Login

गर्ल्स हॉस्टेल.. भाग - पहिला.

अनामिका ला डिन मॅडम सक्त ताकीद देतात.

भाग -1



रात्रीचे बारा वाजले होते. अनामिका आज हॉस्टेल मध्ये उशिराच आली होती. म्हणून हॉस्टेलच्या खडूस डीन मॅडमनि तिला हॉस्टेल मध्ये घेण्यास नकार दिला होता. तरी सुद्धा अनामिका चोरून रूमच्या खिडकीतून आत आली.

अनामिका बोलते, " हुश्श... काय ती मॅडम नुसती भडकते. थँक्स यार सोनिया! तू आहेस म्हणून...!"


अनामिका ही सोनिया ची रूम मेट होती. अनामिका दिसायला गोरी पण झल्ली होती. तिला मुलींसारखं टिपिकल राहणं पसंतचं नव्हतं. आई वडिलांची एकुलती एक होती. शिकण्यासाठी ती घरापासून दूर हॉस्टेल मध्ये राहत होती.

दररोज रात्री पार्टी करून पब मध्ये जाऊन ती नेहमी सारखं उशिराने हॉस्टेल मध्ये आली.


हॉस्टेल च्या हिटलर मॅडम ने तिला आधीच बजावलेलं होतं, पण अनामिका काही सुधरेना. म्हणून डिन मॅडम ने तिला शिक्षा म्हणून हॉस्टेल मध्ये नको येऊ सांगितले.


पण अनामिकाच्या रूम मेट सुद्धा तिच्याच सारख्या, हॉस्टेल मध्ये चौघी ह्या खूप फेमस होत्या. हो चौघी ! सोनिया, रिया, सायली आणि अनामिका. ह्या चौघी एकाचं रूममध्ये रहायला होत्या.


सोनिया बोलते, " अनामिका, तू आज ही डिन मॅडमचा ओरडा खाल्ला ना ? "


अनामिका तिला बोलते, " सोनिया तिला ओरडायला काय, होतो कधी कधी. आणि रात्रीचे बारा वाजले इतका थोडी उशीर झाला मला. "


सोनिया बोलते, " अगं आपण हॉस्टेल मध्ये राहतो. इथे असं नाही ना चालत. " सोनिया तिला समजावत बोलते.


सोनिया ही कामासाठी मुंबईत आलेली. वडील काही वर्षांपूर्वीच वारले. आई ही गावात असते, सोनिया प्रत्येक महिन्याला आईला पैसे पाठवत असते. आईची जबाबदारी ही सोनियावर होती.


सोनिया वेळेवर हॉस्टेलवर यायची आणि वेळेच्या आधी ऑफिससाठी निघायची.


अनामिकाला खूप भूक लागलेली असते. पण हॉस्टेलवर उशिरा आल्यामुळे तिला नेहमीप्रमाणे जेवण ही मिळाले नाही.


अनामिका, " यार सोनिया खूप भूक लागली आहे, चल ना काहीतरी ऑर्डर करूया ना ? " तिला अतिशय भूक लागलेली असते. म्हणून ती सोनियाला ऑर्डर करायला विनवणी करते.


सोनिया हसत हसत बोलते, " यार अनामिका, इतक्या उशिरा तुला कोण भेटेल, आणि तसंही डिन ला कळालं ना की आपण असं बाहेरून मागवलं तरं अजून ती ओरडेल... "


अनामिका, " अरे यार सोनिया नाही ओरडणार, प्लीज यार भूक लागली आहे. "


सोनिया, " यार तू पार्टी करून आलीस ना ? मग परत तुला भूक कशी लागली ? "


अनामिका, " यार थोडा पॅक मारला सो त्यामुळे !"

अनामिका पार्टी करून आली होती आणि ती काही प्रमाणात ड्रिंक सुद्धा घ्यायची.


सोनिया, " मस्त.. पण आता तू काही केलंस तरी तुला काही मिळणार नाही आहे. त्यामुळे मॅडम गप्प झोपा. गुड नाईट... "

असं बोलून सोनिया झोपून जाते.


सोनिया ही जरा वेगळीचं असते. टिपिकल मुलगी म्हणालात तरी चालेल. साधी,सरळ..


सकाळचे सात वाजतात.... सोनियाचा नेहमीप्रमाणे अलार्म वाजतो.


अनामिका चिडून बोलते, " यार सोनिया बंद कर गं, किती कोकलतो आहे तो..!" आणि ती कूस वळून पुन्हा झोपते.


सोनिया उठते... तितक्यात दरवाजा खोलायचा आवाज येतो. दरवाजात रिया असते.


हो, रिया त्या दोघींची रूममेट. रिया ही ऑफिस कामाच्या निमित्ताने हॉस्टेल मध्ये राहत असते. रिया एक डिवोर्स घेऊन वेगळी झालेली मुलगी असते. तिला एक दहा वर्षाची मुलगी असते. तिला तिने दुसऱ्या हॉस्टेल मध्ये ठेवलेलं असते. आणि ती इथे राहत असते. एका कॉलसेंटर मध्ये ती कामाला असते. त्यामुळे तिला पगार ही चांगला असतो.

ती तिची शिफ्ट संपवून आलेली असते.


सोनिया, " रिया तुला चहा देऊ का ? मी केली आहे. "

सोनिया ने विचारलं.


रिया, " नाही गं थँक्स. मी जरा झोपते. खूप थकली आहे. " आज रिया शिफ्ट वरून थकून आली होती.


सोनिया तयारी करून तिच्या ऑफिससाठी निघते.


काही वेळानंतर अनामिका उठते.. फ्रेश होऊन ती रूमच्या बाल्कनीत चहा चा घोट घेत निवांत उभी असते.

तितक्यात रिया उठते.


रिया, " अनु आज गेलीस नाही कॉलेज ला ? "


अनामिका, " नाही यार आज मुड नाही. सो म्हटलं आराम करू आज. "


रिया, " ह्म्म्म, काल कितीला आलीस. " रिया तिला प्रश्न करते.


अनामिका, " हेय, तुला कसं कळलं. मी काल उशिरा आली ते ? "


रिया हसते, " अगं राणी आपण गेले एक वर्ष एकत्र आहोत ! सो माहित आहे ना कोण कितीला आणि कुठे जात ते. "


अनामिका, " हुशार आहेस गं . "


रिया, " आहेच... " आणि रिया हसू लागते.


अनामिका, " हसायला काय झालं ? आणि काल डिन हिटलर खूप चिडलेली. उशीर झाला म्हणून. "


रिया, " गुड मग काय बोलली ती ? "


अनामिका, " काय बोलणार! सक्त ताकीद दिली तिने. आत ही घेतलं नाही. मग आली रोज येते तशी."


रिया, " गुड, बरं सायली आज येणार आहे की.. कधी ? "

रिया चहाचा घोट घेत अनामिका ला विचारते.


अनामिका, " कदाचित आज येणार आहे दुपार पर्यँत . "


रिया, " हम्म्म्म ओके, बरं चल मी जाते आवरायला घेते."

असं बोलून रिया फ्रेश व्हायला जाते.


क्रमश....


0

🎭 Series Post

View all