गर्भातील संवाद
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
अधिराला सकाळीच आनंदाची बातमी समजली होती. ती लगेच अबीरजवळ आली.
“अबीर, तू बाबा होणार आहेस!”
“अबीर, तू बाबा होणार आहेस!”
अबीर तर खुश झाला. त्याने त्यांच्या आई आणि बाबांना पण सांगितले. तेही आनंदी झाले.अधिरा त्यांच्या पाया पडली. अबीरने छान बाळाचे फोटो आणले आणि रूममध्ये लावले. अधिरा खूप खुश होती.
अधिराच्या सासूला आनंद झाला तर होता, पण त्यांना नातू हवा होता. त्यांना चेक करायचे होते की अधिराच्या पोटात मुलगी आहे की मुलगा. त्यांनी सोनोग्राफीच्या निमित्ताने ते बघायचे ठरवले. त्यांनी अधिरा आणि अबीरला हाक मारली.
अधिरा आणि अबीर लगेच बाहेर आले.
“आई, काय म्हणत आहेस?” अबीर म्हणाला.
“आई, काय म्हणत आहेस?” अबीर म्हणाला.
“आपण उद्या अधिराची सोनोग्राफी करून घेऊ. आता तीन महिने होऊन गेले आहेत. बाळ कसे आहे, आपल्याला समजेल” अबीरची आई म्हणाल्या.
अधिरा आणि अबीर लगेच तयार झाले.
“आता आराम करा, उद्या सकाळी आपण जाऊ,” अबीरच्या आई म्हणाल्या.
“आता आराम करा, उद्या सकाळी आपण जाऊ,” अबीरच्या आई म्हणाल्या.
अधिरा आणि अबीर रूममध्ये निघून गेले. अबीरने लॅपटॉप घेतला होता आणि तो काम करत होता. अधिरा पोटावर हात ठेवून बोलत होती.
“आई, मी लवकर येईन पण तू उद्या सोनोग्राफीला बाबांना घेऊन जा, आजीला घेऊन जाऊ नकोस. आजीला मला या जगात येऊ द्यायचे नाही आहे, कारण मी मुलगी आहे. आई, मला या जगात यायचे आहे. मला बाबांना मिठी मारायची आहे, बाबांकडून लाड करून घ्यायचे आहेत. मला भावाला राखी बांधायची आहे. नवरात्रीत दुर्गा देवीची पूजा करतात ना, मग त्यांना मुलगी का नको आहे? कन्या पूजेला मुली लागतातच ना?”
“बाळा, तू असे का विचार करत आहेस? आजीला फक्त बाळ कसे आहे ते बघायचे आहे. डॉक्टर फक्त चेक करतील, काही गोळ्या देतील, काही काळजी घ्यायला सांगतील” अधिरा म्हणाली.
“आई, तू खूप भोळी आहेस ग. माझे एक ऐक, तू बाबांना सोबत घेऊन जा. मी जीव तोडून सांगतेय. आता तू आराम कर. मी पण आराम करते.”
अधिरा आजूबाजूला बघू लागली. तिला आवाज येणारा बंद झाला होता. ती झोपून गेली. अबीरचे काम झाले, तोही झोपला.
अधिरा सकाळी उठली.
“आज मला माझ्या बाळाचे ठोके अनुभवता येतील,” ती विचार करत होती. ती आवरायला लागली.
“आज मला माझ्या बाळाचे ठोके अनुभवता येतील,” ती विचार करत होती. ती आवरायला लागली.
अबीरची आई पण आवरून बाहेर आली. शेजारची बाई आली होती. अबीरची आई तिच्याशी गप्पा मारत होती.
“हे पेढे घ्या,” शेजारची बाई म्हणाली.
“कशाचे पेढे वाटतं आहेत? सुनेची डिलिव्हरी झाली का? कायं झाले?” अबीरची आई म्हणाल्या.
“नात झाली आहे, म्हणून पेढे वाटत आहेत” शेजारची बाई म्हणाली.
“कायं? नात झाली का?” अबीरची आई म्हणाली.
“हो. मला दुसरीकडे पण जायचे आहे. आम्हाला आनंद झाला आहे” शेजारची बाई म्हणाली आणि निघून गेली.
“कायं पेढे आहेत हे? कोणी आणून दिले?” अबीरचे बाबा म्हणाले.
“नात झाली तरी सगळ्यांना पेढे वाटतात, जणू नातू झाला आहे” अबीरची आई म्हणाली.
“अगं, असे कायं म्हणतेस? आपल्याला नात झाली तर मला तर खूप आवडेल. आपल्याला मुलगी नाही ना, मला तर नातच हवी आहे,” अबीरचे बाबा म्हणाले.
“मला नातूच हवा आहे. आज समजेल, मुलगा आहे की मुलगी” अबीरची आई म्हणाली.
अधिरा सगळं ऐकत होती. तिला रात्रीचे शब्द आठवले. ती घाबरली.
“मला खरंच मुलगी होणार असेल तर? आई तिला या जगात येऊ देणार नाही. मला माझं बाळ हवं आहे, मग ते काहीही असलं तरी,” ती म्हणाली आणि रूममध्ये गेली.
“मला खरंच मुलगी होणार असेल तर? आई तिला या जगात येऊ देणार नाही. मला माझं बाळ हवं आहे, मग ते काहीही असलं तरी,” ती म्हणाली आणि रूममध्ये गेली.
“अबीर, तू माझ्यासोबत सोनोग्राफीला ये. मला जरा घाबरल्यासारखे होत आहे” ती म्हणाली.
“अधिरा, मी तुझ्यासोबतच येणार आहे. मला बाळाचे ठोके ऐकायचे आहेत. आईला पण सोबत घेऊ. मी चांगले हॉस्पिटल बघितले आहे, आपण तिथेच जाऊ,” अबीर म्हणाला.
अबीर आणि अधिरा तयार झाले, रूममधून बाहेर आले.
“आई, तुझे झाले का? आपल्याला जायचे आहे,” अबीर म्हणाला.
“आई, तुझे झाले का? आपल्याला जायचे आहे,” अबीर म्हणाला.
“तू पण येतो आहेस का? मी तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होते” त्या म्हणाल्या.
“त्या हॉस्पिटलमध्ये नको. तिथे मुलगा आहे की मुलगी हे आधीच सांगून देतात. मला मुलगी असली तरी चालेल, मुलगा असला तरी चालेल. मला अधिरा हवी आहे आणि माझे बाळ हवे आहे. आम्हाला मुलगी झाली तरी तुला स्वीकार करावा लागेल. आई, तू पण कोणाची तरी मुलगी होतीस ना? माझ्यानंतर तू बाळ होऊ दिले नाहीस, कारण मुलगी झाली तर? तू फक्त तुझा विचार केलास. पण बाबांना मुलगी नको होती का? मुलगी ही घरची लक्ष्मी असते. तिच्या हसण्याने, तिच्या बोलण्याने, तिच्या पायातल्या पैजणाच्या आवाजाने घरात छान वाटते. मला मुलगी हवी आहे!” अबीर म्हणाला.
अबीरच्या आईचे डोळे उघडले. त्यांनी अबीरच्या बाबांकडे बघितले.
“आम्ही कधीच असं म्हटलं नाही की मुलगी नको. आम्हालाही मुलगी हवी आहे” बाबांनी सांगितले.
“आम्ही कधीच असं म्हटलं नाही की मुलगी नको. आम्हालाही मुलगी हवी आहे” बाबांनी सांगितले.
त्यांनी अधिरा आणि अबीरची माफी मागितली.
“तुम्ही दोघं जाऊन या. मला पण आनंद होईल, घरी लक्ष्मी आली तर” त्या म्हणाल्या.
“तुम्ही दोघं जाऊन या. मला पण आनंद होईल, घरी लक्ष्मी आली तर” त्या म्हणाल्या.
अधिराने पोटावर हात ठेवला.
“सॉरी बाळा, रात्री मी तुझे ऐकले नाही. पण तू लवकर ये. मी तुझी वाट बघते,” ती म्हणाली.
“सॉरी बाळा, रात्री मी तुझे ऐकले नाही. पण तू लवकर ये. मी तुझी वाट बघते,” ती म्हणाली.
---
समाप्त
दिपाली चौधरी
दिपाली चौधरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा