“अरे, तुझ्यापासून काही होणार नाही रे!”…
ही वाक्यं आयुष्यात प्रत्येकाने कधीतरी ऐकलीच असतील. कुणी आपली थट्टा केली असेल, कुणी आपल्याला कमी लेखलं असेल, कुणी आपल्यावरचा विश्वास तोडला असेल. सुरुवातीला या टोमण्यांच्या जखमा जाळतात, आत्मविश्वासाला कुरतडतात. पण हाच अपमान जेव्हा मनाच्या मातीखाली गाडला जातो, तेव्हाच त्यातून उगवतात यशाची हिरवी कोंबं. टोमणे हा शेवट नसतो, ती फक्त सुरुवात असते.
ही वाक्यं आयुष्यात प्रत्येकाने कधीतरी ऐकलीच असतील. कुणी आपली थट्टा केली असेल, कुणी आपल्याला कमी लेखलं असेल, कुणी आपल्यावरचा विश्वास तोडला असेल. सुरुवातीला या टोमण्यांच्या जखमा जाळतात, आत्मविश्वासाला कुरतडतात. पण हाच अपमान जेव्हा मनाच्या मातीखाली गाडला जातो, तेव्हाच त्यातून उगवतात यशाची हिरवी कोंबं. टोमणे हा शेवट नसतो, ती फक्त सुरुवात असते.
जीवन म्हणजे सतत चाललेला संघर्ष. माणूस चालताना कितीदा पडतो, धडपडतो, अपयश येतं, पण खरा हिरो तोच, जो पुन्हा उभा राहतो. लोकं हसतात, बोटं दाखवतात, पाठीत वार करतात. पण हेच टोमणे जेव्हा प्रेरणेची तलवार बनतात, तेव्हा त्याच लोकांच्या तोंडून टाळ्यांचा आवाज घुमतो. “टोमण्यांपासून टाळ्यांपर्यंतचा प्रवास” म्हणजेच हा संघर्षाचा, अपमानातून उगम पावलेल्या यशाचा प्रवास.
आपल्या समाजात टीका करायला लोकं सदैव तयार असतात. कोणी नवीन काम सुरू करायचं म्हटलं की लगेच म्हणतात – “हे तुझ्या बसचं नाही.” परीक्षा चुकली की म्हणतात – “याला काही नाही जमत.” व्यवसायात अपयश आलं की म्हणतात – “हा व्यापाऱ्याचा लायकीचा नाही.” पण हेच लोकं, जेव्हा तुमचं नाव पुढे सरकतं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून हेवा नाहीसा होऊन अभिमान चमकू लागतो.
जीवनात टोमण्यांचा भार हलका वाटत नाही. सुरुवातीला अपमानाचे शब्द काट्यासारखे टोचतात. पण लक्षात ठेवा, अपमान हीच खरी ताकद आहे. कारण ज्या क्षणी आपण म्हणतो – “मी दाखवून देणार,” त्या क्षणापासून यशाकडे वाटचाल सुरू होते.
टोमणे ऐकून थांबणारे हजारो असतात, पण टोमणे ऐकून जिद्दीने पुढं जाणारे काहीच असतात. त्या काहींचा प्रवासच इतरांसाठी प्रेरणा बनतो. टोमणे कधीही तुमचं भविष्य ठरवू शकत नाहीत. टाळ्या मात्र तुमच्या प्रयत्नांचा सन्मान करतात.
लोकं बोलतात, बोलू देत. तुम्ही मात्र काम करत राहा. कारण टोमणे देणाऱ्यांच्या तोंडात हात नाही, फक्त शब्द असतात. पण तुमच्याकडे हात, डोकं आणि जिद्द आहे. म्हणून टोमण्यांचं रूपांतर टाळ्यांत करायचं असेल, तर एकच मंत्र – कष्ट करा, संयम ठेवा, सातत्य ठेवा.
खरं तर, टोमणे हा तुमच्यासाठी अलार्म असतो. ते सांगतात – “तू अजून काहीतरी करून दाखवायचं बाकी आहे.” जखमांचा ओरखडा बघून खचायचं नाही, तर त्या जखमा यशाच्या रंगांनी सजवायच्या. आणि जेव्हा विजयाची वेळ येते, तेव्हा त्याच जखमांवर गुलाल फेकला जातो.
एक वेळ अशी येते, जेव्हा टोमणे देणारे लोकच तुम्हाला दाद देतात. त्यांच्या नजरेत बदल होतो. जे हसले होते, तेच अभिमानाने म्हणतात – “हा आमच्यातलाच आहे.” जे शंका घेत होते, तेच तुमच्या यशाची उदाहरणं देतात. हा बदल सोपा नसतो, पण तो शक्य असतो.
यश मिळाल्यावर लोकं तुमचं कौतुक करतात, टाळ्या वाजवतात. पण त्या टाळ्यांच्या आवाजामागे लपलेले असतात – हजारो टोमण्यांचे प्रतिध्वनी, हजारो अपमानांची सावली. म्हणूनच जेव्हा टाळ्या ऐकू येतात, तेव्हा त्या टाळ्या फक्त आवाज नसतात – त्या प्रत्येक टोमण्याला दिलेलं उत्तर असतं.
जीवनाच्या प्रवासात कधीही टोमण्यांपासून घाबरू नका. त्यांना शस्त्र बनवा. कारण अपमान म्हणजे तुमच्या यशाची सुरुवात असते, आणि टाळ्या म्हणजे त्या प्रवासाचा मुकुट.
शेवटचा विचार:
“टोमण्यांपासून टाळ्यांपर्यंतचा प्रवास” हा फक्त शब्दांचा खेळ नाही. तो आयुष्याची खरी कहाणी आहे. जी जखमा अपमानाने दिल्या, त्या जखमा जिद्दीच्या शाईने सोन्याच्या अक्षरात विजय लिहून जातात. आणि जेव्हा गुलाल उधळला जातो, तेव्हा प्रत्येक थेंब सांगतो – हा प्रवास सोपा नव्हता, पण सार्थक झाला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा