मिळाली आहे....... तुझ्या शिक्षणाचा काय ग , तू तर लग्न झाल्यावर ही ते पूर्ण करू शकते ना...... घर तर मला चालवावे लागणार आणि त्यासाठी मी आता चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे..... प्लीज नाही म्हणू नको....... " निशांत असे बोलून तिला लग्नासाठी तयारही करतो.......... त्याचे आपल्यावर असलेले प्रेम पाहून पूर्वाला तेव्हा आनंद होतो......... तो आपल्या शिवाय राहू शकत नाही, ही भावनाच तिच्या मनाला स्पर्शून जाते म्हणून ती पण जास्त आढेवेढे न घेता लग्नासाठी तयार होते........ दोघांच्या घरचे मोठ्या थाटामाटाणे त्यांचे लग्न लावून देतात......... निशांतला आपल्या फॅमिली सोबत राहायचे नसते म्हणून तो वेगळी रूम घेऊन तिकडे स्वतःचा संसार मांडतो........ पूर्वा पण त्याची इच्छा राखण्यासाठी त्याच्यासोबत निघून जाते...............
पूर्वा त्या नवीन घराला निशांत च्या आवडीनुसार सजवते....... त्याला जे आवडत असते ते सगळं ती बनवत असते....... ती स्वतःही त्याच्या आवडीप्रमाणेच राहत असते......... त्याला एखादी गोष्ट पटली नाही की तो लगेच तिला बोलावून दाखवत असे म्हणून ती त्याच्या मर्जीप्रमाणे सगळं करण्याचा प्रयत्न करत होती........ रोज चला खुश ठेवण्याच्या नादात ती स्वतः मात्र तिचा आनंद कशात आहे हेच विसरून गेली होती.............
लग्न होऊन सहा महिने झाले होते आणि आता तिच्या मैत्रिणी सोबत एक दिवस बोलत असताना तिलाही स्वतःच्या शिक्षणाची आठवण झाली म्हणून एक दिवस तिने निशांत कडे हा विषय काढण्याचे ठरविले........
रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर जेव्हा बेडवर निशांत तिच्यासोबत लगट साधण्याचा प्रयत्न करत होता..... तेव्हाच पूर्वाने संधी साधून आपल्या शिक्षणाचा विषय त्याच्यासमोर मांडला.......
" तुला शिक्षण करून पूर्ण करण्याची काय गरज आहे....... तुझा नवरा इतका कमवतो की, तू आयुष्यभर जरी उडवले तरी कमी पडणार नाही....... मग कशाला नको त्या गोष्टी स्वतःला अडकवून ठेवायचा प्रयत्न करते........ आता फक्त तुझे एकच कर्तव्य आहे , ते म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला कसे खुश ठेवायचे....... " असे बोलून निशांत तिचं बोलणं इग्नोर करत आपली इच्छा पूर्ण करू लागतो..... ती पण मग तो विषय बाजूला ठेवून त्याला साथ देऊ लागते..........
हळूहळू जसे दिवस पुढे जाऊ लागतात, पूर्वा दिवसभर स्वतः ला घरातल्याच काही ना काही कामांमध्ये गुंतवून घेत होती त्यामुळे ती स्वतःकडे लक्ष ठेवत नव्हती....... घरातच असल्यामुळे साधीसुधी कपडे घालून , केस वर बांधून, साधेपणानेच राहत होती त्यामुळे आता निशांतला ही तिचे रूप बघून कंटाळ येत होता........ बाहेर ऑफिसमध्ये दिसणाऱ्या फॅशनेबल मुली पाहून त्याचे मन त्या मुलींच्या सौंदर्यात भुरळत होते..........
हळूहळू निशांत च वागणं बदलू लागले...... कामाचं प्रेशर असल्यामुळे घरात तो जास्त चिडचिड करत होता....... घरातून सकाळी लवकर जाणे, रात्री घरी उशिरा येणे...... त्या दोघांना एकमेकांसोबत पुरेसा वेळच मिळत नव्हता त्यामुळे पूर्वा मग घरात एकटीच राहून खूपच शांत झाली होती ........ हळूहळू उदास राहायला लागली होती....... तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं तेजही दिसत नव्हते.........
असंच एक दिवस सुट्टीच्या दिवशी पूर्वाने किचनची साफसफाई करायला घेतली होती....... दुपारचे जेवण झाल्यानंतर ती सगळ्या वस्तू पुसून लावण्यामध्ये बिझी होती, तेवढ्यात निशांत आत येतों..........
" तू तुझी काम करत बस..... तो पर्यंत मी खाली जाऊन एक राउंड मारून येतो........ " निशांत तुसटपणे तिच्याकडे बघून बोलतो..........
" अरे हे काय मी नंतरही करू शकते ना, तू पाच मिनिट थांब..... मी लगेच तयारी करून येते...... " पूर्वा आपल्या हातातली भांडीखाली ठेवत आनंदाने त्याच्याकडे बघून बोलते........
" काही गरज नाही......... हा असा पसारा ठेवून खाली गेलेले मला अजिबात आवडणार नाही........ त्यापेक्षा तू हे आधी स्वच्छ करून घे......... " निशांत चिडक्या स्वरा तिच्याकडे बघून बोलतो.......
" असं काय करतोस रे......... तू घरी असलास तरीही स्वतःच्या कामांमध्ये बिझी असतो म्हणून मग मी असं काही ना काही काम काढून स्वतःचा वेळ घालवण्याचा प्रयत्न करते......... आज पहिल्यांदाच बाहेर जाणार बद्दल बोलत आहेस, तेही एकटाच...... " पूर्वा थोडं नाराजीच्या स्वरात त्याच्याकडे बघून बोलते.......
" कधी स्वतःकडे बघितले आहे का ? तुला जर असं मी बाहेर घेऊन गेलो तर लोकं नाव ठेवतील ....... आधी तू कशी राहत होतीस , किती सुंदर दिसत होतीस ....... पूर्वा आता तू स्वतःच्या राहण्याकडे, स्वतःच्या चेहऱ्याकडे , कपड्यांकडे जराही लक्ष देत नाहीत........ तुला असे बाहेर घेऊन जायलाही मला लाज वाटते....... " निशांत बोलतच तिचे काहीही ऐकून न घेता तिकडून निघून जातो..........
त्याचं बोलणं मात्र पूर्वाच्या जिव्हारी लागते........ ती तशीच बसून हुंदके देऊ लागते......... आपल्या नवऱ्याला आपली लाज वाटत आहे या पेक्षा अजून दुर्भाग्य नाही, असे तिच्या मनाला वाटून जाते......... आता तिचे मन कशातही लागत नसते परंतु तरीही त्याला हा पसारा आवडणार नाही........ आल्यावर परत चिडचिड करेल म्हणून ती स्वतःला सावरत तो पसारा उचलू लागते..........
एक दिवस पूर्वा मनाशी काहीतरी ठरवून छान पैकी तयार होऊ लागते.......... छान असे कपडे घालून , सुंदर हेअर स्टाईल करून, चेहऱ्यावर थोडाफार मेकअप करून ती निशांत ची वाट पाहू लागते.......... त्याच्या येण्याची वेळ निघून गेली तरीही अजून त्याचा काही पत्ता नसतो म्हणून मग तीच त्याला फोन करते........ त्याला फोन केल्यानंतर तिला समजते की, तो आपल्या ऑफिसच्या मित्रांसोबत एका ठिकाणी पार्टीला आला आहे......... ती जागा त्यांच्या घरापासून जवळच असल्यामुळे ती पण तिकडे जाऊन त्याला सरप्राईज देण्याचे ठरवते.........
पूर्वाने छान तयारी केलेली असते....... आज तिला बऱ्याच दिवसानंतर स्वतःला आरशात बघून आनंद वाटत असतो...... निशांत ने पण आपल्याला असे बघितल्यावर त्यालाही आपले प्रेम आठवेल, असा विचार करून ती घरातून निघून पार्टीच्या दिशेने जाऊ लागते......... त्यांची पार्टी एका क्लब मध्ये असते, पूर्वाही त्या क्लबच्या जवळ जाऊन पोहोचते....... निशांत ची ओळख सांगितल्यामुळे तिला आत सोडतात........
आत डिस्को लाईट चालू असते........ त्यातच सगळेजण डान्स फ्लोर वर डान्स करत असतात....... पूर्वा आत जाऊन सगळीकडे निशांतला शोधू लागते आणि अचानक तिची नजर डान्स फ्लोर वर डान्स करणाऱ्या निशांत वर पडते......... तो डान्सवर एका मुली सोबत डान्स करण्यात गुंग झालेला असतो......... त्या मुलीने शॉर्ट ड्रेस घातलेला असतो......... चेहऱ्यावर खूप सारा मेकअप करून ती त्याला आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न करत असते, निशांतही डान्स करत तिच्यासोबत जवळीक साधत असतो...... ते पाहून इकडे पूर्वाच्या पायाखालची जमीन सरकते............
आत डिस्को लाईट चालू असते........ त्यातच सगळेजण डान्स फ्लोर वर डान्स करत असतात....... पूर्वा आत जाऊन सगळीकडे निशांतला शोधू लागते आणि अचानक तिची नजर डान्स फ्लोर वर डान्स करणाऱ्या निशांत वर पडते......... तो डान्सवर एका मुली सोबत डान्स करण्यात गुंग झालेला असतो......... त्या मुलीने शॉर्ट ड्रेस घातलेला असतो......... चेहऱ्यावर खूप सारा मेकअप करून ती त्याला आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न करत असते, निशांतही डान्स करत तिच्यासोबत जवळीक साधत असतो...... ते पाहून इकडे पूर्वाच्या पायाखालची जमीन सरकते............
पूर्वा तरीही हिम्मत करून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागते........ पूर्वा त्याच्यापासून काही अंतरावर असताना त्याचीही नजर पुरवावी जाते आणि तो रागानेच तिच्याकडे बघू लागतो....... निशांत त्याच्यासोबत डान्स करणाऱ्या त्या मुलीच्या कानात काहीतरी बोलून तडतड पावलं टाकत तिकडून पूर्वाच्या दिशेने निघून येतो.......... तिच्या जवळ आल्यावर तिचा हात घट्ट पकडून तिला डायरेक्ट ओढत क्लबच्या बाहेर घेऊन येतो..........
" पूर्वा तू इकडे का आलीस ? " निशांत रागाने तिच्याकडे बघून खवळून बोलतो.......
" ते....ते.... मला तुम्हाला सर ... प्राईज..... " पूर्वाला आत जे काही बघितले ते सगळे असह्य झालेले असते त्यामुळे तिच्या तोंडातून शब्द फुटत नसतात........
" मूर्ख मुली अशी कोणती पद्धत असते सरप्राईज देण्याची......... माझ्या ऑफिसमधल्या माणसांनी तुला जर इकडे बघितले असते, तर माझ्याबद्दल त्यांनी काय विचार केला असता........ माझी ऑफिसमध्ये एक चांगली इमेज आहे तुला बघून ती सगळी खराब झाली असती.......... यापुढे मला विचारल्याशिवाय अशी कोणतीच गोष्ट करायची नाही जी मला आवडणार नाही....... " निशांत रागानेच बोलत तिचा हात पकडून तिला गाडीमध्ये बसवतो आणि स्वतःही गाडी चालू करून घराच्या दिशेने निघून जातो.........
पूर्वा मात्र पूर्ण रस्त्यात त्याच्या त्या बोलण्याचा विचार करू लागते........ घरी आल्यावरही पूर्वा शांतच असते........ निशांत फ्रेश होऊन रूममध्ये जाऊन झोपून जातो........ पूर्वा मात्र बाल्कनी मध्ये बसून त्याच्या प्रत्येक बोलण्याचा विचार करत असते......... आज तीला आपण आयुष्यात काय गमावले आहे , याची जाणीव होते........ पूर्ण रात्रभर विचार केल्यानंतर पूर्व एक निर्णय घेते.........
" निशांत मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं आहे....... " दुसऱ्या दिवशी नाश्ता करत असताना पूर्वा मध्येच त्याच्याकडे बघून बोलते......
" काय तुला वेड लागले आहे का ? तू या घरात राहत आहेस म्हणून तुला दोन वेळचे जेवण , हे सगळं स्टेटस , हे नवीन कपडे, हे एशो आराम उपभोगायला मिळत आहे...... मला सोडून जाण्याचा विचार जर केलास तर तुझं काय होईल याची कल्पना तरी आहे का ? " निशांत हसतच चिडवण्याच्या स्वरात बोलतो........
" माझे काय होईल ते माझं मी बघून घेईल पण आता तुझ्या उपकाराखाली अजून राहू शकत नाही...... " पूर्वा पण त्याला साडेतर उत्तर देते.......
" आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघ आणि यापुढे तू बोलावले तरी मी तुला घ्यायला येणार नाही...... तुला घटस्फोट पाहिजे आहे ना, जा घे हो मोकळी........ " निशांत पण रागाने तिच्याकडे बघून बोलत तिकडून निघून जातो..........
" त्याने एकदाही आपल्याला थांबवण्याचा किंवा आपल्या नात्याचा विचार करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणजे या नात्यांमध्ये आजपर्यंत मी एकटीच होते तो कधी नव्हताच....... " पूर्वाला त्याची ही गोष्ट खूप मनाला लागते परंतु आता मात्र ती मागे हटणार नसते...... पुर्वा आपल्या आई-वडिलांना आपला निर्णय सांगते....... तेही तिची साथ द्यायला तयार होतात........ त्यांचा घटस्फोट होतो, दोघेही वेगळे होतात.........
पूर्वा आपल्या आई वडिलांच्या घरी राहून आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करते....... काही दिवसात तिलाही चांगल्या पदावर नोकरी मिळते........... खूप कमी वेळात ती आपल्या ऑफिसमध्ये नाव कमवते........ आजची पूर्वा ही वेगळीच असते....... एक दिवस बिजनेस मीटिंग साठी ती बाहेर आलेली असताना तेव्हाच तिला निशांतही समोर दिसतो........ निशांत तिचे ते बदललेले रूप पाहून हक्का बक्का होऊन तिच्याकडे बघू लागतो..........
" पूर्वा तुला माझ्या आयुष्यातून बाहेर काढून मी खरच खूप मोठी चूक केली, पण आता मला माझी चूक समजली आहे...... आपल्या नात्याला एक संधी देशील का ? " मीटिंग झाल्यानंतर निशांत तिच्या जवळ जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो.......
" नाहीं निशांत, जेंव्हा पासून तू माझ्या लाईफ मध्ये आला, मी फक्तं तुझा विचार करत होते.... . तुला आनंदी ठेवण्यासाठी, तुझे प्रेम मिळवण्यासाठी मी दिवस रात्र प्रयत्न केले पण यशस्वी झाले नाही............ तुला खुश ठेवण्याच्या नादात मी स्वतः चे अस्तित्व विसरुन गेले, माझा आनंद, माझ्या भावना याचा तू कधी विचार केला नाही....... पण आत्ता नाही आत्ता माझ्यासाठी आधी मी महत्वाची आहे....... " एस बोलून पुर्वा आनंदाने पुढे निघून जाते....... मोकळ्या आकाशात आपले दोन्हीं हात पसरुनसमाधानाने मोकळा श्र्वास घेते..........
.
समाप्त
*************************************
( कथा आवडत असल्यास कॉमेंट्स आणि लाइक्स द्यायला विसरू नका....... )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा