भाग 1
"सायली........ ए सायली अगं उठ लवकर. तिची आई हाका मारत तिच्या खोलीत आली. सायलीनं आईची चाहूल लागताच पुन्हा डोळ्यांवरून ब्लँकेट ओढून घेतलं. तिच्या ब्लँकेटला ओढत आई म्हणाली, " अहो सुर्यवंशी उठा कि आता. आज कॉलेजला जाण्याचा मूड नाही वाटतं. "नाही... नाही म्हणजे हो हो जायचंय ना कॉलेजला." मघापासून डोक्यावरून घेतलेलं ब्लँकेट दूर फेकत ती म्हणाली. "आज निकाल कि निक्काल !" रिझल्ट च्या आठवणीने तिला भिती वाटली. " काहीही होत नाही. चला तयार व्हा." तिची समजूत घालत आई म्हणाली. "हो,होप फोर बेस्ट.मी तयार होते." ती धावत बाथरूमच्या दिशेनं वळली.
सायली पटकन तयार होऊन हॉलमध्ये आली. पटापट नाश्ता केला आणी नाश्ता आवडला म्हणून आईचं तोंडभरून कौतुकही केलं. आईही त्यावर म्हणाली," थँक्यु हं साऊ". आईला टाटा करून ती घराबाहेर पडली. रिझल्टसाठी आईला नमस्कार सुद्धा केला. घराबाहेर धावत जात सँडल पायात चढवित ती पुन्हा आईकडे पाहत म्हणाली,"बाय बाय आई आणी बाबांचा फोन आला तर सांग मी विचारलं म्हणून.ओके बाय" म्हणत तिने स्कुटी स्टार्ट केली. आईने उंबरठ्यावरूनच तिला हाताने बाय केलं. पाहता पाहता सायली सरकन डोळ्यांसमोरून निघून गेली.
सायली ही एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. ती,तिचे आई बाबा असं त्रिकोणी कुटुंब. वडिल शासकीय नोकरीत होते. कामानिमित्त काहीवेळा त्यांना बाहेर जावं लागत असे. सकाळीच ते पुण्याला कामासाठी गेले होते. सायलीचा दोघांवर खूप जीव आणी त्यांचा तिच्यावर. सायलीही तशीच होती गोड,निर्मळ सायलीच्या फुलासारखी!
" ओ, मिस्टर तुम्ही..... तुम्ही आधी खाली उतरा. बाईक चालवता कि विमान ! घरच्यांनी बाईक हातात दिली म्हणजे तुम्हाला विमान उडवण्याचा फिल येतो. सायली स्कुटीवरून उतरत म्हणाली. एवढा वेळ शांतपणे तिचं बोलणं ऐकुन घेणारा समर बाईकवरून उतरत म्हणाला," ओ,मिस हे जे तुम्ही बरळता आहात ना ते मीही तुम्हाला म्हणू शकतो.पण मला भांडण्याची सवय नाही. तेही असं रस्त्यात!"
"ओ,तुम्ही जे मघाशी केलं ते. तुम्ही बाईक तुमच्या धुंदीत चालवत होतात. समोरून ट्रक आला म्हणून ब्रेक दाबलेत. त्या भानगडीत तुमची बाईक धडकली असती ना माझ्या स्कुटीला. हा समोरचा खड्डा. सगळा चिखल माझ्या ड्रेसवरती उडाला असता."
"एक मिनिट, ओ तुम्ही किती बोलता. हे मुंबईचे रस्ते आहेत. खड्डे असायचेच नवीन काय त्यात!" तो शांतपणे म्हणाला.
"ते माहित आहे मला. तुमच्यासारखे बाईकला विमान समजणारे" तीचं वाक्य मध्येच तोडत तो बाईकवर बसत म्हणाला," तुम्ही तुमची स्कुटी सांभाळा आधी."
"तुम्हाला नाही गरज काळजी करण्याची. माझं काही बरं वाईट झालं तर तुमच्याकडे नाही येणार."
"ओके. ओके बाय बाय." त्याने बाईक स्टार्ट केली आणी तो भुर्रकन निघूनही गेला. सायलीही स्वतःला शांत करत कॉलेजला निघाली.
क्रमशः
आजच्या भागात सायली आणी समरची भेट झाली. पण आपल्या कथेचं नाव तर मैत्रीची गोड गोष्ट आहे ना! आता या दोघांची ओळख होऊन ह्यांची मैत्री तरी कशी होणार? पुढचा भाग वाचायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा