Login

घटस्फोट;सुरवात प्रेमाची-19

Gh

शीखी श्रावणीला उदास झालेल्या बघून..
शीखी-" ते जाऊदे...तुझं काय चालू आहे,.. शुभम काय म्हणतो... त्याच एज्युकेशन संपलं का...  तो नोकरीच्या विचारात आहे का... बिजनेस च्या?

श्रावणी-" वहिनी, त्याला तर बिजनेसच करायचं... पण मला मात्र, दादा सारख ऑफिसर व्हायचं....
सॉरी.... सॉरी वहिनी... दादा सारख नाही तर मला तुझ्यासारखा ऑफिसर व्हायचं... कारण मी दादा सारख ऑफिसर झाले तर माझ्यात आणि आईत इगो ठासून भरेल...
तेवढ्यात शीखी तिला हात लावत..
शीखी- शूsss...
हेल्मेट वाला माणूस नीर असल्याचा इशारा करत होती.

नीर लगेच गाडीवरून उतरून, हेल्मेट काढून श्रावणीसमोर उभा राहतो.

श्रावणी समोर नीरला बघून घाबरते.. ती लगेच शीखीच्या बाजूला येते....ती नीरला बघत,
"दादा, तू मला काहीच करू शकत नाही.. कारण आता माझ्या बाजूला वहिनी आहे."

तिघांनाही आठवतं.... जेव्हा नीर ऑफिस मधून यायचा... श्रावणी त्याला चिडवत असे..
तेवढ्यात, शीखी दोघांच्या मध्ये आल्यावरती श्रावणी शीखीच्या बाजूला थांबवून त्याला अजून चिडवून शीखीला त्याच्या अंगावर ढकलून तिथून पळून जात असे.

आजही नेमकी तीच सिच्युएशन आली; पण परिस्थिती मात्र बदलली.
शीखी श्रावणीचा हात घट्ट धरत... तीला हिमत द्यायचा प्रयत्न करत होती...
तेवढ्यात
श्रावणी- "वहिनी, उद्या माझी आडवांस बर्थडे पार्टी आहे.. हॉटेल ब्ल्यू इन मध्ये तुला यावं लागणार आहे...
शीखी- श्रावणी, मला नाही जमणार...

श्रावणी नीरला बघते... तो आता बराच रागात आला होता...
श्रावणी-वहिनी, तुला यावं लागणार.. असं म्हणून ती शीखीला नीरचा बाजूला ढकलत...तिथून भरकन निघून जाते.
इकडे शीखीच लक्ष नसल्यामुळे तसेच ती अचानक नीरचा अंगावरच पडते...
नीर तिच्या कमरेत भोवती हाताचा विळखा करत तीला सावरण्याचा प्रयत्न करतो.

श्रावणीच्या अल्लडपणा मुळे.. दोघांनाही आज पूर्वीचे दिवस आठवले...

यापूर्वीही श्रावणी जाता जाता मुद्दाम शीखीला त्याच्या अंगावर ढकलत असे आणि तिथून पळून जात असे.
नीर लगेच भानावर येतो.. तो शीखीला सरळ उभा करत.."सॉरी शीखी.. श्रावणीचा अजून अलडपणात गेला नाहीस. "

शीखी शांतपणे गाडीवर बसते.. ती क्षण भरासाठी डोळे मिटते...
पूर्वी हे असंच व्हायचं.. तेव्हा नीर, शीखी एकमेकात गुंतून जायचे; पण आज परिस्थितीने त्या दोघांनाही किती बदललं होतं आणि त्याच परिस्थितीला मात्र श्रावणीचा अल्लडपणा, बालपण बदलता आलं नाही.

रात्री दोघेही त्यांच्या क्वाटरला येतात. सगळे ऑफिसर आपापल्या टार्गेटला कम्प्लीट करून आले होते...
डायनिंग वर त्या सगळ्यांचे डिनर ऑर्गनाइज केलं होतं... त्यात आज नॉनव्हेज स्पेशल होतं.

अय्यर- शीखी मॅडम, यां ना.. तुमच्यासाठी कबाब सर्व्ह करायच का?

नीर शीखीला बघतो; कारण शीखी व्हेजिटेरियन होती त्यात गुरुवारी तिचा उपवासही असतो...

शीखी कबाब बघत तोंड वाकड करते.." सॉरी अय्यर सर.. मला भूक नाही..
असं म्हणून ती तिच्या क्वार्डकडे निघते.

नीर तिथे बसतो.. तो कबाब खाणार इतक्यात विराज तिथे आला.
विराज-" ऑफिसर आजचा मेन्यू आवडला आहे ना, स्पेशली मी बनवला?"
नीर खाता खाता शांत बसतो; कारण विराजला सुद्धा माहित होतं का.. गुरुवारी शीखीचा उपास असतो त्यामुळे त्याने मुद्दाम हे केलं.

विराज नीरजवळ येतो आणि हळूच आवाजात पुटपुटत, "साले साब आवडलं का?"

नीर सुद्धा हळू आवाजात, "मुद्दाम गुरुवारीच.. नॉनव्हेज कशासाठी?
विराज- अरे आज गुरुवार आहे,... पण तुम्हाला तर उपास नसतो.

नीर अजून त्याच्यावर चिडत, मला भूक नाही सॉरी असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये जातो.

तो त्याचा रूम मध्ये आल्यावर ती बडबड करत होता,
" लग्न झाल्यानंतर या लोकांनी तिला वाटेल तसं छळलं ना... आता आमचा डीवोर्स ही झाला... तरीही मुद्दाम तिला ज्या गोष्टी आवडत नाही, त्याच करायला लावायच्या ...आई सुद्धा अशीच करायची तिचा गुरुवारचा उपास राहायचा आणि ती मुद्दाम त्या दिवशी शीखीला नॉनव्हेज करायला लावायची.. तेही या विराज साठी.

तेवढ्यात नीरला श्रावणीचा कॉल येतो, "हॅलो दादू कसा आहेस?"

नीर रागात, "आता तर ठीक आहे; पण जेव्हा तू प्रत्यक्ष समोर येशील.. तेव्हा मात्र तुला दाखवेल, मी नेमका कसा आहे.
श्रावणी- "अरे... जा... जा ...तू काय मला दाखवशील...मी लांबून बघितलं तू कसं तिला सांभाळत होता.

नीर- श्रावणी, स्टाफ धिस नॉन्सर्स! तुला माहित आहे ना... आता सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या कधीच होऊ शकत नाही....

श्रावणी- दादा, याबाबतीत तू काहीच बोलू नको... कारण तुझे डोळे तुझ्या मनातल्या सगळ्या भावना बोलतात.

नीर- ठीक आहे... मान्य करतो..उद्या जर आमचं परत पॅचअप झालं....तर पॅचअप करून मी काय करणार...सांग ना.... हे लोक तिला परत त्रास देणार आणि मी तिला परत त्याच त्रासात नाही बघू शकत मी.

श्रावणी- पण...तू त्या लोकांचा विचारच का करतो, आणि हे बघ... तुझं तिच्यावर प्रेम आहे तर तिच्यासोबत राहा ना... कशाला या लोकांना तुमच्या नात्यात लुडबुड करू देतो?"

नीर- सगळ्या गोष्टी तुझ्यासारखा अल्लडपणे नाही सोडता येत ग...
आता हा विराजच बघ ना, त्याला माहित आहे ना... शीखीला गुरुवार असतो... तर आज याने ऑफिसर साठी मुद्दाम  नॉनव्हेज बनवलं.
श्रावणी आनंदाने, काय वहिनी अजूनही गुरुवार करते?
नीर- हो...पण...तिने मला हे सांगल नाही, तर खाली आम्ही सगळे जेवायला बसलो... नेमकं ताटात नॉनव्हेज बघून शीखी तिथून उठली आणि म्हणाली की आज तिला गुरुवारी उपास आहे.

श्रावणी- दादा... दादा... म्हणजे या फिलिंग केवळ तुझ्याकडूनच नाहीत तर तिच्याकडून सुद्धा आहेत.

नीर- श्रावणी तू मूर्ख आहेस का, मी काय बोलतो तू कुठल्या कुठे विषय नेते?

श्रावणी- अरे दादा.... तुला आठवतं का..
तू एईदा नेक्स्टलाईट एरियातील मिशन साठी दोन दिवस छत्तीसगड ला गेला होता... तर तुला दोन ऐवजी चार दिवस लागले...
तेव्हा शीखी वहिनीने माझ्यासमोर देवाला पाया पडल्या," का... तू आयुष्यभर सुखरूप रहाव यासाठी ती तीच्या श्वासात श्वास असेपर्यंत गुरुवारचा उपवास करेल.

नीरला अचानक भरून आलं तो श्रावणीला काहीच बोलू शकला नाही... त्यामुळे तो फोन कट करतो.

नीरला आता एकांतात त्याचे अश्रू लपवता येत नव्हते...
नीर-"शीखी.. माझ्यावरती प्रेम करतेस... का करतेस एवढं प्रेम...
मला माहित आहे, श्रावणी जे बोलली ते काही चुकीचं नव्हतं... माझ्यामध्ये खरंच इगो ठासून  भरलेला आहे..
माझी आई, माझी बहीण चुकीची आहे...हे माहीत असून सुद्धा मी तुला चुकीचं धरल होतो...मी तुला एवढा ग्राह्य धरत होतो का, तुझ्या बाबतीत मी अक्षरशः डोळ्यावर पट्टी लावून घेतली. आणि तू मात्र अजूनही माझ्यावर तेवढच प्रेम करते.

नीर थोड्या वेळ विचार करत," पण तीला नॉनव्हेज जमत नाही...उपासही सोडायचा असेल आणि मला माहित आहे...ती बाहेरून एकदा थकून आली का तीला बाहेर जायची अजिबात इच्छा होत नाही..
नीर, विचार करत होता.. इतक्यात तो परत गाडीवर बाहेर जातो.

इकडे शीखी नीरला खिडकीतून बघत होती, ती घड्याळात बघत...
शीखी-" याचे पाय घरात अजिबात टिकतच नाही.. हा तर... क्षणभरही घरात बसू शकत नाही..जाऊदे मला काय करायचं... पण ती जेव्हा घड्याळात बघते तेव्हा रात्रीचे साडेदहा झाले.. भुकेमुळे तिला झोप येत नव्हती.
शीखी- काय माहिती... या लोकांना नॉनव्हेज कस आवडतं... दुसऱ्या प्राण्यांचा जीव घेण आणि त्याला ताव मारून खात बसणार... मला तर अजिबात आवडत नाही.

ती मोबाईल हातात घेत, "बाहेरून काही ऑर्डर करू का...परत मोबाईल खाली टाकत...नाही नको तो ॲप डाऊनलोड करा.. तिथून ऑर्डर करा त्यापेक्षा आठ तासाचा तर प्रश्न आहे सकाळी लवकर  नाश्ता करता येईल.

ती बेडवर पडते...क्षणभरासाठी शीखीचा डोळा लागतो..
तेवढ्यात तीला आठवते का श्रावणीने शीखीला नीरचा अंगावर ढकलेलं आणि त्याचे हात तिच्या कंबरे भोवती होते...तेव्हा तिच्या मनात कसतरी झाला होतं...

नीरचा कणखर स्पर्शाला शीखीच बेभान मन रोखू शकत नव्हतं....
शीखी विचार करत होती.. तिला श्रावणीचा राग यायला हवा होता; पण तिला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं...
उलट हसू येत होतं. कारण तिला माहित आहे श्रावणी आणि शुभम शीखीला खूप जीव लावत असे....
त्यामुळे त्यांच्या या छोट्या छोट्या खोड्या पण तिला कौतुकास्पद वाटायच्या.

एवढ्यात शीखीच्या दारावरती बेल वाजली ती दार काढते तर समोर शिपाई होता..
तो तिच्या हातात जेवण्याचे पॅकेट देत,
"मॅड,म तुम्ही रात्री काहीच खाल्लं नव्हतं.. त्यामुळे तुमच्यासाठी हे मागवण्यास सांगल.
शक्यता शीखी शिपायाला  विचारणार इतक्यात तो तिथून लवकर निघून जातो.

शीखी त्यावरचं बिल बघते तर खाली नीर च नाव होतं..
ती नकारार्थी मान हलवत, "याला काय वाटतं, यांने आणून दिलेलं मी खाणार...?
ती बाजूच्या टेबलावर ते अन्न ठेवते; पण पोटातील भूक तिला शांतही बसू देत नव्हती.
शीखी स्वतःला," नकोय मला कोणाचे उपकार... मी स्वतः जाऊन पार्सल आणून घेते किंवा ऑनलाईन ऑर्डर करते..
असं म्हणून ती मोबाईल हातात घेते पण थोडा विचार करत..." आपण ऑनलाईन ऑर्डर करायचं आणि हे पण वाया जायचं... नाही नको जाऊ दे कोणी पण असेना पण... अन्न ते अन्नच असतं असं म्हणून ती ते पार्सल काढते.

शीखी, पार्सल काढल्यावरती बघते का समोर महाराष्ट्रीयन जेवण होतं... तिच्या डोळ्यात पाणी आलं...
शीखी-" म्हणजे याला अजूनही माहित आहे का मला हे जेवण आवडतं.?"
शीखीचे डोळे पाणावतात...ती त्यातील भाकरीचा तुकडा हातात घेत.. नीर...तू...मा ...माझ्या छोट्या... छोट्या गोष्टीची ऐवढी काळजी घेतोस... तर मला या वनवासात एकटीला का सोडला