Login

निरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 4

Friendship Story

दिवस सरत होते तशी त्यांची मैत्री घट्ट होत होती. सायली स्वभावाने खरंच चांगली आहे, समजुतदार आहे हे समरला तर केव्हाच कळलं होतं. समरची हुशारी आणि कला सायलीला सर्वांत मौल्यवान वाटायचं. 
................

ते हिवाळ्याचे दिवस होते. सकाळचं कॉलेज. वातावरणातला गारठा यामुळे आईने सायलीसाठी नवीन स्वेटर विणला. लाल रंगाचा तो स्वेटर. सायली अगदी बाहुलीसारखी दिसत होती. 
" सायली, हे काय! बार्बी डॉलसारखी दिसतेस हं." समरने चेष्टा करायला सुरुवात केली. "अरे,किती गारवा आहे. माझ्या मम्मीने विणला हा स्वेटर माझ्यासाठी,छान आहे ना!" ती आनंदाने म्हणाली. 
"हो.... तू एवढी मोठी झालीस तरी तुझी मम्मी तुझ्यासाठी स्वेटर विणते." समर
" अरे, मुलं किती मोठी झाली तरी आईसाठी लहानच असतात." ती हसून म्हणाली.
"असेल कदाचित " तो दबक्या आवाजात म्हणाला.
"कदाचित म्हणजे, तुझी मम्मी पण तुझी अशीच काळजी घेते ना!"
"मम्मी, ती कुठे आहे माझ्याजवळ" त्याचे डोळे भरुन आले. तो गंभीर झालेला पाहून ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली,"काय झालं?" 
"काही नाही,माझी मम्मी मी चार पाच वर्षांचा असतानाच मला सोडून गेली एका अपघातात."
" सॉरी, तु कधी बोलला नाहीस. मला माहितच नव्हतं हे."
" इट्स ओके." तिने स्वेटर काढला आणि त्याच्या हातात दिला. " घे, आजपासून हा स्वेटर तू वापर."
"अगं पण......"
"मी मम्मीला सांगेन. तिने माझ्यासाठी दोन तीन स्वेटर आहेत विणलेले. तु ठेव तुझ्याकडे. आईच्या मायेची ऊब आहे त्याला." ती त्याला समजावत म्हणाली.
" सायली, तू खूप ग्रेट आहेस." तो आनंदाने म्हणाला.
समर तसाच होता भावूक. सायलीही तशीच कायम आनंदी असणारी. आनंद वाटणारी. 
.................

कॉलेजचे दिवस भुर्रकन उडून गेले. एक दिवस समरने तातडीने सायलीला रेस्टॉरंटमध्ये बोलवून घेतलं. बातमी तशी आनंदाची होती. पण तो थोडा दुःखी होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all