Login

घटस्फोट;सुरवात प्रेमाची-15

Gh




इकडे नीरला त्याच्या आईचा फोन येतो,
दामिनी- "हॅलो, नीर मी हे काय ऐकते... ती.. ती...ऑफिसर झाली, आणि तू आणि ती एकाच टीम मध्ये आहात?
नीर पुटपुटत, शेवटी विराजने आईला सगळं सत्य सांगलंच एकदाच.
दामिनी- बरं झालं, त्याने सगळे सत्य सांगल.. नाही तर तू कशाचाही थांगपत्ता लागू दिला नसता आणि काय माहिती तू तर तिकडेच तिच्यासोबत घर उभ केल असत...

नीर- हाताशाने... आई, आता ती तुझी सून नाही ना... तुझा आणि तिचा काही संबंधही नाही .. का परत तिचं नाव घेऊन तिला सारखं बोलत राहते.

दामिनी- बघितलस, तुझ अजूनही तिच्यावर प्रेम आहे आणि मला याचीच भीती आहे.
हे बघ नीर तिच्यामुळे समाजात तुझी इज्जत गेली आहे..ती आता तुला कितीही भूलीला पाडेल पण अजिबात तिच्या भुलीला बळी पडू नकोस.

नीरलात म्हणतो, ती काय मला भुलीला पडणार मला साधं नजर वर करून ही बघत नाही.

नीरला दामिनीच नेहमीच बोलणं असह्य झालं तो मोबाईल तसाच बाजूला ठेवून डोळे बंद करून पडतो.
नीर-"आई, तुझं माझ्याबद्दल ओव्हर पझेसिव्हनेस सोड...
तुझ्या या पझेसिव्हनेस मुळेच आतापर्यंत या सगळ्या वाईट गोष्टी झाल्या.
इकडे श्रुती- आई, काय म्हणला ग दादा, तो त्या मुली पासून लांब राहील म्हणला ना...? मला तर काळजीच वाटते ग बाई...!
दामिनी- तो कशाचा लांब राहतो, मी जेव्हा त्याला बोलले... तर तो साध हो का चूं.. ही म्हणत नव्हता आणि शेवटी फोन बाजूला ठेवला...  मी आपली बडबडत होते आणि हा काहीच प्रतिसाद देत नव्हता.

श्रुती- आई, मला वाटतं, एकदा तू तिलाच स्पष्ट बोल किंवा तिच्या आईला बोल.. म्हणजे तिची आई पण तिला ठणकावून सांगेल.
दामिनी- बरोबर बोलत आहेस, मी तिच्या आईलाच फोन करते आणि तिच्या आईला सांगते, का तुमच्या मुलीला, माझ्या नीर पासून लांब राहण्यास बजावून ठेवा.

दामिनी लगेच सुवर्णाला कॉल करते,
सुवर्णा- हॅलो कोण बोलतंय?

दामिनी- मी नीर ची आई बोलते..
ती रागात बोलली.

सुवर्णा- "कुस्तीत हसत, नीर...कोण नीर आम्ही कोण्या नीरला ओळखत नाही?

दामिनीला राग येतो, तोच नीर...ज्याच्यासाठी तुमची मुलगी परत दिल्लीला आली आणि त्याच्यासोबत त्याच्या एकाच टीम मध्ये काम करते..
हे बघा दामिनी, मला भांडायची अजिबात हौस नाही..
तुम्ही, तुमच्या मुलीला बजावून ठेवा का ती या मिशनमध्ये माझ्या मुलापासून लांब राहायला हवं..
ती परत नीर सोबत संसार करायच स्वप्न बघत असेल तर, ते स्वप्न मी अजिबात पूर्ण होऊ देणार नाही.

सुवर्णही लगेच रागात,"मी, तुमच्या नीर सारखे 1760 पोरं माझ्या मुलीवरून ओवाळून टाकेल तेवढ्यात दामिनी फोन कट करते.
सुवर्णा लगेच शीखी ला फोन लावते.

शीखी ते दोन-तीन फोन अव्हॉईड करते पण सुवर्णाचे कंटिन्यू फोन चालू होते, म्हणून ती तो कॉल रिसिव्ह करते.
सुवर्णा रागातच "शीखी, तू त्या नीर सोबत काम कशाला करतेस?

शीखीला हे ऐकून धक्का बसतो, ती "तुला कोणी सांगितलं हे?"
सुवर्णा- त्याच्या आईचा फोन आला होता, माहित आहे ती बाई काय बरळत होती, ती म्हणते का तुमच्या मुलीला त्याच्यासोबत परत एकदा संसार करायचा..
त्यामुळेच ती दिल्लीला आली आणि त्याच्या टीम मध्ये काम करते..
तू आता या क्षणी ते मिशन कॅन्सल कर आणि ताबडतोब इकडे निघून ये.
शीखी रागात येत, "तुमची अजून भांडणा- भांडणीचे खेळ संपलेच नाहीत का..
ती बाई एक मूर्ख आहे .ती बरळत असेल तर तू तुझा फोन कट करायचा ना आणि हे बघ मला आता कोणासोबतच संसाराची इच्छा नाही, त्यामुळे मी दुसरा मुलगा काय.. नीर सोबतही हे स्वप्न बघणार नाही आणि राहायला माझ्या कामाचा प्रश्न...हे बघ मी तुला सतरादा सांगते. हे नोकरी माझं ध्येय आहे आणि मी माझ्या ध्येयाच्या वाटेने चालत आहे..
सो प्लीज. तू मला कॉल करून डिस्टर्ब करू नको आणि त्या बाईने तुला जर परत कॉल केला तिला स्पष्ट सांग इथून पुढे जे काही बोलायचं असेल, ते शीखीला बोल आणि माझा नंबरही पाठव..

असं म्हणून रागात शीखी फोन कट करते..
दहा मिनिटातच शीखीच्या मोबाईल वरती तिच्या बहिणीचा फोन येत होता..
शीखी तो नंबर बघून कुस्तीत हसते,
"चला म्हणजे हीला ही कळालं, आता हिच कॉल उचलला तर अर्धा तास लेक्चर ऐकत बसावं लागणार.
पण या नीरला कळत नाही, मूर्ख कुठला.. ऑफिशियल गोष्टी घरात सांगायचा असतात का?
आज एकांतात भेटून त्याला यासंबंधी बोलावच लागणार आहे.

तेवढ्यात इन्स्पेक्टर शर्माचा शीखीला फोन आला..
" हॅलो मॅडम तुमच्यासाठी दोन-तीन ड्रेस आणले आहे ट्राय करून बघा.


रात्री शार्प साडेनऊ वाजता नीर सूटबूट मध्ये ऑफिस बाहेर थांबला होता..
तो शीखीची वाट बघत होता..
पंधरा मिनिटे झाले..शीखी अजून आली नव्हती तो मनात म्हणतो..
वेळे बाबत अगदी अनपँक्चूअल आहे..पहिले सुद्धा हेच व्हायचं...मी तयार होऊन बसायचो आणि मॅडम यायच्या मागून..
असं म्हणून तो मागे वळून बघतो, तर समोर शीखी होती..
शीखीने ब्लॅक गाऊन घातला होता. त्यात हलकासा मेकअप यामुळे, नीर भूतकाळात हरवला..
तो पार्टीला जाण्यासाठी अशीच गडबड करायचा..
शीखी वेळेवर कधीच येत नसे पण जेव्हा ती यायची, तेव्हा नीरच होश उडायचं तो तिला
एकटक बघत राहायचा.
शीखी, "ऑफिसर, मी तयार आहे.. निघायचं.
पण नीर तीला एकटक बघत होता.
शीखी त्याच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत, "गाडी कुठे आहे?
तेव्हा कुठे नीर भानेवर येतो. तो लगेच इन्स्पेक्टर शर्माला कॉल करतो आणि पाच मिनिटातच गेटमध्ये गाडी येते..
नीर आणि शीखी दोघेही गाडीत बसतात. नीर सारखा चोरून तीला बघायचा तर शीखी त्याला नजर ही न मिळवता, "आपण इंक्वायरी मॅनेजमेंट कशी करायची?"

नीर- तू लेडीज मध्ये इन्क्वायरी कर आणि मी जेन्ट्स मध्ये.
यासोबत आपल्याला वेटर आणि ड्रायव्हर सोबत ही इन्क्वायरी करावी लागणार आहे.

शीखी त्याला क्षणभर बघते आणि होकारार्थी मान हलवते..
पार्टी स्पॉट येताच दोघेही गाडीतून उतरतात.

शीखी आणि नीर पार्टी हॉल मध्ये जात होते पण लॉन्ग गाऊन शीखीच्या हीलमध्ये आला, तिचा तोल जाणार इतक्यात
नीर तिच्या दंडाला पकडतो आणि तिला स्टेबल करतो.
नीर- "आर यु कंफर्टेबल?"
शीखी रागात," कशाला सावरलं मला, आता सवय झाली पडायची आणि एकटीनेच हिंमत करून उठायची.
नीर- ऑफिसर, आपण मिशनवर आहोत...
तुम्ही माझ्या सहकार्य आहात, त्यामुळे काळजी घ्यावी लागली....तसेही मला कोणाला स्टेबल करायची इच्छा नाही आणि वेळही नाही..
असं म्हणून तो समोर निघून जातो.

शीखी नीरला रागात बघत," माहित नाही याचात कसला एटीट्यूड आहे.

पार्टीत शीखी, लेडीज च्या घोळक्यात येते, हळूहळू त्यां लेडीज सोबत ओळख काढते.

नीर बघतो का वेटर वाईनचे ग्लास त्या घोळक्यात आणतो..

नीर शीखीला बघत बडबडतो.., यहीला  कशाला वाईन ऑफर करतो.. हिला वाईन अजिबात आवडत नाही..
पण त्याचा अंदाज खोटा ठरला, शीखीने  वाईनचा ग्लास घेतला आणि त्या लेडीज सोबत चिअर्स करत..तिने तो ग्लास ओठाला लावला.

नीर, रागात दुसरीकडे बघतो.." माणसाने बदलावं, पण एवढं बदलावं का... शीखीला पूर्वी तर असल्या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या ना.

तर शीखी इकडं लेडीज सोबत बोलताना नीर वर कटाक्ष टाकते,..
तो तिघे इथे एका लेडीजशी बोलत तिचे हात हातात घेत, तिच्यासोबत हास्यविनोद करत होता..
शीखीला त्याचा राग आला.. याला अस वागायची काय गरज आहे..
पूर्वी तर दुसऱ्यांच्या बायकांना फक्त लांबूनच नमस्कार करायचा आणि आता तिचा हातातला हात सोडायला ही तयार नाही.
मिशनच्या नावाखाली सगळं करायला भेटतं ना, आणि आता अडवायला कोणी सुद्धा नाही.. याच्या आईने माझ्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मुलावर लक्ष ठेवायच ना...


🎭 Series Post

View all