गौरीची मागणी ऐकून राजाच्या चेहऱ्यावर राग आणि थोडा आनंद असा संमिश्र भाव उमटला... आणि राजा विचारात गढून गेला. गौरी ने पुन्हा विचारणा केल्यावर राजा म्हणाला ठीक आहे मी तुला रस्ता सांगेन पण एका अटीवर. आमच्या राज्यात एक समस्या आहे ती तुला आधी सोडवावी लागेल आणि राज्याला त्यातून मुक्त करावं लागेल; बोल तुला मान्य आहे का नाही तर आल्या पावली परत जा.
गौरीने अट मान्य केली आणि समस्या काय ते विचारलं. राजा म्हणाला; "राज्याच्या बाहेरच्या भागात एक डोंगररांग आहे तिथे एक राक्षस राहतो जो दर तीन दिवसांनी येऊन सगळी नासधूस करतो त्या राक्षसापासून आम्हाला तू मुक्ती मिळवून दिलीस तर मी नक्कीच तुला जादुई नदी पर्यंत जाण्याचा रस्ता सांगीन. आता कालच तो राक्षस येऊन गेलाय म्हणजे तो आता पुढचे तीन दिवस येणार नाही तो पर्यंतचा वेळ तुझ्याकडे आहे त्यातच तुला काहीतरी करावं लागेल." गौरी लगेचच त्या पर्वतरांगांकडे जाण्यास निघाली. थोडे अंतर गेल्यावर एक तपस्वी ध्यानस्थ बसलेले गौरीला दिसले. यांची आपल्याला मदत होईल म्हणून गौरीने त्यांना विनम्रपणे राक्षसाबद्दल विचारले, तपस्वी म्हणाले; "मी तुला उपाय सांगेन पण त्या आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे." गौरी होकार देताच तपस्वी प्रश्न विचारतात; "एक माणूस चालत होता आणि पाऊस पडला त्याने छत्री आणलेली नाही किंवा टोपी घातलेली नाही त्याचे सर्व कपडे ओले झाले पण डोक्यावरचा एकही केस ओला झाला नाही हे कसे शक्य आहे?"
गौरीने लगेच उत्तर दिले कारण तो माणूस केशविहीन (टकलू) होता. तपस्वी खुश होतात आणि गौरीला सांगतात इथून पूर्वेला जा तिथे एका गुहेत एक म्हातारी तुला भेटेल तीच त्या राक्षसाला कैद करू शकते. पण सावध राहा ती खूप चालाख आहे. कल्याणामस्तु..!
आता तुम्हाला काय वाटतंय गौरीला ती म्हातारी मदत करेल? गौरीला यात यश मिळेल? नक्की comment करून सांगा तुम्हाला काय वाटतंय..... आणि हा भाग कसा वाटला हे सांगायला सुद्धा विसरू नका...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा