गठबंधन भाग 21 अंतिम

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 21 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

सम्राटने त्याचा भूतकाळ सांगितला. मनाली काय निर्णय घेते? आता पुढे.

मनाली रूम मधे बसली होती. सम्राट आत आला. ती झोपत होती. तिने मधे उशी ठेवली. तो बघत होता. काही म्हणाला नाही.

काय करू पुढाकार घेवू का? लगेच नको. आता तर ती माझ्याशी बोलतो आहे. सम्राट विचार करत होता.

मनाली झोपली होती. बहुतेक थकली असेल. तो लॅपटॉप घेवून बसला. थोड काम केलं. बर्‍याच लोकांना मेसेज केले. उद्या काय काम आहे ते बघितलं. आज मनालीशी मनमोकळ बोलून त्याला बरं वाटत होत. मेन म्हणजे तिने समजून घेतल. खरच एक टेंशन कमी झालं.

तो झोपायला आला. मधली उशी काढू का? त्याने ती उशी काढली तिच्याजवळ सरकला. ती झोपेत होती. तो तिच्याकडे बघत होता. त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. तिला हलकी मिठी मारली. तो तिकडे सरकून झोपला.

सकाळी ती त्याच्या मिठीत झोपलेली होती. ती उठली. बापरे झोपेत मी यांच्याजवळ कशी गेली? तिला कसतरी वाटतं होत. ती हळूच उठली. तो थोड बाजूला होवुन परत झोपला. ती आवरून बसली होती. तो नाश्त्याला आला. तिला लाजलेल बघून छान हसला.
"आपण चहा झाला की निघू."

ती हो म्हणाली.

तो ही दिवस असाच धावपळीत गेला. ते रात्री घरी आले. वंदना तिच्याकडे बघत होती.
"काय मग मनाली कशी झाली सभा?"

" नेहमी प्रमाणे ताई. खूप गर्दी होती."

"ओह हो. इकडं तिकडचं बोलतेस. मला काहीही सांगत नाही." ती चिडवत होती.

"अस काही नाही ताई. हे मोकळे बोलले माझ्याशी. म्हणताय तुझ्या सोबत रहातो." तिने सांगितलं.

"पुढे काय?"

"अजून काही नाही."

"किती बोर आहात तुम्ही दोघ. एवढा चान्स होता. तसेच परत आले." वंदना ओरडत होती.

मनाली हसत होती. "सगळं करायला पूर्ण आयुष्य आहे ना ताई. बोलून काही गोष्टी आधीच क्लियर झालेल्या बर्‍या. "

"बोलण्यासोबत जरा एकमेकांना प्रेम ही दाखवा ."

हो.

तो रूम मधे आला. ती खाली गादीवर बसुन काहीतरी लिहीत होती.

"काय सुरू आहे? "

"शाळेच काम, उद्या तास घ्यायचा आहे."

त्याला म्हणावसं वाटत होत वरती येवून झोप. पण तो काही म्हणाला नाही. ती थोड्या वेळाने झोपली. त्याला कॉटवर बोर होत होतं. तो ही उशी घेवून खाली आला. तिच्या बाजूला झोपला. सकाळी ती त्याला बाजूला बघून दचकली. तिला हसू आलं. हे खूपच मागे मागे करतात. ती उठत होती त्याने तिला जवळ ओढलं. ती त्याच्या मिठीत होती. गुड मॉर्निंग तो म्हणाला.

"गुड मॉर्निंग. तुम्ही इथे काय करताय?"

"माझी बायको जिथे मी तिथे. मला तिकडे करमत नव्हतं. तु माझ्या सोबत रहाणार का? पटकन सांग नाहीतर मी तुला सोडणार नाही." त्याने विचारलं.

"हो, पण अस नाही. तुम्ही माझे एकटीचे आहात ही खात्री पटली की." ती कपाटाकडे बघत होती.

"बर चालेल."

ती शाळेत आली. आज तिकडे ही खूप काम होतं. टीचरचं ट्रेनिंग घेतलं. बरेच डीसीजन घेतले.

दुपार नंतर ती पार्टी ऑफिस मधे आली. तिकडे ही बायकांची मीटिंग होती. ते ही काम लगेच सुरू होणार होतं. थोड्या वेळाने ती फ्री झाली. दोघांनी चहा घेतला.

"मनाली माझ्या सोबत येणार का?" सम्राटने विचारलं.

ते फार्म हाऊसवर आले. त्याने कारच्या डीकीतुन ती बॅग बाहेर काढली. शेकोटी केली. ते पत्र, ग्रिटींगकार्ड जाळले. गिफ्ट तिथल्या लहान मुलांना दिले. ती राख तिथल्या झाडांना टाकली.

त्याने तिचा हात हातात घेतला. "मी फक्त तुझा आहे मनाली. मला आता कोणतीच जुनी आठवण नको. माझा पूर्ण वेळ तुझा. तू म्हणशील ते होईल. मला तुझ्यासोबत रहायचा आहे. झालेल्या गोष्टी विसर. मला माफ कर. माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे."

ती त्याच्याकडे बघत होती. "खरच?"

"हो. आज डोक्यावरच ओझ ही उतरल. यापुढे फक्त तु आणि मी. "

तिने पुढे होवुन त्याला मिठी मारली. त्याने ही तिला हक्काने जवळ घेतलं. दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. "मग हो ना? "

हो. ती लाजून म्हणाली.

ते घरी आले. मनाली किचन मधे बिझी होती. तिने प्रसादाचा शिरा केला. त्याच्या हातून देवाला नैवेद्य दाखवला. दोघांनी देवाला नमस्कार केला. सगळे जेवायला बसले. मनाली खुश होती. चेहर्‍यावर दिसत होतं.

रात्री सम्राट लवकर रूम मधे आला. त्याने दार लावला. ती नेहमी प्रमाणे तिच्या जागेवर बसली होती.

"आता याची गरज आहे का?" त्याने तिला हात दिला. ती उठली. त्याने तिला उचलून घेतलं. ती लाजली होती. तिने त्याच्या छातीवर चेहरा लपवला. त्याने तिला गिफ्ट आणलं होत.

"काय आहे?"

छान डायमंडच मंगळसूत्र होतं. "तुम्ही घालून द्या." ती खुश होती.

त्याने मंगळसूत्र घालून दिलं. हे अगदी मनापासून मनाली. ती त्याच्या मिठीत शिरली. त्याने तिला जवळ घेतलं. तिने ही आढेवेढे घेतले नाही. दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली होती. रात्री केव्हा तरी ती त्याच्या मिठीत शांत झोपली.

ती सकाळी नेहमी प्रमाणे उठली. त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तो थोड उठला तिला परत जवळ ओढून झोपला. ती सुटायची धडपड करत होती. तो छान हसत होता. "जावू द्या ना. उशीर होतो आहे."

"दुपारी घरी येवू ना जेवायला?"

ती त्याचा इशारा समजली. हळूच हो म्हणाली. त्याने तिला सोडलं.

आंघोळ करून ती खाली गेली. सगळ्यांसाठी पोहे केले. सम्राट ही आवरून आला. नाश्ता झाला. जिथे मनाली जाईल तिथे तो तिच्या मागे जावून बोलत होता.
"चल तुला शाळेत सोडतो. मी त्या बाजूला जाणार आहे."

"अरे वाह सम्राट भाऊजी छान सुरु आहे. सारखं मनालीच्या मागे मागे. नक्की काय आहे?"

दोघ हसत होते. वंदनाला समजल. तिने दोघांना जवळ घेतलं.

ती शाळेत आली. मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रक्टीकलने शिकवावा ही तिची आयडिया सगळ्यांना आवडली. तसा ही एक सेशन त्यांनी घेतला. तो सगळ्यांना खूप आवडला. तिने त्या बाबतीत टीचर ट्रेनिंग घेतल. अति गृहपाठ देणे, मुलांना शिक्षा करणे याच्या ती विरोधात होती.

ती घरी आली. आज वंदना ही तिच्या सोबत पार्टी कार्यालयात आली होती. अमितची तर मजा होती. सगळे मुलं त्याचे लाड करत होते चॉकलेटने खिसा भरला होता. सम्राट बाहेर गेला होता. तो आला. मनाली बायकांशी बोलत होती. तो तिच्याकडे बघत होता. तिने एकदम खाली बघितलं. ती लाजली होती. रात्री त्या दोघी लवकर घरी आल्या.

"सम्राट कुठे आहे?" अक्कांनी विचारलं.

"भाऊजी बिझी आहेत ते मनालीला सोडत नव्हते. कसतरी मी तिला घेवून आले." वंदना म्हणाली.

"ताई काहीतरी काय?" ती लाजली. पटकन रूम मधे गेली. बाकीचे हसत होते. ते दोघ एकत्र आहेत बघून घरचे खुश होते.

आरतीचा फोन आला. "मनु एकदम बिझी?"

"हो ताई आत्ता घरी आली. पार्टी ऑफिस मधे गेली होती."

"सम्राट ठीक आहेत ना ?"

"हो ताई आता काही प्रॉब्लेम नाही." हे सांगतांना ती लाजली होती. आरतीला समजलं. ती खुश होती.

"मनु बघ मी म्हटलं होत ना हे नीट होईल."

"हो ताई, आई बाबांनी बरोबर निर्णय घेतला होता. मोठे लोक खरच हुशार असतात. "

"हो त्यांना अनुभव असतो. "

"त्या दिवशी मी रागात निघून गेले असते तर ती चूक झाली असती. " मनाली म्हणाली.

मनाली सम्राट सोबत दौरावर गेली होती. प्रचार जोरात सुरू होता. एक दोन ठिकाणी मनालीने ही भाषण केलं. दोघांच नातं ही छान बहरलं होत.

आज मतदान होतं. सगळे टेंशन मधे होते. कंटीन्यु फोन सुरु होता. एक दोन किरकोळ घटना सोडल्या तर मतदान शांततेत पार पडलं. त्यानंतर ही बरच टेंशन होतं. सम्राट बिझी होता.

आज रिजल्ट होता. धाकधूक होती. खूप फोन सुरु होते. सुरेशराव, सम्राट दोघ जिंकून आले. मोठी मिरवणुक होती. सगळीकडे उत्साह होता. सम्राट पूर्ण गुलालाने भरला होता. खूप कार्यकर्ते घरी येत होते. आक्का, आबासाहेब खूप खुश होते. मनालीने त्याला ओवाळलं. तिला त्याचा खूप अभिमान वाटत होता. तिने माहेरी फोन केला तिकडे ही सगळे आनंदात होते. आबासाहेब सुरेशराव बोलत होते.

दुसर्‍या दिवशी लगेच मोठी मीटिंग होती. हवे तेवढे सीट मिळाले होते. आबासाहेब, सम्राट, सुरेशराव मीटिंग मधे होते. सम्राट आबासाहेबांना काहीतरी सांगत होता. आबासाहेब बोलायला उठले. "सुरेशराव आधी मुख्यमंत्री होतील."

"मी नाही जावई होतील."

"नाही तुम्ही आधी होणार पुढच्या टर्मला सम्राट होईल." तो ऐकत नव्हता. हा निर्णय योग्य होता. लगेच सरकार स्थापन झालं. आज शपथ विधी ही झाला. सम्राटला ही महत्वाचं खातं मिळालं.

मनाली माहेरी आली होती. खूप पाहुणे आलेले होते. आपल सरकार आलं. मोठी पार्टी होती.

सम्राट, मनाली, आरती, जिजाजी, आशिष, निधी वहिनी, वंदना, सुदर्शन सगळे सोबत होते. आपण सगळे पिकनिकला जायच का? सगळे बोलत होते.

"आपला ही हनीमून बाकी आहे." सम्राट हळूच मनालीच्या जवळ जात म्हणाला.

"सम्राट कोणी ऐकेल ना?" ती ओरडली.

"आम्ही काही ऐकलं नाही." निधी वहिनी म्हणाली. सगळे हसत होते. मनाली, सम्राट दोघ लाजले.

आबासाहेब, आक्का, सुरेशराव आशाताई खूप खुश होते. "बघितल का लव बर्डस्. "

"हो ना. पोर सुखात आहेत अजून काय हव." सुरेशराव म्हणाले.

"मी आईकडे राहू का?" मनाली, सम्राट बाजूला उभे होते.

"नाही. " तो म्हणाला.

"प्लीज. किती दिवस झाले मी माहेरी आली नाही." ती म्हणाली.

"जमणार नाही."

"अस का करताय?"

"मी तिकडे एकटा काय करू? मला तुझ्याशिवाय करमत नाही." तो म्हणाला.

"मग तुम्ही ही इथे थांबा. "

"इथे नको मी इथे असलो की तुझ्या घरच्यांची धावपळ होते. गुपचूप बॅग घे मनाली घरी चल."

"तुम्ही मला थांबू दिल तर मग आपण फिरायला जावु." तिने सांगून बघितलं.

"ते तू अशी ही येशील."

"बर मग तुम्हाला काय हव जे हवं ते मिळेल."

"मला एक छान बाळ हव. "

"लगेच काय? "

"नंतर मी बिझी होईल ना."

"अजून नाही सहा महिन्यानी."

"ठीक आहे. मग फिक्स ना. " तो तिच्याकडे बघत होता ती लाजली.

"हो मग मी रहाते." ती खुश होती

सम्राट घरच्या लोकांसोबत गेला.

आरती मनाली रूम मधे आल्या. त्या खूप बोलत होत्या. थोड्या वेळाने आशाताई त्यांच्यात आल्या.

"मनु आरतीकडे गुड न्यूज आहे."

"हो ताईने मला सांगितलं. चला एकावर एक आनंदाची बातमी येत आहेत." निधी आत येत म्हणाली.

"अजून कोण? निधी वहिनी तू?" मनाली तिला चिडवत होती.

"आम्ही नाही. आमच्या आधी तुमचा नंबर आहे मनाली."

"आमचा अजून नाही. सहा महिन्यांनंतर." मनाली म्हणाली. गप्प बसली. सगळया खूप हसत होत्या. चला हे दोघ सोबत आहेत. खूप छान झालं.

घरी कोणाला करमत नव्हतं. सगळे मनालीची आठवण काढत होते. सम्राट जा तिला घेवून ये. सम्राट घ्यायला आला. दोघांना खूप आनंद झाला.

"तुम्ही लगेच आले?"

"मला तुझ्याशिवाय मला करमत नाही." तो हळूच म्हणाला.

ते दोघ निघाले. आई, बाबा बाहेर पर्यंत सोडायला आले होते.

"आई, बाबा थँक्यू तुम्ही योग्य निर्णय घेतला होता." मनाली मनापासून म्हणाली.

"तू खुश आहेस. आम्हाला तेच हव होतं." सुरेश राव म्हणाले.

कार मधे मनाली सम्राट हातात हात घेवून बसले होते तो तिची खूप काळजी घेत होता.

"मनाली आपण फिरायला जावू. प्रॉमीस केलेल लक्ष्यात आहे ना. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवा. " सम्राट मुद्दाम तिला चिडवत होता. मनाली लाजली होती. ती त्याला मारत होती. अरे अस नवर्‍याला मारता का? दोघ गोड बोलत होते. एकमेकात रमले होते. कोणीही त्यांना बघितल तर म्हणत होते हे अगदी लव बर्डस् आहेत. मेड फॉर इच अदर.

समाप्त.

वाचकांचे खूप आभार.

🎭 Series Post

View all