फुलले रे क्षण माझे..भाग३ अंतिम भाग
मागच्या भागात आपण बघीतली की दोघं एकमेकांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध होतात आता पुढे बघू.
लग्नाची तारीख जवळ येत असताना, आकाश आणि प्रिया दोघेही अत्यंत उत्सुक असतात. त्यांच्या दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाच्या तयारीची लगबग चालू असते. लग्नाला फक्त एक महिना बाकी असताना, आकाश एका महत्त्वाच्या मिटिंगला जात असताना त्याचा अपघात होतो.
घडलेला अपघात गंभीर असल्यामुळे आकाशला त्वरित रुग्णालयात दाखल केलं जातं आणि त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात येतं. डॉक्टरांनी सांगतात की आकाशच्या प्रकृतीला धोकादायक स्थिती आहे आणि पुढचे 72 तास अतिशय महत्त्वाचे आहेत.
आकाशच्या कुटुंबातील सगळे प्रिया आणि तिचे कुटुंब ताबडतोब रुग्णालयात पोहोचतात. ते सर्व खूप घाबरलेले आणि काळजीत असतात. आकाशच्या आई-वडिलांना मुलाच्या अपघाताची बातमी ऐकून धक्का बसतो. प्रिया ही अस्वस्थ आणि दुःखी होते. तिला आकाशची खूप काळजी वाटते.
प्रिया रुग्णालयात बसून निरंतर देवाची प्रार्थना करत असते. आकाशला बरे होण्यासाठी देवाजवळ विनवणी करत असते. तिचे डोळे पाणावलेले असतात आणि ती आपल्या आईच्या खांद्यावर डोकं ठेवते. प्रियंकाची आई तिला हळुवार थोपटले. त्यांच्या डोळ्यात भीती दिसते. लग्नाला जेमतेम महिना राहिला असताना हे काय अघटीत घडलं हे त्यांना कळत नाही.
आकाशच्या आई-वडिलांचे अश्रू थांबता थांबत नाहीत. ते डॉक्टरांकडे वारंवार चौकशी करतात.
शेवटी तीन दिवसांनंतर डॉक्टर येऊन सांगतात की आकाशची प्रकृती स्थिर झाली आहे आणि तो आता बरा होईल. या बातमीने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. प्रिया धावत आकाशच्या बेडजवळ जाते आणि त्याला घट्ट मिठी मारते. आकाश हळूहळू डोळे उघडतो आणि प्रियाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटतं. त्याच्या घरच्यांना आणि प्रियाला अश्रू अनावर होतात.
आकाशचा अपघात खूपच गंभीर असल्यामुळे डॉक्टरांना त्याचा एक पाय कापावा लागतो. हा निर्णय घेताना सर्वांनाच खूप दुःख होतं, पण आकाशच्या जीवासाठी हा निर्णय अनिवार्य होता. जेव्हा आकाश शुद्धीवर येतो, तेव्हा त्याला आपल्या स्थितीची जाणीव होते. आपल्याला एक पाय नाही ही जाणीव त्याला खूप त्रास देत. त्याच्या मनात खूप निराशा येते. त्याच्या मनात विचार येतो की आता तो प्रियाला आनंदी ठेवू शकणार नाही.
त्या निराशेतून आकाश प्रियाशी लग्न करण्याला नकार देतो. प्रिया जेव्हा हे ऐकते, तिला खूप धक्का बसतो आणि ती विचारात पडते की आकाश अचानक असं का वागतो आहे. ती आकाशला भेटायला जाते, पण आकाश तिला भेटायला नकार देतो. प्रिया निराश आणि अस्वस्थ होते, ती आकाशच्या निर्णयाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करते.
प्रियाला आकाशच्या निर्णयाचं खरं कारण कळतं - त्याच्या अपंगत्वामुळे तो तिच्यासाठी योग्य नवरा होणार नाही असं त्याला वाटतं. प्रिया त्याच्या भावना समजून घेते, पण ती हार मानत नाही. ती ठरवते की आकाशला आपल्या प्रेमाची आणि समर्पणाची ताकद दाखवायची आहे.
प्रिया आकाशच्या खोलीत जाऊन त्याच्या समोर बसते. ती त्याला सांगते,
"आकाश, मला तुझा एक पाय नाही तर तुझं प्रेम आणि तुझी साथ हवी आहे. तुझं अपंगत्व माझ्यासाठी अडचण नाही, कारण तूच माझ्या जीवनाचा आधार आहेस. आपण एकमेकांच्या साथीने हे आव्हान पार करू शकतो. तुझ्या शिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. तुझा फक्त एक पाय गेलाय. तुझी बुद्धी, तुझी विचार शक्ती तुझा स्वभाव कणखर आहे. त्यांना अपंगत्व आलेलं नाही. आपण कृत्रिम पाय लावू. त्या पायाच्या आधारे तू पुन्हा पहिल्या सारखा चालू शकशील. आकाश तू असा वेड्यासारखा निर्णय घेऊ नको.आपण दोघं नाही एक आहोत. एकमेकांच्या मदतीने आपल्याला दोघांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला ऊठावच लागेल.माझ्याशी लग्न करावच लागेल.”
हे बोलून प्रियाने आकाशचा हात आपल्या हातात घेतला. आकाशच्या डोळ्यातून घळ अश्रू ओघळू लागले. चेह-यावर आनंद झळकला, आकाशच्या कंठ दाटून आला.
आकाशला प्रियाने आनंदाने मिठी मारली. हां सुवर्ण क्षण आकाश आणि प्रियाच्या घरच्यांनी बघीतला. त्यांनीं एकमेकांचं अभिनंदन केलं.
अशा प्रकारे आकाश आणि प्रियाच्या गोड संसाराला सुरुवात होण्यापूर्वी जे ग्रहण लागलं होतं ते प्रेमाच्या शक्ती मुळे दूर झालं.
__________________________________समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा