गठबंधन भाग 13
©️®️शिल्पा सुतार
एवढ्या रात्री मनाली कुठे गेली? सम्राट विचार करत होता. त्याला दोन मिनिट भीती वाटली. ही कायमची तर माहेरी गेली नाही ना? मला आता का तिच्या बद्दल वाटतय? पार्टीसाठी की आठ दिवसात तिची थोडी तरी सवय झाली म्हणून. त्याला याच उत्तर माहिती नव्हतं. आता पुढे.
तो खाली आला. इकडे तिकडे बघितलं त्या दिवसासारखी ती बागेत तर बसलेली नसेल ना. मनाली तिकडे ही नव्हती. तिच्या बॉडीगार्डला फोन करावा तर खूप रात्र झाली होती. एका लेडिजशी इतक्या उशीरा कस बोलणार? आधी आईला विचारू मग फोन करू. तो आक्कांच्या रूम जवळ आला. त्याने हळूच आवाज दिला. "आई झोपली का? एक मिनिट इकडे ये ना." आबासाहेब झोपले होते. त्या बाहेर आल्या.
"आई, मनाली रूम मधे नाहिये." सम्राट म्हणाला.
"म्हणजे? कुठे गेली ती ?" त्या मुद्दाम म्हणाल्या. त्यांच्या चेहर्यावर बारीक हसू होतं.
"मला काय माहिती. मी घरी नव्हतो तू सरिताला फोन कर." त्याला टेंशन आल होतं.
"मनाली माहेरी गेली." त्यांनी सांगितलं.
"म्हणजे?" त्याला विचारायच होत कायमची गेली का? तो काळजीत होता.
"तिचा भाऊ आला होता घेवून गेला. नाहीतर ती इथे कंटाळली होती. बळजबरी ठेवून घेण्यात काय अर्थ आहे." आक्का म्हणाल्या.
"बळजबरी म्हणजे काय? तीच लग्न झालं आहे. आता हेच तीच घर आहे." सम्राट म्हणाला.
"कोणाच्या भरोश्यावर राहील ती इथे? तिला कोणाचा आधार आहे? सांग तू सांभाळशील का तिला? नीट वागशील का? नाहीतर राहू दे तिला माहेरी." आक्का मुद्दाम म्हणाल्या. चांगला चान्स आहे याला सरळ करायचा.
सम्राट काही म्हणाला नाही. तो रूम मधे आला. मनाली कधी परत येईल त्याला विचारायच होतं. पण तो गप्प राहिला. तिच्या सामानाकडे बघत तो नुसता बसला होता. हे काय झालं? वाटतय ती काही आता परत येणार नाही. त्याने सोफ्यावरची उशी समोर फेकली. नाही मी तिला घरी घेवून येईल. माफी मागेल.
ती इथे रूम मधे नाही तर वेगळं वाटत आहे. अचानक पोकळी निर्माण झाली. तिच्या मनात माझ्या विषयी राग आहे. अस नको. मी तिच्याशी बोललं पाहिजे.
त्याने फोन हातात घेतला. दोन तासापूर्वी ती ऑनलाईन होती. उद्या इकडे मीटिंग होती. तिला घेवून जायचं होतं. सांगून ही गेली नाही. ती का सांगेल? मी कोण आहे. तो बघत होता त्यांचा लग्नातला फोटो तिचा डीपी होता. दोघ वरमाला घालण्याआधी एकमेकांकडे बघत होते. तो थोड हसला. मनाली लग्नात खरच खुपच सुंदर दिसत होती. हिने आमच्या दोघांचा फोटो ठेवला म्हणजे ती परत येईल. त्याला आशा होती. मी पण थोडे प्रयत्न करायला हवे. मेसेज करू का?
त्याने मेसेज लिहिला. "कुठे आहेस?"
परत मेसेज डिलीट केला. नको ती म्हणेल आता कसा हा अचानक बोलतो आहे. त्याच्या गठबंधन साठी अस करत असेल. नाही मनाली मी यावेळी खरच तुझ्यासाठी बैचेन आहे.
त्याने फोन कॉटवर फेकला. तो झोपायचा प्रयत्न करत होता. बोलतांना विचार केला पाहिजे. मनालीशी सॉफ्टपणे वागायला हवं. आयुष्यात अनेक कटू प्रसंग आले त्यामुळे वागण्यात एक प्रकारचा कडवट पणा आला होता. बोलतांना तोल गेला. ती समजून घेईल का? मी बोललो तरी ती बोलेल का? माहिती नाही. तो झोपला.
******
आजी सकाळी पूजा करत होत्या. "वंदना फुल आणं."
"मनाली होती तर बर होतं." वंदना म्हणाली.
"हो ना. पोरगी साधी आहे." आजी म्हणाल्या.
"तरी तुम्ही तिला ओरडल्या."
"म्हणून तर ती इथे थांबली. नाहीतर होत्याच नव्हतं झालं असत." आजी म्हणाल्या.
"हो आजी, कधी कधी तो क्षण गेला की वाटत आपण का इतक चिडलो किंवा का असा निर्णय घेतला. " वंदना म्हणाली.
"तेच तर समजल पाहिजे बेटा. तरुण मुलांच रक्त गरम असतं. अश्या वेळी आम्हाला मधे पडाव लागत." आजी म्हणाल्या.
जेष्ठ लोकांचे अनुभवाचे बोल असतात. काही का असेना, सम्राट भाऊजी, मनालीच नात टिकायला हवं. आजी बरोबर आहेत. वंदना विचार करत होती. ती किचन मधे गेली.
******
मनाली सकाळी उठली. तिने बघितल रात्री दोन वाजेपर्यंत सम्राट ऑनलाईन होता. ती त्याचा फोटो थोडा वेळ बघत होती. लग्नाआधी थोड तरी यांच्याशी बोलायला हवं होतं म्हणजे स्वभाव समजला असता. यांनी ही सांगितल नाही की लग्न करायच नाही. मग यांना कोणी बळजबरी केली? आबासाहेबांनी? हे काही लहान नाहीत. असे तर डॅशिंग बनुन किती मोठे मोठे प्रॉब्लेम सोडवतात. इथे बरे हतबल झाले? जावू दे आता काय झालं कसं झालं किती बघणार.
तीच आवरलं नाश्ता झाला. ती रूम मधे आली. आरती कडे जाण्यासाठी ती तयार होत होती. साडी नेसली. केस विंचरले. आशा ताई आत आल्या. "दे मी वेणी घालून देते."
"आई तू ही चल ना ताईकडे."
"नको बेटा तुम्ही मुल जावून या. तुझे बाबा, आजी घरी आहेत ना."
"आई तुला बाबांचा कधी राग आला नाही का?"
"आला ना बरेच वेळा. तुला माहिती आहे. पण तेवढ्या पुरता. त्यावेळी त्यांनी का असा निर्णय घेतला किंवा ते का मला बोलले असतिल? असा विचार मी करायचे आणि हे पण समजून घ्यायचे. नंतर सगळं नीट व्हायचं. " आशा ताई सांगत होत्या ते आता मनालीला समजत होतं.
"तू खरच सहनशील आहेस."
"होत बेटा अस वयामानाने. आपल्या लोकांना आपण समजून घेतलं पाहिजे ना. आटोप आणि बाहेर ये." आशा ताई गेल्या.
नात्यांमध्ये इतका गोंधळ असतो मला आधी समजल नाही. मनाली तयार झाली. ती बाहेर येवून बसली.
******
सकाळी सम्राट जॉगिंग साठी गेला होता. थोड्या वेळाने तो तयार होवून आला. आबासाहेब पुढे बसलेले होते. ते फोन वर बोलत होते.
"सम्राट आधी कंपनीत जा .युनीयनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. काम बंद आहे."
"हो आबा." तो त्यांच्याशी बोलत होता. नक्की काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घेतलं.
"त्याला काही खावू तर द्या. चल सम्राट इकडे ये. दिवस रात्र नुसत काम काम." आक्का म्हणाल्या.
"आई मला तुझ्याशी बोलायच आहे." सम्राट पटकन आक्कां जवळ गेला.
"आई, मनाली रागाने गेली का? तिला कोण घ्यायला आलं होतं?" सम्राटने विचारलं.
"आई, मनाली रागाने गेली का? तिला कोण घ्यायला आलं होतं?" सम्राटने विचारलं.
आक्का हसत होत्या. चला काम झालं. हा कालपासून तिचा विचार करतो आहे म्हणजे आता हे प्रकरण नीट होईल. "तिचा भाऊ आला होता."
"मनालीला परत बोलाव." सम्राट हळूच म्हणाला.
"तू आणि ती बघा आता काय ते." आक्का म्हणाल्या.
"आई मदत कर ना. " सम्राट म्हणाला. आक्का मानेने नाही म्हणाल्या. त्या किचन मधे गेल्या.
वंदनाने त्याला नाश्ता दिला. "भाऊजी, करमत नाही की काय? काल मनालीचा फोन आला होता. तुम्हाला आला होता का?"
"नाही ना माझ्याशी कोण बोलतय. मला कोणी सांगून ही जात नाही. मी तर व्हीलन." सम्राट म्हणाला.
वंदना हसत होती. "मग घ्या पुढाकार. तुम्ही तिला दूर केलं. आता चान्स आहे. नाहीतर आक्का तिला परत बोलवणार नाहीत. यात तुमचीच चुकी आहे. नाहीतर मनाली गोड मुलगी आहे. "
"मनाली गोड, तुम्ही सगळे चांगले. मीच कडू आहे ना. तुम्ही सगळे एका बाजूला झाले. पण तेव्हा तो क्षण तसा होता. काय झालं कस झालं समजल नाही. मी तिला गृहीत धरलं. चुकी झाली. मी हे ठीक करेन." सम्राट म्हणाला.
"नक्की भाऊजी? खरच ना?" वंदनाला आनंद झाला होता.
"हो. मी खूप विचार केला. मी यापुढे नीट रहाणार आहे. तुम्ही मनालीला काही सांगू नका. मी तिची समजूत काढेल."
"हो, "
"मग मनाली अजून काय म्हणाली? परत यायचा काही विचार?" सम्राट म्हणाला.
"ती म्हणाली तुम्ही घ्यायला गेले तर परत येईल. " वंदना तिच्या मनाच सांगते आहे हे सम्राटला समजलं तो ही हसत होता.
"बर ठीक आहे. " आता सासुरवाडीची ट्रीप करावी लागेल.
सुदर्शन आला. ते कंपनी बद्दल बोलत होते.
"चल आधी तिकडे जावू. एक एक प्रॉब्लेम होवुन बसला आहे. घरी दारी सारखं. आता सगळीकडे समजूत काढायची आहे." सम्राट वंदनाकडे बघत म्हणाला.
"गुड भाऊजी. हेच योग्य आहे. दुपारी जेवायला या नाहीतर मनाली म्हणेल मी नव्हती तर माझ्या नवर्याला कोणी जेवायला दिल नाही."
******
आशिष, निधी, मनाली आरतीकडे निघाले. मनाली फोन मधे बघत होती. हे उठले आहेत वाटत. वंदना ताईने सांगितल असेल का की मी माहेरी आली. हो वाटत. सम्राटला बर वाटत असेल. ते खुश असतिल. तेवढीच त्यांना रूम मोकळी मिळाली असेल. पूर्वी सारखी. एवढं होत तर लग्न का केलं. तिला परत सम्राटचा राग आला.
तिने घरी फोन केला. आक्का होत्या. अमित शाळेत गेला होता. वंदना होती. ती आक्कांशी बोलली. नंतर फोन वंदनाने घेतला.
"ताई हे काल केव्हा आले?"
"भाऊजी उशिरा आले. जेवले. तुझ्या बद्दल ही विचारलं. मला नाही आक्कांना."
मनाली आता लाजली होती.
"बोलायच का त्यांच्याशी? थांब फोन देते. " वंदना म्हणाली.
"नको ताई." मनाली घाईने म्हणाली.
"तसे सम्राट भाऊजी घरी नाहीत." वंदना उगीच चिडवत होती.
मनाली हसत होती. तिने फोन ठेवला. तिला खूप धडधड झाली. वंदना ताई ही जास्त करतात. पण खूपच चांगल्या आहेत.
ते आरतीकडे आले. दोघी भेटल्या. तिच्या घरचे मनालीच कौतुक करत होते." तुझे मिस्टर नाही आले का? "
"ते नंतर येणार आहेत." तिने सांगितलं.
जिजाजी आले. आरती त्यांना भेटली. त्यांना सगळं माहिती होतं. "मन लहान करायच नाही मनाली. हे नीट होणार आहे. सम्राट चांगला मुलगा आहे."
"जिजाजी खरच अस झालं ना तर मी तुम्हाला पार्टी देईल."
"बस पार्टी? आपण सगळे मस्त फिरायला जावू. "
"नक्की जिजाजी. "
"मनू तू आरतीची प्रिय बहीण आहेस. आम्ही आहोत तुझ्यासाठी. काळजी करायची नाही. मी बोलू का सम्राट सोबत? "
"काही उपयोग नाही जिजाजी, जो पर्यंत यांना मनापासून माझ्या बद्दल वाटणार नाही तो पर्यंत हे नात नीट होणार नाही. " मनाली म्हणाली.
"आम्ही दोघ ही तुझ्यासोबत आहोत मनु." आशिष निधी म्हणाली.
मनालीला खूप बर वाटलं.
******
पुढे काय होईल? सम्राट मनालीला घ्यायला जाईल का? ती त्याच्यासोबत परत घरी येईल का? बघू पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा