गठबंधन भाग 10

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 10

©️®️शिल्पा सुतार

सम्राट खाली स्विमिंग पूल जवळ नुसताच बसला होता. मनाली नक्की गेट बाहेर का गेली होती? तो विचार करत होता. आता पुढे.

वंदना आली त्याच्या बाजूला बसली.

"अमित झोपला का?" त्याने विचारलं.

"हो, आता हल्ली तो खूप मस्तीखोर झाला आहे."

"जा वहिनी तुम्ही आराम करा. काळजी करू नका मी ठीक आहे." सम्राट म्हणाला.

"काय झालं भाऊजी? मनाली मुळे तुम्ही नाराज आहात ना?" तिने मुद्दाम विचारलं.

तो मानेने नाही म्हणाला.

"मग? मनालीची काळजी वाटते का? ती का गेट बाहेर गेली." वंदनाला ही काळजी वाटत होती.

"माहिती नाही. सगळा गोंधळ झाला आहे."

"बरोबर आहे, ती का राहील? इथे तीच कोण आहे? नवरा आपल मानत नाही. माहेरचे विचारत नाहीत. एका मुलीसाठी ही परिस्थिती खरच भयानक असते. तुमच गठबंधन त्यात ती भरडली गेली. पण खरचं मनाली वेडी आहे. सगळं सांभाळायला बघते. तिला आशा आहे हे ठीक होईल. अस करु नका ना भाऊजी. तिला सांभाळून घ्या."

वहिनी... त्याचा डोळ्यात पस्तावा होता.

"मला माहिती आहे एका दिवसात या गोष्टी नीट होत नाहीत. ट्राय तर करा. झालं ते गेलं. तुमच्या भांडणाचा तुम्हाला किती त्रास होतो. तर विचार करा मनालीला कस वाटत असेल. ती सगळं सोडून इथे आली. ती एकटी आहे. तिला मानसिक आधाराची गरज आहे. ती तुटून गेली आहे."

सुदर्शन त्याच्या जवळ बसला. वंदना आत गेली. तो गप्प होता.

"तुला काही सांगायच नाही का दादा? " सम्राट म्हणाला.

"काही नाही. तू हुशार आहेस मला माहिती आहे तू हे नीट करशील."

"जा मग झोप."

"तुझ्या जवळ बसू नको का? तुला सगळे समजून सांगायचा प्रयत्न करता आहेत ना? का करताय ते अस?"

"माहिती नाही, सगळे मनालीच्या बाजूने आहेत. " तो कोरडे पणाने म्हणाला.

"लग्नाच्या गाठी वरती बांधलेल्या असतात. आपल्या नशिबात जे असत ते होत. ते कोणी बदलू शकत नाही." सुदर्शन म्हणाला.

"हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती दादा."

"हो ना मग आहे ते स्विकार. पुढे जा आनंदी रहा. सम्राट प्रत्येक ठिकाणी आपले रोल वेगळे असतात ना. जस आबांशी बोलतांना वेगळं वाटत. तेच आक्का असली की आपण निर्धास्त असतो. मोकळ वागतो, बोलतो. सभेत वेगळ. मित्रांमध्ये वेगळ. तस घरी तुझा एक पती म्हणून रोल आहे. तो तू नीट केला पाहिजे."

दादा...

"तुमच गठबंधन वगैरे सगळ मला समजत आहे. ते खूप महत्वाच आहे. पण एक माणूस म्हणून एकदा मनाली कडे बघ. बायका हळव्या असतात. त्यांना नवर्‍याच अटेंशन हव असत. त्यांच काही चुकत नाही. सासरी त्या एकट्या असतात. जास्त काही नाही तर मैत्री तर कर. तिला आता सांभाळ. खुश रहा. लग्न केल ना तू नीट रहा ना. आणि तसा ही तू किती चांगला आहेस. " सुदर्शन खूपच समजूतदार होता.

" हो दादा. "

"मला माहिती आहे तुझ्या मनात आता काय सुरू आहे. किती भूतकाळाला कुरवाळत बसणार आहेस. जे तुझ्या नशिबात नव्हत ते गेलं. जी तुझ्यासाठी इथे आली आहे तिला जप. आयुष्यात पुढे जायला हव. नवीन सुरुवात कर." सुदर्शन गेला.

सम्राट उठला रूम मधे आला. मनाली एका बाजूला गादी टाकून झोपली होती. काॅट पूर्ण मोकळा होता. तो तिच्याकडे बघत होता. एकंदरीत तिचा चेहरा सुकला होता. लहान वाटते ही. साधी आहे. हे लग्न तिने अगदी सीरीयसली घेतलं आहे. मला सर्वस्व मानते. सोबत राहू म्हणते आणि घाबरते ही. मी जरा जास्त बोललो का हिला?

तो कॉटवरून तिच्याकडे बघत होता. अशी कोणती गोष्ट आहे हिच्यात जे पूर्ण घर तिच्या बाजूने आहे. सगळे मलाच बोलता आहेत. हिने एका आठवड्यात घरच्यांवर काय जादू केली.

तशी ती चांगली आहे. माझ ही किती करत होती. वस्तू जागेवर मिळत होत्या. ती छान हसुन बोलत होती. सुंदर तर ती आहेच. समाधानी आहे.

जे झाल ते चुकीच झालं. ती अचानक मिठीत आली. मला काही सुचलं नाही. पण तरी तिला शांत पणे समजवायला हवं होतं. उगीच चिडचिड केली. मी कायम मुलांच्या घोळक्यात रहातो. तिथे काहीही म्हणालो की कोणाला राग येत नाही. मनाली हळवी आहे. मला काय माहिती ही गोष्ट इतकी मोठी होईल.

आपल्याला हव तस का होत नाही? एखाद्या राजकुमारा सारखा माझा थाट आहे. तरी मनात किती दुःख आहे. माझ्या बाबतीत का अस झालं? रात्र रात्र भर झोप येत नाही. स्वतः ला कामात गुंतवून घेतो. अचानक लग्न झालं. मी मनालीला अस बोलायला नको होतं. माझ्या आयुष्यात तुला जागा नाही हे वाक्य काही छोटं नाही. चूक झाली. आता काय करू? बघू काय होत ते.

तो सकाळी उठला. मनाली रूम मधे नव्हती. ती सकाळी आवरून खाली गेली होती. काहीच सुचत नव्हतं. ती किचन मधे नुसती उभी होती. वंदना नाश्ता तयार करत होती. आक्का आल्या. "मनाली बेटा चहा ठेव."

तिने चहा केला.

वंदना बिझी होती. तिने सुदर्शन भाऊजीं साठी डबा भरला. ते आवाज देत होते. ती पटकन रूम मधे गेली. मनाली सगळं बघत होती. तिला परत वाईट वाटलं. माझा नवरा का असा निघाला? विचार करायचा नाही. धीर धर जरा. तिने स्वतःलाच समजावलं.

सम्राट खाली आला. तो इकडे तिकडे बघत होता. मनाली दिसली नाही. आक्कांनी उपमा दिली. त्याने खाल्ला. कोणी काही बोलत नव्हतं. आक्कांनी त्याला चहा दिला. तो उठला. आक्का डिश घेत होत्या. तो नाही म्हणाला. किचन मधे आला. ती दिसली. दोघांनी एकमेकांकडे बघितलं. त्याने डिश किचन मधे ठेवली.

"आई मी निघतो." त्याने मोठ्याने सांगितलं.

तिने आतून आवाज ऐकला. थोड्या वेळाने सुदर्शन ही ऑफिसला गेला. त्याच्या कारचा आवाज आला.

"मनाली चल थोडं खा." तिने वंदना सोबत नाश्ता केला. थोड्या वेळाने अमित शाळेतून आला. त्याच्या सोबत तिला बर वाटल. समोर पेपर होते. ती बघत होती काय आहे?

"बेटा आपली शाळा, कॉलेज या गावत आहे." आक्का सांगत होत्या.

"अरे वाह." ती माहिती वाचत होती.

"तुला काही करायचं असेल तर सांग." आक्का म्हणाल्या.

"मी आधी टीचर होती. मी शाळा जॉईन करते." मनाली आता खुश होती ती पेपर वाचत होती.

"चालेल. मी आबांना सांगते. "

आक्का शेतावर जाणार होत्या. त्यांच्या सोबत वंदना, मनाली, अमित ही गेले. तिथे छान वाटत होतं. मोठा व्यवहार होता. आक्का तिथल्या मॅनेजर सोबत बोलत होत्या. मनाली, वंदना आजूबाजूचा परिसर बघत होत्या. घरासाठी थोडी भाजी घेतली. अमित सोबत ती खेळत होती. आबासाहेब आले. ते कुठे कोणत पीक आहे सांगत होते.

"आबा मी शाळेत जॉईन होते." मनाली म्हणाली.

"अरे वाह सूनबाई. आम्हाला गरज होती. शाळेचा व्यवहार तू बघ. माझ्या सोबत सोमवारी तिकडे चल."

हो. तिला बर वाटलं. काहीतरी काम मागे हवं. ती ठीक होती. घरच्यांना बर वाटलं.

रात्री सम्राट सोडून जेवायला सगळे होते. मनाली आरामात जेवत होती. सम्राट बद्दल तिने विचारलं नाही. आवरून झालं. ती पेपर घेवून वरती आली. शाळेची, कॉलेजची माहिती वाचली. त्यांचे अनाथाश्रम होते त्याबद्दल ती बघत होती. इथे भरपूर काम करता येईल.

आईचा फोन आला. ती विशेष बोलली नाही. "मनाली रागात आहेस का?"

"नाही आई. काय बोलू अस आहे." ती सावकाश म्हणाली.

" काय झालं बेटा?"

"काही नाही आई, मी ठीक आहे. मला थोडा वेळ दे मी नंतर फोन करेन."

नंतर तिने आरतीला फोन केला.

"कशी आहेस मनु?"

"ठीक आहे, ताई मी शाळा जॉईन करते आहे."

"टीव्ही बघितला का? सम्राटची सभा सुरू आहे. "

मी बघते. तिने फोन ठेवला. टीव्ही लावला. तो भाषण करत होता. ती ऐकत होती. प्रत्येक वाक्यावर टाळ्या येत होत्या. हे खूपच बिझी आहेत वाटत. असू दे ना पण इतक रागात रहातात. तोडून बोलतात. तिने टीव्ही बंद केला. गादी घातली. ती एका पेपर वर डिझाईन काढत बसली.

माझ लग्न झाल नाही असं आता मी समजायचं का ? पण किती दिवस? कायमच बहुतेक. पण का कस? काही इलाज नाही का? त्यापेक्षा यांना माझ्या बाजूने केल तर? पण कस? थोडे दिवस जावू द्यावे लागतील. तो पर्यंत इतर गोष्टीत मन रमवु.

आज हे किचन मधे का आले होते? माझ्याकडे बघितल का? जातांना ही सांगितल. ती थोडी खुश होती. हे प्लेट तर कधी उचलत नाहीत. अस नसेल बहुतेक घर काम करत असतिल. आक्का चांगल्या आहेत. त्यांनी चांगल वळण लावल आहे.

घरचे लोक चांगले आहेत. मला समजून घेतात. पण आजी ओरडतात. म्हणजे सम्राट आजीवर गेला आहे का? तिला हसू आलं. माझ्या वाटेला खडूस वांग आलं. थोड्या वेळाने ती झोपली.

******

मनाली हळू हळू रूळते आहे. बघू, तिच्या मनाप्रमाणे होईल का?

🎭 Series Post

View all