Login

गाठ

कोणाची दृष्ट लागले आणि हे काळे कॉफी नशिबी आली.
गांठ भाग एक

टाऊन हॉलच्या
प्रेक्षागृहातमांडलेल्या खुर्चीवर सुलक्षणा येऊन बसली.आजूबाजूच्या खुर्च्यांवर समवयस्क तर काही वयाने लहान मोठे असलेले स्त्री पुरुष बसले होते.

बरोबर दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला. स्टेजवर लायन्स क्लबचे अध्यक्ष व इतर सन्माननीय डॉक्टर बसलेले होते. त्यांच्या मागे कॅन्सर केअर डे चा बॅनर लावलेला होता. अनेक डॉक्टरांनी कॅन्सर केअर वर भाषण दिली व कॅन्सर अवेअरनेस बद्दल सांगितले.
त्यानंतर कॅन्सर मधून बरे झालेल्या बऱेच कॅन्सर फायटर्स आणि विनर्स आपले अनुभव सांगताना म्हणाले"जेव्हा कॅन्सर झाल्याचे कळले तेव्हा वाटले आयुष्य संपले पण आम्ही मनोबल ठेवले आणि आज तुमच्यासमोर उभे आहोत.
या सगळ्या प्रवासात घरच्यांची खरी परीक्षा होती .त्यांच्या सहयोगाने तसेच डॉक्टरांच्या औषधोपचाराने आम्ही जिंकलो.
बरे झालेल्या प्रत्येक कॅन्सर पेशंटचे अनुभव जवळपास असेच होते.
कार्यक्रमात मध्ये ब्रेक होता. सुलक्षणा उठून बाहेर आली, तिला आता तिथे बसवत नव्हते.
जवळ असलेल्या देऊळात ती गेली. तिथे दर्शन करून थोडा वेळ बाहेर बेंच वर बसली.
थोड्याच वेळात आरती सुरू झाली, झांजा घंटेचा येणार मधूर नाद, आरती कानावर पडत होती...
. सुलक्षणाने डोळे मिटले. ओठांनी हळूहळू आरतीम्हणत, टाळ्या वाजवत कितीतरी वेळ ती बसली होती ...
थोड्यावेळाने गुरुजींनी आरती समोर करत आवाज दिला तशी तिने डोळे उघडून आरती घेतली व प्रसाद हातात घेत डोक्याला हात लावून तोंडात टाकला. थोड्यावेळ सुलक्षणा बसून राहिली.
घरी जाण्याची घाई नव्हती, कोणी वाट पाहणारे नव्हते,
अनिकेत मीटिंग मुळे बाहेर गावी गेले होते ,ते उद्या परतणार..

देवळातून बाहेर येऊन तिने टॅक्सी केली व चौपाटीवर समुद्रकिनारी येऊन बसली.
मनात उठणाऱ्या विचारांच्या लाटा वाळूत बसून शांत करू पहात होती...
आजूबाजूला खूप गर्दी होती अनेक जोडपी बसलेली, काही मुले वाळूत खेळत होती, तर काही शंख शिंपली गोळा करत होती.
भेळ चाटच्या ठेल्यावर बरीच गर्दी होती .
भेळ पाणी-पुरी पाहूनही तिच्या तोंडाला पाणी नाही आले.

लग्ना नंतर अनिकेत नी ती सुट्टीच्या दिवशी चौपाटीवर यायचे तेव्हा ती पोटभर पाणीपुरी ,भेळ खात असे. अनिकेत तिला चिडवायचे "पाणीपुरी वाल्याशीच लग्न करायचे होते, पण मग म्हणायचे "माझे काय झाले असते? मैं तो कुवांरा ही रह जाता."
अशी पोटभर तिखट पाणीपुरी, भेळ खाऊन झाल्यावर मग दोघं कुल्फी खायला जायचे .कधीकधी ती बर्फ गोळा घ्यायची .ते रंगबिरंगी गोळे चाटताना तिला पहात त्यांना खूप मजा यायची.
रात्री तिचे ओठ ओठात घेऊन अनिकेत म्हणायचे" हं गोळा खूपच गोड होता " मग ती लाजून लाल व्हायची.

गावातून मुंबई सारख्या शहरात लग्न होऊन आलेल्या सुलक्षणाला हे सर्वच खूप खूप सुखावून जात होतं. एवढ्या जवळून समुद्र पाहायला मिळणार या कल्पनेनेच ती रोमांचित झाली होती, जेव्हा अनिकेत ने तिला होकार दिला.
त्या येणाऱ्या मोठ्या मोठ्या लाटा पायाखालून सरकणारी वाळू लहान मुलासारखी ते दृश्य डोळ्यात साठवून घेत असे, अनिकेत तिचा हात धरून पुढे पुढे नेत असत पायाखालून सरकणारी वाळू जाणवताच ती घाबरून त्यांना घट्ट बिलगायची. डोळ्यातून पाणी येत असे. अनिकेतला त्या सर्वाची खूप मजा येत .
किती छान दिवस होते ते खरंतर किती तरी वर्ष असे आनंदात निघून गेले हे कळलेच नाही.
ती आणि अनिकेत, दोघं सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत होते .
त्यांच्या प्रेमाच्या बरसातीने तिची काया बहरत फुलत गेली. दोन मुलांच्या रुपात त्यावेली वर फळे धरली ,नाजूक शा सुलक्षणाचे यौवन फुलत गेल_
कानाशी पिपाणीच्या आवाजाने त भानावर आली.
भाग दोन...
घरी परत येऊन भाताबरोबर भाजी खाऊन सुलक्षणा बाहेर बाल्कनीत बसली सकाळपासूनच्या दगदगीने थकवा जाणवत होता.
रात्री झोपायच्या आधी कॉफी प्यावी असे वाटू लागले. पाणी उकळून मोठ्या मग मध्ये साखर व कॉफी टाकून काळीकॉफी घेऊन बेडरूम मध्ये आली.
काॅफी च्या वाफेबरोबर आठवणीचे वलय सुलक्षणाच्या मनात फिरायला लागले.
लग्नानंतर सुरुवातीला अनिकेतला रात्री झोपायच्या आधी कॉफीची सवय होती. हळूहळू सुलक्षणा ही घेऊ लागली. ् गावात वाढलेली सुलक्षणा, खूप दुधाची कॉफी तिला लागे पण अनिकेत कमी दुधाची घेत.
"तुला दूध नाही आवडत? विचारले की म्हणत "दूध खूप आवडते पण-- ते दूध तुझ्या त्या घटातले अधिक गोड लागे" म्हणत डोळे मिचकावत तिच्याकडे पहात" मग लटक्या रागाने सुलक्षणा डोळे वटारत
"तू पण ना" म्हणून उशी फेकून मारायची.
किती छान दिवस होते, काय होऊन बसले सगळे दूधच नासून गेलं .कोणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक. आणि हीकाळी कॉफी नशीबी आली.
कपातली गार झालेलीकाफी एका घोटात संपवून ती झोपायला गेली.

. रात्री जाग आली तेव्हा तीन वाजले होते आताशा झोप ही अशीच अवेळी उघडते, मग काही लागत नाही, मग पडल्या पडल्या जुन्या आठवणी जाग्या होतात.

मुलगा मोठा झाल्यावर बाहेर देशात शिकायला गेला, तिकडेच रमला, मुलगी लग्न होऊन सासरी.
सगळ्या जवाबदार्या तुन मुक्त दोघेही पारव्या च्या जोडी सारखी गुटर्रगूं करत दिवस चालले होते.
पण त्याच दिवसांत सकाळी उठताना थकवा वाटायचा, काही ही करू नये असे वाटत.
मेनोपाॅज मधे होते असं मैत्रीणींन कडून ऐकल होत. तसंच काहीसं असेल म्हणून फार लक्ष दिल नाही
—-------+++++------------------------------

क्रमशः पुढे काय वाढून ठेवले होते सुलक्षणा घ्या जीवनात?