गठबंधन भाग 20

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 20

©️®️शिल्पा सुतार

मनाली विचार करत होती. सम्राटला समजल काही तरी नक्की आहे. आता पुढे.

तो तिच्या जवळ आला." मनाली टेंशन घ्यायच नाही. आपले जसे चांगले मित्र असतात ना तसे शत्रू ही असतात. त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. अश्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. काही ना काही होणार."

" हो मी ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. "

"घरच्यांची आठवण येते का? "

नाही.

"काही नाही तर मग मोकळ रहा. मला तुला एक गोष्ट दाखवायची आहे. हे बघ आकडे इतके लोक आपल्या बाजूने आहेत." तो एकदम उत्साहात बोलत होता.

ती फक्त त्याच्याकडे बघत होती. या माणसाने किती दुःख सहन केल असेल. नक्की काय झालं असेल? अस एकीला मनात ठेवून दुसरी सोबत रहाणं अवघड आहे.

"अहो तुम्ही आराम करा ना. खूप दमतात." ती मधेच म्हणाली.

"मनाली अस बघितल की अजून उत्साह येतो. उद्या आपण दौर्‍यावर जातो आहोत. दोन दिवस लागतील. तू येशील ना?"

"हो येईल."

"तुझ्या शाळेला सुट्टी होईल." तो म्हणाला.

"हो चालेल. तस ही मला अजून नीट वर्ग मिळाला नाही." ती जागेवर येवून झोपली.

सकाळी ती राधाशी फोनवर बोलत होती. सुट्टी टाकली. तिने बॅग भरली. "तुमचे कपडे? "

"मी घेतो." तो कपाटा जवळ गेला. त्याने ती समोरची बॅग वरच्या कप्प्यात ठेवली. त्या बॅगकडे बघतांना त्याच्या चेहर्‍यावर काहीच भाव नव्हते. ती त्याच्याकडे बघत होती. अरे काय आहे हे? पत्र म्हणजे जुन्या आठवणी असतात. मग यांना त्या बद्दल काही वाटत नाही का? हे नक्की यांचे पत्र आहेत ना की कोणी मित्राचे आहेत? की हे त्या मुलीला विसरले. काय नाव होत? प्रियांका. विचारणार तरी कस? माझ्यासाठी हे महत्वाचे आहेत. जावू दे.

दोघ सभेला गेले. खूप गर्दी होती. बरेच भाषण झाले. दिवसभर सम्राट बिझी होता. ते रात्री गेस्ट हाऊस वर थांबले. आत स्वयंपाक सुरू होता. मनाली बाहेर पूल साईडला बसली होती. सम्राट आला. बाजूला खुर्चीवर बसला. "आज खूप थकलो."

"हो ना आता इलेक्शन जवळ आलं." ती म्हणाली.

"तुला माझ आजच भाषण आवडलं?" त्याने विचारलं त्याच तिच्याकडे लक्ष होत ती मनापासून भाषण ऐकतं होती.

"हो. वेगळ होत. म्हणजे यात प्रेझेंटेशन ही होतं. प्रत्येक जिल्हा त्यातले प्रॉब्लेम त्यावर उपाय छान सांगितला. आणि आधीच काम सुरू करणार हे ही सांगितलं. ते आवडलं."

"ही आयडिया छान आहे तस हे माझ्या मनात हो होतं. पण तू सांगितल्या वर ते मी अजून नीट केल. अजून काही सांगू शकशील का? "

"बेरोजगारीची समस्या खूप भयानक आहे. त्यावर काही केलं तर यंग लोक हाताशी येतील."

"हो ना विचार सुरू आहे."

"कॉलेज फी थोडी कमी केली तर बर होईल. गरजू विद्यार्थ्यांना सवलत हवी." तिने बरेच पॉईंट्स सांगितले. त्याने पॉईंट्स लिहून घेतले.

तो आत जावून फ्रेश होऊन आला.

"भूक लागली का? मी बघते स्वयंपाक झाला का." ती आत जात होती.

"बस होईल. मी ठीक आहे. इथे किती छान वाटत ना. "तो इकडे तिकडे बघत होता.

" हो. खूप शांतता आहे. "

तो विचार करत होता बोलू का हिच्याशी. घरी जमणार नाही. हिला राग आला तर इथे मनवता येईल.

" मनाली मला थोड बोलायचं होतं. आय एम सॉरी."

"का? काय झालं? " ती त्याच्याकडे बघत होती.

"ते त्या दिवशी मी जरा विचित्र वागलो. माझ्या मनात काही नव्हतं. पण मला समजल नाही. नवीन लग्न झालं होतं. मी वेगळ्या विचारात होतो. " तो बोलतांना ही अडखळला.

तिला समजल तो मनापासून बोलतो आहे. "काही हरकत नाही. "

"तुला राग नाही आला का?"

"आला होता. वाटत होत हे सगळं सोडून घरी निघून जावं. पण आई बाबांनी समजावलं. तो एक क्षण होता. तो आला आणि गेला. आता त्या बद्दल का विचार करायचा." ती म्हणाली.

"तू खूप चांगली आहेस. मला तुला एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे मी काय म्हणतो ते ऐकुन घे. मग निर्णय घे. अर्धवट ऐकून काही मत बनवू नकोस. " तो म्हणाला.

तिला माहिती होत हा त्याच्या भूतकाळा बद्दल सांगणार आहे. प्रियांका बद्दल.

"मी इंजिनिअरिंग साठी बाहेरगावी कॉलेज मधे होतो. तिसर्‍या वर्षाला होतो तेव्हा कॉलेज मध्ये एक मुलगी आणि माझं कोणत्या तरी गोष्टी वरून खूप भांडण झालं. आम्ही दोघांनी एकमेकांची कंप्लेंट केली. प्रिन्सिपल सर खूप ओरडले. आम्हाला सोबत शिक्षा झाली. त्यानंतर आम्ही बोलायला लागलो. प्रेमात पडलो. आम्ही कॉलेज मधे खुप फेमस होतो. सगळ्यांना माहिती होत आम्ही लग्न करणार आहोत. " तो तिच्याकडे बघत होता. ती ऐकत होती.

" बोलू ना?" त्याने विचारलं

"सांगा, इट्स ओके. मला काही वाटत नाही. मी बर्‍याच प्रेम कहाणी ऐकल्या आहेत. " ती म्हणाली.

"पण ही कहाणी तुझ्या नवर्‍याची आहे. "

"असू द्या तो ही एक माणूस आहे. "

"तुझ मन मोठ आहे. "

"अस काही नाही जे नशिबात असत ते होत."

"बरोबर हे नशिबाचे खेळ आहेत. तेव्हा वाटायच मी हिच्या शिवाय जगू शकत नाही. आता जगतो आहे ना. आणि मला आता तिच्या बद्दल काही वाटत नाही. खरच. " तो मनाली कडे बघत होता. पण तिच्या चेहर्‍यावर काहीच भाव नव्हते.

"काय झालं होतं? "तिने विचारलं.

"आमच प्रेम प्रकरण घरी समजलं. त्यांना ते मान्य नव्हतं. "

" मग? म्हणून तुम्ही लग्न केल नाही का? "

"त्याच्या चेहर्‍यावर दुःख होत. कोणाला वाटणार नाही आपल प्रेम पूर्ण होवू नये. ती दुसर्‍या जातीची होती." तो हळूच म्हणाला.

"तुम्ही इतकी जात पात पाळतात का? "

"नाही पण आबांनी हे केलं. म्हणजे पार्टी साठी त्यांनी हे लग्न होवू दिल नाही. तेव्हा ते सत्तेवर होते. त्यांना मीच मदत करेल हे माहिती होत. आम्ही दोघ घरातून निघून गेलो होतो."

" मग तुम्ही लग्न केलं? "

"नाही त्यांनी आम्हाला सहा तासात पकडल. तिच्यासाठी नवरदेव ही तयार होता. आबा मला घरी घेवून आले त्याच त्याच दिवशी तीच लग्न झाल. मला धक्का बसला. मी अ‍ॅडमिट होतो. डिप्रेशन मधे ही गेलो होतो. "

ती त्याच्या जवळ सरकली. तिने त्याचा हात हातात घेतला.
"किती वर्ष झाले या गोष्टीला? "

"तीन वर्ष झाले. तिला एक मुलगा आहे."

"तुम्ही दोघ अजून बोलतात का?

"नाही, तिच्या लग्नानंतर एकदाही नाही. मी अस करु शकत नाही. ती तिच्या घरी सुखी आहे. पण इतके दिवस माझ्या मनात तिचे विचार होते. मी कधीच लग्न करणार नव्हतो. ठरवल होतं. त्यातं तुमच्या घरून विचारल. मी नाही म्हणतं होतो. आबांनी ऐकलं नाही. त्यांनीच हो सांगितलं. म्हणजे सॉरी यात तुझी परवड झाली. "

"इट्स ओके. "

"माझ लग्नात मन नव्हतं. मी तुझ्या सोबत रहायचं नाही अस ठरवलं. तुला काही माहिती नव्हतं. तू या नात्यासाठी प्रयत्न करत होती ते स्पष्ट दिसतं होत. तुझ्यावर सगळा राग निघाला. तू मला माफ करू शकते का मनाली? तू हे सगळं विसरून माझ्या सोबत राहशील का?" त्याने तिचा हात घट्ट धरला. ही काय म्हणते? ती चिडली तर? ती जे बोलेल ते मी ऐकुन घेईन. तो खाली बघत होता.

"मला तुमचा राग आला होता पण माहिती होत या मागे काहीतरी मोठ कारण असेल. मला तुमच्या सोबत रहायला काही हरकत नाही. पण तुमच्या मनात मला जागा आहे का?" तिने विचारलं.

"हो, तुला खर सांगतो आता माझ्या मनात फक्त तू आहेस."

"इतक्यात हा बदल कसा झाला?" तिने विचारलं.

"मी एकटा होतो. तिचा विचार करत होतो. आता समजल जे गेल ते माझ नव्हतं. तो भूतकाळ होता. तू माझ सर्वकाही आहेस. "

"आता जर एक चान्स दिला ती किंवा मी तर ?"

"तूच फक्त. "

"माझ्या सोबत रहायचा असेल तर यापुढे मी सोडून कोणाचा विचार करता येणार नाही." ती म्हणाली.

"चालेल या पुढे तू म्हणशील ते होईल. तुला विचारल्या शिवाय मी घराबाहेर ही जाणार नाही. तुझ्या मनात काही नाही ना?" तो विचारत होता.

"एक विचारायच होतं. माझा काही भूतकाळ असता तर? तुम्ही मला स्विकारल असत का?" ती त्याच्याकडे बघत होती.

"मी आधी बघितलं असत तो मुलगा अजूनही तुझा स्विकार करायला तयार असता तर तुला जावू दिल असतं. पण तो जर त्याच्या संसारात बिझी असता तर मग तुला माझ्या सोबत रहाव लागलं असतं. मी तुला स्विकारल असतं. कारण प्रेम करण म्हणजे काही गुन्हा नाही. मुळात प्रेम करता येत नाही ते आपोआप होतं. माझ्या दृष्टीने प्रेमाला खूप महत्त्व आहे. "

तिला त्याच उत्तर आवडलं. " तुम्ही दुसर्‍याचा खूप विचार करता ना. आपण इतके दिवस सोबत आहोत त्यावरून अंदाज काढला. "

"हो माझ्यासाठी माझी माणसं खूप महत्वाची आहेत. तू अजून उत्तर दिलं नाही. माझ्या सोबत रहाशील का? "

ते बोलत होते. आरतीचा फोन आला. एक मिनिट. ती बाजूला जावून बोलत होती." बोल ताई? "

"कुठे आहेस?"

"आम्ही इकडे प्रचार दौर्‍यावर आलो आहोत."

"अरे वाह सम्राट राव ठीक आहेत ना?"

" हो ताई."

"जेवण झाल का?"

"नाही आता बसू."

"ठीक आहे मग नंतर बोलू. "

ती परत आली. झाडांना पाणी दिलं होतं. तिचा पाय सरकला. ती पडणार तेवढ्यात सम्राटने तिला पकडलं. उचलून खुर्चीवर बसवलं. दोघ एकमेकांकडे बघत होते. तिच्या साधा, सुंदर चेहर्‍याकडे त्याच लक्ष होतं. तो पुढे झाला. त्याने तिच्या चेहर्‍यावर आलेली केसांची बट मागे केली. तिच्या जवळ येणार तो मंद सुगंध. आजुबाजूच धुंद करणार वातावरण खूप छान होतं. तो जवळ येत होता. तिने नजर खाली घेतली. तिला खूप धडधड होतं होती. त्याचा श्वास गालावर लागत होता. ती शहारली. काय होईल. ती विचार करत होती. तिने डोळे मिटले. तो भानावर आला. तिने अजून होकार दिला नाही. तो बाजूला झाला.

"बघून चालत जा. कुठे लागल का?" त्याने विचारलं.

"मी ठीक आहे ." ती हळूच म्हणाली. ती साडी नीट करत होती.

जेवण तयार आहे. आतून सांगितलं. मनाली पटकन आत गेली. तिने रूम मधे येवून दार लावून घेतलं. ती दाराला टेकून उभी होती. तिची धडधड वाढली होती. सम्राट तिच्यात इंट्रेस्ट घेत होता. तिला ही हे नात हव होतं. तिला खूप बर वाटलं.

तिने ताट वाढले. तो जेवायला आला. समोर बसुन तो तिच्याकडे बघत होता.
"तुझ कधी कोणावर प्रेम नव्हतं का? कींवा कोणी तुला विचारलं नाही? तू तर खूप सुंदर आहेस?"

त्याचा प्रश्न बरोबर होता. ती थोडी हसली.

"आमच्याही कॉलेज मधे होते की हँडसम मुल. काही काही तर खूप भारी होते. पण आमच्या ग्रुप पासून सगळे दूर असत. बहुतेक बाबांमुळे, शिवाय आशिष दादा ही लक्ष देवून होता. मला स्वतःला अस कधी वाटल नाही. पण मला मुव्ही स्टार आवडतात."

"कोण?"

ती सांगत होती. दोघ हसत होते.

"तू मैत्रीण म्हणून खूपच चांगली आणि मोकळी बोलणारी आहेस."

तिला बर वाटलं. चला हे माझ्या सोबत थोडे तरी कंफर्टेबल आहेत. जेवण झालं. ती रूम मधे बसली होती. तो बाहेर कोणाशी तरी बोलत होता.

काय असेल मनालीचा निर्णय? बघू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all