Login

फुगे भाग 2

रहस्यकथा
रोजच्याप्रमाणेच तोही एक धावपळीचा दिवस होता. विविध लोकं गडबडीने आपल्या इच्छित स्थळी निघाली होती. पटेल रोडच्या सिग्नलवर ठिकठिकाणी नवीनच फुगेवाले आले होते. चारपाच चारपाच जणांची टोळी प्रत्येक सिग्नलवर फुगे विकत होती.

त्या दिवसापासून त्यांनी शहरात ठाणच मांडलं. दिवसरात्र सगळ्या लहानमोठ्या रस्त्यावर ते त्यांच्या छोट्या धकलगाड्या घेऊन फिरताना दिसायचे. दिवसभर उदासवाण्या चेहऱ्याने फुगे विकत फिरणारे हे फुगेवाले रात्र झाली की रस्त्याच्या कडेला रोज नवीन ठिकाणी आपली पालं टाकायचे.

रात्रीची जेवणं झाल्यावर साहिल एकटाच बाहेर पडला. सोनू आणि सीमा तंबूतच झोपायची तयारी करत होत्या. रस्यावरची वर्दळ कमी होत होती. बऱ्याच वेळानंतर एखादी एखादी गाडी रस्यावरून जात होती. साहिल एका सुनसान मुख्य रस्त्यापासून लांब असलेल्या गल्लीत वळला. जुनाट, बसक्या घरांची ती गल्ली होती. अधून मधून तुरळक इमारती होत्या.एका घराच्या बाहेर दोन माणसं एकमेकांशी काहीतरी बोलत होती. सतत आजूबाजूला कोणी येत नाहीये ना हे बघत होती. साहिलने त्यांना न बघितल्यासारखं करून पुढे गेला. त्यांच्या पुढच्याच इमारतीमध्ये शिरला. ती भिंत त्या दोघांच्या मागेच होती. आवाज न होऊ देता साहिल भिंतीवर चढला. आता त्याला ते दोघेही व्यवस्थित दिसत होते. त्यातल्या एकाने खिशातून एक चिठोरा काढला. “हा पत्ता घे. इथून माल उचलायचा. हायवेवर घेऊन जायचा. पुढचा पत्ता तुला तिथे मिळेल. कुणालाही ह्यातलं काही कळलं, तर तुझ्या घरच्यांचं काही खरं नाही लक्षात ठेव.”

आजूबाजूला कोणी नाही हे बघून दोघेही दोन दिशांना बाहेर पडले. साहिल आवाज न करता त्या चालकाच्या मागून चालत होता. चालता चालता त्याने त्याच्या टीमला सावध केलं. सगळेच तयारीत होते. तो माणूस ट्रक मधते चढेपर्यंत, साहिलची टीम एका गाडीतुन त्याच्यापर्यंत पोहोचली. त्यांची गाडी ट्रक चालकाला दिसणार नाही इतपत अंतर राखून पाठलाग करत होती. शहरातल्या विविध रस्त्यांवरून उलटसुलट फिरत एका गोदामापाशी येऊन ट्रक थांबला. साहिल आणि त्याच्या साथीदारांनी आपापली बंदूक बाहेर काढली. हवेत ताण जाणवत होता.


साहिल गाडीतून उतरणार, इतक्यात तो ट्रक चालक एक वेगळाच ट्रक घेऊन निघाला. साहिल पटकन आत बसला. पण गाडी वळवून बाहेर काढेपर्यंत ट्रक निसटून गेला होता. साहिल आणि त्याचे साथीदार पटकन त्या गोदामात शिरले. तिथे माल मिळाला असता, सोबतच काही पुरावे सुद्धा मिळू शकले असते. ते सावधपणे गोदामात शिरले. कोणी आत नाहीये हे बघून ते जरा गोंधळले. सगळं गोदाम रिकामं होतं. एकूणएक सामान गायब होतं. तिथे कोणी माणसं वावरत होती, ह्याचा एकही पुरावा शिल्लक नव्हता. निराश होऊन साहिल आणि त्याचे साथीदार जमिनीवरच बसले. अचानक सगळ्यांच्या मोबाईलची धून वाजली. सगळ्यांना एकच संदेश आला होता.

'भास होत जेथे, तेथे मुळी नाही
शोध कुठे माझी चाहूल आहे।
आंधळ्याच्या चेल्या होय सावधान
हृदयीच माझा सदा वास आहे।।'

क्रमशः
अभा बोडस
0

🎭 Series Post

View all