गठबंधन भाग 9

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 9

©️®️शिल्पा सुतार

घरचे सम्राटला समजावत होते. तो ऐकेल का. नक्की त्याच्या मनात काय आहे? आता पुढे.

जरा वेळाने फोन आल्यामुळे आबासाहेब बाहेर गेले.
"जुन्या गोष्टी विसर सम्राट." आक्का म्हणाल्या.

तो आकांकडे बघत होता. "मला शक्य नाही. म्हणून मी लग्नाला नाही म्हणत होतो. आबांनी बळजबरी केली."

"हो ते आहे तरी एखाद्या मुलीचा आयुष्य तू असं खराब करू शकत नाही. मनाली बघ किती चांगली आहे. नवीन सुरुवात कर." आक्का म्हणाल्या.

"मला हे जमणार नाही आई. थोडा वेळ हवा आहे."

सम्राट... सम्राट...

तो रूम मध्ये निघून गेला. किती तरी वेळ तो खुर्चीवर बसला होता. कपाट उघडून त्याने एक फाईल बाहेर काढली तो काहीतरी बघत होता. त्याच्या चेहर्‍यावर दुःख होतं. नंतर त्याने ती फाईल नीट वरती ठेवून दिली. काय कराव सुचत नव्हतं. सगळा गोंधळ झाला आहे. पार्टी ऑफिस मधून फोन येत होता.

"येतो थोड्या वेळाने. " त्याने फोन ठेवला.

मनालीची बॅग समोर दिसत होती. हिची जायची तयारी झाली होती. ती तिच्या बाजूने बरोबर होती. तिला काय माहिती माझ्या सोबत काय झालं. मी तिचा नवरा आहे तिला वाटणारच. माझा सगळा राग तिच्यावर निघाला. जावू दे आता अस करायच नाही. एवढ झाल्यावर मला नाही वाटत ती माझ्याशी बोलेल. ती खुप घाबरली होती.

थोड्यावेळाने तो जेवायला आला. जेवणाचे टेबलवर पण शांतता होती. मनाली नेहमी प्रमाणे काम करत होती. सम्राट आल्यावर ती पटकन किचन मधे गेली. तिकडे उभी राहिली. तिला खूप राग येत होता. आई बाबा केवळ तुमच्या साठी मी इथे रहाते आहे.

यांच्या पुढे पुढे करायच नाही. बाबा म्हणाले तस बघू तरी ते काय करता. कोणाबद्दल आता तिला काही वाटत नव्हतं. हे खर होत की ती पुर्ण अडकली होती. यातून तीलाच मार्ग काढायचा होता. सध्या तरी तिला काहीच सुचत नव्हतं.

आक्का किचन मधे आल्या. तिला उभ बघून काही म्हणाल्या नाही. आबासाहेब सम्राट बोलत होते. सुदर्शन आक्कांना मदत करत होता. अमित गडबड करत होता. वंदना त्याच्या मागे होती. सगळे थोडे हसले. काकू... तो मनालीला येवून चिकटला. तिला पापी दिली.

"अमित बेटा नीट जेवण कर." मनाली म्हणाली.

"तू खावू घाल काकू. मला गोष्ट सांग." ती त्याला घेवून सोफ्यावर बसली. अमित नीट बसुन खात होता. मनाली त्याला गोष्ट सांगत होती. तिचा समजूतदार पणा. चांगला स्वभाव यातून समजत होता. ही सगळ सांभाळते. चांगली आहे. आक्का बघत होत्या.

वंदना ताट वाढत होती. आजी, आबासाहेब, आक्का, सुदर्शन, सम्राट जेवायला बसले. वंदना मनाली साठी थांबली होती. नाहीतर आज ती जेवली नसती.

सम्राटच जेवण झालं. तो बाहेर गेला.

मनाली, वंदना जेवत होत्या. सुदर्शन ही त्यांच्यात बसला होता. थोड्या वेळाने तो अमितला घेवून रूम मधे गेला.

मनाली, वंदना असच इकड तिकडच बोलत होते. त्यांनी तोच विषय काढला नाही. जेवण झालं.

मनाली काहीतरी विचारात होती. असच वागणं बरोबर आहे. जितक आपण एखाद्या गोष्टी मागे जावू तितकी ती गोष्ट आपल्या पासुन दुर जाते. शांत रहाणं योग्य आहे. ती मागचं सगळं आवरत होती. मदतनीस सोबत होती.

"राहू दे मनाली तू रूम मधे जा. " वंदना म्हणाली

"नाही ताई मला कसली घाई आहे. उलट रूम मधे अजिबात करमत नाही. तुम्ही जा आराम करा. अमित आणि भावोजी वाट बघत असतिल. मी हे करते." मनाली म्हणाली. तिने जेवण फ्रीज मधे ठेवल. बाकी काम मावशी करत होत्या.

वंदनाच्या डोळ्यात पाणी होतं. मनालीने ते बघितल. "ताई मी ठीक आहे. रडून उपयोग नाही ताई. आता मी आणि माझ नशीब. मी हार मानणार नाही. पळपुटेपणा काही कामाचा नाही. एक दिवस असा येईल ना यांना माझ्या शिवाय काही सुचणार नाही."

"तुझ्या मनाप्रमाणे होईल." तिने मनालीला जवळ घेतल.

किचन आवरून झाल. सगळे आपआपल्या रूम मधे होते सम्राट घरी नव्हता. मनाली जरा वेळ बागेत बसली. छान गार वारा होता. तिला जरा बर वाटल. तिने इकडे तिकडे बघीतलं. ताईला फोन करू का? तिने आरतीला फोन केला.

"मनु अग मी तुला किती फोन केले."

"हो ताई बघितलं."

"तू ठीक आहेस का?"

"हो ताई." ती तिला सगळं सांगत होती. ती रडत होती.

"ताई इकडे सगळी गडबड आहे. ह्यांना लग्न करायचं नव्हतं. ते अलिप्त रहातात. मला तोडून बोलले. म्हणाले तुझ्यासाठी माझ्या आयुष्यात जागा नाही. असे वाक्य आपण शत्रूला ही बोलत नाही. मला यांच्या सोबत रहायची इच्छा नाही. आणि मी उगीच पुढाकार घेतला. यांनी त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ घेतला." मनाली सांगत होती.

"मनु त्यांनी तुझ्यासोबत काही बळजबरी...... "

"नाही ताई त्यांनी काही केल नाही. फक्त बोलले."

"मनाली मी काय बोलू. मला कसतरी वाटत आहे. हे काय झालं समजत नाही. पण आई बाबा बरोबर आहेत. सगळं एक दोन दिवसात होत नाही. तुला आत्ता त्यांचा राग येईल पण ते बरोबर करता आहेत. "

"मला आई बाबांचा राग नाहिये ताई."

"सम्राट कुठे आहेत. आता तू हा विषय वाढवू नकोस. समजेल त्यांना आपोआप."

"ते नेहमी प्रमाणे पार्टी ऑफिस मधे बसले असतिल. ठीक आहे ताई जावू दे कोणाला बोलू नकोस. माझी इथून सुटका नाही. आता हेच माझ घर आहे. मी बघते काय करायच ते. तू काळजी करू नकोस."

"मनु नीट रहा." तिने फोन ठेवला. बंगल्याचा मागचा गेट जवळ होता. आधी ती गेट जवळ उभी होती. फोनवर बोलत बोलत केव्हा पुढे गेली समजल ही नाही. हा मदतनीस लोकांसाठीचा गेट होता. पुढे जावून मोठा गेट होता. तिथे सिक्युरिटी होती. ती लांबून बघत होती. मी इथे कुठे आली?

दोन गाड्या आल्या. सम्राट होता. त्याचे बॉडी गार्ड ही सोबत होते. तो सगळ्यांशी छान बोलत आत आला. ते लोक हसत होते. कोणी तरी जोक केला असेल. तिला ही थोड हसू आलं.

सम्राट इतर लोकांमधे मोकळे रहातात. आज मी पहिल्यांदा त्यांना हसतांना बघते आहे. ते किती भारी दिसतात. जावू दे त्यांच सगळं चांगल वागण दुसर्‍यांसाठी आहे. माझ्या साठी काही नाही. एकट जिवन माझ. हे कधी ठीक होईल.

ती परत छोट्या गेटकडे आली. रूम मधे जावू. गेटला आतून कुलूप होत. कोणी लावल? काय करू? आत कशी जावू? पुढच्या बाजूने जायला जागा नव्हती.

ती तिथे झाडा खाली उभी राहिली. वंदना ताईंना सांगू का? त्या झोपल्या असतिल का? भाऊजीं सोबत असतिल.

******

सम्राट रूम मधे आला. मनाली नव्हती. कुठे गेली तो इकडे तिकडे बघत होता. बाथरूम मधे बघितल. बाल्कनीत बघितल तो घाबरला. ही कुठे निघून गेली की काय? तो पटकन खाली आला.

"आक्का, मनाली रूम मधे नाहिये."

"आता तर इथे होती कुठे गेली? " आक्का घाबरल्या.

सगळया घराचे लाइट लागले. सुदर्शन, वंदना ही बाहेर आले. "काय झालं?"

"मनाली घरात नाहिये."

सगळे त्याला रागवत होते. एकच शोधाशोध सुरू झाली. मनाली अजूनही बाहेर उभी होती. जावू दे इथे छान वाटत शांत अगदी. माझा वेळ आहे हा. ती मोबाईल मधे मेसेज बघत होती. तिचा फोन वाजला .वंदना ताई? तिने फोन घेतला.

"कुठे आहे मनाली?"

"किचनच्या त्या बाजूला गेट आहे ना तिथे आहे. मी माझ्या ताईशी बोलत होती. कोणीतरी लॉक केल." तिने सांगितल.

"थांब मी आलीच." आक्का वंदना त्या बाजूला गेले.

तो पर्यंत सम्राट गेट कडे गेला. तो काहीतरी बोलत होता. त्याने इकडे तिकडे बघितलं. गेट बाहेर गेली नाही म्हणजे ती आत आहे. तो त्या बाजूने आला. छोट गेट उघडल. ती झाडा खाली उभी होती. वंदना, आक्का ही सोबत होत्या. त्याने तिच्याकडे बघितल. तो आत गेला.

ती आत आली. आबा, सुदर्शन तिच्याकडे बघत होते.

"मी फोनवर बोलत तिकडे गेली तोपर्यंत कोणीतरी छोट्या गेट ला कोणीतरी कुलूप लावल." तिने सांगितल.

"ठीक आहे बेटा. काळजी करायची नाही. जा झोप." आबासाहेब म्हणाले.

आजी बाहेर आल्या. "काय झालं?"

"काही नाही."

"तुम्ही सगळे खाली काय करताय? झोपायचं नाही का? "

"असच बोलत होतो."

मनाली रूम मधे गेली.

"सम्राट उद्या लेडी बॉडीगार्ड बोलवून घे सूनबाई कडे बघायला. चोवीस तासासाठी." आबासाहेब म्हणाले.

" हो आबा."

******

सुदर्शन, वंदना आत आले. "मला मनालीसाठी वाईट वाटत आहे. किती शांत झाली. चेहरा ही उतरला."

"हो ना. किती गोड मुलगी आहे. सम्राट मूर्ख आहे." सुदर्शन म्हणाला.

"तुम्ही बोला ना त्यांच्याशी. थोड समजावून सांगा. "

" हो बघतो. "

******

मनाली रूम मधे आली. तिने साडी बदलली. पुस्तकांच्या शेल्फच्या बाजूला तिने गादी घातली. मी इथे खाली झोपत जाईल. कॉटवर नको. तिने तिची बॅग नीट ठेवली. पुस्तक घेतलं वाचत बसली. तिला माहिती होत सम्राट रूम मधे लवकर येणार नाही. तशी ती त्याची वाट बघत नव्हती.

थोड्या वेळाने ती झोपली.

मनाली रूळेल का त्या घरात? तिने जो विचार केला आहे तो योग्य आहे का? बघू त्यासाठी ती काय करते. पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all