कवितेचे नाव : अंधारातून प्रकाशाकडे
कवितेचा विषय : मीच माझ शिल्पकार
राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी - २
नाशिक.नेहमीच कमतरता जाणवते
तुलना करता इतरांशी
अधुर जीवन क्षणात भासवते ||१||
नियतीचा फिरला विचित्र फेरा
गोष्टीत कोणत्या रमवावं मन
वास्तवात न रुजे विचारांच चक्र
नैराश्याने शरीर गेल थकून ||२||
गोष्टीत कोणत्या रमवावं मन
वास्तवात न रुजे विचारांच चक्र
नैराश्याने शरीर गेल थकून ||२||
घरट्यातून दूर जावेसे वाटे
काळोखात स्वत:ला बंद कराव
अपयशाने खचून जावून
आयुष्य आपल आपणचं संपवाव ||३||
काळोखात स्वत:ला बंद कराव
अपयशाने खचून जावून
आयुष्य आपल आपणचं संपवाव ||३||
सांजवेळी दिसता आशेचा किरण
उपजत कला दृष्टिस पडली
जिद्दीने पेटून उत्साहाची ज्योत
कार्य करण्या उभारी धरली ||४||
उपजत कला दृष्टिस पडली
जिद्दीने पेटून उत्साहाची ज्योत
कार्य करण्या उभारी धरली ||४||
विजयाची पताका गगनी झळकली
स्वत:लाच उमगले गुपित यशाचे
कौतुकाचा सोहळा दारी सजला
नव्याने गवसले सूर जीवनाचे ||५||
स्वत:लाच उमगले गुपित यशाचे
कौतुकाचा सोहळा दारी सजला
नव्याने गवसले सूर जीवनाचे ||५||
©®प्रज्ञा तांबे बो-हाडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा