गांठ भाग तीन
केमोथेरपी होऊन महिना होत आला. अजून ही अशक्तपणा खूप जाणवत होता. कैमो नी होणारी तगमग ह्या सगळ्या पेक्षा ही अनिकेत ची होणारी परवड तिला सहन होत नव्हती.
जवळ असुनही दूर दूर रहायला ती आता शिकत होती शरिराने,पण मन मात्र अजुनही अनिकेत च्या आजुबाजुला घुटमळत असे.त्यांना यायला उशीर झाला की जीव कासावीस होत असे.त्यांचे आपल्या कडे लक्ष नाही असे वाटून डोळे भरून येत.
अचानक एक दिवस रेवती आली उत्साहाचे कारंजे घेऊनच. हातात फुलांचा गजरा .
गजरा पाहून सुलक्षणा ला आठवलं.. अनिकेत बरेचदा गजरा घेऊन येत.एक सूचकता त्या गजरा आणण्यात असायची. आता तोच गजरा पाहून सुलक्षणा आणखीनच डिप्रेस झाली पण तसे न दाखवता गजरा ठेवून घेतला. गजरा लावायला डोक्यावर केस कुठे राहिले? किमोथेरपी नेपूर्वीचे लांब केस जाऊन जवळजवळ नाहीसे होत आलेल्या केसांवर गजरा लावण्याचे धारिष्ट रेवतीलाही नाही झाले.
“चलते बाहेर गाडीमध्ये फिरायला??... जरा बरं वाटेल..”

सुलक्षणा तयार झाली. घरातल्या उदास शांततेत तिला घाबरायला होत होते. अर्धा तासाने रेवती ने तिला घरी सोडले तोपर्यंत अनिकेत घरी आलेले होते.
रात्री झोपायला जेव्हा सुलक्षणा बेड वर आली अनिकेत च्या हातात गजरा पाहून दचकली, त्यांच्या शी नजर मिळवण्याचे तिचे धारिष्ट होत नव्हते, खाली पहात तिने सांगितले
“अरे आज रेवती आली होती तिच्याबरोबर बाहेर गेले होते.”

‘समजले मला म्हणत अनिकेतने कूस बदलली. ‘
सुलक्षणाचे डोळे भरून आले अनिकेतची होणारी कुचंबणा तिला जाणवत होती पण् तिचाही नाईलाज होता.
दिवस आपल्या गतीने चालले होते. सकाळी चहा पिताना त्याने तिला औषधाची आठवण करून दिली व पुढच्या महिन्यात डॉक्टर कडे जायचे आहे ती तारीख ही नोट केली तिच्या गालावर हलकेसे किस करत तो निघाला त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे पहाताना सुलक्षणाला जाणवले काय होऊन बसले..
दिवस आपल्या गतीने चालले होते.
परत एकदा हॉस्पिटल मध्ये जाऊन टेस्ट करून आली .कॅन्सर ने आपला विळखा आणखीनच घट्ट केला होता.
आता सर्जरी हा एकच उपाय होता मास्टेक्टाॅमी…..

दवाखान्यातून सुलक्षणा घरी आली ती शरीराबरोबर मनानेही कोसळली होती. एक भाग पूर्णपणे काढला. ज्या सौंदर्या ने ती आत्ममुग्ध झाली होती त्या शरिराला आरशात पाह्यची तिला लाज वाटत होती.
दिवसभर ती पडूनच असे काही करायची इच्छा होत नव्हती. अनिकेत तिची खूप काळजी करत होते पण तिचे मन परत उभारी धरायला तयार नव्हते सर्व काही संपले असेच तिला वाटत होते….
दोन दिवसांनी अनिकेत परतले.

बरेचदा रात्री झोप न झाल्यामुळे आणि औषधाची खुमारी,दुपारी खूप गाढ झोप लागत असे सुलक्षणाला..
त्या दिवस दुपारी जेव्हा जाग आली बाहेरअंधारल्यासारखे वाटत होते आणि अनिकेत च्या बोलण्याचा आवाज येत होता मधूनच हसण्याचा आवाजाने सुलक्षणा उठून बसली. हा तर रेवतीचा आवाज .केव्हा आली? आपल्याला कळलेही नाही .
सुलक्षणा तिथे च बसून राहिली.
बराच वेळ त्या दोघांच्या हसण्या बोलण्या चा आवाज येत होता .
अचानक रेवतीचा आवाज येईनासा झाला. सुलक्षणा उठून बाहेर आली. अनिकेत ला गुणगुणतान पाहून तिला खूप बर वाटल.
किती तरी दिवसांने तिने अनिकेत ला इतकं फ्रेश मूडमध्ये पाहिलं . तिच्या याआजारपणामुळे सर्व घरावर एक उदासवाणी अवकळा पसरलेली होती .
एकटी असताना आताशा सुलक्षणा च्या मनात एक विचार डोकावायचा, उद्या ला जर आपण नसलो तर अनिकेत कडे कोण लक्ष देणार? मुल त्यांच्या व्यापात आणि अनिकेत ला मुलांवर अवलंबून रहाणे पटणार नाही.अगदीच एकटे पडतील!
त्यांना कोणी तरी जोडीदार हवाच अनिकेत अजूनही शरिराने फिट आहेत स्वभाव ही हौशी, कोणीही सहज त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वावर फिदा होईल.आणी अचानक रेवती चा विचार तिच्या मनात डोकावला.

खरंच कि रेवती आहे तशीच स्मार्ट,टेलेंटेड, अनिकेत ला शोभून दिसेल अशी आणि मुख्य म्हणजे एकटी आहे अजुन तरी .
आता अनिकेत घरी असले की सुलक्षणा काही ना काही कारण काढून रेवतीला घरी बोलावत असे, त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या कि औषध घेण्याचा नावावर आत येऊन झोपून जात असे. असे दोनचार वेळा घडले एक दिवस रेवती ने विचारले अनिकेत शी तुझं बिनसलं आहे कां ?
“कां अस कां विचारले ?
“नाही सहजच,”
“कां अस कां विचारले ?
“नाही सहजच,”
त्या नंतर बरेच दिवस रेवती आली नाही.
“अनि बरेच दिवस झाले रेवती आली नाही तुला काही बोलली होती कां?”
‘मला कां बरे?’
सहजचं ,’कशी वाटते रेवती तुला?’
छान आहे अनिकेत सहजपणे बोलून गेले.
छान आहे अनिकेत सहजपणे बोलून गेले.
आता सुलक्षणा ला स्वतः ची जागा घेण्यासाठी रेवती परफेक्ट वाटू लागली.तिने एक दोन वेळा रेवतीचा फोन ट्राय केला पण फोन स्विच ऑफ येत होता.
एक दिवस रेवतीचा मेसेज आला
“सुलु मी माझ्या बॉस बरोबर जर्मनीला आले आहे, त्यांच्या ट्रीटमेंट साठी यायचे होते यायच्या आधी तुझी भेट घेणार होते पण मुद्दामच नाही आले .काय चाललंय तुझ्या डोक्यात? अनिकेत च खूप प्रेम आहे ग तुझ्यावर . रिप्लेसमेंट म्हणून तू माझ्याकडे पाहते हे माझ्या लक्षात आले आणि म्हणूनच तुला कळवते आहे वेडाबाई अनिकेत फक्त तुझेच आहेत. तुला त्यांच्या साठी बरं व्हायचे आहे. आणि माझ म्हणशील तर मी तुला सांगणार नव्हते पण आता सांगते मी आणि मिस्टर देसाई आम्ही दोघेही बऱ्याच वर्षापासून “लिव्ह इन रिलेशनशिप” मध्ये राहतो लग्न आम्ही नाही केलं .तसं करायचा विचारही नाही.
अनिकेत ला तुझी गरज आहे तेव्हा असले वेडे विचार मनातून काढून टाक!
तुझी रेवती

आणि हो- पुढे येईन तेव्हा मला पूर्वी ची अनिकेत वेडी सुलक्षणा भेटायला हवी…
सुलक्षणा कितीतरी वेळ तो मेसेज वाचत होती. अचानक मागून पाठीवर हात पडला वळून पाहिले मागेअनिकेत उभे होते. त्यांच्याकडे पाहतात तिचे डोळे पाणावले.
काय चाललं होतं तुझ्या डोक्यात सुलू?
मला तर कल्पनाही नव्हती . रेवती माझ्याजवळ बोलली आपल्या दोघांची ही लग्न गाठ तुला वाटते तितकी कमकुवत नाही. कॅन्सर ची गाठ विरघळली ,पण तुझ्या मनातली निराशेची गाठ– त्याचा इलाज करायला हवा आहे.. मी तुझ्या शरीरावर नाही तुझ्या वर प्रेम करतो ग तुझ्या शिवाय माझ्या जीवनात आता कोणी ही नको आहे.‘आपल्या नात्याची ही रेशीम गाठ तुझ्या अशा वागण्याने निरगाठ होऊन बसली.आता ही गाठ या जन्मात तरी सोडायचा विचार करू नकोस .I Love you,and I wan't you for ever,असे म्हणत अनिकेत ने तिला मिठीत घेतले व म्हणाले “दोन दिवसांनी पुन्हा एकदा डॉ कडे जायच आहे रुटिन चेकप ला तिथून मग चौपाटीवर जाऊ बरेच दिवस झाले बर्फाचा गार गार गोड गोड गोळा चाखला नाही चलूया कां ?”

त्यांच्या या बोलण्याने त्यांच्यातल्या सूचकतेने मनातून सुखावलेल्या सुलक्षणाने त्यांच्या छातीवर आपले डोके टेकून दिले.
____________________ संपूर्ण
लेखिका –सौ.प्रतिभा परांजपे
____________________ संपूर्ण
लेखिका –सौ.प्रतिभा परांजपे