Login

मुक्ती

One Worshipping God and Praying For Freedom Of Mind

आठव देवा
माझी सेवा
दे मुक्ती ह्या जीवा

तुझेच पूजन
तुझेच अर्चन
तुला अर्पिले अवघे जीवन
ब्रह्मानंद मज हवा

नसे कमी
मम पुण्याई
भक्तीची कर भरपाई
दे अद्वैत अनुभवा

पहा प्रेमाने
अन् करूणेने
संचित सरु दे तव कृपेने
दे आनंदाचा ठेवा

मिळता मुक्ती
होईल तृप्ती
ज्योतीस मिळेल ज्योती
सुरवर करतील हेवा

        .......योगिता मिलिंद नाखरे