गंधबावरे 54
"आपण भेटूयात का?" अनु
"आपण भेटूयात का?" अनु
"आज तर गेली आहेस इतक्यात तुला आठवण झाली." मिहिर
"व्हेरी फनी, कसला भारी जोक मारतोस." अनु
"मग का भेटायचं आहे?" मिहिर
"थोडं महत्वाचं काम आहे." अनु
"इथं होतीस तेव्हा आठवले नाही आणि तिकडे गेल्यावर लगेच महत्त्वाचे काम आठवले." मिहिर
"तू पुन्हा संशय घेत आहेस?" अनु
"संशय येण्यासारखेच तू वागतेस, मी तरी काय करू?" मिहिर
"राहू दे मग." अनु
"नको नको. आपण नक्की भेटूया." मिहिर
"आता का बरं?" अनु
"मला प्रपोज करायचंय." मिहिर
"उगीच काहीतरी बरळू नकोस." अनु
"तूच म्हणालीस ना भेटायचं म्हणून भेटूया." मिहिर
"ठीक आहे. कधी भेटायचं ते मी मेसेज करून सांगते." असे म्हणून त्या दोघांनी फोन ठेवला आणि झोपी गेले.
इकडे श्रेया देखील खूप आनंदात होती. तिला मिहिरला भेटून एक वर्ष झाले होते. एका वर्षानंतर ती मिहिरला पाहणार होती. मिहिर तिला ओळखेल की नाही तिला काहीच माहित नव्हते पण त्याला भेटण्यासाठी ती आतुर झाली होती. कधी एकदा मिहिरला भेटतोय असे तिला झाले होते. रात्रभर ती मिहिरच्या विचारातच होती. त्याला भेटलं की असं करायचं आणि तसं करायचं अशा वेगवेगळे प्लॅनिंग ती करत होती. कधी एकदा मिहिरला भेटतोय असे तिला झाले होते.
अखेर तो दिवस उजाडला. अनुने भेटण्याचा दिवस ठरवला आणि मिहिरला कुठे भेटायचे ते मेसेज करून सांगितले. डायमंड हॉटेलच्या शेजारी ब्ल्यू कॉफी शॉपमध्ये भेटण्याचे त्यांचे ठरले. मिहिरने देखील ओके म्हणून त्याला संमती दिली. आता त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय आज ठरण्याची वेळ आली. सगळेजणच भेटण्यास खूप आतुर झाले होते. इकडे अनुची मात्र मनाची घालमेल सुरू होती. मिहिर कोणता निर्णय घेईल? जर मिहिरने श्रेयाला निवडलं तर मी काय करायचे? माझे पुढचे आयुष्य काय? अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनामध्ये काहूर माजले होते. मिहिरने मला निवडले तर बरे होईल. श्रेयाला काय कोणीही मिळेल. तशीही ती खूप सुंदर आहे. कोणीही तिच्या प्रेमात पडेल पण माझ्यासारख्या सावळ्या मुलीला शिवाय आता एक वर्ष त्याच्यासोबत संसार केलेल्या मुलीसोबत कोण संसार करेल? शिवाय माझे करिअर मी मिहिरसोबत सुरू केले होते पण त्याच्यापासून वेगळे झाले की पुन्हा सुरुवातीपासून करिअर करावे लागेल. तो स्ट्रगल आणि वेगळाच. काय करावे तेच समजेना. सरळ श्रेयाच्या आधी माझ्या मनातले मिहिरला बोलून दाखवले तर. तसाही तो सध्या माझ्याशी चांगलं बोलतोय पण मी जर असे केले तर त्या दोघांना फसवल्यासारखे होईल. मी फक्त त्या दोघांमधला दुवा आहे. ती दोघे आधीपासूनच एक आहेत. फक्त थोड्या दिवसांसाठीच मला तिथे जायचे होते. माझे काम आता पूर्ण झाले शिवाय तिथे जाण्यासाठी मी स्वतःच्या मर्जीनेच तयार झाले होते. यामध्ये मला कोणीही जबरदस्ती केली नाही. पण आता तिथून बाहेर निघताना माझ्या मनाची कुचंबना का होतेय? मला त्यातून बाहेर का पडता येत नाहीये? कितीही केले तरी त्या दोघांचा संसार आहे. माझे त्यांच्यामध्ये काहीच काम नाही. पण माझे मन काही केल्या निघत नाही. मिहिरमध्ये गुंतलेले मन बाहेर कुठेच रमत नाही अशावेळी मी काय करावे माझे मलाच समजेना. यातून बाहेर काढण्यासाठी कुणाची मदत घेऊ. जर या गोष्टी कोणाला सांगितल्या तर त्यांचे माझ्याबद्दल काय मत होईल अशा असंख्य प्रश्नांनी तिचे डोके बधीर झाले होते. तशाच अवस्थेत तिने तिचे आवरून घेतले आणि श्रेयासहित घरातून बाहेर पडली.
अनु आणि श्रेया दोघीही ब्लू कॅफेमध्ये जाऊन बसल्या होत्या. बराच वेळ झाला तरी मिहिर अजून आला नव्हता. त्या दोघींनाही त्याला भेटण्याची आतुरता लागली होती. तो आल्यानंतरच कॉफीची ऑर्डर द्यावी म्हणून त्या तशाच बसल्या होत्या. त्यांच्याकडे बोलण्यासाठी एकही शब्द नव्हता. दोघी शांत तशाच मोबाईलमध्ये पाहत बसल्या होत्या. अनुला मिहिर कधी एकदा येतोय असे झाले होते पण तो आल्यानंतर पुढे काय होईल याची तिला भीती वाटत होती. मिहिरने जर श्रेयाला पाहिले आणि त्याला सगळे आठवले तर? किंवा त्याला काहीच आठवले नाही आणि तो श्रेयाला पाहून तिच्या प्रेमात पडला तर? अशा दोन्ही गोष्टींनी तिला भीती वाटू लागली. आणि जर त्याला काहीच आठवले नाही आणि तो श्रेयाशी काहीच बोलला नाही तर? असेही तिला वाटू लागले. मिहिर आल्यानंतरचा काळ तिच्यासाठी एक वेगळे वळण घेणार होता. तिच्या आयुष्यातील खूप मोठे वळण होते जेणेकरून त्यावरून तिचे पुढील भवितव्य घडणार होते. मिहिर जो काही निर्णय घेईल तो तिला मान्य होता पण मिहिरने तिला सपोर्ट करावा असे तिला वाटत होते. अनु आणि श्रेया त्यांच्या त्यांच्या विचारात बसल्या होत्या.
इकडे मिहिर मात्र सकाळपासून खूप आनंदात होता. अनुशी भेटून तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारावे असे त्याला वाटत होते कारण कॉलेजनंतर त्याचे मित्र कुणी नव्हते. मिहिरला नेहमी एकटेच राहणे पसंत होते त्यामुळे कॉलेज नंतरही तो एकटाच राहत होता. आता अनुशी बोलू लागल्यानंतर तिच्यामध्ये त्याला एक मैत्रीण दिसत होती आणि त्यानुसार तो तिच्याशी मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करत होता. आत्ताही तिच्याशी बोलून त्याला बरे वाटणार होते म्हणूनच तो भेटण्यास तयार झाला होता. आज सकाळपासूनच तो खूप आनंदात होता. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्याच्या आईला देखील बरे वाटले. तसे अनुने मिहिरच्या आईला ते दोघे भेटणार आहेत अशी कल्पना दिली होती त्यामुळे त्या देखील निश्चिंत होत्या. त्या दोघांचे सूर जुळले की त्यांना बरे वाटणार होते. तसेही अनुने खूप काही सहन केले आहे असे त्या म्हणायच्या त्यामुळे अनुचे आणि मिहीरचे लवकरात लवकर पुन्हा जळू दे अशा त्या देवाकडे रोज प्रार्थना करायच्या. आज मात्र त्या सुद्धा खूप आनंदात होत्या. मिहीर आणि अनु भेटणार म्हणजेच त्या दोघांचे लवकरच जुळेल असे त्यांना वाटत होते.
मिहिर अनुला भेटण्यासाठी जाणार होता म्हणून तो तयारीला लागला. अगदी दुपारपासूनच त्याने तयारीला सुरुवात केली होती. मस्त पैकी शेविंग करून तो बसला होता. आता कोणता शर्ट घालायचा म्हणून त्याने कपाट उघडले तेव्हा अनुने दिलेला तो शर्ट त्याला घालावासा वाटला म्हणून त्याने तो शर्ट काढून ठेवला. त्याने सगळे आवरण्यास सुरुवात केली. आवरून तो लवकरच तयार झाला होता पण इतक्या लवकर कसे निघावे म्हणून तो निवांत बसला होता. तरीही कॉफी शॉपमध्ये जाऊन बसावे अशा विचाराने तो घरातून लवकरच निघाला होता. कितीही लवकर निघाले तरी रस्त्यातील ट्रॅफिकमुळे त्याला कॉफी शॉपमध्ये पोहोचण्यास आपसूकच उशीरच झाला. लांबूनच त्याने अनुला पाहिले आणि त्याची वाट पाहत बसलेली अनु त्याच्या दृष्टीस पडली. अनुच्या शेजारी एक सुंदर मुलगी बसली होती हे देखील त्याने दुरूनच पाहिले. मिहिरने गाडी एका बाजूला पार्क केली आणि तो रस्ता क्रॉस करून कॉफी शॉपमध्ये जाऊ लागला. दुरूनच येत असलेल्या मिहिरकडे त्या दोघींचेही लक्ष गेले आणि त्या दोन क्षण त्याच्याकडे पाहतच राहिल्या.
दुरूनच येत असलेल्या मिहीरकडे पाहून अनुला खूप आनंद झाला कारण तिने दिलेला शर्ट त्याने घातला होता आणि त्या शर्टमध्ये तो खूपच छान दिसत होता. मिहिर मी दिलेला शर्ट घालून आला आहे याचा अर्थ तो नक्कीच माझ्यासाठी इथे आला आहे. श्रेयाकडे पाहूनही त्याच्या चेहऱ्यावर काही प्रश्न निर्माण झाले नाही त्याचा अर्थ त्याला श्रेयासोबत जायचे नसेल असा विचार करत ती बसली होती पण तिला काही कळायच्या आतच श्रेया तिच्या खुर्चीतून उठून मिहीरकडे धावत जात होती. समोरून येणाऱ्या मिहिरदेखील श्रेयाकडे पाहिले आणि अनुला आणि मिहिरला काही कळायच्या आतच श्रेयाने मिहिरला जाऊन मिठी मारली.
अनुला कसेतरीच वाटले. तिचे मन खूप दुखावले. तिला रडू कोसळले होते पण कसेतरी तिने त्यावर बांध घातला आणि ती जड पावलांनी खुर्चीतून उठून तिथून जाऊ लागली. श्रेयाने मिहिरला मिठी मारल्यावर त्यालाही दोन क्षण काहीच समजेना. तो तसाच उभा होता.
पुढे काय होईल? मिहिर कोणता निर्णय घेईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा