गंधबावरे 59
जेवण आटोपल्यावर अनु गच्चीवर फेरफटका मारण्यासाठी गेली होती. श्रेया मात्र अनुच्या रूममध्ये जाऊन झोपण्याची तयारी करत होती. तिला खरंच बसून बसून खूप कंटाळा आला होता म्हणूनच ती झोपायला गेली होती. अनु मात्र बाहेर थंड वारा सुटला होता त्याचा आस्वाद घेत शतपावली घालत होती. शतपावली घालतानाच तिला मागे काही घटना घडलेल्या आठवत होत्या. त्या गोष्टी एखाद्या चित्रपटासारख्या तिच्या नजरेसमोरून जात होत्या आणि आजचा हा मिहिर तिला काहीसा वेगळाच भासत होता. आजपर्यंत कधी दोन शब्द न बोललेला मिहिर आज इतक्या गप्पा मारत होता की जणू आधी काही घडलेच नाही असे तिला वाटत होते. बोलता बोलता वेळ कसा निघून गेला हे तिला समजले नव्हते. श्रेयाला पाहून तो तिच्याच गुंतून जाईल, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल असे तिला वाटत होते पण तसे काहीच घडलेच नव्हते याचेही तिला आश्चर्य वाटत होते. ती तिच्या विचारांच्या तंद्रितच फिरत होती. इतक्यात तिला कसल्यासा आवाज झाल्याचे ऐकू आले आणि ती त्या दिशेने पाहून लागली तर तिथे मिहीर आला होता ते पाहून ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती.
जेवण आटोपल्यावर अनु गच्चीवर फेरफटका मारण्यासाठी गेली होती. श्रेया मात्र अनुच्या रूममध्ये जाऊन झोपण्याची तयारी करत होती. तिला खरंच बसून बसून खूप कंटाळा आला होता म्हणूनच ती झोपायला गेली होती. अनु मात्र बाहेर थंड वारा सुटला होता त्याचा आस्वाद घेत शतपावली घालत होती. शतपावली घालतानाच तिला मागे काही घटना घडलेल्या आठवत होत्या. त्या गोष्टी एखाद्या चित्रपटासारख्या तिच्या नजरेसमोरून जात होत्या आणि आजचा हा मिहिर तिला काहीसा वेगळाच भासत होता. आजपर्यंत कधी दोन शब्द न बोललेला मिहिर आज इतक्या गप्पा मारत होता की जणू आधी काही घडलेच नाही असे तिला वाटत होते. बोलता बोलता वेळ कसा निघून गेला हे तिला समजले नव्हते. श्रेयाला पाहून तो तिच्याच गुंतून जाईल, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल असे तिला वाटत होते पण तसे काहीच घडलेच नव्हते याचेही तिला आश्चर्य वाटत होते. ती तिच्या विचारांच्या तंद्रितच फिरत होती. इतक्यात तिला कसल्यासा आवाज झाल्याचे ऐकू आले आणि ती त्या दिशेने पाहून लागली तर तिथे मिहीर आला होता ते पाहून ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती.
"मिहिर, तू यावेळी इथे असा असा काय आलास?" अनुने आश्चर्याने विचारले.
"का? मी इथे यायचे नव्हते का? मी इथे येऊ नये असे कुठे लिहिले आहे का? हॅलो मॅडम, हे घर माझे आहे आणि मी कुठेही जाणारच. यात तुझी परवानगी घेऊन यायला हव होत का इथे?" मिहिर म्हणाला.
"तसे काही नाही. मला वाटत होतं की तू श्रेयासोबत बोलत असणार म्हणून मी म्हटले." अनु म्हणाली.
"मी आल्यापासून पाहतोय, काय ते श्रेया श्रेया श्रेया लावली आहेस. तू, मी कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही हे माझं मी ठरवणार. तुझी कोणतीच दादागिरी चालणार नाही. मला फक्त तुझ्यासोबत बोलायचं आहे तर तू फक्त श्रेया श्रेया करत आहेस. तुला नक्की काय म्हणायचं आहे? तू आता माझ्या डोक्यात जाऊ नकोस हं." मिहिर जवळपास ओरडतच अनुला म्हणाला.
"अरे, इतकं का चिडतोस? मी तर सहजच म्हटले." अनु म्हणाली.
"चिडू नको तर काय करू? मला तुझ्याशी बोलायचं असतं. मी आलो की तू त्या श्रेयाच नाव घेतेस असं का? तुझ्याशी बोलायला नको आहे का? तुला आवडत नाही का मी तुझ्याशी बोललेलं?" मिहिर नाराजीच्या सुरात म्हणाला.
"तसे काही नाही रे. उलट आवडतं तू असं बोलत असतोस तेव्हा मला तुझ्याशी बोलायला. आवडतं तू हसलास की तुला पहायला. आवडतं सगळं काही आवडतं पण तू मला सांग तुला माझ्याशीच बोलायला का हवं असतं? मी तुझी कोण लागते?" अनुने मिहिरला प्रतिप्रश्न केला.
"तू माझी कोण लागतेस हे मला माहित नाही आणि मला तुझ्याशी का बोलायचं असतं हे सुद्धा मला माहित नाही पण तरीही मी तुझ्यासोबत बोलण्यासाठी इथे येतो. माझे मलाच समजत नाही माझे असे का होत आहे ते पण मलाच सांग तुला माझ्याशी बोललेलं का आवडतं?" मिहिर म्हणाला.
"सहजच." अनु म्हणाली.
"खरं खरं सांग." मिहिर पुन्हा म्हणाला.
"अरे, म्हणजे तुझा तो रुबाब, तुझी ती बोलण्याची स्टाईल, तुझी ती चालण्याची स्टाईल हे सगळं मला खूप आवडतं. आता मी एक मुलगी आहे आणि तू एक मुलगा आहेस म्हटल्यावर मुलीला मुलाचं चांगलं बोलणं वगैरे आवडणारच ना? त्यात असं विचारण्यासारखं काय आहे?" अनु सहजतेने बोलून गेली.
"अच्छा इतकाच आहे तर. मला वाटलं.." मिहिर बोलता बोलता थांबला.
"काय वाटलं तुला" अनु म्हणाली.
"काही नाही उशीर झालाय. चल झोपायला. सकाळी लवकर उठायचं आहे ना? तसेही कॉलेज असेल ना उद्या?" मिहिर म्हणाला.
"आ कॉलेज!" अनु आश्चर्याने म्हणाली.
"आहे ना कॉलेज? एवढ्या आश्चर्याने काय पाहतेस?" मिहिर असे म्हणताच अनु भानावर आली.
"अरे मी सांगितले होते ना? आता कॉलेजला सुट्टी आहे अजून म्हणून. मग उद्या कसे कॉलेज असणार?" अनु सावध होत म्हणाली तेव्हा मिहीर ठीक आहे असे म्हणत खाली येण्यास सांगितला.
अनु रूममध्ये गेली तेव्हा श्रेया बेडवर झोपली होती. तशी ती जागीच होती पण अनुची वाट पाहत बसली होती. श्रेयाला अनुशी कसे बोलावे हेच समजत नव्हते. ती भयंकर चिडली होती आणि अनुदेखील तिच्या तंद्रितच आत आली.
"काय हे श्रेया? तू माझी आणि मिहिरची ओळख करून देणार होतीस. आमच्यात मैत्री करून देणार होतीस आणि नंतर आमचे सगळे सेटिंग लावणार होतीस. ते सगळे काय झाले? माझे दूर स्वतः त्याच्याशी बोलण्यात गुंतत चालली आहेस. तुला नक्की काय साध्य करायचे आहे? तुझ्या या रंगामुळे तो तुझा होणार नाही असे तुला वाटत होते ना? मग आता कसा तो तुझ्याशी बोलतोय याचा अर्थ मी काय समजावा? माझ्याकडे तर तो ढुंकूनही पाहत नाहीये मग कसे आमचे जुळणार? बघ हं आमचे जुळवण्याच्या नादात तुमच्या दोघांचे जुळून जाईल. आता तर अशीच शंका येत आहे." श्रेया वैतागून अनुशी बोलत होती.
"अगं श्रेया, अशी काय बोलतेस तू? मी तर तुमचे जुळवण्यासाठीच तर इथे घेऊन आले आहे ना मग मी अशी कशी करेन? आता मिहिर तुझ्यासोबत बोलण्यास येत नाही त्याला मी काय करू? त्याला सर्व प्रकारे समजावून झाले पण तो म्हणतोय की श्रेयाशी माझी ओळख नाही आणि मी कसा बोलू? आता सांग मी त्याला जबरदस्ती तुझ्यासोबत बोलायला आणू शकत नाही ना? तुलाही काहीतरी प्रयत्न करायला हवेतच ना. मी एकटी कुठे म्हणून पुरणार आणि काय म्हणून करणार. त्यात त्याला आधीचे काहीच आठवत नाहीये त्यामुळे सगळा घोळ झालाय. मी सर्व प्रकारे प्रयत्न करतेच आहे ना?" अनु श्रेयाची समजून घालत म्हणाली.
"तू लाख करशील ग, पण ज्याच्यासोबत बोलायचं आहे तोच माझ्या सावलीला सुद्धा उभा राहत नाहीये त्याला मी काय करू?" श्रेया वैतागून म्हणाली.
"आता तसे होणार नाही. मी आहे ना? मी जे काही करेन ते सगळे योग्यच करेन. तुला त्रास होईल असे काहीही करणार नाही. तू फक्त मला थोडा वेळ दे." अनु म्हणाली.
"तुला हवा तितका वेळ घे पण काहीतरी नक्की कर. नाहीतर मी इथे येऊन काय उपयोग?" श्रेया पुन्हा वैतागत म्हणाली.
"उद्याच काय तयाचा सोक्षमोक्ष लावते. तू काहीच काळजी करू नकोस, टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस. मी आहे ना." अनु श्रेयाला आश्वस्त करत म्हणाली.
"तू आहेस म्हणूनच तर तुझ्या विश्वासावर मी इथे आले आहे पण इथे येऊन पाहते तर तो तुझ्याच मागेपुढे करतोय. मला ढुंकूनही पाहत नाही त्याचेच वाईट वाटते. आजपर्यंत असे कधीच घडले नाही. कॉलेजमध्ये, क्लासमध्ये तू तर पाहतच आली आहेस प्रत्येक जण माझ्या मागेपुढे करत होते. मिहिरदेखील सुरुवातीला लग्नामध्ये माझ्या मागे मागे आला होता पण आत्ताच त्याला काय झाले आहे काय माहीत? तो साधे माझ्याकडे पाहतही नाही. त्याला माझ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही असे कसे होईल? त्याला तर सुंदर मुली आवडत होत्या मग मी त्याच्यासाठी इतके इथे आले तरीसुद्धा तो माझ्याकडे पाहायला तयार नाही. मला त्याचा खूप राग येतोय." श्रेया म्हणाली.
"काम डाऊन श्रेया, अशी रागाच्या भरात काहीही बोलू नकोस. मी आहे ना. जे होईल ते आता चांगलेच होईल. तू उगीच नाही त्या गोष्टीचा विचार करू नकोस. मी उद्याच मिहीरला याचा जाब विचारणार आहे. त्याला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील." अनु काहीतरी ठरवत म्हणाली.
"हो पाहूया." असे म्हणून श्रेया अंथरुणात शिरली. 'उद्या अनु नक्की काय विचारेल? मिहीर त्याच्याबद्दल काय उत्तर देईल? त्याला खरंच आठवत नाहीये की तो मुद्दामून करत आहे. त्याला माझ्यात इंटरेस्ट नाही का? हे सगळे काही उद्या ठरेल.' श्रेया झोपता झोपता याचा विचार करत होती.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा