गठबंधन भाग 17

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 17

©️®️शिल्पा सुतार

मनाली सम्राट निघाले. तीच मन भरून आलं होत. सम्राटने तिला सावरल. आता पुढे.

बर्‍याच कार एका मागे एक होत्या. रस्त्यात एका गावाला पार्टी ऑफिस मधे ते गेले. सम्राट येणार आहे हे आधीच माहिती होतं. खूप लोक जमले होते. आकाश तिथे भेटला. तो कामात होता. नंबर प्रेमाने लोक भेटत होते. सम्राट खूप लोकांना मदत करत होता त्यामुळे तो प्रसिद्ध होता. तो बिझी होता. मनाली थोड्या वेळ आत बसली. ती सगळं बघत होती. तिला चांगल वाटल. बाजूला शेत होत. ती आतून बघत होती. ती तिकडे गेली. तिथे उभी होती. छान वाटत होतं.

"वहिनी तुम्ही इथे का उभ्या आहात? आत येवून बसा." आकाश बोलवायला आला.

"इथे किती गार वाटत ना. छान वारा आहे. आणि आत तुमचे काम सुरू आहेत. तुम्हाला डिस्टर्ब नको."

"त्यात काय डिस्टर्ब. सम्राट नेहमी असाच बिझी असतो. जनता दरबार नेहमी सुरू असतो." आकाश म्हणाला.

"लोकांना किती प्रॉब्लेम असतात ना." मनाली म्हणाली.

"हो खूप. पण सम्राट जमेल तेवढी मदत करतो."

"हो. खरच. तुम्ही लोक चांगल काम करता आहात. " तिला छान वाटल. एक माणूस म्हणून हे खूप चांगले आहेत.

"वहिनी एक विचारू? सम्राट आणि तुमच्या मधे सगळं ठीक आहे ना? तुम्ही दोघं बोलत नाही का? मी आता बघितलं. तुम्ही दोघ इतके शांत कसे?" आकाशने विचारल.

"कधीतरी बोलतो."

"मला तर एकदाही दिसले नाही." आकाश तिच्याकडे बघत होता.

मनाली काही म्हणाली नाही.

"काय झालं वहिनी? काही प्रॉब्लेम?"

"हे का अलिप्त असतात ते तुम्हालाच माहिती ना आकाश भाऊजी. मी तर यांना ओळखत ही नाही. यांनी काही सांगितलं ही नाही." मनाली सहज म्हणाली.

आकाश गप्प झाला. बरोबर आहे हीच. सम्राट का गप्प असतो आता समजलं. "थोड कामं आहे. " तो आत आला.

आम्ही बोलत नाही हे बर्‍याच लोकांना लक्ष्यात येत आहे. काय करणार? मला आता काही अडचण नाही. त्यांचे काही कारण असतिल. समजतील. हे तसे चांगले आहेत. घरी माझ्या आई बाबांशी किती नीट वागले. ते महत्वाचं. नंतर माझ काहीही झालं तरी चालेल. हे माझ्याशी ही एकदा दोनदा हसले. थोड बोलले. शांततेत घेवू. होईल ठीक.

पण हे अचानक माझ्याशी कस काय नीट वागता आहेत. पार्टीसाठी का? की खरच त्यांना त्या दिवशी वागले त्याबद्दल वाईट वाटत असेल? माहिती नाही. पण जो बदल आहे तो खूप छान आहे. मला चालेल अस. ती विचार करत होती.

सम्राट बाहेर आला. सोबत दोन चार लोक होते. त्याने आवाज दिला. ती पटकन पुढे आली. त्याने ओळख करून दिली. "ही मनाली माझी पत्नी. "

ती थोडी लाजली. ते सम्राटच्या नजरेतून सुटलं नाही.

तिला त्या वाक्याने खूप छान वाटलं. चला शेवटी यांनी मान्य केलं. मी त्यांची बायको आहे.

काम झालं. ते निघाले.

सम्राट फोनवर बोलत होता. तिने तिची पर्स बाजूला ठेवली. ती नीट बसत होती की कार अचानक थांबली. ड्रायवरने जोरात ब्रेक दाबला. ती पुढे पडणार तेवढ्यात सम्राटने तिला सावरलं. तिने पण पटकन त्याचा हात धरला.

"सीट बेल्ट लाव." त्याचा आवाज आला. ती तिकडे सरकली. तिने बेल्ट लावला.

"काका जरा विचारून कार सुरू करा." सम्राट म्हणाला.

"सॉरी साहेब. निघायच का वहिनी साहेब?"

ती हो म्हणाली. वार्‍याने तिचे केस, पदर उडत होता. तो सम्राटच्या शर्ट वर येत होता. त्याने फोनवर बोलतांना तो पदर हातात घेतला. किती छान साडी आहे. तो बघत होता. त्याने पुढे होवुन खिडकी बंद केली. तिने त्याच्याकडे बघितलं. त्याने पदर परत केला. तिने पटकन पदर बाजूला घेतला. ते घरी आले. ती उतरत होती.

"मी पार्टी ऑफिस मधे जातो. आईला सांग. घरी यायला रात्र होईल." तो म्हणाला.

ती हो म्हणाला. एक दोन लोक मदतीला होते. तीच सामान आत आणलं. फराळाचे बॉक्स टेबल वर ठेवले. तिची बॅग तिने बाजूला ठेवली. ती आत आली. वंदना, आक्का खूप खुश होत्या. अमित झोपलेला होता. आजी ही बाहेर येवून बसल्या. आबासाहेब बाहेर गेलेले होते.

"वंदनाताई, अमित केव्हा उठेल? आज मी त्याच्याशी खूप खेळणार आहे." मनाली म्हणाली. तिचा खुललेल्या चेहर्‍याकडे सगळे बघत होते.

"मग मनाली खुश ना एकदम. आई बाबा भेटले. भाऊजी घ्यायला आले." वंदना म्हणाली.

"तुम्ही पाठवलं ना यांना ." तिने विचारलं.

"नाही भाऊजी त्यांच्या मनाने आले ."

"खर ?"

"हो अगदी खर. ते तुझ्याशी बोलले का? " वंदना विचारत होती.

"हो अगदी थोड. आम्ही काल पार्टी केली." मनाली फोटो दाखवत होती.

"वाह मजा आली. तू जीन्स घातली होतीस?"

" बघू." आक्का बघत होत्या. आजींनी ही बघितलं त्या काही म्हणाल्या नाही.

"या फोटोत भाऊजी बघ, तुझ्याकडे बघता आहेत." वंदना हळूच म्हणाली.

मनाली बघत होती. खरच की. सम्राटची नजर बघून ती लाजली होती. तिला काल पासुन वाटत होत हे माझ्याकडे बघता आहेत. पण नक्की काय आहे हे? मनाली काळजीत होती. हे बाहेर तर सगळ्यांसमोर नीट वागले. थोड बोलले ही. रूम मधे बोलतील का? की तिकडे परत तू कोण मी कोण सुरू राहील. जावू दे आता आई बाबा निश्चिंत आहेत. माझ काही का होत नाही. आज रात्री समजेल. ते आज माझ्याशी बोलले तर खरच ते या नात्यासाठी प्रयत्न करत आहेत, नाहीतर ते माझ्या माहेरच्या लोकांसमोर नाटकं करत होते. त्यांनी इलेक्शन साठी मला इथे आणलं हे स्पष्ट होईल. तिला उगीच धडधड झाली. देवा यांना माझा विचार मनात असू दे. आमच नातं नीट होवू दे.

"तुमचं छान सुरु आहे. मी म्हणाली होती ना मनाली भाऊजी तुझ्या पासून जास्त दूर राहू शकत नाहीत. असच छान रहा. मला खूप आनंद झाला आहे." वंदना म्हणाली. तशी मनाली तिच्या विचारातून बाहेर आली.

"मी सामान वरती ठेवते." ती म्हणाली.

"हो लगेच ये मी चहा ठेवते आहे." वंदना म्हणाली.

मनाली रूम मधे आली. तिला खरच इकडे छान वाटतं होतं. हे माझ घर आहे. आई, ताई बरोबर म्हणतात. अगदी पंधरा दिवसात मला इथली सवय झाली. ती खाली आली.

"सम्राट कुठे आहे?" आक्कांनी विचारल.

"ते पार्टी ऑफिस मधे गेले. रात्री येतील तुम्हाला सांगायला सांगितल."

" मग आत्ताशी सांगते आहेस." दोघी हसत होत्या.

अमित उठला. मनालीला बघून रुसला होता. "अरे बापरे काय झालं?"

"तू त्याला नेल नाही. आम्हाला काकूची किती आठवण आली." वंदना म्हणाली.

"सॉरी, हे चॉकलेट. आज क्रिकेट?"

"हो चालेल." त्याने टाळी दिली.

रात्रीच जेवण झालं. मनाली आवरत होती. सम्राट आला.

" मनाली याच ताट वाढ." आक्कांनी आवाज दिला.

तिने जेवायला वाढलं.

तो थँक्यू म्हणाला. तो आबासाहेबांसोबत बोलत होता. मनाली रूम मधे आली. कपडे बदलले ड्रेस घातला. ती रूम आवरत होती. बॅग नीट ठेवली. तो थोड्या वेळाने आला. तिला दोन पुस्तक दिले. ती पण थँक्यु म्हणाली. ती जे पुस्तक वाचत होती त्याचा पुढचे भाग होते. म्हणजे यांच लक्ष आहे तर. तिला छान वाटलं.

तो कॉटवर बसला होता. त्याच तिच्याकडे लक्ष होतं. ही ड्रेस वर छान दिसते. ते केस का बांधुन घेते समजत नाही. डोळ्यात काजळ घालते का? हो अगदी बारीक रेघ. आजची ती साडी ही किती छान होती. त्यातून एक मंद सुगंध येत होता. तो स्वतः वर हसला.
तिच्याकडे बरच लक्ष आहे. दुसर मन म्हणालं.
असू दे ती माझी बायको आहे. तो खुश होता.

मनाली मोबाईल वर आरतीला मेसेज करत होती. "ताई संध्याकाळी घरी आली."

"सगळं ठीक आहे ना मनु?"

"हो काही प्रॉब्लेम नाही."

"सम्राट राव बोलतात ना."

" हो ताई."

"काळजी घे. नीट रहा." मेसेज करतांना ही तिच्या चेहर्‍यावर थोड हसु होत.

सम्राट बघत होता. ही कोणाशी बोलते आहे? घरी मेसेज करत असेल. नाहीतरी हिच्या आयुष्यात आहे तरी कोण. मी चौकशी केली होती.
अरे वाह म्हणजे बायकोच कोणाशी काही नको. आणि स्वतःच? छान सुरु आहे. तिच्या पासून सगळं लपवून ठेवल. वरून तिच्यावर ओरडून तिला गप्प केलं. त्याला कसतरी वाटलं.

तिला जर माझ्या बद्दल समजल तर ती काय करेल? मला समजून घेईल की हे सगळं सोडून जाईल? नाही ती जाणार नाही. जनरली मुली अॅडजेस्ट करतात.

मूल? ते सहन करतील का बायकोच अस प्रकरण? माझ्या ऐवजी हीच काही असत तर? तिने जर अस सांगितल असतं की माझ्या आयुष्यात तुम्हाला काही स्थान नाही तर मी ऐकलं असत का. की पत्नी आहेस तुझ कर्तव्य कर म्हणून जबरदस्ती तिच्या सोबत......

तो तिच्याकडे बघत होता. खूप सॉरी.
हे मनातल्या मनात म्हणून उपयोग नाही. तिच्याशी बोल.
हो लगेच नाही. त्याने दुसर्‍या मनाला सांगितल.

त्याला वाटत होत तिने वरती येवून झोपावं. पण तो काही म्हणाला नाही. बोलू का हिच्याशी? काय बोलणार पण?

"मनाली आपण ओळख करून घ्यायची का? "

तिने त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं. चला बर आहे देव पावला. ती छान हसली.

"काय झालं?" त्याने विचारलं.

"आपण पहीलं अस कपल आहोत जे लग्नानंतर अस बोलत असेल." ती म्हणाली.

तो ही थोड हसला.

"तुमच गाव घर छान आहे. तु लहानपणापासून त्याच शाळा कॉलेज मधे होती का?"

"हो बाबांनी तिकडे शिक्षणाची चांगली सोय केली आहे. तुम्ही?" तिने ही विचारल.

"मी थोडे वर्ष होस्टेल वर होतो नंतर इकडे आबांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं." तो गप्प झाला. एकदम कॉलेजच्या आठवणी डोळ्या समोर आल्या.

तिला त्याचा चेहरा वेगळा वाटला.

"काय झालं?" तिने विचारल.

"काही नाही थोड काम आहे."

ती बघत होती यांचा असा काय मूड बदलला. नक्की कॉलेज मुळे काहीतरी झालं आहे. यांची एखादी मैत्रीण असेल का? हो बहुतेक मग यांनी लग्न का केल नाही. नक्की काय झालं असेल? कोणाला विचारता येईल. तो मुलगा त्या दिवशी भेटली होता तो सांगेल का? पण ताई म्हणते धोका होवू शकतो. त्याच कार्ड पर्स मधे आहे. बघू काय करता येईल.

"मी शाळा जॉईन करते आहे." तिला त्याला सांगावसं वाटलं.

"अरे वाह तू आधी टीचर होतीस का?" त्याने विचारल.

"हो. उद्या आबासाहेबांसोबत जाणार आहे."

"तिकडून पार्टी ऑफिस मधे ये."

" हो नक्की. "

"तिकडे आपण बायकांची मीटिंग घेवू." त्याने सांगितल.

" पुस्तकांसाठी थँक्यु."

"तुला इथली लायब्ररी बघायची आहे? " त्याला समजल ही खूप हुशार आहे. तिला वाचनाची आवड आहे.

" हो मला मेंबर होता येईल का?"

" का नाही आपण जावू."

तिला ही थोड लिहायची आवड होती. पण ती तिने तिच्या पर्यंत ठेवली होती. यावेळी तिने तिची डायरी सोबत आणली होती.

दोघांनाही थोड बोलून बर वाटत होत. ती विचार करत होती हे अस जरी राहिले तरी बर होईल.

तो विचार करत होता मला हिला लवकर सगळं सांगाव लागेल. त्या दिवशी ही मी विचित्र वागलो. ही लवकरच मला माफ करेल तर बर होईल. नंतर तो काही म्हणाला नाही. आज पुरत एवढ ठीक आहे.

सम्राट मनालीला खर सांगू शकेल का? काय होईल पुढे? बघू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all