गठबंधन भाग 12

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 12

©️®️शिल्पा सुतार

सम्राट बर्‍यापैकी समजुतीने घेत होता. आता पुढे.

सम्राट सकाळी लवकर उठला. मनाली झोपलेली होती. त्याने आवरल. तो आज बाहेर गावी जाणार होता. त्याला एकदा वाटल की तिला सांगून जाव. तो तिच्याकडे बघत होता. नको, ती झोपलेली आहे, हात कसा लावणार. ती घाबरेल. तो खाली आला. स्वतः साठी चहा केला. आक्का उठून आल्या. त्यांना ही थोडा चहा दिला. "आई येतो. रात्री परत येईल. मीटिंग आहेत दोन तीन."

" ठीक आहे, मनाली?"

" ती झोपली आहे. तिला सांगून दे. " तो निघाला.

थोड्या वेळाने मनाली उठली. आज हे रूम मधे नाहीत? जीम मधे गेले असतिल. ती आवरून खाली आली सम्राट खाली नव्हता. कुठे गेले हे? कोणाला विचारू. तिने चहा ठेवला.

"मनाली फुल घेवून ये." आजींनी आवाज दिला. ती आजीं जवळ बसली होती. "तुला भजन येत का ग पोरी?"

"हो आजी. "

"म्हण एखाद. "

ती कृष्णाच भजन म्हणत होती.

गोविंद बोलो हरी गोपाल बोलो
राधा रमण हरी गोविंद बोलो

राधा रमण हरी गोविंद बोलो
गोविंद बोलो हरी गोपाल बोलो

"तुझ आवाज किती गोड आहे. असच एक दिवस तुझं जिवन प्रेमाने भरेल. तू सुखी होशील बेटा." आजी आशीर्वाद देत होत्या. मनाली खुश होती. ती किचन मधे आली.

"मनाली, सम्राट पहाटे बाहेर गावी मीटिंग साठी गेला." आक्का सांगत होत्या.

ती काही म्हणाली नाही. नाश्ता झाला ती घर आवरत होती.

" मनाली तुझा आशिष दादा आला बघ." वंदना तिला आवाज देत होती. आबासाहेब आक्कांना माहिती होत. रात्रीच सुरेशराव त्यांच बोलणं झालं होतं.

ती पळत जावून त्याला भेटली. "तू इकडे कसा काय? "

"तुला घ्यायला आलो आहे. आटोप. " आशिष आबासाहेब, आक्कांशी बोलत होता.

ती खूप खुश होती. "आक्का, आबा मी जावु का?" तिने विचारलं.

"जा बेटा. लगेच ये."

ती आजीं कडे बघत होती. त्या ही जा म्हणाल्या.

"हो सोमवारी येते."

"आपल्याला शाळेत जायच ना मनाली. सरिताला सोबत घेऊन जा." आबासाहेब म्हणाले.

" हो आबा."

चला मनाली शांत झाली. हे बर झालं. ती परत येईल. आबासाहेब विचार करत होते.

सम्राट घरी नव्हता म्हणून त्याची आशिषची भेट झाली नाही.

मनाली तयार झाली. तिने बॅग मधे थोडे कपडे घेतले. ती किचन मधे आली. "वंदना ताई मी येते. तुम्ही येता का सोबत?"

"तु जावून ये. "

"ताई यांना सांगितल नाही. " मनाली म्हणाली.

"मेसेज कर, फोन कर." वंदना हसत म्हणाली.

नको.

"ठीक आहे मी सांगेन. पण हे बरोबर नाही. तू त्यांच्याशी बोलायला हवं. यावर विचार कर." वंदना म्हणाली.

"हो ताई." दोघी भेटल्या.

"मी दुपारी अमितला फोन करते. "

"लवकर ये ग."

मनाली, आशिष निघाले. ती खूप खुश होती. कधी घर येत अस तिला झालं होतं. रस्त्याने ही ती खूप बोलत होती.

"सम्राट राव बिझी असतिल ना मनू. " जागोजागी सम्राटच्या पार्टीचे बॅनर होते. त्याकडे बघत आशिषने विचारल.

"हो दादा खूप बिझी असतात. मी पण सभेला गेली होती. सगळे वहिनी वहिनी करतात."

"हो बाहेर त्यांना खूप मान आहे. त्यांचा आदर ठेवायचा. घरच्या गोष्टी बाहेर जावू द्यायच्या नाहीत."

"हो दादा. तुझा प्रचार कसा सुरू आहे?"

"जोरात."

घर आलं. ती पळत आत आली. तिला बघून आशा ताई खुश होत्या. ती आईला भेटली. आजी ही खुश होती.

" बाबा कुठे आहेत?"

"पुढे आहेत ऑफिस मधे." आशा ताई पाणी देत म्हणाल्या.

सुरेश राव आत आले. बाबा... ती भेटली. माझ बाळ. त्यांनी तिला जवळ घेतल.

" कशी आहेस?"

"ठीक आहे?"

"सम्राट राव कुठे आहेत?"

"आज ते बाहेरगावी मीटिंग साठी गेले."

त्या दिवसा पेक्षा आज मनू बरी दिसते आहे हे बघून आई, बाबा खुश होते. त्यांना ही खूप काळजी वाटत होती.

माहेरी येवून मनाली खुश होती. तिने तीच सामान तिच्या रूम मधे ठेवलं. ती बेड वर पडली. ओह माय गॉड ही रूम किती कंफर्टेबल आहे. इथे किती छान वाटत आहे. मला परत सासरी जायच नाही. पण माझ्या मनावर काही नाही.

लग्नाआधीच जग किती वेगळं होतं. अतिशय सुंदर. फुलपाखरा सारखी मी सगळीकडे बागडत होते. दुःख काय असतं माहिती नव्हतं. माय लाइफ माय रुल आधी वाटत होत ते किती खोट होतं. कोणाची तरी नजर लागली. माझं आयुष्य, सगळे निर्णय घेतात. मला गृहीत धरतात.

"मनु कढी केली ग चल जेवायला." आशा ताई आत आल्या.

"हो आई तुझ्या सोबत बसते."

"बेटा तिकडे सगळं ठीक आहे ना?"

"हो आई."

"सम्राट राव कसे आहेत?"

"ते बाहेरगावी गेले मीटिंग साठी. "

"मी ताट वाढते. तू ये."

तिने आरतीला फोन लावला. "ताई तू ही इकडे येतेस का?"

"मनु जमणार नाही. तू ये ना इकडे."

"ठीक आहे. उद्या येते."

मनाली जेवायला बाहेर आली. आजी डायनिंग टेबल वर बसली होती. "आजी तू किती चांगली आहेस ग. यांची आजी मला नुसती ओरडते. "

"अस बोलायचं नाही बेटा. कधी कधी घर एकत्र रहाण्यासाठी कठोर वागावं लागतं. "

"पण तू छान आहेस शांत एकदम. माझ्या सासुबाई खूप चांगल्या आहेत. "

जेवण झालं मनाली आराम करत होती. सीमा भेटायला आली. ती खूप चिडवत होती. "मला वाटल सम्राट जिजू तुला आता काही माहेरी पाठवत नाही."

"काहीही आपलं, तुझ्या लग्नाचं काय झालं? ते पाहुणे बघायला येणार होते ना?" मनालीने विषय बदलला.

"हो ना अजून आले नाही."

"आमच्या गावाला बघू का स्थळ? तिकडे खूप तरुण कार्यकर्ते आहेत."

"बघशील तर एखादा हॅन्डसम ,डॅशिंग हीरो सारखा मुलगा बघ. जिजूं सारखा. " दोघी हसत होत्या.

यांच्या सारखा नको ग बाई. दुरून डोंगर साजरे. त्यापेक्षा एखादा साध्या मुलाशी लग्न केलं असत तर बर झालं असतं. हे श्रीमंत राजकुमार विचित्र असतात. सीमा तुला तुझ्यावर प्रेम करणार छान नवरा मिळेल. तिने मनातल्या मनात आशिर्वाद दिला.

"पण तिकडे जावून तू बारीक झाली मनु." फरक तिच्या लक्ष्यात आला.

"हो मग ते सासर आहे. नाही म्हटलं तरी टेंशन येतं. काम असतं. थोडे दिवस आईकडे नीट राहून घे सीमा. एकदा लग्न झालं की काही खर नसतं." मनाली म्हणाली. थोड्या वेळाने सीमा गेली. तिने घरी फोन केला. अमित बरोबर थोड बोलली.

रात्री जेवायला मनालीचे आवडते पदार्थ होते. निधी वहिनी ताट वाढत होती. मनु ही मदतीला गेली.

"वहिनी कशी आहेस?"

"तुझी आठवण येते ग. तू अगदी मैत्रिणी सारखी होतीस. मला किती सपोर्ट केला."

"माझी जावू बाई तशीच आहे साधी छान. अमित अगदी गोड आहे."

सुरेशराव आले ते जेवायला बसले. आशाताई मनालीला खूप वाढत होत्या.

"पुरे आई. किती देणार. माझ पोट भरलं. स्वयंपाक खूपच छान झाला आहे." मनाली म्हणाली.

"अस केलं तर ती दोन दिवसात जाढ होईल." आशिष चिडवत होता.

"आईची माया असते ती." निधी म्हणाली. जेवण झालं.

सुरेश राव पुढे बसले होते. मनु इकडे ये. आशाताई ही आल्या.

"बेटा आता तिकडे सगळे ठीक आहेत ना?"

"हो बाबा."

"कोणत्याही गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाही. होईल ठीक. आमच्यावरचा राग गेला का बेटा? नाराज राहू नकोस. आम्हाला ही इकडे काही सुचत नाही." सुरेशराव म्हणाले.

"बाबा मला तुमचा आईचा राग आला नव्हता. मी माझ्यावर नाराज होते. तुमचा राग करून काय करू? मला तरी तुमच्या शिवाय कोण आहे. अजिबात काहीच मनात आणू नका. आई मी ठीक आहे." मनाली म्हणाली.

आशा ताईंच्या डोळ्यात पाणी होतं.

"आई काय हे? " ती त्यांच्या जवळ बसली.

"मनु बेटा तुला अस तिकडे सोडून येतांना आम्हाला किती त्रास झाला."

"मला माहिती आहे ते आई. शांत हो. सोड बर. आई बाबा तुम्ही माझ्या चांगल्याचा विचार करतात. मी पण तुम्हाला प्रॉमीस करते मी तिकडे नीट राहील. घाईने निर्णय घेणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. डोळे पुस बर आई."

"मनु बेटा, मी आहे तुझ्यासाठी. थोडे दिवस मी पण बघतो आहे ते लोक काय करता ते. नंतर ठरवू बेटा. " सुरेशराव म्हणाले.

"बाबा काही प्रॉब्लेम नाही. घरचे लोक चांगले आहेत. मी दोन दिवस आहे ना आपण मस्त राहू. उद्या मी ताई कडे जाते. रात्री परत येवू." आशिष, निधी तिला बोलवत होते. ती त्यांच्यासोबत आईस्क्रीम खायला गेली.

आशाताई ,सुरेशराव रूम मधे आले. "मनाली अचानक शांत झाली ना?"

"हो आणि बारीक ही. होईल ठीक. तू काळजी करू नकोस आशा." सुरेशराव म्हणाले.

******

मनाली रूम मधे होती. आशिष आला. तुझ्या लग्नाचे फोटो आले आहेत. त्याने फोटो दिले तो गेला. ती फोटो बघत होती. आम्ही दोघे सोबत खूपच छान दिसतो. आशिषने काही फोटो त्यांच्या फॅमिली ग्रुपवर ही पाठवले. फोटो खुपच छान होते. तिने त्यांच्या लग्नाचा फोटो डीपी म्हणून ठेवला. सम्राट ती वरमाला घालण्याआधी एकमेकांकडे बघत होते तो फोटो.

ती मोबाईल मधले फोटो बघत होती. सम्राट खूपच भारी दिसत होता. आमची जोडी छान दिसते. यांचा नुसता चेहरा गोड आहे. बोलायला खडूस अगदी. ती हसत होती. जे आहे ते ठीक आहे.

अस म्हणतात एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती गोष्ट मिळतेच. अस होवू दे यांना माझ्या बद्दल काहीतरी वाटू दे. मी यांना मनापासून आपल मानलं आहे. ती जागा आता इतर कोणी घेवू शकत नाही. आमच नात टिकू दे देवा.

मला यांचा राग ही येतो. एकदा वाटत त्यांच्या शिवाय मी अपूर्ण आहे. मला नक्की हवं तरी काय? ते जर समोरून बोलले तर मी त्यांना माफ करेल का? पण अस होणार नाही. हे पुढाकार घेणार नाही. त्या दिवशीचे त्यांचे शब्द अगदी टोचणारे होते. त्यांनी मला दूर लोटलं. आता हे कधी नीट होईल माहिती नाही.

ती बघत होती सम्राट ऑनलाईन होता. जावू दे. अस ही आम्ही कुठे बोलतो.

ती झोपली.

******

रात्री सम्राट घरी आला. तो जेवायला घेत होता. सुदर्शन बाहेर बसला होता. दोघ बोलत होते. इलेक्शन, बिझनेस त्याच गप्पा होत्या. सम्राट बर्‍यापैकी शांत वाटत होता.

तो रूम मधे आला. त्याने कोपर्‍यात बघितलं मनाली नव्हती. तो आश्चर्य चकित झाला. एवढी रात्र झाली. मनाली कुठे गेली? त्याने कपाट बघितलं. तिचे कपडे होते. ही कुठे गेली. मला तर काही सांगितल नाही?

सम्राट मनाली बद्दल घरी विचारेल का? की त्याला काही फरक पडणार नाही. बघू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all