Login

फुलले रे क्षण माझे..भाग २

एक प्रेम कथा
फुलले रे क्षण माझे…भाग २

मागच्या भागात आपण बघीतलं की आकाश आणि प्रिया दोघांची साक्षीच्या वाडदिवशी ओळख होते आता बघू पुढे काय होईल.


आकाश आणि प्रिया यांना गप्पांमधून एकमेकांचे विचार आणि स्वप्नं कळली.. त्यांच्या वारंवार भेटीतून त्यांच्या भावी आयुष्याचे विचार एकमेकांना कळले. दोघांनीही एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नात्यात मैत्री, समजूतदारपणा, आणि एकमेकांच्या स्वप्नांना आधार देण्याची भावना दृढ झाली.

आकाश आणि प्रिया एकमेकांच्या स्वप्नांना आधार देत एकत्र प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतात.आकाश आपल्या स्टार्टअपच्या यशासाठी मेहनत सुरू करतो आणि प्रिया आपल्या कला स्टुडिओच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यांच्या नात्यात विश्वास, प्रेम, आणि एकमेकांच्या स्वप्नांना आधार देण्याची भावना यामुळे त्यांचे नाते अधिक दृढ होते.


आकाश आणि प्रिया जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल घरच्यांना सांगतात, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया वेगवेगळी असते.

आकाशच्या घरात त्याचे आई-वडील आधुनिक विचारांचे आहेत. ते नेहमीच आकाशच्या निर्णयांना पाठिंबा देत आले आहेत.

“आकाश, तुला तुझ्या जीवनात जे काही करायचं असेल, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तू न डगमगता निर्णय घे. जर प्रिया तुझ्यासाठी योग्य आहे असं तुला वाटत असेल, तर आम्हाला आनंद आहे. आमचा तुझ्या निर्णयाला पाठिंबा आहे.”

“ हो, बेटा. आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही प्रियाला भेटण्यासाठी उत्सुक आहोत. तुझे आणि तिचे विचार जर छान जुळत असतील तर आम्हाला सुद्धा आणखी काय हवं. आम्ही तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या पाठीशी आहोत.”

आकाशला त्याची आई त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली.


प्रियाच्या घरातील थोडे जुने विचार असल्याने तिच्या आई-वडिलांना सुरुवातीला थोडी शंका असते, परंतु प्रियाचा आनंद पाहून ते तिच्या निर्णयाला ते मान्यता देतात.


“ प्रिया, आम्हाला थोडी काळजी आहे. पण जर तुला आकाशवर शंभर टक्के विश्वास असेल आणि तू त्याच्याबरोबर आनंदी राहशील असं तुला वाटतं असेल तर आमची तुझ्या निर्णयाला मान्यता आहे. “

“हो, प्रिया. आम्हाला फक्त तुझं सुख हवं आहे. आपली आर्थिक परिस्थिती बेताची आहे हे तुला माहीती आहेच. म्हणूनच तुला त्या मुलावर शंभर टक्के विश्वास असेल तर आम्ही तुझ्या सुखाआड येणार नाही.आम्ही आकाशला भेटायला उत्सुक आहोत.”

आपल्या आई वडिलांचं बोलणं ऐकून प्रियाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिने चटकन आपल्या आईला मिठी मारली.आईनेही तिच्या पाठीवरून हात फिरवला.


घरच्यांची संमती मिळाल्यानंतर, आकाश आणि प्रिया अधिक आत्मविश्वासाने एकमेकांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी एकत्र येतात. त्यांची भेटी वारंवार होतात आणि त्यांचं नातं अधिक घट्ट होतं जातं.

---

“आकाश, मला तुझ्या आई-वडिलांचा खूप आधार वाटला. ते खूप चांगले आहेत.”

“हो.प्रिया, तुझे आई-वडीलसुद्धा खूप समजूतदार आहेत. आपण एकत्र खूप चांगले आयुष्य घालवू असं मला मनापासून वाटतंय.”

हे बोलताना आकाशने हळूच प्रियाच्या हात हातात घेतला.

“ आकाश. तुझ्या पाठिंब्यामुळे माझ्या कला स्टुडिओचं स्वप्न साकार होईल याचा मला आनंद होतोय.”

“ तुझ्या प्रेरणेने माझं स्टार्टअप यशस्वी होईल. आपण दोघं एकमेकांचं स्वप्न पूर्ण करू.”

आकाश प्रिया कडे बघत म्हणाला आणि हलकसं हसला. प्रिया पण हसली.

त्यांच्या प्रेमकहाणीला एक नवीन दिशा मिळाली .ज्यात दोघेही एकमेकांच्या स्वप्नांना समर्थन देत, त्यांच्या आयुष्याची सुंदर गोष्ट लिहिण्यासाठी वचनबद्ध झाले.

____________________________
क्रमशः पुढे काय होईल बघू.