सावली आणि पावसाची लहर एकत्रच उतरली होती त्या रात्री...!
आभाळ काळसर झाकलेलं होतं, आणि झाडांच्या फांद्या ओलसर थरथरत होत्या. पाण्याचे थेंब पानांवरून हळूच गळत होते. मातीचा सुगंध सण्णसणीत शांततेत मिसळत होता.
त्या रात्री, ती चिखलात न दिसणारा एक वळसा कापून डोंगराच्या कुशीत, गावाच्या शेवटी असणाऱ्या शेणा-मातीच्या एका मोडकळीस आलेल्या झोपडीच्या दिशेनं चालली होती. तिचे पाय चिखलात रुतत होते, पण तिची चाल ठाम होती जणू कोणत्यातरी अदृश्य ओढीनं ती तिथे परत आली होती.
झोपडीच्या आत पोहोचल्यावर, एका कोपऱ्यात मातीच्या भिंतीजवळ ती अलगद बसली. तिनं आपल्या पोटावर हात ठेवला आणि पाय घट्ट दुमडून घेतले. आजूबाजूला फक्त शांतता होती, पण तिच्या श्वासांचा आवाज झोपडीभर घुमत होता.
तिचं वय ठरवणं कठीण होतं. चेहरा शांत होता, पण डोळ्यांत जुना, खोल थकवा. शरीर सडपातळ, पण पोट खोल फुगलेलं एक सांगता न येणारा आकार. जणू काही महिने उलटलेली गर्भवती...
गावकऱ्यांनी तिला "वेडी धरणी" म्हणतं.
कुणी म्हणे, ती काही वर्षांपूर्वी गावाबाहेर हरवली होती.
कुणी म्हणे, तिचं म्हणावं असं या जगात कुणीही उरलेलं नाही.
पण जेव्हा ती भर पावसात, अंगावर भिजलेलं काळं वस्त्र आणि तीव्र शांततेत फुगलेलं पोट घेऊन गावात पुन्हा परतली त्या क्षणी गावकऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पण कुणाच्याही तोंडून शब्द निघाले नाहीत. ना तिला तिथून हाकलवू शकलं.
त्या दिवसापासून, देवळाच्या मागच्या मोडकळीस आलेल्या झोपडीत धरणी राहू लागली.
त्या दिवशी सकाळी आभाळ अजूनही धूसर होतं. ढगांनी त्यावर आपली सावली टाकली होती, आणि सूर्य त्या धुक्याच्या पडद्याआड लपून उभा होता. प्रकाश येण्याची घाई नव्हती.
गाव अजून झोपेत गुंग होतं. घराघरांतून अजून धूर निघालेला नव्हता, दारं बंद होती, आणि रस्ते निवांत शांत होते. पण आकाशात मात्र पहाटेच हलकासा हालचाल सुरू झाली होती. चिमण्या सूर्योदयाआधीच जाग्या झाल्या होत्या. त्यांचा किलबिलाट हवेत भरून राहिला होता जणू त्या पहाटेचं स्वागत करत होत्या.
हवेत पावसानंतरचा एक नाजूक थंडावा होता ना फार बोचरा, ना अगदी सौम्य. मातीतून उठणारा ओला वास तीव्र झाला होता जणू पाय जमिनीवर ठेवण्या आधीच मातीच श्वास घेत होती.
झोपडीच्या बाजूला असणारं पारिजातकाचं झाड अगदी शांत उभं होतं. पण त्याच्यावरच्या शुभ्र फुलांनी आणि त्याच्याखाली पडलेल्या पाकळ्यांनी सारं दृश्य मंत्रमुग्ध केलं होतं. झाडाच्या भोवती इतकी फुलं पडली होती, की वाटत होतं झाडाशी रात्री जणू कोणीतरी रात्रभर खूप गप्पा मारल्या असाव्यात.
झोपडीत...
धरणीचा चेहरा काही काळापूर्वीच रडून थकलेला होता. आता मात्र तिच्या डोळ्यांतली ओल पूर्णपणे कोरडी पडली होती. चेहऱ्यावर एक निर्विकार शांतता पसरली होती, पण त्या शांततेआड अजूनही वेदनेची खोल छाया उमटत होती.
ती झोपडीतल्या खरखरीत, ओलसर मातीवर निष्प्राणासारखी कलंडून पडली होती. एक हात पोटावर होता, तर दुसरा मातीवर. बोटांच्या वाढलेल्या नखांमध्ये माती साचली होती. तिच्या उजव्या खांद्यावर एक खोल जखम होती. त्यातून झिरपणारं रक्त मातीत मिसळून गेलं होतं. मातीने ते जणू मुकाट्यानं पिऊन घेतलं होतं.
जखमेतून रक्त थांबलं असलं, तरी झोपेतही तिचं हलकं कण्हणं तिच्या वेदनेची जाणीव करून देत होतं.
तिच्या अंगावर फाटलेलं, शिंद्र पडलेलं एक काळं वस्त्र होतं. त्याशिवाय काहीच नव्हतं. पण तेही पावसाच्या दमटपणाने पूर्ण भिजून गेलं होतं.
रात्रीच्या पावसाळी वाऱ्याने झोपडीचं सैलावलेलं दालन आणि गवताचा फटीतून वाट काढत थेट आत प्रवेश केला होता. त्या भेगांतून सरकणारा वारा झोपडीत रेंगाळला होता.
तो वारा कधी गालावरून अलगद फिरायचा, कधी मानेखालून टोचून जायचा. कधी पाठ, कधी खांदा, तर कधी कमरेच्या वळणांवरून सरकायचा. तो तिला कुरवाळतोय की छळतोय, हे तिचं सुन्न झालेलं शरीरही सांगू शकत नव्हतं.
मात्र त्या वाऱ्याच्या स्पर्शाने तिचं शरीर थरथरत होतं – कुठलाही आवाज न करता. ती थरथर तिच्या थकलेल्या, मूक श्वासांमध्ये मिसळून गेली होती.
"अचानक, एक खोल आणि भारावलेला घंटानाद धरणीच्या झोपडीत घुमू लागला. त्या आवाजाने संपूर्ण झोपडी क्षणभर थरथरली. आवाज जणू भिंतींतून आत शिरून थेट तिच्या कानांवर आदळला होता.
त्या आवाजाने मेंदू जागा व्हावा, तशी धरणीने एकदम डोळे उघडले. काही क्षण तिला कळेना ती स्वप्नात आहे की जागेपणी. पण अजूनही तो घंटानाद तिच्या कानात घुमत होता. आता तो अधिक तीव्र, छिन्न करणारा वाटत होता. घाबरून धरणीने दोन्ही हात कानांवर घट्ट दाबले, तरीही आवाज थांबण्याचं नाव घेत नव्हता. उलट तो आवाज तिच्या अंगाखांद्यावरून झंकारून जात होता.
पोटावर हात ठेवत ती कशीबशी उठली. शरीर थकलं होतं, पण मनात एक अस्पष्ट धास्ती आणि एक ओढ निर्माण झाली होती. ती डळमळीत पावलं टाकत पुढे सरकली. डोळे थकव्याने मिटायला लागले होते. एक क्षण… आणि तिचं पाऊल अडखळलं. ती थरथरत पडायच्या बेतात होती, पण स्वतःला सावरत भिंतीला हात लावत ती झोपडीच्या बाहेर आली.
बाहेरच्या मातीचे ओलसर तुकडे तिच्या अनवाणी पायांना चिकटत होते त्यात थोडा गारवा, थोडी घाण. पावसाचे टपोरे थेंब पुन्हा गळायला लागले होते. प्रत्येक थेंबाचा आवाज वेगळा... एक रेंगाळणारा ठिपका जणू.
झाडांच्या फांद्या पुन्हा थरथरल्या. पानांवर साचलेलं पाणी झरझरत गळू लागलं. वाऱ्याच्या झुळुकीनं त्या धारांना दिशा मिळत होती कधी डावीकडे, कधी उजवीकडे.
पण धरणीचं लक्ष ना त्या पावसाच्या थेंबांवर होतं, ना झाडांच्या थरथरत्या फांद्यांवर तर फक्त त्या खोल होणाऱ्या घंटानादावर होतं.
वारा गडद राखाडी ढगांमध्ये मिसळलेला होता गारठलेली सकाळ हळूहळू धरणीच्या हाडांमध्ये घुसत चालली होती. तिने एक पाऊल उचललं.मग दुसरं…
आता तिचं लक्ष सरळ समोर नदीच्या पलीकडे, धुक्याच्या चादरीत गुंडाळलेल्या टेकडीकडे वळलं. निरखून पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या धरणीला त्या टेकडीवर एक मंदिर दिसत होतं.
शिवमंदिर.
धरणीच्या डोळ्यांनी त्या धुक्याच्या चादरीतून डोकावणाऱ्या मंदिराकडे एक एक क्षण पाहिलं. टेकडीवर उभं असलेलं ते शिवमंदिर जणू काळाच्या कपारातून उगम पावलेलं होतं.त्याचं शिखर धुक्याच्या गर्भात लपलेलं, पण त्या गर्भातून उगमणारा एक शांत तेज त्याच्या अस्तित्वाची साक्ष देत होता.
माथ्यावरचा तांबूस कलश पावसाने थोडा मळलेला
पण तरीही वरून पडणाऱ्या पावसाच्या सडसडीत थेंबांमुळे अधूनमधून चमकत होता.त्यावर वर हलकासा झुकलेला भगव्या रंगाचं झेंडा थोडा फाटलेला पण तरीही, वाऱ्याच्या लयीसह थरथरणारा,
पण तरीही वरून पडणाऱ्या पावसाच्या सडसडीत थेंबांमुळे अधूनमधून चमकत होता.त्यावर वर हलकासा झुकलेला भगव्या रंगाचं झेंडा थोडा फाटलेला पण तरीही, वाऱ्याच्या लयीसह थरथरणारा,
मंदिराच्या भिंती काळसर ओल्या दगडांनी बांधलेल्या होत्या प्रत्येक दगडावर काहीतरी काहीतरी कोरलेल.
दिसतं होतं.
दिसतं होतं.
मंदिराच्या दरवाज्याला जुनी काळसर झालेली, ओलसर पावसाने थोडी सडलेली, तुळशीमाळ लटककेली दिसतं होती आता ती वाऱ्यावर वाऱ्यावर झुलत असली तरी तिच्या.प्रत्येक दाण्यात अजूनही एक जप साठलेला भासत होता.
धरणीचं लक्ष अजूनही त्या वाऱ्यावर झुलणाऱ्या तुळशी माळेवर खिळलेली होती.पण अचानक, घंटानाद थांबला.आणि त्याच क्षणी हलणारी तुळशी माळही
थांबली आणि एक वेगळीच, खोल शांतता सर्वत्र पसरली.
थांबली आणि एक वेगळीच, खोल शांतता सर्वत्र पसरली.
धरणीची नजर मात्र आता मंदिराभोवती असलेल्या झाडांवर वेलींवर गेली.
तिथे कोणीतरी असल्याचा क्षणभर भास झाला पण ज्या क्षणी धरणीने नजर रोखून पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं.
ती हळूहळू वळली, आणि थकलेलं शरीर घेऊन परत झोपडीमध्ये गेली.
तिचे पाय डळमळले आणि ती झोपडीमध्येच खाली कोसळली.त्या क्षणी बाहेरचा पावसाचा टपटप आवाज थांबला.आणि झोपडी भोवती एक निवांत शांतता पसरली.
सुरुवातीला फक्त काळोख...पण त्या शांत काळोखात एक मंद घंटेचा नाद घुमू लागला.त्या क्षणी धरणी हळूच मागे वळली तर तिच्या नजरे समोर महादेवाचं मंदिर दिसलं.
आकाशात लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या प्रकाशात
मंदिराचा कलश चमकत होता,
मंदिराचा कलश चमकत होता,
धरणी त्या घंटानादाच्या दिशेने चालू लागली.प्रत्येक पावलागणिक खाली असणाऱ्या मऊशार वाळूत तुळशीच्या पानाच्या आकाराचे ठसे उमटत होते त्याच
बरोबर ती जशी जशी पुढे जात राहिली तसा तसा तो घंटेचा नाद अधिक स्पष्ट आणि अधिक जवळ वाटू लागला.
बरोबर ती जशी जशी पुढे जात राहिली तसा तसा तो घंटेचा नाद अधिक स्पष्ट आणि अधिक जवळ वाटू लागला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा