मनावर ठेवलेला मणामणाचा दगड
थोडा बाजुला सार
आणि शांत होऊन एक नवा विचार
घेऊन जा तू अनंताच्या पार
थोडा बाजुला सार
आणि शांत होऊन एक नवा विचार
घेऊन जा तू अनंताच्या पार
सारे काही सोबती फक्त दोन घडीचे
आणि आपली वाट आपणच चालणार
मग का रुसवे फुगवे
कुणाकडूनही नको अपेक्षा
अगदी गोड शब्दांचीही
कारण देणाऱ्याचे हात हजार
( हे भगवंताला उद्देशून आहे)
आणि आपली वाट आपणच चालणार
मग का रुसवे फुगवे
कुणाकडूनही नको अपेक्षा
अगदी गोड शब्दांचीही
कारण देणाऱ्याचे हात हजार
( हे भगवंताला उद्देशून आहे)
संघर्ष म्हणजेच जीवन
आपल्या सत्याशी प्रामाणिक
राहुन समाधान मिळव
तेच येणार सोबत सरणावर
सच्चिदानंद परमात्म्याला स्मरुन
आनंद वाट , आनंद मिळव
आपल्या सत्याशी प्रामाणिक
राहुन समाधान मिळव
तेच येणार सोबत सरणावर
सच्चिदानंद परमात्म्याला स्मरुन
आनंद वाट , आनंद मिळव
.....योगिता. मिलिंद नाखरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा