Login

घटस्फोट;सुरवात प्रेमाची-18

Gh
ऑफिसर कावेरी एन.एम.डी.सी एरिया च्या मागच्या साईडला या खुना संबंधी चौकशी करत होती.
त्यासाठी ती नाल्याच्या मागच्या परिसरात आली होती...
फॉर्मल ड्रेस असल्यामुळे ती एक ऑफिसर आहे हे सामान्य लोकांना ओळखू येत नव्हतं
अशातच एक दारुडा तिच्या मागे लागला.
ऑफिसर कावेरी निरक्षणासाठी इकडे तिकडे बघत होती..
आता त्या दारुड्याचा  मित्राची संख्या जवळपास पंधरा-वीस झाली. ते सगळेच  तिच्या मागे होते.
ती नाल्याच्या पायवाटेतून निघायचा प्रयत्न करत होती, पण ते लोक तिला जाण्यास मज्जाव करत होते.
ऑफिसर कावेरीने त्यांच्या ग्रुप वरती इमर्जन्सी हेल्प टाकत...तिथल लोकेशन सेंड केलं
पंधरा मिनिटातच तिथे टीममधल्या सगळ्या ऑफिसर च्या गाड्या आल्या.

अय्यर कावेरी समोर येत,"डोन्ट वरी! चल माझ्यासोबत..."

तेवढ्यात तो दारुडा येत अय्यर ला मागे ढकलतो..
अय्यर जोराने त्याच्या मुस्काटीत मारतो.
कावेरी सुद्धा कमी नव्हती, ती एकाला हाताने आणि दोघांना जवळपासच्या लाथाने खाली पाडते..
पण आता त्या 15 दारुड्याची संख्या तीस वर गेली...
30 दारूड्या समोर दोन ऑफीसर...
एकाने अय्यरच हात पकडला आणि दुसरा त्याच्या पोटात मारणार
इतक्यात रश्मीने त्या गुडांचा हात पकडला
त्यावर तो गुंड रश्मीला बघत हसत म्हणाला,”
"आपने जो हात थांब लिया, हम तो खुदा का शुक्रिया करते है।"

नाजूक रश्मीने त्याच्या कानशिलेत जोरात लगावत," एक बार हमार तरफ से भी शुक्रिया कीजिए असं म्हणते.."
तो बिचारा गाल चोळत त्रासाने विव्हळत होता,
तेवढ्यात लालू खबरी पण येतो..
तो ही दोघा तिघांना मारत होता.. एवढ्यात शीखी आली..
ती कावेरी जवळ येत, "काय झालं ऑफिसर कावेरी?
तेवढ्यात एक गुंड त्या दोघीजवळ येतो..
शीखी, त्याच्या गालात जोरात लगावत,”आम्ही दोघी...बोलत आहोत ना..बोलू दे.....

तो गुंड परत त्या दोघीजवळ येताच...
कावेरी त्याच्या गालात मारत “आरे, नेमक मॅटर काय झालं, ते सांगू दे.. सारख मध्ये मध्ये येतो.

आता तिथे आठ ऑफीसर विरुद्ध तीस गुंड असा तमाशा रंगला.

आजूबाजूचे बरेच जण बघायला आले..
नीर ने सगळ्या ऑफिसला जवळ बोलवलं आणि त्यांना सांगल,"हे बघा, आपल्याला इथे हिरोगिरी करायची नाही.. कारण आपल्याला इथे अजून चौकशीसाठी यावं लागणार.. सो लेट्स मुव्ह..

कावेरी- लेट्स मुव्ह म्हणजे... काय म्हणायचं तुम्हाला... हे असल्याना घाबरून आपण इथून पळून जायचं?
शीखी हळूच आवाजात,"प्रॉब्लेम पासून पळत जायचं असतं.. असं ह्यांचं नेहमीचच आहे..
मात्र तीच पूटपूटन नीर ऐकतो.
तो क्षणभरासाठी डोळे झाकतो," तर ठीक आहे... अर्ध्या तासातच ह्या सगळ्यांची जिरवा असं म्हणून तो सर्व गुंडावर तुटून पडतो...

तो ऐकाला मारूण वळणार..  इतक्यात एका गुंडांनी शीखीला जोराने ढकललं आणि नेमकं ती नीरच्या मिठीत पडते.
त्या वातावरणात ही दोघे.. ऐकमेकांच्या मीठीत हरवतात...
नीर त्या गुंडाला बघत थँक्यू असं म्हणतो.
शीखी त्याच्या मिठीतून बाहेर पडत, त्या गुंडाला मारायला जाते. एवढ्यात तो शीखीवर हात उगरणार
इतक्यात, नीर त्याचा हात पकडतो, तो रागाच्या भरात म्हणतो
नीर त्याला रागात बघत," तूझी शीखीला मारायची हिम्मत कशी झाली, तो त्याला दोन-तीन शिव्या देत... त्याच्या कानफाडीत लागावतो..
नीर त्या माणसाला ज्या पद्धतीने मारत होता..हे बघून त्याच्या आसपासची लोक घाबरले आणि ते होईल तसं तिथून पळायचा प्रयत्न करत होते..
तो गुंड ही आता स्वतःला नीरच्या तावडीतून  सोडवायचा प्रयत्न करत होता..,
पण नीर त्याला अजिबात सोडत नव्हता. त्या माणसाच्या तोंडातून हातातून रक्त येत होतं..
शेवटी अय्यर नीरला पकडत,"सर हे काय करताय तुम्ही... तो जर मेला तर तूम्ही कायमचे निलंबित व्हाल."

नीर रागात होता, सगळे त्याला शांत करायचे प्रयत्न करत होते... पण शीखी त्याला लांबूनच एकटक बघत होती.

नीर तिच्यावरती कटाक्ष टाकत, त्या गुंडाला खाली पाडून रागात हात झटकून तिथून निघून जातो.

एसीपी विश्वासचा सगळ्या ऑफिसरला मेसेज येतो तडकाफडकी त्या सगळ्यांना कॉन्फरन्सिंग रूममध्ये बोलवल्या गेलं होतं.

एसीपी विश्वास सगळ्या ऑफिसला धारेवर धरत," ऑफिसर, कावेरी.. तुम्हाला वाटत नाही..अशा ठिकाणी जाताना, सोबत एखाद्या ऑफिसर असावा...
मी तुम्हाला त्या एरियाच्या शॉपमध्ये चौकशी करायला सांगितली... नाकी त्या नाल्याच्या एरियात येऊन चौकशी करायची...
तुम्हाला जर इथे इन्क्वायरी करण्यासाठी जायचं होतं तर मला इन्फॉर्म केलं असतं.. तर मी इन्स्पेक्टर बद्री किंवा नीर किंवा अय्यर यांना तिथे पाठवलं असतं.. हे बघा या मिशनमध्ये मला तुमच्या सगळ्यांची सेफ्टी पण महत्त्वाची आहे.

कावेरी उठत," एसीपी सर, तुम्हाला हे म्हणायचं आहे का.. एकटी लेडी स्वतःची सेफ्टी ची जिम्मेदारी घेऊ शकत नाही?"

एसीपी विश्वास- हे.. मी नाही तर.. तुम्ही प्रूव्ह केल, ऑफीसर कावेरी...
आणि प्लीज.. मला लेडीज,जेंट्स या वादात नाही पडायचं...
सो प्लीज कोणतेही एकटी लेडी ऑफिसर तिथे जाणार नाही.. आणि इन्कायरी साठी जायचंच असेल तर, मला इन्फर्म कराव... मी सोबत टीम पाठवून देईल.
ऑल ऑफीसर- एस सर!

एसीपी विश्वास नीर कडे बघत,"सर, आय थिंक आपल्याला एन्काऊंटर साठी इथे हायर केलं नाही.. आज तुम्ही ज्या माणसाला मारलं, कदाचित त्यात त्याचा मृत्यू झाला असता तर,  मिशन सक्सेसच्या ऐवजी तुम्ही कायमचे सस्पेंड झाला असता.
नीर- एस सर!
असं म्हणून तो खाली बसतो.
एसीपी विश्वास त्याला बघत,"आय हियर  ओन्ली एस सर! तुम्ही तुमच्या कृत्याबद्दल सॉरी नाहीत का?

नीर-"सर, यात माझी काही चूक असती तर मी  त्याबद्दल सॉरी असतो..
आज मी गुडां सोबत जे काही केलं, त्यात माझी अजिबात चूक नाही.. त्यासाठी मी हवी ती शिक्षा भोगेल...

एसीपी विश्वास- लूक ऑफिसर.. आता तुम्हाला फिजिकली पनिशमेंट द्यायला, मला योग्य वाटत नाही... पण मी तुमच्या राग आणि जिद्दीबद्दल बरंच ऐकल आहे...
सो प्लीज माझ्यासोबत काम करताना तुम्ही पोलाइट राहताल अशी अपेक्षा करतो."

शीखी (मनात)-पोलाइट... हा माणूस कधीच कोणासोबत पोलाइट राहू शकणार नाही.."
.

नीर आता शीखीकडे चोरटा कटाक्ष टाकत," सॉरी सर! मी कधीच कोणासोबत पोलाइट राहिलो नाही... मी बराच जणांना त्रास दिला पण त्यांना आत्तापर्यंत ही सॉरी बोललो नाही.

शीखीला नीरच्या बोलण्याचा भावार्थ कळाला शीखी क्षणभरासाठी खाली मान घालून, याने माझ्या मनात डीवायीस लावला का याला प्रत्येकगोष्ट कळते...

इन्स्पेक्टर शर्मा तिथे येत, "ऑफिसर, आपलं हे सिक्रेट मिशन आहे....
आम्हाला तुम्हाला कोणाच्या डोळ्यात येऊ द्यायचं नाही...
(इन्स्पेक्टर शर्मा विश्वासला बघत) सर,आपण आपल्या मुद्द्याकडे यायचं का.. ऑफिसर्स ने त्यांच्या टार्गेट रिलेटेड जी माहिती काढली ती चेक करून घेऊ.
एसीपी विश्वास-" गो आहेड!"
इन्स्पेक्टर शर्मा- ऑफिसर शीखी आणि ऑफिसर नीर...तुम्ही काल रात्री प्रीती कौरची माहिती इथे सर्वांसमोर सांगावी, म्हणजे आपल्या मिशनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करता येईल...
नीर शीखी सगळ्या समोर एकत्र थांबतात..
शीखी आता सगळ्यांसमोर उभी राहत,
"एसीपी सर काल नीरसरांसोबत जी प्रीतीकौर बद्द्ल जी माहिती काढली, त्यानुसार प्रीती कौर ने मृत्यूपूर्वी सुसाईडचा प्रयत्न केला होता.

नीर-' आणि सर ती प्रेग्नेंटही होती, पण डायरेक्टर प्रदीप वर्माच्या दबावामुळे तिला अबोर्शन कराव लागलं...
शीखी- सर, तिच्या अफेअर बद्दल तिच्या नवऱ्याला कळालं होतं, त्यामुळेच त्याने डिवोर्स घेतला...

एसीपी विश्वास-"ठीक आहे.. तुम्ही बसा.. त्यानंतर ते प्रोजेक्टर वरती गीता वासू, सरकारी वकील सोफीया खान, जर्नलिस्ट जेनिफर डिसूजा.. त्यानंतर प्रीती कौर यांचे फोटो प्रोजेक्टर वर चारीही साईडला ॲरेंज केले होते 

एसीपी मध्यभागी गोल काढत," ऑफीसर तुम्हाला वाटतं का, या चारही खुनामध्ये काहीतरी साधर्म्य आहे?

सुपर लक्ष्मी उठत, "एस सर, चौघी लेडीज त्यांच्या क्षेत्रात बऱ्यापैकी नावाजलेल्या होत्या.


एसीपी विश्वास, प्रोजेक्टवर तो पॉईंट लिहितात.

अय्यर उठत, "सर या चौघींचेही त्यांच्या आई-वडिलांशी पटत नव्हतं, त्यामुळे त्या सेपरेट राहायच्या.

एसीपी विश्वास अय्यरचा ही पॉईंट लिहितात. त्यानंतर इन्स्पेक्टर बद्रीनाथ उठत,
"सर आणि सर्वात कॉमन गोष्ट म्हणजे या चौघी  ही डायवोर्सी होत्या.
एसीपी विश्वास बद्रीनाथ ला बघत," व्हेरी गुड पॉईंट."
त्यानंतर रश्मी उठत," सर या चौघी  दिसायला खूप सुंदर आहेत.."
एसीपी विश्वास रश्मीला बघत,"हा पॉईंट होऊ शकतो?"
रश्मी- "का होऊ शकत नाही.., चौघींमध्ये साम्य विचारत होता ना, तर हेच साम्य आहे का चौघी पण सुंदर आहेत...

त्यानंतर लालू उठत, "या चौघी मरण्यापूर्वी, प्रीती मॅडमचा माहित नाही; पण या तिघांच्या लाईफ मध्ये एक ड्रायव्हर, तो इंटर फेयर करायचा...त्यानंतर सोफिया खान यांच्याकडे सुद्धा एका ड्रग्स ॲडीक्टची केस आली.. तर जेनिफरकडे सुद्धा एक माणूस रिपोर्ट घेऊन आला होता आणि त्यामुळे या तिघी पॅनिक मध्ये होत्या.

एसीपी विश्वास क्षणभर त्याला बघत," ठीक आहे... हा एक्स्ट्रा पॉईंट आपण ऍड करू शकतो... पण मला वाटतंय आपण काहीतरी मिस करतोय."

कावेरी- सर तो पॉईंट हा आहे का, यांचं  फेलल्युर मॅरेज.. जे त्यांच्या घरी कोणालातरी पटत नसेल.. त्यामुळे त्यांना मृत्यूच्या घाटी उतरल गेल असाव..

एसीपी विश्वास- पण इन्स्पेक्टर कावेरी, एका बाबत हा पॉईंट होऊ शकतो; पण चौघांबाबत तोच पॉइंट कसा होऊ शकणार...?
ऑफिसर नीर, म्हणल्याप्रमाणे जेनेफरच्या वडिलांना  तिच्या लव मॅरेज चा विरोध होता, त्यामुळे जेनिफर ने डिव्होर्सही घेतला..
डीवोर्स घेतल्यानंतर तिच्या वडिलांना तिच्यासोबत काय प्रॉब्लेम असणार आहे?

नीर उठत, "सर, यासोबत तिचे वडील कट्टर धार्मिक होते....कदाचित त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असेल?

एसीपी विश्वास- पण मला मनातून आणि माझ्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात येत का, या चौघांमध्ये काहीतरी साम्य आहे, त्यामुळे मला आतून असं फील होतंय का, या चौघांचा खुनी एकच असू शकतो....ऑफिसर, मला असं का वाटत असेल बरं?

शीखी उठत, सर चौघेही सेल्फ इंडिपेंडेंट होत्या, डीवोर्स घेतल्यावरही त्या समाजात स्वतःचं नाव कमवत होत्या..
ती रागाने नीर वर कटाक्ष टाकत आणि हेच कोणाला तरी कुठेतरी खूपत असेल.. त्यामुळे हे खून होत असेल.

सुपर लक्ष्मी- आणि सर या चौघींचाही खून त्या महिन्याच्या तीन तारखेला झाला आहे...
विचार करा, दोन तारखेला त्यांचा किडनॅपिंग आणि तीन तारखेला त्यांची बॉडीज आपोआप नाल्यावर तरंगत होती...

एसीपी विश्वास- गुड पॉईंट...
इन्स्पेक्टर कावेरी उठत,  सर चौघींची लाश एकाच ठिकाणी मिळाली, त्यामुळे खुनी हा एकच असू शकतो.


एसीपी विश्वास- सो ऑल ऑफीसर..आज पासून तुम्ही या चौघींच्या आसपासचे नातेवाईक अथवा मित्रपरिवार यांचा या चौघींसोबतही कुठे सुत मिळतं का हे बघा .
तसेच, लालू ने जी माहिती आणली त्यानुसार लाश आपोआप तरंगत होती, तर आपल्याला ह्या नाल्याचं ही स्ट्रक्चर बघावं लागणार आहे...

आणि ऑफिसर शीखीच्या म्हणण्यानुसार जर या सहा हा वॉचमन पैकी कोणी संशयित असेल तर आपल्याला सावध राहून या सहा वॉचमनचा तसेच या चौघी जिथे राहायचा... तिथल्या वॉचमन चे कनेक्शन चेक करून घ्या.

इन्स्पेक्टर अय्यर, गीता बासूला जो ड्रायव्हर त्रास द्यायचा, त्या ड्रायव्हरचा शोध काढा आणि सुपर लक्ष्मी सोफिया खानने ज्या ड्रगीस्ट माणसाची केस घेतली, त्याबद्दल पूर्ण माहिती हवी....
इन्स्पेक्टर कावेरी, आर्किटेक इंजिनियर कडून नाल्याचा स्ट्रक्चर ची माहिती  मिळायला हवी.
ऑफिसर नीर या चौघांचा एकमेकांसोबत काही ना काही संबंध होता का ते तपासून घ्या.

सगळे ऑफिसर आपल्या ध्येयासाठी परत एकदा नवीन ऊर्जेसहित उठतात..