फ्रिजचे रहस्य ( भाग तिसरा )

फ्रिजची भीती बाळगणारा आणि सतत हात धुण्याची सवय असलेला एक पेशंट, आणि त्या मागचं भीषण सत्य
फ्रीज ( भाग तिसरा )

दुपारी तो तिला घ्यायला आला. त्या वेळी त्याच्याशी एक शब्दही बोलू नये असं तिला वाटतं होतं. पण त्याचे ते भुरळ पाडणारे डोळे पाहून ती विरघळली.

" सॉरी निकी. काल कसा कुणास ठावूक पण माझा फोन आपोआप सायलेंट मोडवर गेला होता. आणि कधी नवद मला गाढ झोप लागली होती.

" वेड्या काल रात्रीच मी तुला बोलवणार होते. पण तुझं बॅड लक . कालची संधी तू गमावली." खरं म्हणजे त्याला काही झाले नव्हते याचा तिला मनोमन आनंद झाला होता.

" कालची संधी आज घेऊ, काय फरक पडतो " हात धुता धुता हसत तो म्हणाला.

" आता तोंड धूऊन बस " ती त्याच्या गाडीवर बसत त्याला चिडवत म्हणाली. दोघं त्याच्या घराकडे निघाले. सूर्योदय नावाच्या अतिशय उंच आणि पॉश बिल्डिंगच्या समोर गाडी थांबवत तो म्हणाला,

" चल, आलं आपलं घर. " त्याने गाडी पार्क केली. लिफ्टच बाराव्या मजल्याचे बटन दाबून ते दोघं वर आले.

" ये ना आत. " तो दरवाजा उघडून तिला म्हणाला. ती त्याच्या फ्लॅटला बघत होती. सगळया रूम मधून सुगंधाचे लोटच्या लोट अंगावर येत होते. नुकतच धूवून पुसून काढलेले असावे असा तो फ्लॅट स्वच्छ धुतलेला चकचकीत होता.

" तू तूझ्या हाता सारखाच फ्लॅट देखील धूत असतो की काय ? " ती त्याला चिडवत म्हणाली.

" हो ना. मला स्वच्छ्ता खूप आवडते. तसेच सेंट देखील खूप आवडतात. मी माझा फ्लॅट नेहमी स्वच्छ ठेवतो. " तो म्हणाला.

उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ होती. बाहेर ऊन रणरण करत होतं. तिला प्रचंड तहान लागली होती.

" मला खूप तहान लागली आहे रे. थंड पाणी असेल तर दे ना आधी. "

" एकच मिनिट ह. मी आत्ता पाण्याची बाटली घेऊन येतो. " असं म्हणत तो पळतच खाली गेला. तिला आश्चर्य वाटलं. तो गेल्यावर ती घर पाहू लागली. किचन देखील चकचकीत होतं. बेडरूम मध्ये भला मोठा फ्रीज होता. ह्याच फ्रिज बद्दल तो बोलत होता का, विचार करता करता तिला स्वतःशीच हसू आले. म्हणून घरात फ्रीज असतांना हा वेडा बाटली आणायला खाली  गेला वाटतं. त्याच्या वेडेपणाचे तिला हसू आले.

साधारणपणे एव्हढा मोठा फ्रीज कोणी वापरत नाही. पण याची प्रत्येक गोष्ट वेगळीच आहे. फ्रिज देखील एव्हढा स्वच्छ होता की कुठेही कणभर डाग नव्हता. अगदी कालच विकत घेतल्या सारखा चकचकीत दिसत होता. सहज कुतुहल म्हणून तिने फ्रीजचा दरवाजा हात उघडण्याचा प्रयत्न केला. पण फ्रिज लॉक केलेले होते. तोच तो पाण्याची बाटली घेऊन आला. तिला बेडरूम मध्ये पाहून म्हणाला, फ्रिज पासून तिला दूर नेत म्हणाला,

" हाच तो फ्रिज ज्याची मला भीती वाटते. प्लीज उघडू नको ना. "

पुन्हा त्याची अवस्था त्याच दिवसा सारखी झाली. त्याला दरदरून घाम सुटला.

" ठीक आहे बाबा, नाही उघडत. पाणी दे मला आधी."

तिने घटाघटा पाणी पिले. त्याने एसी सुरू केला. सुगंधी वासाबरोबर गारवा तयार झाला. त्याने बरेच पदार्थ सोबत आणले होते. त्याने मधूर संगीत लावले. दोघं गप्पा करत जेवण करत होते.

जेवण झाल्यावर त्याने तिला बेडवर बोलावले. हळुहळू त्या वातावरणाचा परिणाम व्हायला लागला. सगळ्या गोष्टींचा तिला विसर पडला. शेवटी तो आपलाच आहे आणि आपण त्याचे आहोत असा विचार करत तिने मुक्त पणे स्वतःला त्याच्या हवाली केले. मध्येच तिचं लक्ष फ्रिजच्या दाराकडे गेलं. चकचकीत असलेल्या फ्रिजच्या दारावर आणि चकाकणाऱ्या हॅण्डलवर दोघांच्या आकृत्या अंधूक आणि धूसर लयबध्द हालचाली करतांना दिसत होत्या. स्वतःला असं पूर्ण झोकून दिल्यावर तिला सुखाची ग्लानी आली.

थोडावेळ दोघं तशीच पडून राहिली. मग तिने कपडे सावरले. फ्रिजच्या जवळ असलेल्या आरशात बघत चेहऱ्याचा मेकअप ठीक केला.

या पूर्वी, भर दुपारी तुला तुझं परमोच्च सूख प्राप्त होईल असं जर कोणी सांगितलं असत तर तिचा विश्वास बसला नसता. पण सत्य हे कल्पनेपेक्षा सुंदर होतं. तो अजूनही तिला न्याहाळत होता. त्याचे केसं दोन्ही हातांनी विस्कटून टाकत ती म्हणाली,

" बघतोस काय. चल मला क्लिनिकवर सोड. तुला नाही पण मला काम आहे. "

आणि हा क्रम नेहमीचाच सुरू झाला. आता ती एकदोन दिवसा आड त्याच्या फ्लॅटवर येत असे. तो तिला संध्याकाळी क्लिनिक वर सोडून देत असे. लग्न करण्याचं दोघांचं जवळ जवळ ठरलेलेच होतं. त्या मूळे दोघंही निर्धास्त होती. प्रणयाचा आनंद लुटत होती.

एक दिवस ती दुपारी आला नाही. दुसऱ्या दिवशी आला नाही. तिने त्याला फोन केला. पण त्याने तो उचललाच नाही. कशातच तिचं लक्ष लागत नव्हतं. सारखी मोबाईल वर नजर असे. शेवटी तिने स्वतःच त्याच्या रूमवर जायचं ठरवल. ती तिकड जायचा विचार करू लागली पण मध्येच तिने विचार केला त्याला नक्कीच काहीतरी अर्जंट काम निघाले असेल.

करमत नाही म्हणून तिने टिव्ही लावला. आणि बातमी ऐकून तिचं अंग थरथर कापू लागलं. तिचा तिच्या कांनांवर, डोळ्यांवर आणि स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. अगदी तीच सूर्योदय बिल्डिंग, तोच मोठ्ठा फ्रिज बातम्यांमध्ये दाखवत होते. ज्याला ती आपला प्रियकर समजत होती त्या समीरने त्याच्या पहिल्या प्रेयसीचे तुकडे तुकडे करून फ्रिज मधे भरून ठेवलेले होते. आणि त्या तुकड्यांच्या साक्षीने तिचा प्रणय फुलला होता.

ती सुन्न होऊन बसून राहीली. आपल्या दाराची बेल केंव्हाची वाजते आहे हे तिच्या लक्षातच आले नाही. तिने दरवाजा उघडला. तिला घेऊन जाण्यासाठी दारात पोलीस ऊभे होते.

( समाप्त )

🎭 Series Post

View all