Login

निरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 3

Friendship Story

 भाग 3
काय मुलगी आहे ही! आणि रात्रीची कुठे गेली होती! आपण तेवढ्यात तिथे नसतो तर काय केलं असतं. नशिब आपल्यावर बरे संस्कार आहेत याची तरी खात्री वाटली. नकळत त्याच्या मनात असे विचार येऊन गेले. 
................

दुसर्‍या दिवशी रविवार होता.सकाळी सायलीने नाश्ता केला. पटकन आवरुन ती निघाली. मार्क्स छान मिळाल्यामुळे आई बाबा ही एकदम खुश होते तिच्यावर. आज आर्ट गॅलरीला पेंन्टिंग्जचं प्रदर्शन होतं. नवीन नवीन पेंन्टिंग्ज पाहणं, खरेदी करणं हे तिचं आवडतं काम. मनातल्या सगळ्या भावना व्यक्त नाही करता येत. कला हे त्याचं एक माध्यम आहे. या मताची होती ती. तिला स्वतःलाही फोटोग्राफीची भारी आवड! त्यामुळे सौंदर्य टिपणारे आणि समजणारे डोळे. एकेक पेंन्टिंग पाहण्यात ती गर्क झाली. अचानक एका चित्रासमोर ती थबकली. ' Pleasure is to the mind what happiness is to the heart ' त्या पेंन्टिंगवरच्या उजव्या कोपर्‍यात या ओळी लिहिलेल्या होत्या. 'वा! किती सुंदर! हा पेंन्टिंग करणारा पण रसिक माणूस असला पाहिजे.' तिच्या तोंडी आपसुक वाक्य आलं. ते पेंन्टिंग सूर्योदयाच्या दृश्याचं होतं. समुद्रकिनारा, उंचच उंच माड, त्यातून डोकावणारा सूर्याचा लाल केशरी गोळा. नवीन असं काहीच नव्हतं. पण पाहत राहाव असं चित्र होतं ते. त्या ओळी किती मोठा अर्थ होता त्यात. तिला ते खुप आवडलं. आपल्या रूममध्ये लावण्यासाठी तिनं ती खरेदी करण्याचं ठरवलं.

" हे पेंन्टिंग  खूप सुंदर आहे. मला ते आवडलं." सायली
" पाच हजार रू. आहे त्याची प्राईज. आजचं प्रदर्शन नव्या चित्रकारांसाठी आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आजचं प्रदर्शन आणि विक्री आहे." ते गृहस्थ म्हणाले.
"ठिक आहे. मी देते पैसे."
"ओ,मला हवं आहे ते पेंन्टिंग. मी तुमच्या आधी इथे आलोय." पाठीमागून एक आवाज आला.
तिने पाठीवळून पाहिलं तर समर उभा होता. " तुम्ही उशीरा आलात. मी पैसे पे करणारच होते." सायली
"नाही, मला आवडलंय ते चित्र. माझ्या फ्रेंन्डला गिफ्ट द्यायचंय मला." 
"तुम्ही दुसरं कोणतंही पेंन्टिंग न्या. मी हेच नेणार आहे." तिने पर्समधुन पैसे काढले आणि पेंन्टिंगची रक्कम त्यांना देऊन टाकली. तिला खूप आनंद झाला होता. समर तिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही अश्या नजरेने तिथून निघून गेला. 

    एवढा वेळ गप्प असणारे ते गृहस्थ म्हणाले," अहो मॅडम, काय केलं हे तुम्ही ! एवढं सुंदर पेंन्टिंग करणारा माणूस तुमच्यासमोरच तर होता. समर मराठे. 
"काय!!!!!! " एकाचवेळी आश्चर्य आणि आनंदाचे भाव तिच्या चेहर्‍यावर पसरले. तिचा सगळा आनंद त्या घटनेने विरून गेला. ती उदास झाली. आपण त्याच्या कलेची तुलना पैश्यात केली. तेही त्याच्यासमोर याचंचं तिला जास्त वाईट वाटलं. एकवेळ माणूस बोलण्यावरुन नाही येत ओळखता.पण हे सुंदर चित्र. छे! नकळतपणे आपण अपमानित केलं. तिचं मन शांत बसतं नव्हतं. तिनं त्या गृहस्थांकडून समरच्या घरचा पत्ता मिळवला. दुसर्‍या दिवशी ती त्याच्या घरी गेली. 

" तुम्ही ! हे तर कालचं चित्र! तुम्ही खरेदी केलेलं."
"मला माफ करा." ती दरवाजातून आत आली. तो सोफ्यावर बसला. तिने हातातलं पेंन्टिंग टिपॉयवर ठेवलं.
"मला खरंच तुमचा अपमान नव्हता करायचा. मी तुमची कला तुमच्यासमोर पैशात मोजली. आय एम सॉरी. हे चित्र खरंच खुप सुंदर आहे. तुमच्या फ्रेंन्डला द्यायचं आहे ना तुम्हाला." तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. ती उठली. दरवाजाच्या दिशेने वळली.
"नाही, तुला माफी नाही! उचल ते पेंन्टिंग तिथून. एकदा कोणी घेतलेली वस्तु मी परत घेत नाही." तो चिडक्या स्वरात म्हणाला. 
"पण तुला ते गिफ्ट द्यायचंय ना. "
"हो, पण घे आता ते तू. माझ्या मैत्रिणीला दिलं असं समजेन मी !" तिने पाठीवळून पाहिलं. हा आपल्याला मैत्रीण म्हणाला म्हणजे आपल्याला माफ केलं. तीनं चटकन ते पेंन्टिंग उचललं. 
"सॉरी, तू एवढा सुंदर कलाकार आहेस नव्हतं माहित."
"मलाही वाटलं होतं तुला फक्त भांडता येतं. कलेची पारख करता येते हे नव्हतं माहित." तो पुढे  म्हणाला,"ठेव ते तुझ्याकडे, तुला आवडलं ना. मैत्रीची भेट समज." 
"थँक्यु " ती हसत म्हणाली. 
क्रमशः

🎭 Series Post

View all