गाठभाग दोन
संध्याकाळी पार्टी ला जायचे आहे बॉसकडे."अनिकेत जाताना बोलून गेले.
सुलक्षणाने छानशी साडी काढली ब्लाउज घालून पहावा होतो की नाही? शरीर वाढत चाललंय.
अनिकेत म्हणतो" तू अशीच मला आवडते" ते ठीक आहे पण पुढे जाऊन वाढलेलं वजन कमी करणे कठीण. आत्ता एक तारखे पासून एरोबिक्स क्लासेस जॉईन करारयचेच.
अनिकेत म्हणतो" तू अशीच मला आवडते" ते ठीक आहे पण पुढे जाऊन वाढलेलं वजन कमी करणे कठीण. आत्ता एक तारखे पासून एरोबिक्स क्लासेस जॉईन करारयचेच.
संध्याकाळी तयार होताना ब्लाऊज कसा- बसा अंगात घुसवला व साडी नीट करत सुलक्षणा ने आरशात पाहिले गळ्यातल नीट करेपर्यंत अनिकेत मागे येऊन उभे राहिले
. "वा व काय मस्त दिसतेस ग! त्या मिसेस लाड जळून खाक होतील तुला पाहून."
. "वा व काय मस्त दिसतेस ग! त्या मिसेस लाड जळून खाक होतील तुला पाहून."
पुरे---निघायच?
हं-- जावं कि--अनिकेत ने तिला मागून मिठी मारत म्हंटले.
हातातल्या हेयर ब्रश आरशात पाहून उगारत 'अरे काळवेळाचे असं काही भान ठेव' .
"कसे ठेवू तू ही अशी नटून थटून समोर आली की-"
-- चल रे आता, म्हणत सुलक्षणा किल्ली घेऊन बाहेर निघाली.
"कसे ठेवू तू ही अशी नटून थटून समोर आली की-"
-- चल रे आता, म्हणत सुलक्षणा किल्ली घेऊन बाहेर निघाली.
रात्री कपडे बदलताना हात वर करून ब्लाऊज काढायला गेली तेव्हा काखेत बारीक शी गाठ जाणवली, हात वर करताना दुखतोय असे वाटले, काय बरे झाले? कुठे हात आपटला कां? असे म्हणत तिने कपडे बदलले.
गाठीकडे तिने जरी दुर्लक्ष केले तरी ती वाढतच गेली डाव्या स्तनाचा आकार ,रंगही वेगळा जाणवू लागला.
एक दिवस अनिकेतला तिने जवळ बोलावले .ने
.”अरे बघ ना जरा” त्याच्यासमोर अनावृत्त होत तिने त्याला विचारले.
एक दिवस अनिकेतला तिने जवळ बोलावले .ने
.”अरे बघ ना जरा” त्याच्यासमोर अनावृत्त होत तिने त्याला विचारले.
"त्याने लाडात येत”काय ग काय विचार आहे"
अरे नीट पहा मी काय म्हणते ते तिने काकुळतीने अनिकेतला दाखवले. अनिकेत ही जरा चपापले पण-- चेहऱ्यावर न दाखवता म्हणाले" अग होत असं आपण दाखवू डॉक्टरला काळजी नको करू.
डॉक्टरने नीट तपासले, कुठे दुखते कां, .केव्हा जाणवले? असे अनेक प्रश्न विचारले नंतर इतर विषयांकडे वळवत मुलांविषयी विचारले व तिला बाहेर पाठवले. नंतर अनिकेतशी त्या बोलल्या 'बायोप्सी करून पहावे लागेल'.
बायोप्सी झाली, त्या दिवसापासून मन कशातच लागत नव्हते .अनिकेत तिला धीर देत होते आणखीन काही असू शकते आणि समज काही असलं तरी आता पुष्कळ औषधोपचार आहेत .मी सांगतो तू नक्की बरी होशील.
सुलक्षणाचे सारखे डोळे भरून येत होते "मला इतक्यात नाही रे सोडून जायचे तुला". मला खूप भीती वाटते.
‘ वेडाबाई मी तुला बरं जाऊ देईन तू फक्त पेनिक होऊ नको.’
‘ वेडाबाई मी तुला बरं जाऊ देईन तू फक्त पेनिक होऊ नको.’
रिपोर्ट आले- तेच काळे ढग घेऊन. कॅन्सर डिटेक्ट झाला. गाठ बरीच पसरली होती उपचार सुरू झाले. मुलगा मुलगी दोघं धीर देत होते अनिकेत दाखवत नसते तरी तेही मनातून हादरले होते त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्टी लागली.
आणि ह्याच सुमारास अचानक रेवती भेटली.
दवाखान्यातून निघताना रिसेप्शनवर अनिकेत बिल पे करत होते तेव्हा रेवती रिसेप्शनवर रूम नंबर सहा कुठे व मिस्टर देसाई वगैरे काहीसे विचारत होते रूम कडे जाता जाता ती अडखळली तिची नजर सुलक्षणाकडे गेली क्षणभर दोघी एकमेकींकडे पाहतच राहिल्या तू दोघींच्या तोंडात शब्द निघाले.
रेवती तू इथे?
“आणि तू कोणासाठी?”
आणि किती बदलली सुलु काय होतय तब्येत बरी नाही ?
माझी ट्रिटमेंट सुरू आहे सुलक्षणाचा आवाज किंचित कापरा झाला. तिच्याजवळ बसत रेवतीने तिचा हात हातात घेतला व त्यावर हलकेसे थोपटत म्हणाली" अग होशील बरी".
माझी ट्रिटमेंट सुरू आहे सुलक्षणाचा आवाज किंचित कापरा झाला. तिच्याजवळ बसत रेवतीने तिचा हात हातात घेतला व त्यावर हलकेसे थोपटत म्हणाली" अग होशील बरी".
तू इकडे कुठे?
ते आमचे न्यूज एडिटर आहेत ना त्यांना पाह्यला आले मी.
ते आमचे न्यूज एडिटर आहेत ना त्यांना पाह्यला आले मी.
"तू एकटी तुझ्याबरोबर कोणी?"
"हे आहेत ना ते काय तिकडे" तेवढ्यात अनिकेत समोर आले. नमस्कार म्हणत अनिकेत ने सुलक्षणाकडे प्रश्नार्थक पहात डोळ्याने कोण ही? विचारले.
" मी रेवती सुलक्षणाची बाल मैत्रीण".
'अच्छा -अच्छा तुम्ही येताय घरी??
नाही येईन कधीतरी, पत्ता देऊन ठेव तुझा,
मी इथे मि.देसाई आमचे एडिटर आहे त्यांना पाह्यलाआले आहे, मी इथेच बोरिवलीला राहते हे माझे कार्ड म्हणत आपले कार्ड देऊन रेवती निघून गेली.
मी इथे मि.देसाई आमचे एडिटर आहे त्यांना पाह्यलाआले आहे, मी इथेच बोरिवलीला राहते हे माझे कार्ड म्हणत आपले कार्ड देऊन रेवती निघून गेली.
रेवती तिची बालमैत्रीण,जाति ने मराठा कुणबी, अभ्यासाची खूप आवड,शरीर यष्टी एक दम दणदणीत, कुणाला ही न घाबरणारी
या उलटसुलक्षणा भित्री नाकासमोर चालणारी,अभ्यासा पेक्षा इतरकलाकुसरीची आवड असणारी,
बाबांनी "किमान ग्रजुएट तरी हो"असे म्हंटले म्हणून आर्टृस ला एडमिशन घेतली.
एकदा सुलक्षणा ची काही मुलांनी छेड काढली, सुलक्षणा रडवेली झाली.रेवती ने पुढे येत त्या मुलांची जोरदार क्लास घेतली.

रेवती च्या घरी तिला फार शिकवायला तयार नव्हते.तिच्या साठी स्थळ पहायला सुरुवात करताच रेवती ने कडाडून विरोध केला.
सुलक्षणा ची फायनल ची परीक्षा होताच तिचे लग्न झाले. नी ती मुंबई निवासी झाली.
आणी इतक्या वर्षांनी रेवती अशी समोर आली.
—------------------------------++++++++++
क्रमशः
रेवती घ्या येण्याने काय होणार?
सुलक्षणा ची फायनल ची परीक्षा होताच तिचे लग्न झाले. नी ती मुंबई निवासी झाली.
आणी इतक्या वर्षांनी रेवती अशी समोर आली.
—------------------------------++++++++++
क्रमशः
रेवती घ्या येण्याने काय होणार?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा