गठबंधन भाग 19

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 19

©️®️शिल्पा सुतार

सम्राट बराच समजूतदार आहे. दोघांची ओळख वाढत आहे. आता पुढे.

सम्राट, मनाली दोघ रूम मधे आले. ती फ्रेश होऊन आली. तिच्या जागेवर बसुन ती मुलांचा सिलॅबस बघत होती. तो सोफ्यावर बसून काम करत होता.
" हे बघ मनाली मी आपल्या पार्टीचा रीपोर्ट तयार केला आहे."

ती त्याच्या जवळ बसली. ती रीपोर्ट बघत होती. यानुसार त्याला यश मिळत होतं. फक्त कमी सीट जिंकतील अस वाटत होत. या बाबतीत काय करता येईल तो सांगत होता.

"तुम्ही प्रत्येक गावचा मेन प्रॉब्लेम शोधा. तो नीट करा मग यश तुमच आहे." मनाली म्हणाली.

"बरोबर, ते काम सुरू आहे पण थोड्या ठिकाणी. उद्याच सगळीकडे लोक कामाला लावतो. तिकडे जायच असेल, प्रचार सभा असतिल तर तर तू येशील का माझ्यासोबत?" त्याने विचारलं.

"हो येईल." दोघ बर्‍याच वेळ बोलत होते. मनाली आता खूप कंफर्टेबल होती. सम्राट तिच्या कलाने घेत होता.

ती सकाळी लवकर शाळेत आली. कोणत्या वर्गात कोण टीचर आहे ते बघितलं. एक दोन टीचर कमी पडत होत्या. ते काम ती करणार होती. क्लास टीचर तिला होता येणार नव्हतं. शाळेत खूपच छान वाटलं. ती घरी निघाली.

रस्तात कार पंचर झाली. "मॅडम तुम्ही घरी जाता का? मी रिक्षा बोलवतो."

"हो चालेल." मनाली बाहेर उभी राहिली.

ड्रायवर चाक काढून घेवून गेला. तो तिकडून रिक्षा पाठवणार होता. ती बाजूला उभी होती. नितीन आणि एक मुलगा मोटर सायकल वर आला. "नमस्कार वहिनी."

ती दचकली. थोडीशी हसली. बाजूला सरकून उभी राहिली. हा तोच मुलगा आहे.

"काय झालं वहिनी तुम्ही घाबरल्या का? मी चांगला मुलगा आहे. चला तुम्हाला घरी सोडतो." तो म्हणाला. मोटर सायकल वर बसलेला मागचा मुलगा उतरला.
"वहिनी चला."

"नाही मी कार ठीक झाली की येईल. तुम्ही जा बर." मनाली म्हणाली.

"तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं. मी त्या दिवशी तुम्हाला माझं कार्ड दिल होतं. तुम्ही फोन केला नाही." नितीन म्हणाला.

तिने इंट्रेस्ट दाखवला नाही.

"ड्रायवर कुठे गेला? "

"ते काका पंचर काढायला गेले आहेत." तिने सांगितलं.

"तुम्ही माझ्या सोबत येवू शकतात. मी सम्राटचा मित्र आहे."

" नाही नको." तिने सम्राटला फोन लावला. फोन बिझी येत होता. काय करावं? हा मुलगा ही ना. मला आता काही गडबड नको. सम्राट सोबत मला शांत आयुष्य हवं आहे.

"वहिनी तुम्ही बर्‍या आहात ना? मला वाटत तुम्हाला घरी त्रास आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. "

"त्याची काही गरज नाही. काय झाल होतं जाणून घेवून काय करणार. तुम्ही जा ना. मी सांगते ना." ती चिडली.

"वहिनी तुम्ही खूप चांगल्या आहात. सम्राट खरच खूप लकी आहे. इतकी समजूतदार, सुंदर बायको मिळाली. पण तो त्या लायक नाही. खूप काही करून बसला आहे. तुम्हाला वाटत तितके ते लोक साधे नाहीत. करपशन, मुलींना फसवणे, लोकांच्या जमिनी काबीज करणे, धाक दाखवून काम करणे असे काम आहेत त्या सम्राटच. किती सांगू नी काय सांगू. " नितीन म्हणाला.

"तुम्ही चुकीची माहिती देत आहात हे लोक पूर्वी पासून श्रीमंत आहेत आणि राजकारणात आहेत. माझ्या वडलांनी माहिती काढली होती. उगीच काहीही सांगू नका. " मनाली चिडली.

सम्राटचा फोन आला. मनाली पटकन बाजूला गेली. " काय झालं?"

"अहो तुम्ही लवकर या ना. ते कोणीतरी उगीच माझ्याशी बोलत आहेत. मला भीती वाटते."

"कोण फोन दे."

"घ्या सम्राट बोलता आहेत. "

"नाही नको. " नितीन घाबरला.

"तू कुठे आहेस? " सम्राटने विचारलं.

"कार पंचर झाली मी इकडे आहे मेन रोडच्या बाजूला आहे."

"लोकेशन दे मी येतो ." तो लगेच निघाला.

"तुम्हाला इथून माहेरी जायच असेल तर मी मदत करू शकतो वहिनी. एकदा फोन करा. सम्राटच प्रेम प्रकरण होतं. तुम्हाला सांगायच आहे." तो घाईत म्हणाला.

"नितीन चल तो सम्राट येईल. इथून त्याच पार्टी ऑफिस जवळ आहे."

ते दोघ निघून गेला.

प्रेम प्रकरण होतं म्हणजे काय? बापरे हे काय आहे? कोण असेल ती मुलगी. त्यांचे अजूनही संबध असतिल का? तिला खूप कसतरी वाटतं होत. पण तिने स्वतः ला सावरल. यांच्यावर विश्वास आहे. सध्या ते फक्त पार्टी ऑफिस आणि सभेला जातात. टीव्ही वर दिसतात की. कोणी लेडिज सोबत नसते. सगळीकडे मीडिया आहे. मग ही जुनी गोष्ट असेल. पण मग तो मुलगा आता का सगळं उकरून काढतो आहे. बहुतेक तो सम्राटचा दुश्मन असावा. म्हणून तर असा पळाला.

सम्राट येवून समोर उभा राहिला. "मनाली चल."

ती कार मधे बसली. दोघ नेहमी प्रमाणे गप्प होते. तो नक्की नितीन होता. हिला काय सांगितलं, काय नाही. सम्राट काळजीत होता.
"मनाली तो मुलगा काय म्हणाला?"

"तुमच्या बद्दल काहीतरी सांगायच आहे अस म्हणाला." तिने सांगितलं.

"अजून म्हणत होता? "

"की मला इथून जायच असेल तर तो मदत करेल. "

"तो चांगला मुलगा नाही. त्याच काही ऐकायच नाही." सम्राट घाईत म्हणाला.

"हो मला माहिती आहे .तुम्ही काळजी करू नका. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या भूतकाळ सकट मी तुम्हाला स्विकारल आहे. " ती म्हणाली. एकदम गप्प बसली. तो तिच्याकडे बघत होता.

ते घरी आले. सम्राट वेगळाच शांत झाला होता. तिला समजत होतं. नक्की काहीतरी आहे. कॉलेज मधे कोणी मैत्रीण असेल. यांचा ही राजकारणासाठी बळी गेला आहे. म्हणून ते असे कोरडे झाले आहेत. काही का असे ना मी आता यांच्याशी नीट वागणार आहे.

तो तिच्याकडे बघत होता. "मला माहिती आहे तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत. मी तुला सगळया गोष्टी सांगणार आहे. मला थोडा वेळ दे. तुझ्यापासून काहीही लपवणार नाही. तू फक्त कोणी काही सांगितल तर ऐकू नकोस. इथून मला सोडून कुठे जायच नाही. मला भीती वाटते. मी रात्री घरी येतो."

ती काही म्हणाली नाही. कार मधून उतरली. तो गेला.

ती घरी आली. ती विचार करत होती आज यांच्या चेहऱ्यावर भीती होती. कसली? मला काही समजेल याची? की मला गमवायची. सांगतील ते. पण ही नक्की जुनी गोष्ट आहे.

ह्यांना मी हवी आहे. ते म्हणाले कुठे जायचं नाही मला भीती वाटते तिला थोड बर वाटलं. हे चांगले आहेत.

तिने वंदनाला किचनमधे मदत केली. अमित अभ्यास करत होता. ती त्याच्या जवळ बसली होती. त्याचे खूप लाड करत होती.

"मनाली तुला लहान मुल खूप आवडतात ना?" वंदना म्हणाली.

"हो ताई."

"मग आता लवकर नंबर लावा."

"काहीही काय ताई." ती हसत होती.

"भाऊजी नीट वागतात ना?"

"हो. नाराज नाहीत. ताई तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले?"

"पाच वर्ष झाले. "

म्हणजे यांना सम्राट बद्दल सगळं माहिती असेल. विचारू का? जावू दे. जाणून घेवून काय करणार.

******

सम्राट पार्टी ऑफिस मधे आला. त्याने एक फोन फिरवला. जीप भरून मुल पार्टी ऑफिस समोर आले. तो त्यांच्या सोबत निघाला. "ते मूल कोण होते?"

"नितीन आणि प्रमोद."

"कुठे आहेत?"

"फार्म हाऊसवर."

ते तिकडे आले.

सम्राट घाईने आत जात होता. दोन तीन मूल मागे होते. बॉडी गार्ड मधे पडला. "सम्राट साहेब सोडा त्यांना. जावू द्या. इलेक्शन जवळ आल आहे."

सम्राटने ऐकलं नाही. रागाने आत आला. त्याने नितीनच्या कानाखाली मारली." तुझी ही हिम्मत माझ्या बायकोशी बोलतो. तिला भडकवतो. काय म्हटला तिला इथून जायचं असेल तर तू मदत करशील."

"नाही सम्राट अरे कार पंचर होती तर मी मदत करत होतो."

"खोट बोलू नकोस. तुला माझा संसार मोडायचा आहे का?" सम्राट त्याला मारत होता. दोन तीन मुलांनी त्याला पकडल.

"सोडा मला." मुलांनी सम्राटला शांत केल. नितीन समोर बसला होता.

"हे बघ नितीन तुझ माझ काय असेल ते एकमेकांशी. त्यात फॅमिलीला मधे घ्यायचं नाही. माझ्या बायकोला भेटायचा प्रयत्न करायचा नाही. "

"सॉरी सम्राट. "

" जा इथून."

तो आणि प्रमोद गेला. सम्राट डोक्याला हात लावून बसला होता. मी घरी जातो. त्याला मनालीची काळजी वाटतं होती. एक तर आमच्या नात्यात किती उतार चढाव आहेत त्यात सारख काही ना काही होतं.

******

मनाली किचन मधे होती. वंदना अमितला खावु घालत होती. सम्राट आला. तो इकडे तिकडे बघत होता. "आई मनाली कुठे आहे."

"किचन मधे आहे. काय झालं? "

"काही नाही." तो डायनिंग टेबल जवळ बसला. मनाली भांडे घेवून आली.

"अरे तुम्ही लवकर आले." ती म्हणाली.

त्याला ती नॉर्मल बोलते आहे हे बघून बर वाटलं. म्हणजे नितीनने काही सांगितल नाही. मला हिच्याशी बोलाव लागेल.

जेवण झालं. आबासाहेब त्याच्याशी बोलत होते. एक दोन फोन ही आले.

मनाली रूम मधे आली. सम्राट अजून खाली होता. ती विचार करत होती. हे प्रेम प्रकरण काय असेल. हे त्या मुलीला विसरले की अजूनही त्यांच्या मनात तीच आहे?पण ते माझ्याशी खूप चांगल वागतात.

ती रूम आवरत होती. कपाट थोड उघड होत. फाईल थोडी बाहेर होती. तिने कपात उघडल. फाईल नीट आत ठेवली. ती कपाट बंद करत होती. आत एक बॅग दिसली. तिरपी ठेवलेली. त्यात गुलाबी इनव्हलप थोड बाहेर आलेलं होतं. बघू का काय असेल? नको सम्राट आले तर. कोणाचे पत्र बघू नये. वाचू नये अस म्हणतात. पण मी थोडी चुकीच करते आहे. त्याचा गैरवापर करणार नाही. काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे.

तिने रूमचा दरवाजा बंद केला. त्या बॅगमधे बघितलं. खूप ग्रीटींग कार्ड होते. पत्र ही होते. बापरे हे काय आहे. प्रियांका नाव होत. त्या मुलीने पत्रात काय लिहिल आहे ते मनालीने बघितल नाही. खूप गिफ्ट होते. सामान परत नीट ठेवलं. कपाट बंद केलं. दार उघडलं. ती तिच्या जागेवर बसली.

तिला काही सुचत नव्हतं. कोण होती ही प्रियांका? जिने यांना इतके पत्र का लिहिले. शेरोशायरी काय, दिल काय सगळं काढलं होतं. यांच ही तिच्यावर प्रेम होत का? मग त्या दोघांनी लग्न का केल नाही? काय झाल नक्की? बापरे म्हणून हे असे वागत होते का? अजून ही ते संपर्कात असतिल का?

काही अंदाज बांधायला नको. यांनी सांगितल ना ते माझ्याशी बोलणार आहेत. ते सांगतील सगळं.

तिला त्याचा राग येण्या ऐवजी वाईट वाटत होतं. अस असेल तर यांनी खूप त्रास सहन केला आहे. त्या मुलीच काय झालं असेल? नक्की ब्रेक अप का झाला? तिला झोप येत नव्हती.

थोड्या वेळाने सम्राट आला. "झोपली नाहीस? काय सुरू आहे?"

"थोड काम होत. तिने नोट्स दाखवल्या."

" शाळा कशी सुरू आहे?"

"चांगली. मुलांमधे खूप छान वाटत. खूप शिकायला मिळत स्ट्रेस बस्टर आहेत. "

"तुझा चेहरा असा का दिसतो आहे? तू अजून त्या मुलाचा विचार करते का?"

नाही. सम्राट काळजीत होता.

******

काय होईल पुढे? मनाली सम्राटला समजून घेईल का?

🎭 Series Post

View all