गठबंधन भाग 5

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 5

©️®️शिल्पा सुतार

मनाली सासरी रूळायचा प्रयत्न करत होती. तिला सम्राटची साथ मिळत नव्हती. आता पुढे.

जरा वेळाने सम्राट उठला. त्याने इकडे तिकडे बघितल. मनाली रूम मधे नव्हती. रूम मधे सगळीकडे तिच्या वस्तू होत्या. त्याने आवरल. तो खाली आला.

वंदना, मनाली कडे बघत होती. "भाऊजी आले."

तो तयार होता. हातात कारच्या चाव्या होत्या. " आई मी निघतो." त्याने आवाज दिला.

"सम्राट नाश्त्याला ये." आजीने आवाज दिला.

सगळे नाश्त्याला बसले. मनाली शिरा वाढत होती.

"वाह तुझ्या हाताला खूप चव आहे." आबासाहेबांनी तिला नेकलेस सेट दिला.

आजीने पेपर दिले. "बेटा या घरच्या प्रॉपर्टी मधे तुझा वाटा आहे."

तिने त्यांच्या पाया पडल्या. " सुखी रहा."

"भाऊजी शिरा कसा झाला सांगा तरी ." वंदना म्हणाली.

"छान झाला आहे."

"फक्त छान आणि मला काय सांगताय. मनालीला सांगा. तुम्हाला काय आता तिने पाणी दिल तरी गोड लागेल." वंदना हसत होती.

"सम्राट मनालीला गिफ्ट दे." आक्का म्हणाल्या.

तो आक्कांकडे बघत होता. त्यांनी कपाटातून एक डबी काढून त्याच्याकडे दिली. त्याने ती तिला दिली. आत छान बांगड्या होत्या.

"घालून दे. " आजी म्हणाली.

"नाही मला उशीर होतो आहे. "

आजीने आवाज दिला. "नीट दे त्या बांगड्या."

त्याने तिच्या हातात बांगड्या घालून दिल्या. सगळे खुश होते. तिने त्याच्या पाया पडल्या. तो पटकन मागे झाला.

"मनाली बेटा तयार हो. एका ठिकाणी जायच आहे. सभा आहे. यांच नवीन लग्न झाल आहे. लोकांना कौतुक आहे. नंतर वाटल तर आपण घरी येवु. " आक्का म्हणाल्या.

आबा आक्का सोबत होते. सभेत मनालीच खूप कौतुक झालं. नवीन सून सगळ्यांना खूप आवडली. जोडी शोभत होती. बर्‍याच ठिकाणी दोघांना ओवाळल. नजर काढली. ओटी भरली. ते सभेच्या ठिकाणी आले. सम्राटच भाषण झालं. ती नीट ऐकत होती यांचा खूप अभ्यास आहे. हे हुशार आहेत. तिला छान वाटलं.

ते ऑफिस मधे आले आक्कां सोबत तिने फिरून कंपनी बघितली. थोड्या वेळाने त्या दोघी घरी निघाल्या. मधे ओळखीच्यांकडे चहासाठी थांबल्या होत्या.

"ही मुलगी कोण आहे लाल साडीतली?" नितीन त्याच्या कार्यकर्त्यांना विचारत होता.

"सम्राटची बायको आहे."

"ही आहे का ती?"

"तुला माहिती नाही का? पूर्ण राज्याला माहिती आहे. आत्ताच लग्न झालं."

"मुलगी चांगली आहे पण बिचारी फसली." नितीन म्हणाला.

"हो ना सम्राट तिच्या बरोबर राहणार नाही. पूर्वी काय झालं होत माहिती ना?" ते मित्र बोलत होते.

"असू दे ना ती जुनी गोष्ट झाली." एक म्हणाला.

"जुनी कसली दोन वर्ष झाले." नितीन सांगत होता.

"ही पूर्व मुख्यमंत्रीची पोरगी आहे. सुंदर आहे, मालदार आहे. परत ती पार्टी याला सपोर्ट करते. अजून काय हवं. "

"म्हणून हा एवढा भास मारतो." नितीन चिडला होता.

नितीन, सम्राटचा प्रतिस्पर्धी होता. कॉलेज पासून त्यांच पटत नव्हतं. आधी कॉलेजच इलेक्शन. मग ग्रामपंचायत घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे सम्राट वरती निघून गेला. मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता. नितीन त्यामुळे त्याच्यावर चिडुन होता.

नितीन विचार करत होता कोणीतरी या मुलीला सम्राट बद्दल सांगायला हव. म्हणजे ती याला सोडून जाईल. लग्न करतो का? ते ही एवढ्या सुंदर मुलीशी. कोण बोलेल पण. तिच्या आजुबाजूला सिक्युरिटी असते.

******

संध्याकाळी मनाली, आक्कां घरी आल्या. स्वयंपाक झाला होता. अमित अभ्यास करत होता. मनाली वंदना सोबत होती. सुदर्शन भाऊजी आल्यावर ती तिच्या रूम मधे आली. रात्र झाली. आज सम्राट लवकर आला. तो फ्रेश व्हायला गेला. मनाली खुश होती. ती डायनिंग टेबल वर मदत करत होती. आक्का सांगतील तसे ताट करत होती. सम्राट जेवायला आला, तो आणि सुदर्शन बोलत होते. त्यांचा बिझनेस जोरात सुरू होता.

"मनाली सम्राट जवळ बस." आक्का म्हणाल्या.

"आई ते बोलता आहेत. मी तुमच्या जवळ बसते." मनालीला आक्कांसोबत आवडत होतं.

"नवर्‍याला कोण वाढेल? त्याच्याकडे कोणी बघायच?" आजी ओरडल्या. मनाली घाबरली. सम्राट जवळ बसली.

"आजी हळू, मी घेईल मला हव ते. " सम्राट म्हणाला.

जेवण झालं. ती वंदनाला मदत करत होती.

सम्राट आबासाहेब सुदर्शन सोबत खालीच बोलत होता. ती कंटाळली. रूम मधे आली. ती पुस्तक वाचत होता. तो आला. बाथरूम मधे गेला. तिने उठून टॉवेल दिला. ती तिचे कर्तव्य बरोबर करत होती. तो गप्प होता. तो बाल्कनीत बसला. थोड्या वेळाने फोनवर बोलत असल्याच्या आवाज येत होता. तो आत आला सोफ्यावर झोपला.

ती उठून आली. "तुम्ही कॉट वर झोपा."

तो काही म्हणाला नाही. सोफ्यावरच झोपला.

"आहो तिकडे झोपा तुमचे पाय पुरत नाहीत. दिवसभर काम असत थकता." ती प्रेमाने म्हणाली.

तो कॉटवर येऊन झोपला. ती पण त्याच्या बाजूला झोपली. पाच मिनिटातच तो झोपला.

चला आज एवढी तर प्रगती तर झाली. सोफ्यापासून कॉटपर्यंत. मला या नात्यासाठी प्रयत्न करावा लागेल अस दिसतं आहे.

आठ दहा दिवस असेच गेले. ती त्याच सगळं करत होती. तो अलिप्त होता. कधी लवकर घरी यायचा तर कधी उशिरा. तिने धीर धरला होता. तिने बहिणीला फोन केला.

"हॅलो आरती ताई."

"काय म्हणते मनु?"

"ठीक आहे. ताई इकडे करमत नाही. घरच्यांची आठवण येते."

"सुरुवातीला असच होत मनु. तू स्वतः ला सांभाळ. सम्राट बिझी आहेत का? थोडे दिवस, एकदा इलेक्शन झाल की बर वाटेल."

"ते अजून घरी आले नाहीत. रोज उशीर होतो." मनालीने सांगितल.

"फोन करून बघ."

"नको. "

"का नको. अस काय मनु? तू त्यांच्याशी मोकळ बोलत जा. विचार कुठे आहेत? तुझा हक्क आहे. काय ग तुम्ही दोघ. उगीच लांब लांब रहातात. "

सम्राट आला.

"ताई हे आले. मी नंतर बोलते. " तिने फोन ठेवला. तिने उठून टॉवेल दिला. पाणी दिल. "जेवण झाल का?"

तो हो म्हणाला. तो काहीतरी फाईल शोधत होता. त्याने फोन केला. घरी नाहिये. ठीक आहे उद्या बघू.

ती बाजूला येवून उभी होती. तो सोफ्यावर बसला. ती त्याच्या बाजूला बसली. त्याने थोड तिच्याकडे बघितल. ती हसली.

तो उठला कॉटवर झोपला. काही खर नाही आता हे कस घरच्यांना सांगणार. मी किती पुढे पुढे करणार. यांना इंट्रेस्ट नाही. ती थोड्या वेळ बाल्कनीत उभी होती.

रात्री बाराला घरून व्हिडिओ कॉल आला. सुरेश रावांचा वाढदिवस होता. आरती, आशिष, आई मनालीशी बोलत होते. घरच्यांना बघून तीच मन भरून आलं. घरी मोठा कार्यक्रम होता. "तू येशील का मनू?"

"माहिती नाही मला घरी विचारावं लागेल. घरचे पाठवतील तर येईल."

"सम्राट कुठे आहेत?" तिने आत बघितल. तो फोन मधे बघत होता. "अहो फोन."

त्याने फोन मागितला. तो उठून बसला. "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा."

"धन्यवाद. उद्या इकडे कार्यक्रम आहे सगळ्यांनी यायच. तस आबासाहेबांशी बोललो आहे. " सुरेश राव म्हणाले.

"हो आम्ही नक्की येवू. "

ती फोनवर बोलत होती. थोड्या वेळाने आत आली. तो झोपलेला होता.

सकाळी तिने अक्कांना विचारलं.

"हो जाऊन या सम्राटही येईल. "

तिकडे मोठी सभा होती. वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनही होईल.

हे लोक सगळीकडे त्यांची व्होटबँकच बघतात. ठीक आहे पण त्या निमित्ताने ते माझ्यासोबत येतील तरी. मनाली विचार करत होती.

दुपारी ती आणि सम्राट निघाले. ड्रायव्हर सोबत होता. बॉडीगार्ड होते. रात्री लगेच परत येणार होते.
ते दोघ आल्यामुळे घरचे खूप खुश होते.

सगळे जेवायला वाट बघत होते. सम्राटची ठेप ठेवली जात होती. सगळे नवीन जावयाच्या मागे पुढे होते. त्यांना काय करू काय नको अस झाल होतं. जेवण झालं. सम्राट, आशिष मीटिंग मधे होते. मनाली, आरती आत बसल्या होत्या.

"मनू तुम्ही फिरायला जाणार नाही का?" आरतीने विचारल. त्या निम्मीत्ताने तरी ते एकत्र येतील अस आरतीला वाटलं.

"नाही हे किती बिझी आहेत. इलेक्शन जवळ आहे. ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे." तिने आठ दिवस काय झालं ते सगळं सांगितलं.

"मनु तुमच नवीन लग्न झाल आहे. होत असं. काळजी करू नकोस. एक सांगू का? तू सुद्धा या नात्यासाठी प्रयत्न करायला हवा. कदाचित त्यांना ते अपेक्षित असेल. ते बोलत नाही तर तू स्वतःहून बोल. तू पुढाकार घे. बघ खूप फरक पडेल. त्यांच्या डोक्यात इलेक्शनचे विचार असतील. ते बिझी असतील." आरती म्हणाली.

"ताई पण हे कसं तरी नाही वाटणार ना? या नात्यात पुरुषच पुढाकार घेतात ना?" मनाली म्हणाली.

"तुला काय हवं आहे ते तू मिळवलं पाहिजे. अगदी जास्त नाही पण तू त्यांची काळजी करते आहेस, तुझं प्रेम आहे हे दाखवून द्यायला पाहिजे. घरचं सगळं राहू दे आधी नवऱ्याकडे बघ. "

"ठीक आहे ताई. "

संध्याकाळी छान कार्यक्रम झाला. आई बाबांना भेटून मनाली खुश होती.

ते निघाले. घरी येताना तर बोलायचा चान्स नव्हता. खूप लोक सोबत होते. ते घरी आले. मनाली, वंदनाशी बोलत होती. तिकडे काय काय झालं सांगत होती. अमित तिच्या मांडीवर बसला होता. काकू, काकू करत होता.

"जा आता मनाली भाऊजी वाट बघत असतील. " वंदना म्हणाली.

******

सम्राट या नात्याची सुरुवात करेल का? की मनाली साठी अजूनही त्याच्या भावना कोरड्या आहेत. बघू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all