"मी एकटीने एवढी दोन-दोन लग्न काढली.. तेही नवरा नसतांना.."
रेवतीबाईंचा भरल्या घरात हे वाक्य पाचव्यांदा सर्वजण ऐकत होते. आज घरात त्यांच्या धाकल्या लेकाच्या- सुजयच्या लग्नाची हळद लागणार होती. सर्व नातेवाईक जमले होते. ही पिढी गावाकडून शहरात आल्याने रितिभाती अजूनही गावाकडच्याच पाळल्या जात होत्या. त्यासाठी गावाहून मोठा गोतावळा येऊन बसला होता.
"वहिनी...वहिनी....वहिनी..."
सकाळपासून घरात ही एकच हाक दुमदुमत होती. सुजयची वहिनी पहाटेपासुन कामाला लागली होती. पाहुणे जमले त्यांच्यासाठी चहा, नाश्त्याची तयारी, हळद समारंभासाठी लागणारे साहित्य आणि त्यात दिराने त्याच्या सगळ्या पोशाखाची जबाबदारी तिच्यावर दिलेली. पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे ती घरात नुसती धावपळ करत होती.
आलेले पाहुणे तिचं कौतुक करत होते,
"खरंच, चांगला उरक आहे रेवाला.."
"होना, माझी सून तर बाई..घरात काय चाललंय काही घेणं नव्हतं, फक्त तिचा मेकप आणि पार्लर एवढंच पाहिलेलं तिने.."
रेवा हे कौतुक ऐकण्यासाठी करत नव्हती, तर तिचं कर्तव्य म्हणून आणि घरातलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सगळं करत होती.
"रेवाने बघा ना कार्यक्रमाचं सगळं साहित्य कसं नीट रचून ठेवलं आहे, आमच्यावेळी एक वस्तू धड कुणाला सापडत नव्हती.."
सूनबाईचं कौतुक ऐकून रेवतीबाईंना रागच येत होता, सगळं कौतुक सुनेचंच, काल आलेल्या या मुलीचं सगळं दिसतंय..मी मात्र नवरा नसतांना सगळं सांभाळलं त्याबद्दल कुणीही बोलत नाही याबद्दलचा राग त्यांच्या मनात उफाळून येत होता.
हळदीच्या दिवशी बरेच कार्यक्रम होणार होते, त्यातल्या कशातही रेवतीबाईंनी दखल घेतली नव्हती, स्वतःच्याच घरात पाहुण्यासारखं बसून होत्या आणि वर 'मीच केलं' च्या फुशारक्या ऐकून नातेवाईकही कंटाळले होते.बिचारी रेवा एकटीच सगळं बघत होती आणि तेही कसली अपेक्षा न करता, या सगळ्या कार्यात त्यांची सून रेवा आणि सगळ्या नातेवाईकांचा हातभार आहे हे रेवतीबाईंना मान्य करायचंच नव्हतं..
"वहिनी...अहो दिवट्या बुधल्या कार्यक्रमासाठी दिवटी लागणार आहे, आहे का तुमच्याकडे? आईने चांगली आठवण करून दिलेली पण घाईघाईत मी गावाहून आणायची विसरलो बघा......."
चुलतदिराचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत रेवाने दिवटी पिशवीतून काढून त्याच्या हातात ठेवली, तो दिर समाधानाने हसला आणि त्याला कौतुकही वाटलं,
"वहिनी तुमची तयारी म्हणजे अगदी जबरदस्त हा.."
आता मात्र सासूबाईंना सहन होईना, त्या म्हणाल्या,
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा