Login

मैत्रीचे बंध

मैत्री


मनाला मनाची
साथ लाभली
नात्यास नाव त्या
मैत्रीची दिली...

नाते हे मैत्री चे
मिळते आपल्या नशीबाने...
कधी कुठला कोण येईल
अन् होऊन जाईल आपलाच प्रेमाने...

मैत्रीत न असती
कुठले बंधन
मैत्रीत असते
फक्त प्रेमाचे कुंपण....

जीवन हे जगण्यास
हवा असतो साथीदार
मित्र च असतो आपला
सखा सोबती हक्कदार....

मित्रांची असते
दुनिया निराळी
त्याच्याभोवतीच फिरते
आपली जीवन गाडी...

मित्राविण जगणे
नाही काही सोप
मित्रच जाणती मनातले
जे न बोलती कधी ओठ...

जीवनात या जगण्या
करावी मैत्री एक बार
होईल हे जीवन
सुंदर स्वर्ग समान.....