Login

घटस्फोट;सुरवात प्रेमाची-14

Gh
इन्स्पेक्टर बद्री प्रीती कौरच्या अपार्टमेंट समोर येतो...

तो खाली सिक्युरिटी गार्ड जवळ येतो,

बद्री वॉचमन जवळ पाच मिनिट घुटमळतो त्यानंतर तो वॉचमन जवळ चौकशी करतो.
'सर ये प्रीति कौर मॅम यही पे रहती है क्या?

वॉचमन- हे बघा सर.. मी गेल्या आठ दिवसापूर्वीच इथे जॉईन झालो आहे,  मला याबद्दल काहीच माहित नाही...
आणि इथे व्ही.आत.पी लोक राहतात... त्यामुळे तुम्हाला जर या संदर्भात कोणाची चौकशी करायची असेल तर, अगोदर त्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे...

इन्स्पेक्टर बद्री प्रीती कौरचा बुटीक मध्ये जातो, पण तिथेही ते बुटीक बंद असल्यामुळे त्याला तिथूनही फारशी माहिती मिळाली नाही..

संध्याकाळी सगळे ऑफिसर ऑफिसमध्ये जमतात.

एसीपी विश्वास- संध्याकाळचे सेशन हे प्रत्येक ऑफिसर साठी कंपल्सरी आहे आणि प्रत्येक ऑफिसरला मिळालेली माहिती सगळ्यांसमोर सांगावी लागणार आहे..
त्यामुळे एकमेकांच्या माहितीचा संबंध
कुठे ना कुठे लागेल...आणि केस लवकर सॉल्व होईल.

इन्स्पेक्टर शर्मा इन्स्पेक्टर रश्मीला बोलवतात..

रश्मी समोर येत गीता बासू बद्दल माहिती सांगत होती.. सर मी मिळवलेल्या माहिती नुसार गीता बासू हल्ली वेगळ्याच टेन्शनमध्ये होती, त्यात तिच्या मृत्यू पुर्वी तिच एका टॅक्सी ड्रायव्हर सोबत कनेक्शन होतं..
तो ड्रायव्हर रोज तिला ने-आण करत असे.
सर, वॉचमनने दिलेल्या माहितीनुसार गीता  बासूचा नवरा सोमेश चॅटर्जी हा 22 जानेवारी रोजी तिच्या अपार्टमेंट मध्ये आला  तेव्हा सगळ्यांसमोर त्या दोघांचे वाद चालू झाले.. तेवढ्यात हा टॅक्सी ड्रायव्हर सुद्धा तिथे आला आणि त्याने सोमेश चॅटर्जी वरती हमला केला..
त्यात सोमेश चॅटर्जी हे किरकोळ जखमी झाले पण जाताना त्यांनी गीताला धमकावलं का, तू या ड्रायव्हर करवी त्यांच्यावर हमला केला पण मी याचा बदला घेणार आहे. तूला आणि या ड्रायव्हरला सोडणार नाही.

एसीपी विश्वास- इन्स्पेक्टर रश्मी, तुम्ही त्या टॅक्सी ड्रायव्हर विषयी माहिती काढली आहे का?

रश्मी- सर त्याची अजून जुजबी माहिती मिळाली नाही पण हा त्याचा टॅक्सी नंबर.. तो मिळवला आहे.

एसीपी विश्वास- गुड ऑफिसर! ती माहिती इन्स्पेक्टर शर्मा जवळ जमा करा..
यानंतर अय्यर येतात, अय्यर सगळ्या ऑफिसरला गीता बासूची हॉस्पिटल विषयी माहिती देत होते.
अय्यर- "सर, कंपाउंडर आणि इतर बऱ्याच लोकांकडून अशी माहिती मिळाली आहे का, गीताबासू यांचा नवरा सोमेश चॅटर्जी यांना कोर्टाने त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये, गीता बसूला 25% अधिकार देण्याचे बजावलं होतं आणि सोमेशला गीताला तो अधिकार द्यायचा नव्हता. त्यामुळे तो दोन-तीनदा हॉस्पिटलमध्ये येऊन तिच्याशी वाद घातला.
इन्स्पेक्टर शर्मा गीता बासू यांचा डाटा तयार करत होते, तिच्या खुनामध्ये ते अपरिचित टॅक्सी ड्रायव्हर आणि तिचा नवरा सोमेश चॅटर्जी या दोघांना संशयित म्हणून गोलाकार करतो.

त्यानंतर नीर तिथे येतो.
नीर- सर, मी जेनिफर यांच्या घरी चौकशीसाठी गेलो होतो. सर जेनिफरच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांपासून हे सत्य लपवून ठेवलं का, जेनिफर मॅरीड होती आणि तिचा एका महिन्यातच डिवोर्स ही झाला.
या डिवोर्स चा कारण जेनिफर लव्ह मॅरेज आणि तिच्या वडिलांना हे एक्सेप्ट नव्हतं, त्यामुळे त्यांनी तिच्यावर प्रेशर आणून तिला डिवोर्स घ्यायला लावलं.

एसीपी विश्वास- आपल्या कॉन्फरन्सिंग फाईल मध्ये ही माहिती अवेलेबल आहे,ऑफिसर!

नीर- सर, त्या अपार्टमेंटच्या आसपासच्या लोकांनुसार जेनिफरचा वडिलांची मानसिक अवस्था ठीक नाही...
त्यांच त्यांचा घरावर अतिप्रेशर आहे. आणि त्यात त्यांना त्यांच्या धर्मावर अभिमान सुद्धा आहे...
या सगळ्या अनुसार या खुनामध्ये संशयाची सुई जेनिफर च्या वडिलांवर जाते.

इन्स्पेक्टर शर्मा नीर ने दिलेला डाटा कलेक्ट करतात आणि तिच्या मर्डर मध्ये तिच्या वडिलांना संशयित म्हणून गोल करतात.

त्यानंतर येते सुपर लक्ष्मी, सुपर लक्ष्मी सरकारी वकील सोफिया खान याबद्दल माहिती सांगत होती.
सुपर लक्ष्मी- सर सोफिया खान यांनी एका ड्रग्स ॲडिक्ट माणसाची केस घेतली होती आणि ती केस हँडल केल्यापासून ती पॅनिक मध्ये होती.
सर, त्या आरोपीचे नाव कमल खान आहे, आणि तो अजूनही दिल्ली जिल्हा तुरुंगात तुरुंगात कैद आहे.

त्यानंतर इन्स्पेक्टर बद्री समोर येतो,
तो अडखळत," सॉरी सर, मला प्रीती कौर बद्दल काहीच माहिती सापडली नाही..
त्या अपार्टमेंटमधील वॉचमन चेंज झाला आणि प्रीती कौर जिथे काम करते, सध्या ते बुटीक ही बंद होतं.

एसीपी विश्वास इन्स्पेक्टर बद्रीला काहीच न बोलता कावेरीला आणि लालू ला त्यांना
एनएमडीसी एरियाच्या मागे काय काय माहिती मिळाली, ती सांगण्यासाठी बोलवतात.

कावेरी- सर एनएमडीसी एरियाच्य
नाल्याला जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे. आणि ती एक पायवाट आहे....त्या जागेचा उपयोग सहसा हे दारूडे आणि वेश्यागमन करणारे लोक करतात...
सर, आम्ही ईथल्या जवळपास असलेल्या शॉपीवर चौकशी केली असता, दरम्यानच्या काळात येथे कोणीही संशयित इथे फिरकला नव्हता..
सर विशेष म्हणजे या चारही खुनाच्या वेळेस कोणी जड वस्तू अथवा गाडी घेऊन इथून आलं नाही.
लालू- सर, मी जेव्हा एका दारुड्या कडे माहिती काढली. 
तो सांगत होता का, जेव्हा 3 एप्रिलच्या मध्यरात्री हा इसम तिथे दारू पीत होता.
दारू पिता पिता अचानक त्याला एक लाश वर तरंगताना दिसत होती.. तो घाबरून तिथून पळून गेला... त्यांने या संदर्भात पोलिसांना ही काही सांगल नाही.
पण, त्याकडून जी माहिती मिळाली त्यानुसार तो ती लाश मिळण्यापूर्वी एक तास अगोदर पासून तिथे होता आणि तो जिथून ही पायवाट जाते.. त्याच्यासमोरच थांबला होता.. या एक तासाच्या दरम्यान कोणी ही व्यक्ती काही उचलून आणल नव्हतं...त्यानंतर अचानक त्यां नाल्यावरती  लाश तरंगू लागली.

इन्स्पेक्टर शर्मा कावेरी आणि लालू कडून जी काही माहिती मिळाली, त्या माहितीच डाटा मध्ये कलेक्शन करतात. त्यानंतर शेवटी उरली ती शीखी... शीखी तिथे समोर येते.

शीखी- सर, मी इथल्या मजूर लोकांच्या वस्तीमध्ये गेले..
तिथे एका महाराष्ट्रीयन फॅमिली सोबत ओळख करून घेतली...ती बाई अंध होती, पण त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्यानुसार या वस्तीतल्या आणि एन.एम.डी.सी वस्तीवरील स्त्रिया यांना काहीच झालं नाही...
ज्या स्त्रियांच्या लाश मिळाल्या त्या वस्ती बाहेरच्या आहेत...
तसेच, इथे गेल्या वर्षीपासून पाच-सहा नवीन कामगार लोक आले आहेत, जे गैरकानूनी काम करतात... ही त्यांची नावे आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याचे स्वरूप आणि त्यांचा या खुनाच्या वेळी, ते लोक कुठे- कुठे होते या संदर्भातील लोकेशन.
एसीपी विश्वास- ऑफीसर शीखी, मला तुमच्यावर खुप आपेक्षा आहे.. त्यामुळेच माझी पहिली रीकमेंड तूम्ही होता...व्हेरी गुड...
सो... सर्व ऑफीसर आपली कामगिरी चोख पार पाडत आहात ..शिवाय इन्स्पेक्टर बद्रीनाथ यांच्या....
बद्रीनाथला अपमानास्पद वाटत...
एसीपी विश्वास- "ऑफिसर शीखी आणि नीर, आज एका हाय सोसायटी पार्टी आहे. प्रीती कौर त्या होस्ट सोबत बी लॉंग करतात ..
सो तुम्ही दोघे तिथे जाऊन तिच्या विषयी माहिती कलेक्ट करा.
नीर- एस सर.

शीखी- बट सर, ती तशीच स्तब्ध थांबते.
एसीपी विश्वास- ऑफीसर, पार्टीवेअरचे ड्रेस नाहीत का, तुम्ही इन्स्पेक्टर शर्मा ला साइज, कलर  सांगा ते अर्ध्या तासात अवेलेबल करून देतील.
आणि, हो उद्या सकाळी मॉर्निंग सेशन मध्ये मला प्रीती कौर बद्दल माहिती हवी.
नीर आणि शीखी- एस सर..!

पार्टी रात्री साडेनऊला असल्यामुळे शीखी आणि नीरकडे दोन अडीच तासाचा अवधी होता.
सगळे ऑफिसर रेस्ट साठी आपापल्या रूम मध्ये येतात.
शीखी राग राग करत होती, बाकीचे एवढे ऑफिसर आहे, पण एसीपीला माझ्यासोबत या नीरलाच पाठवायचं होतं का...
मला नाही थांबाव वाटत नाही.. त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करा वाटत ना, बोला वाटत.
तो माझ्यासमोर आला तरी मला त्याचा राग येतो...अक्षरशः त्याचा जीव घ्यावासा वाटतो, पण.. (शीखी वरती बघत) पण.. तुला तर हसू येत असेल ना.. माझ्या या सिच्युएशनवर.
हसून घे, कारण तुला करमत नाही म्हणून तू माझं नशीब केवळ टाईमपास साठी लिहिलं आहेस ना...


🎭 Series Post

View all