Login

गगन भरारी

गगन भरारी
कविता
शीर्षक -गगन भरारी

तू नोकरी करायची नाही
घरून नकार घंटा वाजते
पंख छाटले जातात की काय
अनामिक भीती निर्माण होते......

विसरून मनाची दुर्बलता
नव्या उमेदीने उभे राहा
पराजित कधीच व्हायचे नाही
उंच भरारीचे स्वप्न पाहा...

जेव्हा कर्तृत्वाची सुवर्ण किरणे
उदास मनाला खुणावू लागतात
अन् उत्कर्षाची मंगल तोरणे
डोळ्यासमोर नाचू लागतात...

तेव्हा नैराश्याच्या खोल गर्तेतून
केवळ मनोबलाने बाहेर या
उज्ज्वल भविष्याची सुंदर स्वप्ने
प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी ठेवा...

म्हणून मनाने खचू नका हो
औदास्याच्या धुक्यात नका विरून जाऊ
मनाची उभारी असेल तरच
क्षितिजाच्या कडेवरचा शुक्रतारा पाहू.

सौ. रेखा देशमुख