गठबंधन भाग 8

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 8

©️®️शिल्पा सुतार

मनाली आईशी बोलत होती. तिला माहेरहून ही सपोर्ट नाही ते समजल. तिच्या आई बाबांनी अस का केल असेल. बघू. आता पुढे.

सुरेशराव, आबासाहेब पुढे बोलत होते. त्यांनी आवाज दिला. मनाली पुढे गेली.

"ये बेटा काय झालं? "

ती त्यांच्या जवळ रडत होती. "बाबा मला घरी यायचं आहे."

"काही हरकत नाही. तुझंच घर आहे. पण सासरच्या लोकांशी भांडून यायचं नाही. ते जेव्हा सांगतील, परवानगी देतील, घेऊन येतील तेव्हाच यायचं. काय प्रॉब्लेम आहे?" त्यांनी तिला जवळ घेतलं.

ती काही म्हणाली नाही. वडिलांना कस आणि काय सांगणार?

"बेटा सगळ्यांसमोर बोलतांना आधी थोडा विचार करायचा. चीडायचं नाही. तुझ्या नवर्‍याचा मान तुझ्या हातात आहे." सुरेशराव म्हणाले.

"सांगा तुमच्या मुलीला काही समजावून." आजी मध्येच म्हणाली.

"आई अस बोलू नकोस. माफ करा सुरेशराव ." आबासाहेब म्हणाले.

सम्राट आला, सुरेश रावांच्या पाया पडल्या.

"असू द्या सम्राट राव. "

तो सगळ्यांमध्ये बसला. तो मनाली कडे बघत होता. बहुतेक हिने वडलांना सगळं सांगितलं असेल.

"काय झालं? कस झाल? मला माहिती नाही. मनाली, सम्राट तुम्ही दोघ ही समजूतदार आहात. एकमेकांना सांभाळून घ्या. मनाली बेटा एका दिवसात नाती ठरत नसतात. थोड इथे रहा. या लोकांना वेळ दे. मग निर्णय घे. सम्राट राव तुम्ही ही जरा हिला सांभाळून घ्या. राग राग करून काय होणार आहे. आमची मनाली जरा अल्लड आहे. तिच्याकडून चुकी झाली. जरा समजून घ्या. नवीन लोक जरा गडबडली. माफ करा." सुरेशराव म्हणाले.

"मामासाहेब माझ चुकलं. तुम्ही माफी नका मागु. " सम्राट त्यांना म्हणाला.

मनाली आत गेली. सम्राट बाबांशी चांगल वागला. तिला बर वाटलं. तरी माहेरी जायला मिळत नाही म्हणून ती नाराज होती.

मनाली आता आक्कांच्या रूम मध्ये बसली होती. आक्का, आशाताई बोलत होत्या. मनाली बाजूला बसुन सगळं ऐकत होती. आई आणि सासुबाई किती भोळ्या आहेत. त्यांनी किती सहन केल असेल त्यांनाच माहिती. माझ ही असच होईल का?
आई, बाबा ही माझ्या सासरच्या लोकांच्या बाजूने आहेत. मला कोणाचा सपोर्ट नाही.
पण मला बाबांच बरोबर वाटत आहे. थोडे दिवस बघायला हव हे काय करतात. नसेल बोलायच तर नका बोलू. जावू दे. त्यांच गठबंधन साठी सुरू असेल. करा काय करायच ते. सम्राट माझ्याशी कसे वागले तरी ते ताठ मानेने फिरता आहेत. मला सगळे बोलता आहेत. आजी ही किती रागवल्या.

वंदना चहा करत होती. ती किचन मधे गेली. "मी करते."

"असू दे मनाली."

"ताई मला वाटल नव्हत माझ्या बाबतीत अस होईल. आम्ही मुली कॉलेज मधे अन्यायच्या विरुद्ध किती लढायचो. माझे विचार किती बोल्ड होते. आज मी वेगळ्या परिस्थितीत आहे. अस का झालं? इथे सगळे सम्राटची बाजू घेत आहेत."

"असच असत, सासर आहे हे. तू काहीही म्हणशील तर वाद वाढेल. त्यापेक्षा शांत हो मनाली." वंदना म्हणाली.

"यांना बोलून माझ चुकलं का ताई?" तिने विचारलं.

"थोडी घाई झाली. पण ठीक आहे केव्हा ना केव्हा तू विचारल असतं. तस ही इथे कोणालाच काही बोलुन उपयोग नाही. पण तुझे बाबा म्हणाले ते बरोबर आहे. सम्राट भाऊजी चिडलेले आहेत. थोडे दिवस जावु दे मग निर्णय घे. सध्या त्यांच्याशी बोलू नको. लांब रहा. काय माहिती त्यांना नंतर बोलावसं वाटेल."

"ठीक आहे ताई, तुम्हाला ही अस झाल का? "

"नाही सुदर्शन खूप चांगले आहेत. आक्का चांगल्या आहेत. आजी रागीट आहेत. "

"आई मला माहेरी येवू देत नाही. नवरा मला स्विकारत नाही. मला एकटीला रहाव लागेल बहुतेक. मी स्वतः साठी स्टँड घेवू शकत नाही. " मनाली म्हणाली.

"मला सगळ समजत आहे मनाली. काय करणार? प्रत्येकाची वेळ येते. ही परिस्थिती ही बदलेल. हे मोठे लोक आहेत . तुझ लग्न म्हणजे एक व्यवहार आहे. तुला तो व्यवहार प्रेमात बदलावा लागेल. " वंदना म्हणाली.

मनाली विचार करत होती. काय करता येईल?

"सम्राट भाऊजी चांगले आहेत. होईल ठीक."

"तीच आशा आहे. "

चहा झाला. आई बाबा निघाले. मनाली आई बाबां सोबत बाहेर आली.

"नीट राहा बेटा." आशा ताई म्हणाल्या.

"आई मी दोन दिवसासाठी येवू का? माझ्या सासरी सांग ना. मला तुझ्यासोबत रहावसं वाटत आहे." मनाली म्हणाली.

"बेटा आज शक्य नाही. तुला कोणीच इथून सोडणार नाही. हे बघ सगळ्यांना सांभाळुन घे. शांत रहा. तू खूप चांगली आहेस. मला माहिती आहे तुझ्या प्रेमळ स्वभावाने तू त्यांचे मन जिंकशील." आशा ताईंच मन भरून आलं होतं.

"आई असं का आहे? इथे मी माझ्या मनाचं काहीच करू शकत नाही का? तू ही मला येवू देत नाही. आता माझं ते घर नाही का?" मनाली ही नाराज होती.

"काहीही विचार करू नकोस बेटा. तू कधीही घरी येवू शकते. पण आजची गोष्ट वेगळी आहे. भांडण झालं की लगेच सगळं सोडून यायचं नाही. थोड्या फार फरकाने सगळ्यांच्या आयुष्यात सुरुवातीला अस होत. असा तडकाफडकी निर्णय घेवू नकोस. असं वेगळं राहणं वगैरे चालणार नाही." त्या तिला समजावत होत्या.

"बाबा तुम्ही काय म्हणाले होते अर्ध्या रात्री आवाज दे. मी आहे. आता मी सांगते आहे तर तुम्ही मला सपोर्ट करत नाही. तुम्हाला सम्राटची काळजी वाटते. माझी नाही का? माझा नवरा कितीही मोठा माणूस असेल तरी त्यांनी माझ्या सोबत एका पती प्रमाणे रहाव अस मला वाटत."

सुरेशराव तिला घेऊन पुढे गेले." मनाली बेटा नेहमी आपण म्हणू तस होत नाही. माझा ऐकणार ना. हे बघ सगळं सांभाळ. इथून निघायच्या गोष्टी करायच्या नाही. मोठ्या माणसांशी सावकाश बोलायचं. सम्राट रावांना उलट बोलायच नाही. "

"बाबा माझा प्रॉब्लेम काय आहे ते तुम्हाला माहिती नाही."

"मला सगळं माहिती आहे. पण एक सांगतो बेटा सम्राट मुलगा म्हणून खूप चांगला आहे. जरा शांत हो. आधी सांगितलं तस प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ जावू द्यावा लागतो. तू माझी लाडकी आहेस मी एका मिनिटात तुला घरी घेवून जाईल. पण नाही याने तुझ नुकसान होईल. मला जेवढे माणस समजतात त्यावरून सांगतो तुमच नात दूर पर्यंत जाईल. माझ्यावर विश्वास आहे ना? "

"हो बाबा. अस होईल ना. कारण हे माझ्याशी बोलत नाहीत." ती म्हणाली.

"हो बेटा, तुला वाटत तस होईल. किती दिवस बोलणार नाहीत तू चांगली वागत रहा. प्रामाणिक पणा चांगले लोक जिंकतात. तुला अस वाटत असेल मी स्वार्थ बघतो. पार्टी साठी तुला इथे सोडतो. अस नाहिये. हे लोक खरच चांगले आहेत. तुझ कल्याण होईल. आपल समजून रहा." सुरेश राव बरोबर बोलत होते.

" बाबा तुम्ही म्हणाले ना मी तुमच ऐकेल." मनाली शांत पणे म्हणाली.

"बेटा हे लग्नाचं बंधन म्हणजे कायमचं असतं. मला इथे रहायचं नाही सगळं सोडून जायचं असं चालत नाही. तुझा नवरा मोठा माणूस आहे. तुझ्या एका निर्णयाने त्यांच्या कितीतरी गोष्टीवर फरक पडू शकतो. त्यांना सपोर्ट कर. तुझ्या आईने बघ माझी किती साथ दिली. आमच्याही आयुष्यात असे बरेच प्रसंग आले बेटा. पण आम्ही सांभाळून घेतल."

"हो मनु जावईबापूंना सांभाळून घे. हसत खेळत राहा. बेटा त्रास करून घेऊ नको. एक दिवस तूच सांगशील ते खूप चांगले आहेत. पुढच्या आठवड्यात दादाला पाठवते घ्यायला. तेव्हा ये. " आशा ताई म्हणाल्या.

हो.

"सगळं तुझच आहे बेटा. पण असं भांडून यायचं नाही. दोघ जोडीने या. सम्राटराव म्हणतील ते कर. " सुरेशराव म्हणाले.

ते गेले. मनाली आत मध्ये आली. तिला चांगलं समजलं होतं. एकदा मुलीचं लग्न झालं की तिला कायम सासरीच राहावं लागतं. माहेर दोन दिवसाच. पूर्वी लोक असंच म्हणायचे तेव्हा तिला वाटलं होतं की या मुली का सहन करतात? सरळ फाडफाड बोलायचं. घरातून निघायच. नाहीतर अश्या नवर्‍याला पोलिसात द्यायचं.
माझे वडील एवढे पावरफुल आहेत. मला काहीच त्रास होणार नाही. पण नाही, हा नियम सगळ्यांनाच लागू होतो. गरीब, श्रीमंत काही बघत नाही. त्रास होतोच.
तिला आता समजल, वाटत तेवढ्या गोष्टी सोप्या नसतात.
आई बाबा म्हणतात तस मी घाईने निर्णय घेते आहे का? थोडा वेळ जावू देवू. यांच्याशी बोलायला नको. उगीच काय झालं? बोला बोला म्हणत बसण्यापेक्षा शांत राहू. पडेल फरक. बाबांसाठी मला हे कराव लागेल.

ती रूम मध्ये जात होती आक्कांनी आवाज दिला. "काय आक्का?"

"बेटा, तुझ्यासाठी मी आहे. अजिबात काळजी करायची नाही. काहीही वाटलं तर मला सांग. आणि सम्राट ही खूप चांगला मुलगा आहे. होईल ठीक. "

"हो आक्का."

आबासाहेब आत मध्ये आले. ती बाजूला उभी राहिली.

"मनाली बेटा डोक्यातुन सगळे विचार काढ आणि नव्याने सुरुवात कर. मोकळी रहा. जा बेटा किचनमध्ये वंदनाला मदत कर."

ती किचनमध्ये गेली.

सम्राट... आबासाहेबांनी आवाज दिला. तो आत मध्ये आला.

आक्कांनी दरवाजा लावून घेतला. "काय प्रकार आहे हा सम्राट? ती नवीन लग्न झालेली मुलगी घरात आहे. तुला नीट वागता येत नाही का? "

"आता काय करू? सभांना वगैरे जाऊ नको का? तिच्याबरोबरच फिरत राहू? " सम्राट म्हणाला.

" बघितल का कस बोलतो." आक्का आबासाहेबांकडे बघत म्हणाल्या.

"तू काम सोड अस तिचं म्हणणं नाहीच आहे. तू तिच्याशी अजिबात बोलत नाही. तिने काय समजायचं. तिच्या ही काही अपेक्षा असतिल ना. तू तिला बायको म्हणून स्विकारत नाही अशी ती म्हणते आहे. हे काय आहे? काल काही झाल का? " आबासाहेब विचारात होते.

"काही विशेष नाही आबा. आमची ओळख नाही. माझ्या डोक्यात वेगळे विचार सुरू असतात. " सम्राट म्हणाला.

"लग्न झाल ना आता संसार ही महत्वाचा आहे. जरा समजुतीने घे. ओळख हळूहळू होईल. तू सगळ्यांशी जसा वागतो तसा तिच्याशी वागत नाही. तिच्याशी सॉफ्ट आवाजात बोल. ती हळवी आहे. दोघांच्या नात्याला वेळ दे. " आक्का म्हणाल्या.

"आई प्लीज. "

"तुझी आई बरोबर सांगते आहे सम्राट. तुला का आता मी सांगू बायकोशी कसं वागतात. मनाली सुरेशराव कारखानिसांची मुलगी आहे. ते काय आहेत हे तुला माहिती आहे. नीट वाग जरा. हे नातं नुसतं तुमच्या दोघांचं नाही तर हे राजकीय गटबंधन आहे. तुला ते सांभाळायला हवं, जर ती इथून गेली तर इलेक्शन मध्ये काय होईल? त्यांना राग आला तर ते तुझ करीयर संपवतील. माहिती आहे ना. ते आपल्याकडे हळू बोलत होते. त्यांनी तुझी माफी मागितली फक्त त्यांच्या मुलीसाठी. पण किती दिवस? एकदा तर ते तुला बोलतीलच. काय करायच तू ठरव त्यांच्या नजरेत तु जावई आहे. ते जप. मानात रहा. त्यांच्या मुलीला सांभाळ." आबासाहेब त्याला समजावत होते.

"हो बरोबर आहे. ती मुलगी सगळं सोडून इथे आली. जरा माणुसकीने वाग." आक्का म्हणल्या.

सम्राट समजुतीने घेईल का? काय होईल पुढे. की तो ही या गठबंधन मधे अडकला आहे. काही मार्ग निघेल का? बघू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all