गठबंधन भाग 4

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 4

©️®️शिल्पा सुतार

सम्राट मनालीच लग्न जोरात झालं.
आता पुढे.

सगळीकडे सम्राट दादा, सम्राट दादा ऐकू येत होतं. तो किती पॉप्युलर आहे तिला आता समजलं. बरेच मुलं येऊन पाया पडत होते. वहिनी, वहिनी करत होते. तिला काय करावं समजत नव्हतं.

सम्राट तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. एका आजीने दोघांची नजर काढली. दोघ दरवाजात आले. वंदना वहिनीने दोघांना ओवाळून आत मध्ये घेतलं. माप ओलांडून मनाली आत मध्ये आली. घर खूप सुंदर होतं.

"सम्राट मनालीला उचलून घे." इतर तरुण मंडळी सांगत होती. त्याने ऐकलं नाही.

आबा आक्का खूप प्रेमळ दिसत होते. मोठे दादा वहिनी पण चांगले होते. अमित खूपच गोड होता. तिची सगळ्यांची ओळख होत होती. ती पाया पडत होती. सम्राट कोणातरी सोबत बोलत होता. आजी ओरडली. तो पाया पडायला वाकला. घरात आजीचा दरारा होता.

देवघरात जाऊन दोघांनी देवाच्या पाया पडल्या. आक्का सोबत होत्या. त्या सांगत होत्या कशी पूजा करायची. सम्राट आईच सगळं ऐकत होता. मनालीला त्या आवडल्या प्रेमळ होत्या.

पुढचे खेळ खेळायचे होते. पण बरेच लोक भेटायला आले. मनाली थकली होती. कोणी बोलावलं की बाहेर जायचं खांद्यावरूनं पदर घ्यायचा. सांगितलं त्यांचा नमस्कार करायचा. हसायचं असं सुरू होतं.

"मावशी मी थकली. पाठ दुखते आहे." ती बाजूला येवून बसली.

"एवढ्यात थकलीस? अजून तर तुला किती काम आहे."

चहा पाणी झालं. थोड्यावेळाने पुढचे खेळ सुरू झाले. वंदना ऐकत नव्हती. ती सम्राटला घेऊन आली. सम्राट, अजूनही मनालीशी एक शब्दही बोलला नव्हता. घरचे बाकीचे मनमिळावू आहेत. मग हेच का असे शांत, तिला अजून समजत नव्हतं.

मोठ्या घंगाळात पाणी होतं. त्यात गुलाबाच्या पाकळ्या दुध होतं. अंगठी शोधण्याचा कार्यक्रम होता. दोघ समोरासमोर बसले होते. खूप गम्मत सुरू होती. सम्राट प्रत्येकाला बरोबर उत्तर देत होता. ती मान खाली घालून बसली होती.

तुझी बायको खूप शांत छान आहे. एक काकू म्हणाल्या. त्यावर सम्राट गप्प होता काही म्हणाला नाही.

वंदना वहिनीने अंगठी घंगाळात टाकली. दोन वेळा तिने अंगठी शोधली. तिसऱ्यांदा तिने प्रयत्न केला नाही म्हणून त्याने अंगठी शोधली. तिचा हात त्याचा हाताला लागला. त्याने पटकन हात बाजूला घेतला. ती बघत होती. तिला परत टेंशन आलं. दोन तीन गेम झाले. तो अलिप्त होता ते दिसत होतं.

आजी खुश होती. तिने दोघांवरून पैसे ओवाळून टाकले.

हळद उतरायचा कार्यक्रम झाला. सगळ्यांसमोर तिला खूप कसंतरी वाटत होतं. खांद्यावरून पदर घेऊन ती निमुटपणे उभी होती. चिंब भिजलेली ती. तो मागे उभा होता. त्याला समजत होतं.

"आई झाल का?" त्याने विचारल.

आजूबाजूच्या बायका काहीही बोलत होत्या. बाकीचे खेळ करायला सम्राट नाही म्हणाला. त्यामुळे पुढचा प्रसंग टळला. नाहीतर खोबरे तोडणे, विडा खाणे असे बरेच प्रकार आजूबाजूच्या बायका सुचवत होत्या.

कोण कधी कुठली गोष्ट रेकॉर्ड करेल त्यामुळे सम्राटचा या गोष्टीला विरोध होता.

"वहिनी टॉवेल." त्याने आवाज दिला.

वंदनाने टॉवेल दिला. त्याने तो तिच्या अंगावर टाकला. ती पटकन आत मध्ये आली. कपडे बदलून बसली. रात्रीचे जेवण झालं. ती मावशी सोबत झोपली होती. तिला रडू येत होतं.

"मावशी मला इथे करमत नाही."

"आत्ता दोन तास तर झाले तुला सासरी येवून. होईल सवय." मावशी म्हणाली.

"मला आपल्या घरी जायचं आहे."

"अस वागता का बेटा? असच होत. नवीन घर आहे. अस वाटत माझ इथे कोणी नाही. पण इथे तुझा हक्काचा नवरा आहे ना. तो सोबत असेल ना काही वाटणार नाही."

तोच तर प्रॉब्लेम आहे ना. एकंदरीत परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. पण कोणाला सांगणार. त्यांना वाटत मी तेच तेच बोलते. हे गरज असते तेव्हा मदत करतात. इतर वेळी माझ्याकडे बघत ही नाहीत. मला त्यांचा आधार वाटत नाही. उलट बाकीचे माझ्याशी नीट बोलतात ते अलिप्त रहातात. नक्की काय आहे? हे अस का करतात? कोणाला विचारणार? तिला खूप काळजी वाटत होती. तिला तीच भविष्य समजल होतं.

दुसऱ्या दिवशी पूजा होती. ती आवरून रूम मध्ये बसलेली होती. गुरुजींनी बोलावल्यावर बाहेर गेली. खूप पाहुणे होते. सगळे तिच्याकडे बघत होते. किती सुंदर आहे नवरी बायका कुजबुज करत होत्या. ती वंदना वहिनी जवळ उभी होती. अमित तिच्या बांगड्या सोबत खेळत होता.

"काकू तू किती छान आहेस. तू माझी आहेस." तो म्हणाला.

वंदना, मनाली हसत होते. "आता बोलला काका समोर बोलू नकोस. तो चिडेल. ती काकू काकाची आहे."

सम्राट खाली येऊन कोणाशी तरी बोलत होता. गुरुजी बोलवत होते. त्याने इकडे तिकडे बघितल. मनाली आजही छान दिसते आहे त्याच्या मनाने मान्य केल. ती त्याच्या बाजूला उभी राहिली. दोघ पूजेला बसले. तिला त्याच्या हाताला हात लावायला लांब पडत होत.

" तुम्ही अजून यांच्या जवळ सरकून बसा." गुरुजी म्हणाले.

ती थोडी सरकली. पूजा झाली. त्यांनी मोठ्यांचा आशीर्वाद घेतला.

"आता कुठे जाऊ नको सम्राट लगेच देवाला जायचं आहे. त्यानंतर मनाली आणि तिची मावशी माहेरी जाणार आहे." आक्का म्हणाल्या.

दुपारी जेवण झाल्यानंतर मावशी, वंदना वहिनी, सम्राट, मनाली सगळे देवाला गेले. अमित कार मधे मनाली जवळ होता. ते पोहोचले.

"सम्राट भाऊजी पायर्‍यांवर मनालीला उचलून घ्या." वंदना वहिनी म्हणाली.

"नाही वहिनी."

"अस चालणार नाही. पटकन आटपा छान नाजूक बारीक आहे तुमची बायको."

त्याने तिच्याकडे बघितलं. त्याने एका दमात तिला उचलल. तिने पटकन पदर नीट केला. तिला ही कसतरी वाटत होत तो अगदी जवळ होता. त्याचा परफ्युमचा वास छान होता. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता. तो भराभर पायर्‍या चढत होता. मागून खूपच हसी मजाक सुरू होते. शेवटच्या पायरीवर त्याने तिला खाली उतरवलं. त्याचे केस तिच्या गालाला लागले. ती शहारली. पटकन बाजूला उभी राहिली.

"भाऊजी मला वाटल पहिल्या अकरा पायर्‍या तुम्ही हिला उचलाल. तुम्ही तर तिला सोडायला तयार नाही." वंदना हसत म्हणाली.

"मला काय माहिती वहिनी तस सांगायच ना." सम्राट म्हणाला.

तिकडे मोठी पूजा झाली. सगळे परत आले. कार मधे ही ती त्याच्या जवळ बसली होती.

मनालीला घ्यायला तिचा भाऊ, वहिनी आलेले होते. आशिष सम्राट खूप बोलत होते. चला घरचे सगळे खुश आहेत. मला तक्रार करायला जागा नाही. ती कार मधे बसली. निधी वहिनी खूप चिडवत होती. ती लगेच माहेरी आली. माहेरी सगळे विचारत होते तिकडे कस आहे?

मावशी खूप सांगत होती. "मनालीच्या सासरी कसलीच कमी नाही. जाऊबाई चांगली आहे. सांभाळून घेते. घरात कामाला खूप लोक आहेत. सासू, सासरे चांगले. दागिने तर किती आले. आमची ठेप ठेवली."

मनाली तिच्याच विचारात होती. सगळ्यांशी इतकं बोलणारा माणूस माझ्याशी का बोलत नाही? अगदी एक शब्दही नाही. कोणी काही सांगितल की तात्पुरत माझ्याकडे बघतात. मला असं वाटतं त्यांना हे लग्न पसंत नाही. जाऊदे आता कुणाला काही सांगायचं नाही जे होईल ते बघू.

आरती तिच्या सोबत होती. "मनु आता यावेळी रोजचे कपडे साड्या घेवून जा." तिने तिची बॅग भरून दिली. लगेच दुसर्‍या दिवशी सुदर्शन दादा, वंदना वहिनी घ्यायला आले.

तिला वाटलं होतं तो येईल ती काही म्हणाली नाही. तयारी केली. निघताना तिचं मन भरून आलं होतं.

"मनाली मी आता घरी जाते आहे." आरती ताई म्हणाली.

"हो ताई फोन करत रहा."

ते घरी आले. सम्राट घरी नव्हता. वंदना वहिनीने तिला रूम दाखवली. वहिनीने तिला सामानासकट त्यांच्या रूम मध्ये सोडलं. रूम सजवलेली होती. सगळीकडे फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या. छान मोठी रूम होती. एका बाजूला पुस्तकाच कपाट होतं. त्यावरून सम्राटला वाचनाची आवड आहे तिला समजलं. एका बाजूला कपाट होते. त्या साईडला मोठा बाथरूम होता. छान बाल्कनी होती. घराला सगळ्या बाजूने खूप सिक्युरिटी होती.

संध्याकाळी झाली तिने आक्कांसोबत पूजा केली. वहिनी सोबत ती किचनमध्ये होती. तसं विशेष काही करायचं नव्हतं. सगळे कौतुकाने बघत होते एवढ्या मोठ्या घरची मुलगी तरी मदत करायला पुढे असते. सगळे जेवायला हजर होते. आबासाहेब आणि सम्राट नव्हते. ते कधी येणार हे तिला विचारायचं होतं पण ती काही म्हणाली नाही. ती जेवायला बसत नव्हती.

"बेटा सम्राट साठी थांबू नको. त्याचं काही खरं नसतं. आज मोठी मीटिंग आहे दोघ तिकडेच गेले आहेत." आक्का म्हणाल्या.

तिनेही जेवून घेतलं. थोडा वेळ इकडे तिकडे केल. ती रूम मधे आली. एक पुस्तक घेतलं वाचत बसली. खूप वेळ झाला तरी सम्राट आला नव्हता. साडी बदलू का? तिला समजत नव्हत. वाचता वाचता तिला झोप लागली.

सम्राट आणि आबासाहेब उशिरा घरी आले त्यांनी त्यांचं जेवण झालेलं होतं. तो रूम मध्ये आला. ती कॉटवर झोपलेली होती. पुस्तक बाजूला पडलेलं होतं. ती अतिशय सुंदर दिसत होती. निरागस चेहरा त्यावर केस आलेले होते. त्याने तिला नीट ब्लाॅकेट दिलं. तो बराच वेळ लॅपटॉपवर काम करत होता.

सकाळी ती उठली सम्राट समोर सोफ्यावर झोपलेला होता. उंची जास्त होती म्हणून त्याने पाय दुमडले होते. ती उठली त्याला हात लावला तो दचकला. "तुम्ही कॉटवर झोपा. " तो कॉटवर जाऊन झोपला.

सकाळी तो उशिरा उठला. ती खाली होती. वंदना वहिनी तिच्याकडे बघत होती. तिला चिडवत होती. "तू इतक्या लवकर उठली."

"ताई प्लीज."

आक्का आल्या. "मनाली आज तू शिरा कर. येतो ना?"

"हो आक्का." तिने शिरा केला.

काय होईल पुढे? मनाली सम्राटच्या संसाराला सुरुवात होईल का?

🎭 Series Post

View all