ईकडे आई बाबांना काहीही कळायला मार्ग नव्हता. पण सुमंत गुरू माँ सोबत असल्यामुळे ते निश्चिंत होते.ऑफीस मध्ये माया ची मात्र तडफड सुरू होती. सुमंत न सांगता ते ही पंधरा दिवसांची रजा घेऊन जातो हे काही तिला पटलं नव्हतं. सुमंत कोणाच्या प्रेमात तर पडला नसेल अशी शंका उगाच तिच्या मनाला चाटून गेली. आता ती विनाकारण अस्वस्थ फील करत होती.
ईकडे सुमंत गत जन्मी च्या स्मृती पहात होता. एक जुनाट खेडे गाव होते. धोतर बंडी घालून आणि कमरेला पंचा गुंडाळून तो शेतात काम करत होता. तेवढ्यात जेवणाची टोपली घेऊन ती तिथे आली. दुरूनच त्याला पाहून "वर्तक".... " वर्तक "..... अशी साद घालत ती धावत येऊ लागली. प्रथम त्याला तीचा आवाज ओळखीचा वाटला, ती जवळ आली तीच होती ती... गावातल्या रामू शिंप्याची मुलगी नक्षू म्हणजे नक्षत्रा. वर्तक च्या शेजारी राहायची. दोन्ही कुटुंबात छान घरोबा होता. रोज ती वर्तक आणि त्याच्या वडिलांसाठी जेवण घेऊन येत असे त्या नंतर मग तिच्या बापूने शिवलेले कपडे लोकांना पोचते करून पैसे घेऊन येत असे. नक्षत्रा हुशार होती. गावात सातव्या वर्गापर्यंत शाळा होती त्यामुळे ती तेवढेच शिकली होती, पण हिशोबात मात्र पक्की होती. रामू शिंप्याचा एक आणा देखील कुठे सोडून येत नसे. वर्तक आता बावीस वर्षाचा झाला होता आणि नक्षत्रा देखील एकोणीस वर्षाची झाली होती. वर्तक चे बाबा आज शेतात आले नव्हते त्यामुळे वर्तकनी नक्षू समोर आपले प्रेम प्रकट करायचे ठरवले. ती नेहमी प्रमाणे नाचत उडत आली.
वर्तक:- रोज तू ऐसे नाचत काहे आवे है❓
नक्षू:- का हूआ तोहे पसंद नही है ❓
वर्तक:- हमारे बिसवाडा गाव में तोहरे जैसा दुसरा कोई नमुना है ही नही।
नक्षू:- बिसवाडा गाव में काहे पुरी दुनियाँ में मेरे जैसा दुसरा कोई नमुना नही है।
वर्तक:- हाँ हाँ आई बडी.... मूह देखा है अपना चमकादड का पिल्ला लगती हो।
नक्षू:- वर्तक तुझे मै पसंद ना हु का❓
वर्तक:- पसंद तो मन्ने भारी है तू। शादी करना चाहत हू तुझसे, तोहे कोई ऐतराज है❓
नक्षू:- मन्ने तो कोई ऐतराज ना है, पर सोच ले गाववाले क्या कहेंगे.... गधे ने चमकादड के पिल्ले से शादी की है। (दोघेही जोरजोरात हसू लागले)
इतक्यात सुमंत जागा होते.
सुमंत:- गुरू माँ ती..... ती.... ती होती गुरू माँ... रमा होती ती....
गुरू माँ:- शांत हो सुमंत, शांत हो... या विषयावर आपण उद्या बोलू.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा