गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

Everyone has memories of school days

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

शाळेत शिक्षक शिकवत असताना,बेफिकीरपणे एक डुलकी घ्यायची,

आणि पकडलं गेलं की,प्रश्नांची उत्तरे द्यायची,

माहित नाही की,ती बरोबर कशी असायची,

उत्तर बरोबर आलं की,मनातच्ं हसायची,

आणि आता ते दिवस आठवताना म्हणावसं वाटतं----

शाळेत म्हण शिकवली होती,

कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडे ते वाकडे,

शब्दांचा शब्दश: अर्थ घेऊन,

मित्रांच्या मदतीने खरचं प्रात्यक्षिक केलं,

आणि मग पटलं म्हण खरचं खरी आहे,

आता मात्र त्याकडे मागं वळून पाहिले की म्हणावसं वाटतं----

मित्रमैत्रिणिना कणसं खायला आवडायची,

आमच्या शेतातील बोरं खायला आवडायची,

आजीची नजर चुकवून सगळ्यांना तिथे न्यायची,

आणि त्या आनंदाला कसलीही सरं नाही यायची,

आता जर ते आठवले तर हसून म्हणावसं वाटतं----

माझ्या मैत्रिणीच्या घरी लिंबू मिर्चीचं लोणचं बनायचं,

घरच्यांचा आणि तिच्या आईचा डोळा चुकवून,

त्याची जी लज्जत घेण्यात मजा यायची,

अजूनही ती चव जिभेवर रेंगाळत असते,

ती चव आठवून अजूनही तोंडाला पाणी सुटते तेव्हा म्हणावसं वाटतं----

कॉंग्रेसची झाडं उपटायचो, फुलपाखरांमागे धावायचो,

त्यांना बाटलीत पकडून ठेवायचो,

नंतर एक एक करीत एक एकाला सोडून द्यायचो,

त्या फुलपाखरांना उडताना पाहून इतका आनंद मिळायचा,

आता जर ते दिवस आठवले ना तर म्हणावसं वाटतं-----

रुपाली थोरात