Login

गप्पा......

गप्पा म्हणजे गप्पा म्हणजे......
*गप्पा*

गप्पा म्हणजे गप्पा म्हणजे
गप्पा असतात
तुमच्या आणि आमच्या मात्र
वेगवेगळ्या असतात....

पुरुषांच्या गप्पा म्हणजे
राजकारण आणि बाई
स्त्री च्या गप्पात असते
नणंद आणि सासूबाई...

मनाला विरंगुळा देतात
या गप्पा
तर कधी मोकळा करतात मनाचा
भरलेला कप्पा...

गप्पांचेही असतात म्हणे
वेगवेगळे प्रकार
ठार वेडाच देऊ शकतो
गप्पाला नकार......

प्रेमाच्या, भांडणाच्या, कधी
बढायाच्या गप्पा
गप्पाची मैफिल रंगवायला
लागतात अप्पा आणि बाप्पा...


मात्र प्रत्येकाने कराव्या
गप्पा मनमोकळ्या
पळून जाईन ताण आणि
फुलतील मनाच्या पाकळ्या.....


फुलतील मनाच्या पाकळ्या......