गठबंधन भाग 1

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन
गठबंधन भाग 1

©️®️शिल्पा सुतार

कारखानीसांचा बंगला अतिशय सुंदर सजवला होता. सगळीकडे फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या. एक से एक गाड्या मधून पाहुणे घरी येत होते. शहनाई वाजत होती. आनंदी वातावरण होतं.

घर कामाला खूप लोक होते, तरी आशा ताईंची धावपळ होत होती. त्या कामात होत्या. स्वतः सगळं बघण आवश्यक होत. त्यांच्या लाडक्या लेकीच लग्न होतं.

"आई." मनालीने हाक मारली.

" काय बेटा."

"माझ्या जवळ येवून बस ना. "

"आता नाही पाच मिनिट थांब."

"आई मी सासरी जाईल ना. मला वेळ दे."

"काय आहे हीच, वेडाबाई." त्यांच ही मन भरून आलं होतं. त्या मुलींमध्ये येवून बसल्या.

"आई धावपळ करू नकोस. एन्जॉय कर ना. मेहेंदी काढ." मनाली म्हणाली.

"धावपळ तर पाचवीला पुजली आहे. " आशा ताई म्हणाल्या.

मेहेंदीचा कार्यक्रम सुरू होता. मनालीच्या दोघी हातावर मेहंदी काढायच काम सुरू होतं. ती खुर्चीवर बसली होती. गोरी पान. नाजूक अशी मनाली. गालावर गोड खळी पडत होती. स्वभावाने हळवी. तिचे केस मोकळे होते .स्लीवलेस ड्रेस घातलेला. छान लाजत हसत होती.

तीच शिक्षण झालं होत. ती त्यांच्या स्वतःच्या शाळेत टीचर होती. ऑफिस मधे ही जात होती. अतिशय हुशार अशी मनाली बाबांची लाडकी होती.

तिच्या बाजूला तिची मोठी बहीण आरती बसलेली होती. तीच ही एका वर्षांपूर्वी लग्न झाल होत. निधी वहिनी ही बिझी होती. ती आशिष दादाची बायको होती. मनाली तिघांमध्ये लहान होती. घरातल्या लहान मुलीच लग्न सगळे उत्सुक होते. स्थळ तेवढच तोलामोलाच होत.

आई, मावशी ,काकू ,आजी आजुबाजूला होत्या. मधेच मावशीने तिची नजर काढली. आजी सगळं ठीक आहे ना याकडे लक्ष देवून होती. सरबत, स्टार्टर दिले जात होते.

मनालीच्या मैत्रिणी येत होत्या. सीमा तिची बेस्ट फ्रेंड तिच्या सोबत होती. ती मैत्रिणीं सोबत नाचत होती.

मेहँदी लगा के रखना
डोली सजा के रखना
लेने तुझे ओ गोरी
आएंगे तेरे सजना

कोणी चिडवत होतं. कोणी हसत होतं.

"मेहंदी वर काय नाव लिहायच?" त्या ताईंनी विचारल.

" सम्राट." मनालीने हळूच सांगितल.

मैत्रिणी चिडवत होत्या. "आता नाव घ्या म्हणायच नाही. सगळे नावाने बोलवतात."

आई, आजी हसत होत्या. "आपल्याकडे अस चालत नाही हं मनु. नवर्‍याला अहो म्हणायच. होणारे मुख्यमंत्री आहेत ते. मोठे राजकारणी लोक. त्यांना योग्य मान द्यायचा. बरेच लोक आजुबाजुला असतात."

"फोन लावा जीजुंना. नंबर काय आहे? मी विचारते त्यांना मनु तुम्हाला काय म्हणते?" सीमा म्हणाली.

"तिच्या फोन मधे बघा."

"त्यांचे फोन, मेसेज आलेले असतिल. "एक मैत्रीण म्हणाली.

मनालीचा चेहरा उतरला. "नाही ग फोनला हात लावू नका."

"का काय झाल? स्पेशल मेसेज असतिल. " मैत्रिणी हसत होत्या.

ती बळजबरी हसली. सम्राटने तिला एकदाही फोन केला नव्हता. की मेसेज केला नव्हता.

आरती तिच्याकडे बघत होती." काय झालं मनु? "

" काही नाही ताई."

"आजही फोन आला नाही ना. "

" नाही. " तिने मान हलवली.

" अग तुमच लग्न घाईत ठरल ना. ते इलेक्शन कामात बिझी असतिल. बघ लग्न झाल की तुला कुठे ठेवू कुठे नाही करतील." ताई तिच्या अनुभवा वरून सांगत होती.

"नक्की ना ताई? मला तर भीती वाटते हे लग्न करायची."

"काही होणार नाही. तुझ खूप चांगल होईल. "

"आपले बाबा बघितले ना आईच्या वाटेला किती कमी आले. नेहमी जनता दरबार, नाहीतर बाहेर." आरती म्हणाली.

" हो बरोबर आहे आईने एकटीला आपल्याला मोठ केल."

"पण हे स्थळ छान आहे. मुख्यमंत्रीची बायको म्हणून मीरवशील." आरती म्हणाली.

त्यासाठी काय सोसाव लागेल काय माहिती? मनाली तिची तिची म्हणाली.

******

घरी कसलीच कमी नव्हती. सुरेशराव कारखानीस पाच वर्षा पुर्वी स्वतः मुख्यमंत्री होते. मागच्या सायकलला त्यांच्या पार्टीला इलेक्शन मधे हवे तेवढे सीट मिळाले नव्हते, त्यामुळे ते सत्तेवर नव्हते.

आता इलेक्शन तोंडावर होत. यंदा काहीही करून आपलच सरकार आल पाहिजे. यासाठी जमेल ते करत होते. अतिशय श्रीमंत. आलिशान इंडस्ट्री. सत्ता. शब्द झेलायला लोक. कसलीच कमी नव्हती. घरी भरपूर शेती होती. कराव तितक कमी होत.

बंगल्याच्या पुढच्या भागात त्यांचा दरबार भरायचा. त्या बाजूला स्पेशल किचन होत. पाहुणे कायम घरी असायचे. चहा चोवीस तास उकळत असायचा. आशिष त्यांच्या सोबत असायचा.

मनाली साठी सम्राटच स्थळ असंच बघितल होत. देशमुख कुटुंब ही मोठ नाव होत. दोघ पार्टीच गठबंधन झाल तर चांगल होईल. अर्धा वेळ तुम्ही मुख्यमंत्री अर्धा वेळ आम्ही. या साठी बैठक होती त्यात सुरेशरावांनी सम्राटला बघितलं.

उंच पुरा. अतिशय हॅन्डसम रांगडा गडी. वडलांना सपोर्ट करणारा. वाघ जसा. मुख्यमंत्री पदाचा दावेदार. त्याला बघितल की सगळे विचारायचे कोण आहे हा? इतका इम्प्रेसीव. त्याने सांगितल म्हणजे काम झाल अस होत.

घरच्या इंडस्ट्री, त्या कामावर ही चांगली पकड होती. इलेक्शन मधे ही मदत करत होता. त्याचे बाबा आबासाहेब देशमुख खर तर हे मुख्य पद सांभाळत होते. सध्या त्यांना बर नसायचं. तरी ते गप्प बसायचे नाहीत त्यांचे दोन मुल सुदर्शन आणि सम्राट. त्यांनी सुदर्शनला सोडून सम्राटला आपला उत्तराधिकारी निवडल. सुदर्शन दादा त्यामुळे दुखावला गेला होता. सध्या तो राजकारण विशेष लक्ष देत नव्हता.

सम्राटने त्याला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. सुदर्शन दादा सध्या इंडस्ट्रीकडे बघत होता. तो किती जरी म्हटला की मला राग आला नाही तरी ते समजत होतं. सम्राटला वडिलांना एकट सोडता येणार नव्हतं. त्यामुळे तोही राजकारणात सक्रिय होता.

त्या दिवशी कारखानीस, देशमुख मीटिंग मधे होते.

"सम्राट इकडे ये ." आबासाहेबांनी ओळख करून दिली. सुरेशराव, सम्राट बराच वेळ बोलत होते. ते समाधानी होते. त्यांनी मनाली साठी लग्नाची मागणी घातली.

आबासाहेब खुश होते. कारखानीसांची मुलगी आपल्या घरी दिली तर ते आपोआप आपल्याला सपोर्ट करतील. कारखानीसांना ही त्यांचा जावई मुख्यमंत्री झाला तर आनंद होईल.

सम्राट काही म्हणाला नाही. त्याने हा निर्णय घरच्यांवर सोडला होता. आबासाहेबांनी होकार दिला. त्यांना या लग्नात फायदा दिसत होता.

******

सीमा मनाली जवळ बसली होती. "आज सम्राट जिजुंची सभा आहे ना?"

"हो बहुतेक." मनाली म्हणाली. खर तर तिला या बाबतीत काही माहिती नव्हतं.

******

सम्राट त्याच्या हाय एंड कार मधुन सभेच्या ठिकाणी जात होता. पुढच्या कार मधे आबासाहेब होते. बरेच कार्यकर्ते सोबत होते. त्याच्या चेहर्‍यावर गॉगल शोभत होता. त्याने हाताने केस सेट केले.

" सम्राट साहेब हे आजचे सभेचे पॉईंट्स." त्याचा असिस्टंटने पेपर दिला. सम्राट ते वाचत होता.

" प्रेझेंटेशन तयार आहे ना."

" हो." त्यांनी लॅपटॉप दाखवला. सम्राट नीट बघत होता त्याने एक दोन पॉईंट अॅड करायला सांगितले.

गाड्यांचा ताफा एका मागे एक मोठ्या सभेच्या ठिकाणी पोहोचला. खूपच लोक सभेला हजर होते. लोकांमधे खूप उत्साह होता. सगळीकडे घोषणा सुरू होत्या. आबासाहेब देशमुख गाडीतून सगळीकडे बघत होते.

"इतके वर्ष या लोकांसाठी काम करतो आहे. त्याची ही कमाई आहे. माझी सभा असली की सगळे बरोबर येतात." ते म्हणाले.

सगळ्या बरोबरीच्या लोकांनी होकार दिला. ते गाडीतून उतरले स्टेजच्या दिशेने गेले. "सम्राट कुठे आहे."

तो मागच्या गाडीतून उतरला. त्याचा फोन सुरु होता. त्याने फोन खिश्यात टाकला. तो वडलांसोबत स्टेज वर गेला. समोर घोषणा सुरू होत्या. सुरुवातीला सत्कार झाला. देशमुख भाषणासाठी उठले .त्यांनी भविष्यात जिंकून आल्यावर काय काय काम करू सांगितल. पूर्वी त्यांच्या पार्टी मुळे काय फायदा झाला ते सांगितल. विरोधकांवर टीका घेतली. काय काम सुरू आहेत याचा आढावा घेतला. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या येत होत्या. ही निवडणूक बहुतेक आपण जिंकू. त्यांना विश्वास होता.

थोड्यावेळाने सम्राट भाषण करायला उठला. त्याचा एकूण एक मुद्दा बरोबर होता. प्रत्येक गोष्ट सर्च करून तो बोलत होता. जबरदस्त आवाज त्याच दिसणं. सगळे शांत बसुन ऐकत होते. नेता असावा तर असा. बर्‍याच मुलींचे काळजाचे ठोके चुकले होते. त्याला बघाव की तो काय म्हणतो ते ऐकाव अस होत.

त्याच्या समोर लॅपटॉप होता. प्रत्येक माहिती आकडे बरोबर होते.

"नवीन जमान्यातले पुढारी. यांचं काम वेगळं आहे." आबासाहेब त्यांचा जुना साथीदाराला म्हणाले.

"खरच सम्राट साहेब हुशार आहेत." तो म्हणाला.

आबासाहेब हसत होते. "मुलगा कोणाचा आहे. काम असंच करेल. माझ्या सारख चांगलं."
******
सम्राटने का मनालीला एकदाही फोन नसेल. नक्की काय झालं आहे? बघू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all