गौरी आणि खजिना (भाग-८)

Marathi blog, marathi katha, gauri and treasure, treasure hunt

      गौरीने सांगितल्याप्रमाणे राजा सगळी व्यवस्था करतो. युद्धभूमी पेक्षा जरा लांब पण, मेळ्यात होणारा उजेड एखाद्या लांब पर्यंत परसरलेल्या सैन्यासारखाच दिसेल याची खास काळजी घेतली होती. अखेर ती युद्धाची रात्र आली; भोलापूर आणि धुर्तनगरचे सैन्य समोरासमोर आले! पण काय आश्चर्य चक्क धुर्तनगर चे सैन्य माघारी फिरले! गौरीची युक्ती बरोबर वर्मी लागली. दुसऱ्याच दिवशी धुर्तनगर राज्याकडून मैत्रीचा प्रस्ताव आला आणि सोबत झाल्या प्रकाराबद्दल क्षमा पत्र देखील. राजाने गौरीचे मनापासून आभार मानले आणि चौथा नकाशाचा तुकडा गौरीला देऊ केला. 

            गौरीने चौथा नकाशाचा तुकडा जोडताच सगळा नकाशा कोरा करकरीत कागद झाला. आता हे काय नवीन गौरीला काही समजत नव्हते. इतक्यात गौरीला परीची आठवण झाली! हो तीच ती परी जी राक्षसाच्या वधानंतर शापमुक्त होऊन गौरीला सांगून गेलेली जेव्हा मदत लागेल तेव्हा मला नक्की सांग. गौरी त्या परीचीच आठवण काढते; परी गौरी समोर प्रकट होते. गौरी परीचे अभिवादन करून कोरा झालेला नकाशा दाखवते! परी गौरी ला सांगते; "इथून पुढे गेल्यावर तुला एक जादूचं जंगल लागेल, तिथे विशिष्ट प्रकारची पाच फुलं मिळतात! एक निळ्या देठाचं, दुसरं पारदर्शक, तिसरं काळ्या पानांचं, चौथं काटेरी पाकळ्यांचा आणि पाचवं चौकोनी पानं असलेलं! हि सगळी फुलं गोळा करून जशी जशी तू नकाशावर ठेवत जाशील तसं तसं या नकाशा वर रस्ता उमटत जाईल. पहिलं फुल ठेवलंस कि दुसऱ्या फुलापर्यंतचा रस्ता तुला दिसेल मग दुसरं ठेवल्यावर तो रस्ता गायब होईल आणि तिसऱ्या फुलाचा रस्ता येईल असं करत करत पाचवं फुल ठेवलं कि हा नकाशा तुला खजिन्याच्या चावी पर्यंत घेऊन जाईल. चावी मिळाली की मला परत बोलावं मग पुढे काय करायचं ते सांगेन! गौरी परीचे आभार मानते आणि जादूच्या जंगलाकडे प्रस्थान करते. 

         जंगलाच्या बाहेर आल्यापासूनच जादूच्या जंगलाचं अद्भुत रूप दिसत असत. बोलणारी झाडं, बोलणारे प्राणी - पक्षी सगळंच काही आगळ वेगळं असत! गौरी जंगलात प्रवेश करते.... थोडं पुढे गेल्यावर तिला तीन रस्ते दिसतात; आता रस्त्याच्या मध्ये जर एक झुडूप आले तर पार करायला १ मिनिटं लागतं, एक दगड आला तर २ मिनिटं आणि जर झाड आले तर ५ मिनिटं. पहिल्या रस्त्यात २ झुडुपें, १ दगड आणि १ झाड येईल, दुसऱ्या रस्त्यात ४ झुडूप, २ दगड आणि एकही झाड नाहीये, तिसऱ्या रस्त्यात ३ झुडुपें, ३ दगड आणि १ झाड आहे. मग आता तुम्ही सांगा गौरी कोणता रस्ता निवडेल? जेणेकरून ती लवकरात लवकर पहिल्या फुलापर्यंत पोहोचेल.

           गौरी  अर्थातच दुसरा रस्ता निवडते कारण त्या रस्त्यावरून जायला तिला फक्त ८ मिनिटे लागतील (४ झुडूप × १ मिनिटं = ४मिनिटे ) + (२ दगड ×२ मिनिटे = ४ मिनिटे) = ८ मिनिटे. गौरी ८ मिनिटात पुढे येते आणि समोरच पहिलं निळ्या देठाचं फुल गौरीला दिसत. गौरी ते फुल तोडते आणि नकाशावर ठेवते तसं ते फुल नकाशात समाविष्ट होते आणि परीने सांगितल्याप्रमाणे पुढच्या फुलपर्यंत जाण्याचा रस्ता नकाशावर उमटतो. तो रस्ता जात असतो बोलणाऱ्या झाडांच्या जंगलातून. तिथून बाहेर पडणे हे फार कठीण आहे कारण तिथली झाडं माणूस तिथे गेला की त्याला पकडून ठेवत असत. तिथे गेलेला कोणीही माणूस परत आला नव्हता हे सगळं गौरी ऐकून होती. 

       तुम्हाला काय वाटतंय गौरी त्या रस्त्यातून जाईल?..... आणि गेलीच तरी सुखरूप बाहेर पडू शकेल? ..... गौरीला सगळी फुलं मिळतील???.... comment करून तुमचं मत नक्की सांगा....

🎭 Series Post

View all