गणपती... आपला की आमचा? भाग ३
मागील भागात आपण पाहिले की अनघाला मोठी सून असूनही घरातले हक्क मिळत नाहीत. आता बघू पुढे काय होते ते.
"नील, आज आरती जरा पार्थला करू दे.." श्रद्धाने आरतीचे ताम्हण हातात घेतलेल्या नीलला सांगितले. हिरमुसलेल्या नीलने हातातले ताम्हण पार्थकडे दिले. इनमीन पाच दिवसांचा गणपती. त्यात प्रत्येकाचे दिवस ठरलेले असायचे. म्हणूनच नील आज उभा राहिला होता. पार्थचे मित्र आज आले होते म्हणून त्याला आज आरती करायची होती. पार्थने अभिमानाने आरती करायला सुरुवात केली. नील मात्र चेहरा पाडून उभा राहिला. हे बघून अनघाच्या पोटात तुटलं. सगळ्यांसमोर तमाशा नको म्हणून काहीच न बोलता गप्प राहिली. त्या दिवशी मात्र ते रोजच्याप्रमाणे न जेवता फक्त प्रसाद घेऊन घरी आले. आपल्या मित्रमंडळींमध्ये रमलेल्या श्रद्धाला हे समजले देखील नाही. तिला अनघाची आठवण थेट भांडी आवरताना आली. झालं असेल काहीतरी असं समजून तिने लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीही ते कोणीच आले नाहीत, हे बघून मात्र श्रद्धा सटपटली. कारण तो विसर्जनाचा दिवस होता. पूर्ण स्वयंपाक करून आलंगेलं बघणं एकटीला शक्य नव्हतं. तिने नाईलाजाने अनघाला फोन लावला.
"वहिनी, अहो कधीची वाट बघते आहे. येताय ना?"
"नाही गं.. मला जरा बरं वाटत नाहीये. त्यामुळे येणं थोडं कठीण आहे."
"अहो पण.. एवढ्या लोकांचा स्वयंपाक?"
"आम्हा चौघांना नकोच पकडूस. आम्ही फक्त दर्शनाला येऊन जाऊ." अनघाने जास्त न बोलता फोन ठेवला.
"काय बाई हा नखरा... आधी नाही का सांगता येत?" श्रद्धाला टेन्शन आलं होतं.
विसर्जन म्हटलं की पाचपन्नास तरी माणसे यायची. एवढ्याजणांचे जेवण नाही पण नाश्ता करायचा म्हटलं तरी तिला एकटीला जड जाणार होतं. बोलल्याप्रमाणे अनघा आणि सर्वजण विसर्जनाच्या वेळेस आले. पाहुण्यांसारखे उभे राहिले आणि विसर्जन झाल्यावर घरी गेले. नाही म्हटलं तरी विहानला थोडं कसंतरी वाटलं. तो दोन दिवसांनंतर शशांककडे गेला. तिथे अनघा, मुले सगळेच होते.
विसर्जन म्हटलं की पाचपन्नास तरी माणसे यायची. एवढ्याजणांचे जेवण नाही पण नाश्ता करायचा म्हटलं तरी तिला एकटीला जड जाणार होतं. बोलल्याप्रमाणे अनघा आणि सर्वजण विसर्जनाच्या वेळेस आले. पाहुण्यांसारखे उभे राहिले आणि विसर्जन झाल्यावर घरी गेले. नाही म्हटलं तरी विहानला थोडं कसंतरी वाटलं. तो दोन दिवसांनंतर शशांककडे गेला. तिथे अनघा, मुले सगळेच होते.
"विहान, तू अचानक?" शशांकला आश्चर्य वाटले होते.
"ते दादा... तू चिडलास का?" विहानने थेट प्रश्न विचारला.
"मी कशाला चिडू?" शशांकने उलट विचारले.
"ते.. शेवटच्या दिवशी जे झालं ते." विहान अडखळत बोलला.
"बरं झालं तूच विषय काढलास ते. विहान, माझ्याकडे एक ऑप्शन आहे. तू त्यावर विचार कर आणि मग काय ते सांग. गणपती तुमच्याकडे असतात. तुम्हाला आम्ही तिथे आल्याचा त्रास होतो." ते ऐकून विहानने मान खाली घातली. "दुसरं म्हणजे आम्हाला इथे हौसेने सगळं करायचं असतं पण करता येत नाही. मग एकतर आपण गणपती एक वर्ष तुझ्याकडे, एक दिवस माझ्याकडे असं करू. नसेल तुला पटत तर मी माझा वेगळा गणपती बसवतो." शशांकचे बोलणे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले.
"दादा.. अरे.. तो गणपती आपला आहे ना?"
"आपला नाही तुमचा.. आपला गणपती आपल्या लहानपणी होता. जिथे आपण मिळून कामं करायचो, मिळून भांडायचो.. पण मजा करायचो. आता तसं नाही. आता आम्ही फक्त काम करायचे. गणपती मात्र तुमचा. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे जे घर तुमचं म्हणून तुम्ही आमचा सहज अपमान करता आहात, ते घर आपल्या आईबाबांचे आहे. मी घरावरील हक्क जरी सोडला असला तरी कश्यावर सही केलेली नाही अजून."
"तुझे म्हणणे पटले मला दादा.. आपण एक वर्ष इथे एक वर्ष तिथे असा गणपती बसवू. मी बोलतो श्रद्धाशी." कसंबसं विहान बोलला.
पुढच्या वर्षी...
"वहिनी, प्रसाद तयार आहे.." श्रद्धा साडी सावरत म्हणाली.
"प्रसादाचं नंतर बघू.. तू जा बरं पूजेला बस." श्रद्धाला दटावत अनघा म्हणाली.
तिन्ही मुले मजामस्करी करत गणपतीची सजावट करत होते. शशांक आणि विहान दोघे फुलांच्या माळा करत होते. फोटोमध्ये बसलेले त्यांचे आईवडील हे दृश्य बघून नक्कीच खुश झाले असते. कारण एक घर तुटता तुटता वाचले होते.
तिन्ही मुले मजामस्करी करत गणपतीची सजावट करत होते. शशांक आणि विहान दोघे फुलांच्या माळा करत होते. फोटोमध्ये बसलेले त्यांचे आईवडील हे दृश्य बघून नक्कीच खुश झाले असते. कारण एक घर तुटता तुटता वाचले होते.
गणपती.. आमचा की आपला? ज्यांच्याकडे गणपती असतो त्याला ग्रेट असल्यासारखं वाटणं, ज्याच्याकडे नाही त्याला वाईट वाटणे ही घरोघरी दिसणारी गोष्ट. जिथे समजून घेतलं जातं तिथे नाती तुटता तुटता वाचतात. नाहीतर घरोघरी बाप्पा विराजमान होतो.
कथा कशी वाटली हे नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा