"सुमेध...काय?आहे रे डब्यात ,बघू दे मला "..
बाईंनी सुमेधला विचारताच सुमेधने डबा पाठिमागे लपवला ..बाकीची मुलं त्याच्याकडे बघून हसू लागली.
"बाई ..लोंच पोळी असेल हो...रोज तेच असते त्याच्या डब्यात ,सावञ आई ना त्याची...".
"सावञ"..शब्द ऐकताच बाई जरा थबकल्याच...
शांत व जरासा मागे मागे असणारा सुमेध शांत का?असतो त्याच उत्तर हे तर नसावं ,असच बाईंना वाटलं..पाच वर्षाचा मुलगा हा ,काय?झाल असेल याच्या आईला ,किती गोड मुलगा हा ,आईविना आनाथ लेकरू हे ...विचारावं का?याला ,कि नको विचारायला...हा विचाराने ,मुलांनी सुमेधला घातलेला गराडा बाईंना दिसलाच नाही...
जरा भानावर येत त्या धावतच त्या मुलांजवळ गेल्या ,सुमेधने एका मुलाला घट्ट पकडल होत...म्हणजे भांडतच होता तो ,बाईनी धावत जाऊन दोघांनाही एकमेकांपासून वेगळ केलं...व जरासा दमही भरला..
"बाई,अगोदर त्याने मारल मला"
"हो का?तु काय?केलस असं"बाई म्हणत नाही तोवर त्याने त्याला पुन्हा पकडलं..मग बाईंनी सुमेधला धरलचं
"शांत हो..सुमेध ,का?मारतोस तु त्याला ,काय?झाल मला सांग "..
"बाई तो आईला सावञ म्हणतो ना?...माझी आई सावञ नाही ,आवडते मला ,खुप प्रेम करते माझ्यावर "..
"हो का?...मग हे असे का?म्हणतात".
"बाई काय?माहिती...आई आजारी आहे ना?,त्यामुळे बाबा पोळी लाटतात व मला लोंचपोळी व तुपपोळी देतात....आईला बरं वाटलं की मग ती देईल मला रोज छान छान टिफिन ...".
"हो का?..".
"काय?झालयं तुझ्या आईला"..
"नाही माहित बाई...पण आईला ना उठताच येत नाही ,झोपून असते ती नुसती...".
"मग आईच करत कोण?".
"बाबाच...पण सकाळी लवकर शाळा असते ना?म्हणून बाबांना भाजी करता येत नाही ,पोळ्या पण आताच शिकले ते...".
"तुला आजी नाही का?किंवा काकू ,आत्या,मावशी"..
"आहेत ना?तीन आजी ,काकु आत्या सगळेच आहेत ,पण कोणी येत नाही आमच्याकडे...".
"का?,बाबा म्हणतात ,सगळे चिडलेत माझ्यावर..."
"का?असं...तु नाही विचारलसं...".
"विचारलं ना..तर म्हणतात तुझी मोठी आई देवाघरी गेली ना?म्हणुन व आता आईला बरं नाही ना म्हणुन"..
'तुझ्या बाबांची चुक आहे का?मग".
"नाही बाई ...बाबा खुप प्रेम करतात आईवर ".
"मोठी आई कोण तुला. आठवते का?".
"नाही बाई,आमच्या घरात फोटो आहे ,मी एकदा विचारल तर आई म्हणाली ,हि मोठी आई आहे"..
"आई कधीपासून आजारी आहे..."
"बाई मी छोट्या गटात होतो ना?तेव्हा आई चांगली होती...
रोज मला शाळेत सोडायला येई,छान छान टिफिन बनवून देत होती ...आम्ही ना बाई खुप खेळत असू ...आई मला रोज गोष्टी सांगत असे खुप धम्माल येई ...आम्ही फिरायला जात असू ...तेव्हा ना?बाबा रविवारीच येत आम्हाला भेटायला ...मग आम्ही सोबत फिरायला जात असू".
रोज मला शाळेत सोडायला येई,छान छान टिफिन बनवून देत होती ...आम्ही ना बाई खुप खेळत असू ...आई मला रोज गोष्टी सांगत असे खुप धम्माल येई ...आम्ही फिरायला जात असू ...तेव्हा ना?बाबा रविवारीच येत आम्हाला भेटायला ...मग आम्ही सोबत फिरायला जात असू".
बोलतांना सुमेध मोठ्या उत्साहात सांगत होता...आईबद्दल भरभरून बोलत होता....व बाकीची मुलं कुजबुजत होती..
त्यातील एक मोठा मुलगा जोरात म्हणाला,"सावञ आई आहे त्याची ,माझ्या शेजारीच रहातो तो...माझी आई म्हणते शेवटी सावञच ती तीला काय?चिंता ह्याची ,आजारपणाच डोंग करते ती".
त्यातील एक मोठा मुलगा जोरात म्हणाला,"सावञ आई आहे त्याची ,माझ्या शेजारीच रहातो तो...माझी आई म्हणते शेवटी सावञच ती तीला काय?चिंता ह्याची ,आजारपणाच डोंग करते ती".
आता तर सुमेध जास्तच चिडला,
"बाई..सांगा ना याला,माझी आई सावञ नाही आणि नाटक ही करत नाही खरच ञास होतो तीला..."
बोलता बोलता सुमेध जोरजोरात रडू लागला...
तोवर दुसरे शिक्षकही तेथे गोळा झाले...
मुख्यध्यापिका मुलांना म्हणाल्या ,"ऐ गोंधळ कमी करा रे ,मधली सुट्टी ना जा पटकन टिफिन खाऊन घ्या ...दहा मिनिटात शाळा भरेल..'"
क्षणात मुलांची गर्दी कमी झाली...
मुख्यध्यापिका बाईं सुमेधच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या ,"तुला नाही का?जेवायचं,बघू दे वर डबा ,आज तुझाच डबा खाते मी..".
सुमेध जरा हसला व मुख्यध्यापिका बाईंसमोर डबा धरला..
डब्यात दोन तुपाचे लाडू होते ...
"व्वा...!,लाडू ,कोणी केलेत रे..."
"बाई आईने दिले ...आज भाजी नव्हती ना?मला मुलं चिडवतात हे माझ्या मिञांनी सांगितलं ना ?घरी तर तीने बाबांना सांगून बाहेरून बनवून आणले...म्हणाली ,माझ्या सोनूला शक्तीमान व्हायचं ना?तर रोज दोन लाडू खायचे...'"
"भारीच..आहे बा तुझी आई,मग एक लाडू मी खाऊ "
"हो खा ना?तो आईच्याच वाट्याचा असतो ,बाबा दोन लाडू काढून देतात ,आई नाही खात दोघेही मला देते ..."
"का?रे,आईला नसतो का?खायचा"..
"आईला खावा वाटत असेल ना ?बाई ,पण आई म्हणते,तु खालंस ना कि माझा आत्मा तृप्त होतो..."
"बाई एक सांगू मी ना शाळेतून जातांना रोज मंदिरात जातो ..देवाच्या पाया पडायला व देवाला सांगतो...देवा आईला लवकर बर कर व पुर्वीसारख रोज मला सोबत कर...म्हणजे शाळेत मला चिडवणार नाहित ना?"..
"हो का?छान हं...!,लवकरच बरी होईल बघ तुझी आई..."
"खरच बाई "
"हो तर"...
बाईंनी हो बोलताच सुमेधचा चेहेरा खुलला
...मुख्यध्यापिका त्याच्या डोक्यावरून हात फिरवत वर्गात चाललल्या गेल्यात पण सुमेधच्या बाईच्या मनात असंख्य प्रश्न होते....एकीकडे सगळेच सुमेधच्या आईला सावञ बोलत होते व हा छोटासा सुमेध माझी आई सावञ नाही हे ओरडून सांगत होता...
...मुख्यध्यापिका त्याच्या डोक्यावरून हात फिरवत वर्गात चाललल्या गेल्यात पण सुमेधच्या बाईच्या मनात असंख्य प्रश्न होते....एकीकडे सगळेच सुमेधच्या आईला सावञ बोलत होते व हा छोटासा सुमेध माझी आई सावञ नाही हे ओरडून सांगत होता...
बाईंना आता सुभेध व त्याच्या आईच सत्य जाणुन घ्यायचं होत....बर्राच दिवसांपासून त्या सुमेधला एकट पडतांना बघत होत्या....
क्रमश:...
बाकी कथा पुढील भागात...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा