फुलले रे क्षण माझे...भाग१

एक प्रेम कथा.
फुलले रे क्षण माझे… भाग १

आपल्या कथेचा नायक आकाश आणि नायिका प्रिया यांच्या बद्दल थोडीशी माहिती अशी आहे.

आकाश हा एक हुशार, मेहनती आणि कष्टाळू तरुण आहे. तो संगणक अभियंता आहे आणि एका मोठ्या आयटी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो. त्याला नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड आहे आणि त्याच्या कामात नेहमीच काहीतरी नवीन आणि सर्जनशील करायची धडपड असते.

स्वभावाने आकाश शांत, समजूतदार आणि थोडा अंतर्मुख आहे. तो माणसांशी खूप चटकन मैत्री करत नाही, परंतु जेव्हा मैत्री करतो तेव्हा ती खूप घट्ट असते. त्याला वाचनाची आणि फिटनेसची खूप आवड आहे. आकाशला निसर्गात भटकायला आणि ट्रेकिंगला जाण्याची आवड आहे. त्याच्या विचारसरणीमध्ये तंत्रज्ञान आणि सृजनशीलता यांचे मिश्रण आहे, ज्यामुळे तो एक आधुनिक आणि प्रगतिशील दृष्टिकोन बाळगणारा व्यक्ती आहे.

प्रिया एक कलेची विद्यार्थिनी आहे, जिला पेंटिंग, संगीत आणि नृत्याची आवड आहे. ती एका कला महाविद्यालयात शिकते आणि तिच्या कलेच्या क्षेत्रात नाव कमवण्याचे स्वप्न पाहते. तिला कलेच्या विविध शाखांमध्ये रस असून ती नेहमीच काहीतरी नवीन सृजन करायला उत्सुक असते.

स्वभावाने प्रिया उत्साही, आनंदी आणि हसतमुख आहे. ती नेहमीच सकारात्मक विचार करते आणि तिच्या अवतीभोवतीच्या लोकांना प्रेरणा देते. तिची विचारसरणी स्वप्नाळू असली तरी ती तिच्या ध्येयांसाठी मेहनत करण्याची आणि त्यांना साध्य करण्याची ताकद ठेवते. तिचे छंद आहे पेंटिंग, संगीत ऐकणे तसंच मित्रांसोबत वेळ घालवणं. . ती शास्त्रीय नृत्याचे कथ्थक चे शिक्षण घेते आहे

आकाश आणि प्रिया यांची ओळख आकाशच्या मित्राच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत होते. आकाश आणि त्याचा मित्र, राहुल, लहानपणापासूनचे मित्र आहेत. राहुलची बहीण, साक्षी, प्रियाची जवळची मैत्रीण आहे. साक्षीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत प्रियाला आमंत्रित केले होते. पार्टीत आकाश आणि प्रिया एकमेकांच्या समोर येतात. साक्षी त्यांची ओळख करून देते.

पार्टीत साक्षीने आकाश आणि प्रियाची ओळख करून दिली.

“आकाश, ही माझी जवळची मैत्रीण प्रिया. प्रिया, हा माझ्या भावाचा लहानपणीचा मित्र आकाश.

“ हॅलो प्रिया. साक्षीने तुझ्याबद्दल मला खूप सांगीतलं आहे.”

“ हॅलो आकाश. साक्षीने तुझ्याबद्दलही खूप काही सांगीतलं आहे.”
“ चांगलंच सांगीतलं नं माझ्या बद्दल “ असं हसत आकाशने प्रियाला विचारलं प्रियाने हो अशी हसून मान डोलावली.

“प्रिया तू कला शाखेत आहेस ना? तुला कलेतील कोणता प्रकार आवडतो?

“ मला पेंटिंग, संगीत आणि नृत्याची खूप आवड आहे. मला पेंटिंगमध्ये नवनवीन तंत्रं आजमावायला आवडतात. प्रत्येक वेळी एक नवीन कथा सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. “

“ वा! गुड. तुझ्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचा विचार केला आहे का?”

“ हो. माझे सर म्हणतात की एक भावना निवड आणि त्यात वेगवेगळ्या वेळी माणूस कसा वागत असेल त्याचा अभ्यास कर मग त्यावर चित्र क्रं.”
“ छानच सजेशन आहे.” आकाश उत्तेजीत स्वरात म्हणाला.

“तू कोणत्या क्षेत्रात आहेस?”

“मी संगणक अभियंता आहे. मला तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी खूप आवडतात.


“तुला तुझ्या कामात काय आवडतं?”प्रियाने विचारलं.

“मला नवीन तंत्रज्ञान शिकायला खूप आवडतं. प्रत्येक प्रकल्प नवीन आव्हानं आणतो, त्यातून खुप काही शिकायला मिळतं. आपलं ज्ञान आणखी वाढत जातं. शिकताना आलेली आव्हानं पार करणं मला खूप आवडतं. तुझ्या कलेबद्दल सांग ना.

“आकाश:भविष्यात तू काय करायचा विचार केला आहेस?”

प्रियाने विचारलं.

“ मी विचार केलाय. मला माझं स्वतःचं सॉफ्टवेअर स्टार्टअप सुरू करायचं आहे. नवीन आयडियाजवर काम करायला मला खूप आवडेल. तू काय विचार केला आहे?”

“ मला माझा कला स्टुडीओ स्थापन करायचा आहे.”

“ प्रिया आपला व्यवसाय करण़ नेहमीच चांगलं असत़.”

“ ऐ तुम्ही दोघं इकडे का बसलात? चला सगळे डान्स करणार आहे आता”
साक्षीने दोघांना जबरदस्तीने उठवत म्हट्लं
“ ऐ आम्हाला नाचता येत नाही.”
आकाश म्हणाला.
“ नसेल येत तरी चल.”
साक्षी दोघांनाही जबरदस्तीने डान्स फ्लोअर कडे घेऊन गेली.
_________________________________
क्रमशः.आज आकाश आणि प्रियंकाची ओळख झाली पण या ओळखीचं रूपांतर वारंवार होणाऱ्या भेटीत होईल कि? बघू पुढील भागात.


🎭 Series Post

View all