गंधबावरे 65
"मिहिर मीच तिला या घरामध्ये आणले आहे आणि मी तिला अशीच जाऊ देऊ? मला हे पटत नाही. तू प्रत्येक वेळी असा का वागतोस? मला तुझे वागणे अजिबात समजत नाही. काय ती शहानिशा करू असे वाटत असतानाही तू इथे मध्येच येऊन टपकलास. अरे, तिने मला सांगितले असते ना. तिला काहीतरी अडचण असेल तर तिला समजून न घेता असे लगेच कसे जाऊ दिलेस? मी तिला थांबवते ना, तिचे म्हणणे ऐकून घेते. मला जाऊ दे." अनु काकुळतीला येऊन म्हणाली.
"मिहिर मीच तिला या घरामध्ये आणले आहे आणि मी तिला अशीच जाऊ देऊ? मला हे पटत नाही. तू प्रत्येक वेळी असा का वागतोस? मला तुझे वागणे अजिबात समजत नाही. काय ती शहानिशा करू असे वाटत असतानाही तू इथे मध्येच येऊन टपकलास. अरे, तिने मला सांगितले असते ना. तिला काहीतरी अडचण असेल तर तिला समजून न घेता असे लगेच कसे जाऊ दिलेस? मी तिला थांबवते ना, तिचे म्हणणे ऐकून घेते. मला जाऊ दे." अनु काकुळतीला येऊन म्हणाली.
"अनु, थांब तिला काहीच बोलायचे नाही, तर तू उगीच तिच्या पाठोपाठ का जात आहेस? मुळात बोलण्यासारखे असे काही आहे का? हे सगळे पाहून तुला वाटते का की तिला तुझ्याशी काही बोलायचे असेल? या सगळ्या गोष्टींवर तिला तिचे मत मांडायचे असेल. मला तर अजिबात वाटत नाही त्यामुळे तू आता तो विषय सोडून दे." मिहिर म्हणाला.
"अरे, असे कसे मी सोडून देऊ? ती माझ्या अगदी जवळ होती. तिला असेच कसे सोडून देऊ? माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरे तिला द्यायची आहेत. माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहे त्याचे उत्तर आता तिने द्यायला हवे. असेच कसे कसे जाऊ देऊ? या विषयावर मला तिच्याशी बोलायलाच हवे." असे म्हणून अनु बाहेर जाऊ लागली पण मिहीरनेही तिचा हात घट्ट पकडला होता त्यामुळे तिला जाता आले नाही.
"मिहिर, असे का करतोयस? प्लीज, मला तिच्याशी बोलू दे. त्यामुळे तुम्ही दोघेही सुखी व्हाल. तुम्ही दोघे एकत्र याल. तुम्ही वर्षभर वेगळे झालात पण आता एकत्र याल. प्लीज, मला हे काम करू दे." अनु मिहिरला म्हणाली.
"थांब अनु, तू असे काहीही करणार नाहीस. मी आता एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर हा निर्णय मी तुला आधीच सांगणार होतो पण अशी वेळ येईल असे मला वाटले नव्हते. खरंतर मला मुद्दामून श्रेयासमोर तुला हा निर्णय सांगायचा होता पण ती रागाच्या भरात इथून निघून गेली त्यामुळे मी तुला आता माझा निर्णय सांगणार आहे." मिहिर म्हणाला.
"असा कोणता निर्णय तू घेतला आहेस? आणि मला आत्ताच का सांगणार आहेस?" अनु आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"तू मघाशी मला विचारले होतेस बघ; की माझी चूक सुधारता येण्यासारखी आहे पण श्रेयाची चूक सुधारता येण्यासारखी कशी नाही. त्याचे उत्तर आता तुला द्यायचे आहे. खरंतर तो माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असेल." मिहीर बोलत होता आणि अनु एकटक त्याच्याकडे पाहत होती.
"म्हणजे? तू काय बोलत आहेस त्यातील मला काहीच समजत नाही पण तू कोणता निर्णय घेणार आहेस? इतके मला सांग." अनु म्हणाली
"अनु, एक वर्ष झाले तू माझ्या आयुष्यात आली आहेस. प्रत्येक टप्प्यावर तू मला साथ दिलीस. अगदी हसत माझे सगळे केलेस. मी कायमचा तुझ्या आयुष्यात नाही हे तुला माहीत असूनही तू माझ्यासाठी इतके सगळे केलेस. तू हे का केलेस हे मला समजत नव्हते. नक्की पैशासाठी केले आहेस की आणखी काही कारण हेदेखील मला समजत नव्हते. मग मी त्याची शहानिशा करण्याचे ठरवले तेव्हा मला समजले की, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून त्या प्रेमासाठी तू इतके करत आहेस. अगं, लग्न झाल्यानंतरही इतक्या मनापासून कोणी करत नाही. तू तर या खोट्या लग्नाला खरंच लग्न मानलेस. खरंच तू प्रेमात खूप वेडी झाली आहेस आणि मला त्याच्यासाठीच असा निर्णय घेण्यास भाग पडले. तू असे समजू नकोस की तुझ्यावर मी उपकार करत आहे. मी जो काही निर्णय घेतला आहे तो अगदी मनापासून घेतला आहे. मला खरंच माझी चूक समजली आहे." मिहिर बोलत होता.
"मिहिर, आता पटकन तो निर्णय सांग. माझी छाती धडधडत आहे. असा कोणता तू निर्णय घेतला आहेस. प्लीज, लवकर सांग ना." अनु मिहिरकडे बघतच म्हणाली.
"अनु, खरंतर हा निर्णय मला आधीच घ्यायचा होता पण घेता आला नाही. खरंतर मी मनाच्या सौंदर्यापेक्षा बहिर्गत सौंदर्यालाच चांगले समजलो पण मी साफ चुकीचा निघालो. अनु, आपण जे काही एक वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट केले होते ते एक वर्षाकरिता न ठेवता पूर्ण आयुष्यभराचे कॉन्ट्रॅक्ट करूयात का?" मिहिर म्हणाला.
"अजिबात नाही हं मिहिर. आता खरंच मला खूप कंटाळा आला आहे. एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट निभावून घेताना माझ्या जीवाचे किती हाल झाले आहेत हे तुला माहित नाही. आता आयुष्यभर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मला झेपणार नाही हं." अनु बोलण्याच्या ओघात बोलून गेली.
"अगं वेडाबाई, म्हणजे आपण आता खरेखुरे लग्न करूयात का? असे मी तुला विचारत आहे. तू आयुष्यभराची माझी जीवनसाथी म्हणून माझ्या आयुष्यात येशील का? मला अशीच कायमस्वरूपी साथ देशील का? तू माझ्यावर विश्वास ठेवलास त्यामुळे माझा ही तुझ्यावर विश्वास बसला आहे. अशा अविश्वाशी लोकांपेक्षा तुझ्यासारखी विश्वासू मुलगी जर माझ्या आयुष्यात आली तर मला खूप आवडेल. अनु, आता माझ्या प्रश्नाचे उत्तर दे." मिहीर अनुकडे पाहत म्हणाला.
मिहीर एकटाच बोलत होता पण अनुच्या डोळ्यावाटे अश्रू ओघळत होते. तिच्या स्वप्नातही वाटले नव्हते की, मिहीर तिच्यासोबत आयुष्यभरासाठी लग्न करेल. ती फक्त एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट म्हणून या नात्याने पाहून घेत होती पण आता मात्र मिहिरने त्याचा निर्णय सांगितल्यावर तिला खूप मोठा धक्का बसला होता. तो धक्का खरंतर खूप सुखद होता आणि तो तिच्या अश्रुद्वारे मोकळा झाला होता. मिहिर अलगद तिच्याजवळ गेला आणि तिच्या डोळ्यातील पाणी त्याने पुसले.
"वेडाबाई, रडतेस काय? आता फक्त आणि फक्त आनंदी राहायचे. अजिबात डोळ्यातील पाणी काढायचे नाही. आता तुझ्यासोबत मी आहे ना?" असे म्हणून मिहिरने अनुला आश्वासन दिले.
"या शब्दासाठी मला एक वर्ष वाट पहावी लागली. खरंतर त्या दिवशी तुझ्या बाबांनी मला तुला दाखवले तेव्हाच तू मला आवडला होतास पण तुझे तर माझ्याकडे लक्षही नव्हते. तुला तर श्रेया आवडली होती म्हणून मग मी तुम्हा दोघांसाठी हे नाते पाहून घ्यायचे असे ठरवले होते. पण तुझ्याबद्दलचे माझे प्रेम तसूभरही कमी झाले नाही. ते तेव्हा जसे होते तसेच आताही आहे आणि आयुष्यभर तसेच राहणार. अनु, हे बोलत असताना तिच्या डोळ्यातील अश्रू ओघळत होते.
"सॉरी अनु, खरंतर माझा स्वभाव हा रंगावरून किंवा रुपावरून एखाद्या व्यक्तीची पारख करण्याचा मुळीच नाही. पण त्यावेळेस माझ्या बाबांनी जेव्हा मला बोट करून दाखवले तेव्हा मला ती श्रेया आहे असे वाटले म्हणून मी तिच्याकडे ओढला गेलो. त्यावेळेस तिचा स्वभाव मला खूप आवडला आणि मी आपसूकच तिच्यात गुंतून गेलो त्यामुळे तुझ्याकडे पाहायला सुद्धा मला मिळाले नाही. पण आता मी माझी चूक सुधारत आहे ना? त्या गोष्टीसाठी तू मला माफ कर." मिहिर म्हणाला.
"माफी काय मागतोयस? झाले गेले आता विसरून जाऊयात आणि पुढचा प्रवास सुखकर करूया." असे म्हणून अनु मिहिरच्या मिठीत शिरली.
********************
श्रेया त्या रूममधून तडक बाहेर पडली. ती खाली आली आणि तिने मिहीरचे घर सोडले. रिक्षाने ती तिच्या घरी जाऊ लागली. जाताना तिच्या डोळ्यावाटे अश्रू ओघळत होते. हे सगळे असे होईल असे कधीच वाटले नव्हते. इतक्या सहजासहजी या गोष्टी सगळ्या घडून जातील असे वाटलेच नाही. खरंतर मिहिरचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि माझेही त्याच्यावर. पण कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात तेच खरे. असा विचार करत ती घरी कधी पोहोचली हे तिचे तिला समजले नाही. ती रिक्षातून उतरली आणि तडक तिच्या रूममध्ये गेली. ती अशी अचानक आल्यामुळे घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांनी श्रेयाला विचारण्याचा प्रयत्न केला पण "मला तिथे करमेना म्हणून मी इकडे आले आहे." असे तिने उत्तर देऊन टाकले.
श्रेया रूममध्ये एकटीच बसली होती. बराच वेळ झाला तरी ती रूममधून बाहेर आली नाही. संध्याकाळी तिने एक कॉल केला. "हॅलो मयूर, फ्री आहेस का? आपण भेटायचं का?"
"हो नक्की. मी फ्री नसलो तरी तुझ्यासाठी वेळ काढेन. कुठे भेटायचं ते मेसेज कर आपण नक्की भेटू." असे म्हणून त्यांनी फोन ठेवला.
पुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा